आदरणिय श्री मोदीजींचे कालचे भाषण

Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44

भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.

जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न

या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.

बाकीचे मुद्दे म्हणजे आत्मनिर्भर हे कशाच्या संदर्भात आहे आणि नेमके काय करायचे हे ही समजले नाही. पण आधी कोरोनाचे मुद्दे स्पष्ट झाले तर आभारी राहीन.

धन्यवाद
आपलाच

समोरच्या बाल्कनीतला बंब

Group content visibility: 
Use group defaults

ख-या, गाढवा, शेण खाणा-या असे म्हणायची सवय नाही.

तुम्हाला म्हणीचा साधा सरळ अर्थ समजत नाही असे वाटत नाही

गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यहि गेलं अशा अनेक म्हणी आहेत.

शब्दश: अर्थ घ्यायला गेलात तर तो अत्यंत अश्लील आहे.

पण उगाच झगा अंगावर घ्यायचं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकेल?

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षी नियमित पैसे येत आहेत.

आणि हे देशात पहिल्यांदाच घडत आहे.
काँग्रेस नी फक्त कर्ज माफीच्या नावाखाली नेत्यांची च करू माफ केली.
गरिबांना काहीच मिळाले नाही

चला शांत व्हा सगळ्यांनी आता. आणि बाकीच्या महत्त्वाच्या धाग्यांवर लक्ष द्या. बंडीहिन भाऊंना मोदींनी ट्विटर वर उत्तर दिले की ते इथे पोस्ट करतीलच. त्यावरून बाकीच्या उतावळ्या मंडळींनाही माहिती मिळेल (म्हणजे अर्थमंत्र्यांनी काही माहिती जाहीर करण्याआधीच स्वतःला अर्थमंत्री समजून बेडूक उड्या मारणार्या उतावळ्या मंडळींबद्धल म्हणतोय मी)

मेक इन इंडिया , stand up india आणि आत्मनिर्भर यांत काय फरक आहे?
२०१४ ची घोषणा मेक इन इंडिया , 2016 stand up india तरीपण भारत आत्मनिर्भर झाला नाही का?

IMG-20200513-WA0011.jpg

These international brands have started changing their names, as soon as Modiji told us to go local.

इंग्रजी ही आपली मातृपितृभ्रातृभ्रतारु भाषा आहे ती उच्चारताना जराशी जरी चूक झाली तरी शांतं पापं पण हिंदी ही कशीही कितीही चूकीची बोला BELL फरक पडत नाही.

मै इटलीसे आयी, हिंदी नही आयी|

न्यूनगंड... दुसरं काय?

अगदी बरोबर बिपिन भाऊ.. हे दीड शहाणे लोक सोनिया गांधींना व्याकरण शिकवायला गेले तर त्यांच्या आसपासचे काँग्रेसवाले यांची साग्रसंगीत पूजा करतील. त्यामानाने मोदींना काहीही म्हटले तरीही अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहते...

त्यातल्यात्यात हा एक whatsapp fwd आला. तो ही मराठीत!!!

लाॅकडाऊन कधी एकदा उठतोय आणि मी कधी एकदा घराबाहेर पडून आवडीच्या हाॅटेलात जाऊन पोट फुटेस्तोवर खातोय, कधी एकदा झेडब्रिज वर जाऊन बाईकच्या मागे अंधारात जाऊन बसतोय, कधी एकदा माॅलमध्ये जातोय, कधी एकदा नाईटआऊट ला जाऊन मित्रांसोबत दारू आणि सामिष अन्नात आकंठ बुडतोय....एवढा संकुचित बुद्धिगुणांक असणाऱ्यांसाठी पुढचं विश्लेषण नाही, त्यामुळे त्यांनी पुढचं वाचण्याच्या भानगडीत पडू नये. तसदीच घेऊ नये.

“निर्धार”

‘वीस लाख कोटी रूपयांचं पॅकेज’...

माननीय प्रधानमंत्र्यांच्या या घोषणेनं अख्ख्या जगाच्या घशाला कोरड पडली असेल. कारण, आरोग्याइतकंच महत्व प्रपंच चालवण्यालाही आहे, याचं भान आम्हाला आहे, हे भारताच्या प्रधानमंत्र्यांनी जगाला दाखवून दिलं आहे. ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य शब्दात केलेलं योग्य आवाहन’ असं मी म्हणेन. अत्यंत सूचक शब्दांत प्रधानमंत्री जे बोलले ते बोलणं आत्ता या क्षणाला कोणत्याही जागतिक महासत्तेच्या प्रमुखाला शक्य नाही. जगातले सर्व प्रमुख देश एका विचित्र अनिश्चिततेच्या आणि विमनस्क मन:स्थितीत असताना भारताच्या पंतप्रधानांनी ही घोषणा करावी, हा जगासाठी फार मोठा धक्का आहे.

हे नुसते वीस लाख कोटी रूपये नाहीत. हे एक फार मोठे क्रांतिकारक आव्हान माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिले आहे. आव्हान आहे स्वयंपूर्णतेचे. सुई पासून ते वैद्यकीय उपकरणांपर्यंतच्या सर्व गोष्टींमधील स्वयंपूर्णता..

मी महाराष्ट्रीयन, मी गुजराथी, मी बंगाली, मी पंजाबी, मी बिहारी ही ओळख मिटवून स्वत:ची “मी भारतवासी” एवढी एकच ओळख निर्माण करा, असं माननीय प्रधानमंत्र्यांचं सांगणं आहे. याचाच अर्थ असा की, ‘भेदाभेद अमंगळ’ हे संतवचन आता अंगिकारणं आवश्यक आहे.

सज्ञान झाल्यापासून आठवड्याला किमान २५ तास काम करून स्वत:ची भाकरी स्वत: कमवायला शिकणं अत्यंत गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री सुचवत आहेत. कोणतंही काम हलकंसलकं न मानता ‘जिथे काम तेथे उभा शाम आहे’ असं स्वत:ला समजावून सांगा, असं प्रधानमंत्री सांगत आहेत. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आता आळस आणि निष्क्रीयता झटकून उभं राहिलं पाहिजे, असं पंतप्रधानांचं सांगणं आहे.

लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर घडतंय, ते कोणत्या कारणामुळं? मुख्य कारण आहे ते रोजगार थांबल्याचं. आता ते रोजगार पुन्हा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करायला हव्यात, ही अवाढव्य आर्थिक तरतूद त्याकरिताच आहे. रामसेतूच्या बांधणीच्यावेळी खारीनंसुद्धा तिचा वाटा दिलाच होता. आता सर्वांनीच कष्टरूपानं, बुद्धिरूपानं वाटा दिला पाहिजे, असंच प्रधानमंत्री सुचवत आहेत.

व्यावहारिक पातळीवर कोरोनाचा लढा आता आणणं आवश्यक आहे. आतापर्यंत तो केवळ वैद्यकीय पातळीवरच होता. आता तो सर्वांचा मिळून एकत्र लढा बनला पाहिजे. हे काम माझं नाही, मी इतकं शिकून हे काम का करू, हे माझ्या इभ्रतीला शोभणारं नाही वगैरे जळमटं काढून टाकून सज्ज व्हायला हवं.

आपल्या देशांतल्या प्रत्येक राज्यांत नवे उमदे, धाडसी उद्योजक तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी प्रत्येक क्षेत्रात पाय भक्कमपणे रोवले पाहिजेत. मोबाईल फोन किंवा एकूणच प्रत्येक इलेक्ट्राॅनिक उपकरणाचा प्रत्येक भाग आपल्याच देशात तयार झाला पाहिजे, हे मोठं आव्हान आहे. लघुउद्योग, बचतगट यांना मोठं धाडस करावं लागेल. अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढवावा लागेल. अन्नधान्यासारखंच वैद्यकीय क्षेत्रातही १०० टक्के स्वयंपूर्णत्व मिळवावं लागेल. अर्थव्यवस्थेतलं परावलंबी असणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्याचं मोठं आव्हान आहे. प्रत्यक्ष कामातून निवृत्त झालेल्यांनीही त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेऊन आणखी काही काळ स्वतंत्रपणे काम केलं पाहिजे.
प्रदूषणाची पातळी कमी करणं महत्वाचं आहेच, पण प्रदूषणाचं विकेंद्रीकरण करणंसुद्धा महत्वाचं आहे. लोकसंख्येच्या विषम वितरणावर आणि विषमायोजनावर प्रचंड काम करावं लागेल. हे सगळं प्रधानमंत्री सुचवू पाहत आहेत.

स्वदेशी उत्पादनांवर जोर देणं क्रमप्राप्त आहे. आयफोनपेक्षाही उच्च गुणवत्तेचा फोन आपल्या देशात आपल्या अभियंत्यांनी बनवावा. ॲमेझाॅनच्या कैक पटींनी उत्कृष्ट कंपनी भारतीय तरूणांनी सुरू करावी. पेटंट्स मिळवण्याचा ध्यास भारतीय तरूणांनी घ्यावा. घरोघरच्या सुगरणींनी पुढं यावं आणि पुरणपोळी जगभर विकावी. इथं येऊन शिकावं असं जगभरातल्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे, इतकी गुणवत्ता शिक्षकवृंदानं सिद्ध करावी. शिकवण्याच्या पद्धतीचं सुद्धा पेटंट मिळालं पाहिजे. भारतीय साहित्यकृतींचा अनुवाद जगभर झाला पाहिजे. भारताचा व्हिसा मिळावा याकरिता रांगा लागल्या पाहिजेत आणि तो सहजासहजी मिळत नाही असं वातावरण निर्माण झालं पाहिजे. चायनीज नूडल्स आणि चाॅप्सी जर भारतातल्या लहान गावातही मिळत असेल तर भाजणीचं थालिपीठ आणि साटोऱ्या जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक शहरात जाऊन विकण्याची तयारी करायला हवी. संधी दारात उभी आहेच, आपली मानसिक तयारी हवी.

गुणवत्ता, सचोटी, प्रामाणिकपणा यांत एक कणभरही तडजोड न करण्याची नव्या उद्योगधर्माची दीक्षा सर्वांनी घेतली पाहिजे. रस्ता स्वच्छ करणारा आणि साॅफ्टवेअर स्वच्छ करणारा दोघांनाही सारखीच प्रतिष्ठा आम्ही देतो, हे जगाला समजलं पाहिजे. काम करणाऱ्याचा सन्मान समाजात वाढला पाहिजे. काम न करणं, निष्क्रिय होणं, आळस करणं, आयतं बसून खाणं या गोष्टींना अतिशय निषिद्ध मानणं समाजात रूजायला हवं. हा फार महत्वाचा बदल करावाच लागेल. ‘आमचं बाळ अजून लहानच आहे, त्याला कसं कामाला लावणार?’ किंवा ‘तू काम करण्याची काही गरज नाही, तुझा बाप खंबीर आहे पैसा कमवायला’ ह्या वाक्यांचा त्याग पालकांनी करावा.

आपल्या मुलांना अत्यंत साधं रहायला शिकवा आणि स्वत:ही अत्यंत साधी राहणी स्वीकारा. काटकसरीची सवय लावून घ्या. गुंतवणुकीची सवय आपल्या कुटुंबाला लावा. प्रत्येक कुटुंबानं स्वदेशीचा स्वीकार करून रोज एक रूपयाची बचत केली आणि त्याच रूपयाचा बॅंकेत भरणा केला तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला भारतापुढे लोटांगणं घालावी लागतील. जगातले सर्व प्रमुख उद्योजक आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी धडपडतील. हे सगळं शक्य आहे. फक्त मानसिकता बदलण्याची गरज आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा विचारही मनात आणू नका. हातातला हा एकांतवासाचा काळ दवडू नका. नियोजनावर जोर द्या. नवनव्या कल्पनांचा विचार करा. डोकं चालवा. तज्ञांना विचारा. चर्चा करा आणि आखणी करा. फुटकळ न्यूज चॅनेल्स किंवा टुकार सिनेमे पाहत लोळत पडण्यापेक्षा हे खूप गरजेचं आहे.

आपल्यापैकी प्रत्येकात एक विशेषता आहे. तुम्हांला काहीच येत नाही असं समजू नका. तुमच्यातल्या त्या विशेष क्षमतेचा शोध घेऊन उपयोग केला तर हा उत्कृष्टांचा देश होईल, याची खात्री बाळगा. आपलं स्वाॅट ॲनालिसिस करून या महासंग्रामात उडी घेण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. धावणं, चालणं, रांगणं, सरपटणं यापैकी ज्याला जे जमेल, जितकं जमेल तितका प्रयत्न त्याने करावा. हे समजून घ्यायला हवं.

नरेंद्रजी मोदी बोलत असताना कुसुमाग्रजांची कविता आठवली.... कवितेचं नाव आहे ‘निर्धार’...

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड दुर्घट चढलेले,
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासक्ती समर्थता बलिदानाची,
पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२||

करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधटिळा,
शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचून अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||४||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||५||

जंगल जाळापरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळातुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशाण भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||६||

बाकी सविस्तर लिहीनच.... पण “घरोघरी कर्ते भारतीय जन्मती, जगद्व्याळ पैजां जिंकती” हे आता घडवायला हवं. असंच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी स्पष्ट सांगताहेत. आता उभे राहूया अन् नवा भारत घडवूया....!

मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

आत्मनिर्भर बद्दल असंख्य विनोद वाचले.

काही चांगले होते काही भिकार आणि काही पूर्वग्रहदूषित होते.

विनोद बाजूला ठेवला तर बहुसंख्य लोकांशी बोलताना आत्मनिर्भरचा अर्थच त्यांना समजला नाही असे लक्षात आले.

त्यास्तव या शब्दाचा मला जाणवलेला अर्थ मी येथे लिहीत आहे.

आत्मनिर्भर म्हणजे *तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता*

आज कोणताही देश तुम्हाला अणुबॉम्ब चे, उपग्रहाचे किंवा क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान देत नाही.

हे तंत्रज्ञान तुम्ही स्वतःच्या देशातच विकसित करावे लागते.

या बाबतीत भारत बऱ्यापैकी स्वयंपूर्ण (आत्मनिर्भर) आहे.

जर आपल्याला अणु पाणबुडी, अणू बॉम्ब किंवा आंतर खंडीय क्षेपणास्त्रे स्वतः तयार करता येतात तर
मोटार कारचे इंजिन गियर बॉक्स, मोबाईल फोन किंवा वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ स्वतः बनवता येणार नाहीत का?

असेच औषधे, किमती रसायने, शेतीविषयक तंत्रज्ञान यातही करता येईल.

फ्रेंच बनावटीच्या एका डिझेल पाणबुडीची किंमत 5000-6000 कोटी आहे तर भारतातच बनवलेल्या अरिहंत या आण्विक क्षेपणास्त्रे असलेल्या अणूपाणबुडीची किंमत सुद्धा फक्त 6000 कोटी आहे.

म्हणजेच जर आपण उच्चकोटीचे तंत्रज्ञान देशातच विकसित केले तर आपल्याला इतर देशांना मोठ्या प्रमाणावर पैसा द्यायला लागणार नाही.

उदा. आपल्याकडे सगळी महागडी वैद्यकीय उपकरणे ही सर्व आयात केलेली आहेत.

याऐवजी हीच उपकरणे आपण स्वतः बनवू शकलो तर आणीबाणीच्या वेळेस आपल्याला दुसऱ्या देशांकडे तोंड वेंगाडायला नको.

सध्या आपली उपकरणे बिघडली तर सुटे भाग परदेशातून येत नाहीत म्हणून उपकरणे/ यंत्रे बंद आहेत.

यासाठी शक्य असेल तेथे आपण सर्व भारतीय उत्पादकतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

हा आत्म निर्भरतेचा खरा अर्थ आहे.

पहा पटलं तर

गंगाजलाचा उपयोग कोविड वर होईल का हे पहायचा सल्ला वैज्ञानिकांना कुणी तरी दिला होता. त्यांनी तो मानला नाही.

ह्या देशाचे केंद्रीय सरकार वाईट.
ह्या देशाचे पंतप्रधान वाईट
ह्या देशाची संस्कृती मागास.
ह्या देशच प्राचीन ज्ञान बोगस.
ह्या देशात काहीच बनत नाही सर्व चीन मध्ये बनत.
ह्या देशात अल्प संख्याक असुरक्षित .
एवढी सर्व वाईट परिस्थिती आहे इथे तर उलथा ना ह्या देशातून कशाला rahatay

मी महाराष्ट्रीयन, मी गुजराथी, मी बंगाली, मी पंजाबी, मी बिहारी ही ओळख मिटवून स्वत:ची “मी भारतवासी” एवढी एकच ओळख निर्माण करा

हे परप्रांतीय मजुरांना नावे ठेवणाऱ्यांनी लगेच अमलात आणावे.

मोदींच्या दिवे बंद करण्याच्या टास्क वेळी, इथले जे लोक Electrical Engineer झाले होते ते लोक मोदींच्या कालच्या भाषणानंतर अचानक अर्थतज्ञ झाले आहेत.
---

लष्करी वैद्यकीय अधिका-यांबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. त्यात काही नासके असले तरी इतर सर्वच प्रतिकूल तापमान, अपु-या सोयी यांची पर्वा न करता ऐन युद्धातही दिवसरात्र आपली सेवा देत असतात. काही प्रशासकीय पदं भूषवीत असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात अरोगन्स असतो. पण ते ही आवश्यक असते,
मात्र असे काही अधिकारी मोदीभक्ती तल्लीन झाले की भयानक रसायन तयार होतं. लष्करी सेवा संपल्यानंतरही तोच अरोगन्स काय कामाचा ?

गंगाजलाने कोरोना बरा होतो याला बरं मग प्रश्न विचारायचा उर्मट पणा जो वैद्यकीय क्षेत्रातला मनुष्य करत असेल त्याने तंत्रज्ञानात आत्मनिर्भर व्हायच्या गप्पा सांगाव्यात एव्हढा भीषण विनोद आजवर झाला नाही आणि होणार नाही.

बरं मग असं उर्मटपणे विचारणा-यांनी गंगाजलाने कोरोना बरा होतो का आणि कसा हे सांगावे.

तीन लॉकडाऊन नंतर हातावर पोट असलेल्या सर्वांचे कंबरडे मोडले आहे. फक्त परप्रांतीयच कशाला कोकणातले चाकरमानीही गावी निघाले आहेत. त्यांनीही रेल्वे रूळाचा रस्ता धरला आहे. रस्त्याने पोलीस मारतात. खोलीचं भाडं , वीजेचे पैसे नुसतं बसून भरायला कुणी वेडे नाहीत.
मोदी हए काही राजघराण्यातून आलेले नाहीत. त्यांना ही परिस्थिती नक्कीच माहिती आहे.

त्यांच्या भाषणात या लोकांसाठी काही असेल अशी अपेक्षा करणे हा गुन्हा आहे का ? की मी काहीही बोलेन चुकलं तर आयटी सेल वाल्यांनी सांभाळून घ्यायचं हा करार आहे ?

देश आत्मनिर्भर होईल की नाही याचा कोरोना काळात जो लॉकडाऊन वाढवायचा आहे त्याच्याशी काय संबंध आहे ? कामधंदे बंद आहेत. ते कसे हळू हळू सुरू करणार हे सांगायचेय की शेखचिल्ली प्रमाणे काय स्वप्नं बघायची ते सांगायचं ?

जीवन पूर्ववत झाल्यावर ठोस प्लान घेऊन सांगा की. नको कोण म्हणतं ?
नशीब आपल्याला मंगळावर वस्ती करायचीय असे म्हणाले नाहीत. कोरोना काळात लोकांना दिलासा हवा आहे. त्यांच्या सधन भक्तांना आवडेल तेच इतर सर्वांना आवडेल का ?

लोक अक्षरशः शिव्या घालताहेत.

२० लाख करोडचं पॅकेज निर्मला सीतारामन दररोज पत्रकार परिषद धेऊन जाहीर करणार आहेत. त्यांच्याकडे सगळी योजना तयार आहे, पण देशाला एवढे सगळे उपाय एकदम कळणार आणि झेपणार नाहीत म्हणून त्या स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत.

काल सांगितलेल्या गोष्टींपैकी काही रिलीफ मे जर कशी आहेत ते समजून घ्यायला आवडेल.

Rs 18,000 cr refunds given to tax payers; 14 lakh taxpayers benefitted from clearing of refund dues, says FM -

टॅक्स रिफंड द्यायचेच असतात. दरवर्षी दिले जातातच. मग याचा कोरोनाशी काय संबंध ?

पगारेतर टीडीएसचा रेट कमी करून २५% केला. पण यावर करदात्याला टॅक्स भरावा लागेलच - कदाचित तिमाहीतल्या करभरतीच्या वेळी .

तीन महिने भविष्य निर्वाहनिधीसाठी पगारातून कापली जाणारी रक्कम २४% ऐवजी २०% असेल. भविष्य निर्वाह निधीत जमा होणारा पैसा त्या त्या पगारदाराचाच असतो. तो न कापता त्याला नगद दिली म्हणजे तो ती खर्च करू शकेल. पण यात सरकार काय खर्च करतंय.
भविष्य निर्वाह निधीत जाणार्‍या रकमेवर करबचत होत असे. आता या कमी बचतीवर आयकर लागेल.

पगारदार लोकांनी एम्प्लॉयरचा कमी झालेला २% वाटा त्यांना नगदीत मिळाला की तो एम्प्लॉयरचा फायदा ते बघून सांगा.

MSME सेक्टरला ३ लाख करोडची क्रेडिट गॅरंटी दिली आहे. क्रेडिट गॅरंटी म्हणजे कर्जदाराने कर्ज बुडवलं तर सरकार ते भरेल. उद्देश - बँका आणि वित्त संस्थांनी लघु उद्योगांना कर्ज द्यावं. पुन्हा इथे सरकारचा प्रत्यक्ष खर्च पुढे कधीतरी होईल आणि तो बुडालेल्या कर्जाइतका असेल.

वीजवितरण कंपन्यांना दोन संस्था करवी कर्ज देऊ केलं आहे. यातही सरकारला कसलीच तोशीस नाही.

२० लाख करोड या भल्या मोठ्या आकड्यात सरकारने स्वतः खर्च केलेला पैसा फारच कमी आहे.

Pages