आदरणिय श्री मोदीजींचे कालचे भाषण

Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44

भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.

जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न

या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.

बाकीचे मुद्दे म्हणजे आत्मनिर्भर हे कशाच्या संदर्भात आहे आणि नेमके काय करायचे हे ही समजले नाही. पण आधी कोरोनाचे मुद्दे स्पष्ट झाले तर आभारी राहीन.

धन्यवाद
आपलाच

समोरच्या बाल्कनीतला बंब

Group content visibility: 
Use group defaults

तिथे जे भाषण आहे ते समजले नाही म्हणून इथे विचारले आहे. जर मोदीजी स्वत: उत्तर देणार असतील तर काही म्हणणे नाही.

आत्म निर्भर म्हणजे नक्की काय? महात्मा गांधीजींची स्वदेशीची, स्वयंपूर्ण गावाची थिअरी होती तसेच का? का काही नवे कराय्चे आहे?
https://www.gandhiashramsevagram.org/voice-of-truth/gandhiji-on-self-suf... पुस्तक विकत घेउन वाचते.

टास्क काय दिले आहे यावेळी?
२० लाख कोटी म्हणजे नक्की किती. प्रत्येक क्षेत्रास किती मिळतील?
मुळात लॉक डाउन एक्स्टें ड हो णार का? किती दिवस? ते सांगा. त्या प्रमाणे भाजी किराणा आणून ठेवता येइल.

अमा, Lockdown extend होणार आहे. नवीन rules असतील म्हणाले. तुमच्याकडे अजून नीट दुकानं उघडली नाहीत का? होम delivery नीट मिळत नाही का? मुंबईतली परिस्थिती पाहता जे आम्हाला लागू असेल ते तुम्हाला लागू असेलच असं नाही. बाकी सगळे नियम हे जे पाळतात त्यांच्यासाठी असतात.

मी वाचलं त्यानुसार लॉकडाउन.४ चे निर्णय राज्यांनी घ्यायचे आहेत. म्हणजे त्यांनीही आत्मनिर्भर व्हायचं आहे. Wink
https://indianexpress.com/article/india/the-math-its-10-of-gdp-but-less-...
२० लाख करोडची फोड
- रिझर्व बँकेने फेब्रुवारीत उचललेल्या पावलांमुळे अर्थव्यवस्थेत वाढलेली तरलता ८ लाख करोड
अर्थमंत्र्यांनी मार्चमध्ये जाहीर केलेले पॅकेज - १.७ लाख करोड

आत्मनिर्भर होणे म्हणजे शक्य तेवढ्या सर्व वस्तू चे उत्पादन भारतात करणे तंत्र ज्ञान विकसित करणे.
बाकी देशावर अवलंबून राहण्याची स्थिती बदलणे
जसे ppe किट्स आणि न९५ मास्क आपण २ लाख पर्यंत रोज बनवत आहोत.
बाहेरून मगवण्याची गरज नाही

तिथे जे भाषण आहे ते समजले नाही म्हणून इथे विचारले आहे. जर मोदीजी स्वत: उत्तर देणार असतील तर काही म्हणणे नाही.

मोदीजींनी मायबोलीवर येऊन ढेरपोट्याला उत्तर द्यायला हवंय?

मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

काही नाही हो. कोरोनाव्हायरस, लॉकडाऊन, त्यामुळे इथून पुढे निर्माण होणारे भीषण प्रश्न, चिंताजनक असलेली अर्थव्यवस्था ह्या सगळ्यावर २० लाख कोटीची पोकळ फुंकर घालून नेहमीप्रमाणे पब्लिक ला उल्लू बनवले आहे. कुणाचाही विश्वास राहिलेला नाही यांच्यावर. यांना गांभीर्याने घेण्यात अर्थ नाही हे जनता कळून चुकली आहे. कालपासून त्या भाषणाची टिंगलटवाळी करणारे मिमीजचा पूर आला आहे.

आणि तुम्ही हा धागा आरोग्यम् धनसंपदा मध्ये का सुरु केलाय? मोदींच्या भाषण आरोग्यासाठी घातक असतेच. पण तरीही हा धागा कृपया विरंगुळा विभागात हलवा.

२०२० वर्षासाठी २०:०० वाजता सुरू केलेल्या भाषनातल्या २० व्या मिनिटाला म्हणजे २०:२० वाजता २० लाख करोड पॅकेजची घोषणा . मास्टरस्ट्रोक - इति एक भाजप नेता.

२०२० वर्षासाठी २०:०० वाजता सुरू केलेल्या भाषनातल्या २० व्या मिनिटाला म्हणजे २०:२० वाजता २० लाख करोड पॅकेजची घोषणा>>>>

सॉलिड.... काय जबरदस्त निरीक्षण.... विलक्षण आहे...

खरे साहेब, माझी माघार. तुमची फुत्कारी, विखारी भाषा कितीही सौजन्यपूर्ण असली तरी तिच्यावर कारवाई होणार नाही. माझा पास. अजून सौजन्य दाखवा. अजून पास. मी घाबरलो.

ज्यांच्या वर जबाबदारी काही ते उपाय योजना करण्यात व्यस्त आहेत .
संकट मोठे आहे पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
आणि जे कोणतीच जबाबदारी स्वीकारत नाहीत ,कोणतेच सहयोग करत नाहीत ते फक्त टिंगल टवाळी करत आहेत.

तुमची फुत्कारी, विखारी भाषा ?

तिथे जे भाषण आहे ते समजले नाही म्हणून इथे विचारले आहे. जर मोदीजी स्वत: उत्तर देणार असतील तर काही म्हणणे नाही.

हे तुमचंच वाक्य शब्दशः लिहिलं आहे.

त्यात माझं काहीही योगदान नाही.

२०२० वर्षासाठी २०:०० वाजता सुरू केलेल्या भाषनातल्या २० व्या मिनिटाला म्हणजे २०:२० वाजता २० लाख करोड पॅकेजची घोषणा . मास्टरस्ट्रोक - इति एक भाजप नेता. ----- नाव सांगा हो, लाजू नका. नाहीतर आम्हाला वाटेल तुम्हीच छुपे भक्त की काय !

खरे साहेब. माझा पास. तुम्ही म्हणाल तेच खरे. मोदीजी तुम्हाला ढेरपोट्या म्हणाले असतील तर मी तुमची माफी मागतो.

सर्वांच्या सहायोगाची गरज आहे संकटात न बाहेर येण्यासाठी .
तो पण सहयोग द्यायचा नसेल तर शत्रू राष्ट्र सारखे वागू नका.
शांत घरात आराम करा.
वीस लाख करोडच काही हिस्सा तुम्हाला मिळेल.
ते घेण्यासाठी मात्र हक्कानी पुढे या.
आणि लाईन मध्ये सर्वात पुढे उभे रहा.
तो तुमचा हक्काचं आहे

नाव लक्षात राहिलं नाही, काल ट्विटरवर पाहिलं होतं.
द टेलिग्रा फनेही लिहिलंय याबद्दल आणि ट्विटरवर लोक याचा संबंध न्युमरॉलॉजीशी जोडताहेत.
पाच वाजता पाच मिनिटे, नौ वाजता नऊ मिनिटे हेही आहेच.

ते राज्यांच्या हक्काच्या जीएसटीचे २० की ३० हजार कोटी वेळेवर का मिळत नाहीयेत?

आधी केलेल्या वायद्याचे पैसे देता येत नसतील तर नवीन घोषणा केलेली रक्कम कुठून येणार?

मोदीजी तुम्हाला ढेरपोट्या म्हणाले असतील

हायला

हे म्हणजे आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं

अहो आपलं स्वतःचं नाव आपण ढेरपोट्या ठेवलंय ना?छज्जातील बंडीहीन ढेरपोट्या

मग माझ्या (नसलेल्या) ढेरपोटाचा संबंध कुठे आला?

आणि मोदीजींनी माझ्यासारखया य:कश्चित माणसाचा मुलाहिजा ठेवायचे काय कारण हो?

माझ्यावर जे संस्कार आहेत त्याला अनुसरून कुणाचे आडनाव खरे आहे म्हणून त्याला ख-या, गाढवा, शेण खाणा-या असे म्हणायची सवय नाही. ज्याचे जसे संस्कार त्याने तसे प्रतिसाद द्यावेत.

देशात नवीन उद्योग येणार, कामगारांची पिळवणूक करून स्वस्त उत्पादने बाजारात आणणार,ती आपण विकत घ्यायची आणि कोरोनाची तमा न बाळगता तोंडावरील मास्क काढून " आत्मनिर्भर" होऊन आपल्या " व्होकल कॉर्ड " ला ताण देऊन शक्य तेव्हढ्या मोठ्याने ओरडून जगाला सांगायचे, " आम्ही कसे वापरतो तसे तुम्ही पण वापरा ना " , आणि प्राण सोडायचा. व्होकल ने " लोकल ते ग्लोबल " जाहिरात देशातील जनतेने करायची , कारण नवीन उद्योग आत्मनिर्भर नसल्याने त्यांना जाहिरातीवर पैसा खर्च करता येणार नाही. तूम्ही मरा.

इनामदार साहेबांनी
जे चित्र टाकले आहे आणि ते मजूर दलित आहेत असे वर्णन केले आहे.
त्यांची जाती ची प्रमाणपत्र चेक करायला
पोस्ट करता गेला होता का?
की फक्त जातीयवादी पोस्ट टाकून मोदी कसे जातीय वादी आहेत हे दाखवण्यासाठी असले उद्योग केले आहेत.

Pages