आदरणिय श्री मोदीजींचे कालचे भाषण

Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44

भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.

जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न

या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.

बाकीचे मुद्दे म्हणजे आत्मनिर्भर हे कशाच्या संदर्भात आहे आणि नेमके काय करायचे हे ही समजले नाही. पण आधी कोरोनाचे मुद्दे स्पष्ट झाले तर आभारी राहीन.

धन्यवाद
आपलाच

समोरच्या बाल्कनीतला बंब

Group content visibility: 
Use group defaults

१९६५ मधे जवाहरलाल नेहरु यांचे निधन झाले....

५५ वर्षांनंतर.... आत्मनिर्भरता सिद्ध करण्यासाठी नेहरुंवर धादांत खोटे आरोप करावे लागणे यासारखे दयनिय अवस्था भक्ताची कुणी केली ?

राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांचे लिखाण सहज उपलब्द आहे. नेहरु यांना भारतरत्न देण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा होता. वाचकांना खरी माहिती मिळणे हा माझा उद्देश आहे.

Chacha_Nehru_BharatRatna.jpg

On the lighter note सोनिया गांधींच्या हिंदी वर हसणार्यांनी कधी निर्मला सितारामांच हिंदी ऐकलं आहे का...
उत्पादन चली जायेगी , रोजगार चली जायेगी Happy
पण ह्या बाईंच्या बोलण्यात जबरदस्त arrogance जाणवतो.

(१७ मे २०२०)
निर्मला सीतरामन उत्तर देत आहेत...
ठीक है....

२० लाख कोटी पॅकेज चे एक एक पैलू बाहेर येऊ लागलेत. कसेही करून पॅकेजच्या आकडेवारी जवळ जाण्यासाठी कोरोना पूर्वीच्या योजनांचे आकडे मिळवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. खोटं रेटून बोलत आहेत. कसे ते बघा.
Talking about the measures taken for the agriculture sector in the past two months, the Finance Minister stated that the Centre has taken many measures to support farmers, including minimum support price, purchases of Rs 73,300 crore during the two months of lockdown. Apart from this, Rs 18,700 crore under the PM Kisan Fund transfers were made and Rs 6,400 crore of payment in crop insurance have been made.
१) लॉक डाऊन च्या दोन महिन्यातील हमी भावाने ७३,३०० कोटी रुपयाची खरेदी केली. ह्यात नवीन काय दिले?
२) पि एम किसान फंड योजने अंतर्गत १८,७०० कोटी हस्तांतर केले. ह्यात नवीन काय दिले?
३) ६,४०० कोटी पीक विमा दिला. दिला म्हणजे? सरकारचा काय संबंध? विम्याचा हप्ता शेतकरी भरतो , त्यामुळे त्याला विमासंरक्षण मिळते. मुळात शेतकऱ्यांकडून किती पीक विमा हफ्ता गोळा झाला आणि प्रत्यक्षात किती पीक नुकसानभरपाई दिली ह्याचेही आकडे जाहीर करा. सगळी आकड्यांची जुमलेबाजी चालू आहे. देश कोणत्या कठीण परिस्थितीतून जात आहे आणि सत्ताधारी खुशाल खोटं बोलून जनतेला खोटी स्वप्ने दाखवत आहे.

कोविड सुरू झाल्यापासून सरकारने जो काही खर्च केला तो कोविड पॅकेज मध्ये अंतर्भूत केला ( घोषणा करतानाच हे सांगितलं होते अर्थात भाषण नीट ऐकाणार्याना ते समजले) तर काहींच्या पोटात का दुखावे?

जनता मूर्खच आहे
तिने दोन वेळेस श्री मोदींना निवडून दिले आहे आणि आता लिब्रांडू ना भीती आहे की असंच चालू राहिलं तर 2024 मध्ये जनता परत त्यांनाच निवडून देणार.
यामुळेच जनतेला शहाणे करण्यासाठी लिब्रांडू फ़ुरोगामी एवढा कंठशोष करत आहेत.
पण जनता काही केल्या सुधारत नाहीये.

मला वाटलेला तोच प्रश्न तुम्ही विचारला आग्या भाऊ. पण तो मला विचारण्या ऐवजी अर्थमंत्र्यांना विचारा ट्विटर वर. लवकर उत्तर मिळेल. आणि जरा मोदींची भाषणे नीट ऐकत जावा.. म्हणजे तुम्ही जे वर जुमलेबाजी च्या नावाखाली लिहिलंय तसे खोटे आरोप करण्यची वेळ येणार नाही. कोविडकाळात आतापर्यंत केलेला खर्च वीस लाख कोटींच्या पॅकेज मध्ये अंतर्भूत असेल असे मोदींनी भाषणात स्पष्ट सांगितले होते.

तुम्ही शाने आहेत ना? मग पीक विम्याला ह्या पॅकेजमध्ये का जोडले?
ते खरेला कळणार नाही. त्याच्या दृष्टीने पिकविमाचा पैसा शेतकरी स्कॉर्पिओ घ्यायला वापरतो.

कशासाठी ही आकड्यांची जुमलेबाजी? ६००० वर्षातून तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते ,त्यात नवीन काय? आणि पॅकेज चा अर्थ काय?

ही पहिली वेळ नाहीच पॅकेजची. जुगाड करून चालू असलेल्या सर्व योजनांचे पैसे पण पॅकेजमधे सांगायचे.
कोविडसाठी वेगळा खर्च काय आहे ?
समजा कोविड नसता तर यातल्या ज्या योजना चालूच होत्या त्या चालूच राहिल्या असत्या ना ? पास्वानांनी योजना जाहीर केली ती कोविडच्या आधी. त्या वेळी कोरोनाचा काय संदर्भ होता ?

आग्या भाऊ, पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सांगितले त्याप्रमाणे भाषणानंतर रोज आतापर्यंतचा निधी कसा खर्च झाला व यापुढे उरलेला निधी कसा खर्च केला जाईल याची माहिती अर्थमंत्री देत आहेत हे आम्हाला माहीत आहे.

तुम्हाला ती जुमालेबाजी वगैरे वाटत असेल तर त्याला कोणाचा काय इलाज आहे? चालुद्या.

41fKcppxeEL[1].jpg

पंतप्रधान आणि अर्थमंत्री काय म्हणतात ते कळते हो आम्हालाही. परंतू ही आकडेवारी जोडून नक्की काय सांगायचे आहे त्यांना? उगाच कोविडचे भांडवल करून खर्चाचे आकडे फेकत आहेत.
पॅकेज म्हणजे " बंडल " .

2024 मध्ये श्री मोदी परत येणार आहेत या भीतीने सर्व लिब्रांडूंचे धाबे दणाणले आहेत म्हणून कोल्हेकुई चालू आहे.

च्यायला म्हणजे इतकी वर्षे भाजप निवडून येत नव्हती तेव्हां याचं काय काय दणाणलं होतं ?
अनुभवाशिवाय नाही बोलत नाही माणूस

त्याच्या दृष्टीने पिकविमाचा पैसा शेतकरी स्कॉर्पिओ घ्यायला वापरतो.
बाब्बो! हे माहीत नव्हते. गुग्गुळ वैद्य लै हुश्शार.

ते थाळ्या वाजवणे दिवे लावणे इ मध्ये काहीही अर्थ नाही हे सामान्य मोदी समर्थकांना माहिती होतेच
परंतु प्रत्यक्ष जनतेचे श्री मोदींच्या कामाला किती समर्थन आहे हे त्यातून स्पष्ट झाले.

एक लिब्रांडू पत्रकाराने दुःखी शब्दात तेच लिहिले होते. त्याच्या शब्दात हे जनमत चाचणी ( referendum) होती आणि त्यात मोदी बरेच यशस्वी झाले. त्यांची लोकप्रियता 85% वरून 93 % पर्यंत गेली.

या मुळेच लिब्रांडू आणि फ़ुरोगामी लोकांची जळजळ होत आहे आणि ते उच्चरवाने रडारड करत आहेत.

बाब्बो! हे माहीत नव्हते. गुग्गुळ वैद्य लै हुश्शार.
गुग्गळ वैद्य हे परफेक्ट नाव आहे खरेसाठी.

कालच्या घोषणेनंतर आज निफ्टीपैकी कोल इंडियाचा शेअर सगळ्यात जास्त पडलाय.
निर्मलाबाईंच्या पाच दिवसां च्या मालिके नंतर मार्केट किती वर की खाली?

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेत तयार झालेल्या विमानाचा पहिला फोटो समोर आला आहे. मोदींच्या सुरक्षेचा विचार करून VVIP Boeing 777-300 ER या विशेष विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या यातील दोन विमान तयार झाली आहेत. या विमानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोग्राफर अॅडी एग्लॉफ यांनी हा फोटो घेतलाय.

https://maharashtratimes.com/business/business-news/viral-pictures-pm-na...

Pages