Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मधुरा बोबडं बोलते. रेसिपीज
मधुरा बोबडं बोलते. रेसिपीज पण बंडल असतात. हेब्बर खरंच छान आहे.
मधुरा बोबडं बोलते.>> नाही हो.
मधुरा बोबडं बोलते.>> नाही हो. ती सची भाषा बोलते.
स ची भाषा म्हणजे?
स ची भाषा म्हणजे?
हेब्बार चा चेहरा दिसत नाही.
हेब्बार चा चेहरा दिसत नाही. तिचे फक्त हात दिसतात आणि तिची लांबसडक बोटं मला खूप आवडतात.
मधुरा जे बोलते ते बोअर होतं खूप.
मी परवा कोणतीतरी साईट बघून
मी परवा कोणतीतरी साईट बघून सोयाबीन चिली बनवली होती, भारी झाली होती! फोटो काढायचा राहिला.
मुळात सगळ्या पाककृती,
मुळात सगळ्या पाककृती, हेअरस्टाईल, स्कार्फ स्टाईल दाखवणाऱ्या बायांनी हे लक्षात घ्यायला हवं की लोक घाईत काहीतरी टीप शोधायला त्यांचे व्हिडीओ बघतात.व्हिडीओ ला पुस्तकासारखी 'प्रस्तावना,अनुक्रमणिका, मुख्य विषय,परिशिष्ट' असं नसून मुख्य विषय थेट असला तरी कोणी शिक्षा करणार नाहीये याची जाणीव हवी.
अर्चना hebbar असं नाव आहे
अर्चना hebbar असं नाव आहे तिचं, engineer आहे
तिचा नवरा व्हिडिओस shoot आणि edit करतो
शाळेत असताना रफ ची भाषा
शाळेत असताना रफ ची भाषा बोलायचो तसच स ची भाषा.
मधुरा जे बोलते ते बोअर होतं
मधुरा जे बोलते ते बोअर होतं खूप. >>> होना. न आणि ण चा पण खूप घोळ घालते ती, आवाज छान आहे पण कानाला तिचे काही शब्द त्रास देतात, अतिलाडीक बोलणंही नको वाटतं कधी कधी.
मुळात ती केस सोडून कीचन मध्ये
मुळात ती केस सोडून कीचन मध्ये काम करते ते ईरिटेट होत
.
मला निशामधुलिका च्या रेसीपीज
मला निशामधुलिका च्या रेसीपीज वाचायला आवडतात पण व्हिडिओ प्रचंड कंटाळवाणे वाटतात.
हेब्बार चा फोर्मॅट आवडला.कुणाल कपुरचे पण व्हिडिओ आवडतात.
Yummy curry पण hebbar सारखेच
Yummy curry पण hebbar सारखेच आहे. मधुराच्या रेसिपीस खुप lengthy असतात.
<<मुळात ती केस सोडून कीचन मध्ये काम करते ते ईरिटेट होत Happy .>> खरंच
सारखं मस्स्सतं परतुया...
सारखं मस्स्सतं परतुया....मस्सतपैकी शिजलंय...मस्स्त झालंय ऐकायला बोअर होतं. मधुराच्या रेसिपीज पण नाही आवडल्या. उकडीचे मोदकही ओबडधोबड. नखंही वाढलेली.
मेधावि हिच ती "स्स्स्स" ची
मेधावि हिच ती "स्स्स्स" ची भाषा!
खाण्याबद्दल जास्त बोलूनही
खाण्याबद्दल जास्त बोलूनही बोअर न करणारे दोनच
संजीव कपूर आणि
नमक नमक, नमक नमक, डाल देते है गाणारा सरदारजी
संजीव कपुरचे ९०ज मधले शोज
संजीव कपुरचे ९०ज मधले शोज प्राईम वर आलेले. आता बघितल्यावर लक्षात आल कि काही रेसीपीज इतक्या भंकस होत्या. मला आठवत तेव्हा कित्ती आवडीने शोज बघायचो त्याचे. एकदम नविन स्टाईल आणली त्याने कुकिंग शोजमध्ये. आता त्यातल्या काही रेसीपीज अगदीच अतर्क्य वाटतात.
पनीर च्या पुस्तकात मालवणी पनीरची रेसीपी पण मला एकदम अचाट वाटलेली.
निशा मधुलीका बेस्ट, हातचं
निशा मधुलीका बेस्ट, हातचं राखून सांगत नाही तिच्या रेसिपी कधीच फसत नाही. महाराष्ट्रीयन पदार्थ करण्यासाठी फार फेमस नसलेल्या गृहिणींच्या रेसिपी वापरतो, घरघुती स्वाद त्यातच मिळतो. मधुरा आणि विष्णू मनोहर लै मिळमिळीत.
कुणाल कपुर, रणविर ब्रार,
कुणाल कपुर, रणविर ब्रार, हेब्बार आवडते आहेत. रणविर ब्रार त्या कुझिनशी रिलेटेड माहिती देतो ते पण आवडत , गावरान चव वाल्या एक दोन रेसिपी बघितल्या त्या पण फार भारी वाटल्या, पाट्यावर वाटलेले वाटण , मातिच्या भान्डित बनवलेले पदार्थ एक्दम भारी वाटत होत.
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सिजन १२
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सिजन १२ वा चालू झालाय आणि या कोविड १९ सिच्युएशन मध्ये ही सगळे नियम पाळून शोज होताहेत त्यांचे. हॉटस्टार प्राईम वर सगळे आतापर्यंतचे भाग पाहायला मिळतील.
मधुराच्या रेसेपीज कुठून तरी
मधुराच्या रेसेपीज कुठून तरी उचलून आणून केल्यासार ख्या वाटतात. अजिबात ओरीजिनल वाटत नाहीत.
मला पण हेब्बार बाई आवडते,
मला पण हेब्बार बाई आवडते, शिवाय या काकू पण आवडतात
https://www.youtube.com/channel/UCTqMclNHRqkzqVerXQTNTDw
मस्त सांगतात , त्यांचे कौतुक वाटते.
https://www.youtube.com
https://www.youtube.com/channel/UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
या काकूंच्या रेसेपीज छान असतात एकदम.
अरे तुम्ही लोक आद्य युट्युब
अरे तुम्ही लोक आद्य युट्युब रेसेपीकर्ता वाह शेफ ला विसरलात !! जेव्हा युट्युब नविन होते - जवळ जवळ १२ वर्षांपासून तो रेसेपीज टाकतो आहे. आम्ही सुरूवातीला त्याच्याच रेसेपी बघून काय काय प्रयोग केलेले
तो सध्या घरून रेसेपी टाकतो आहे. खुपच एंटरटेनिंग आहेत त्याचे व्हिडीओ.
मग आमच्या सगळ्यांत जास्ती सफल झालेल्या रेसेपीज रणबीर ब्रार च्या आहेत. त्याने सांगितल्यानुसार केले की थोडे बदल करूनही रेसेपी हीट होते. अगदी पनीर पण त्याच्या पद्धतीने करून पाहिले तर एकदम क्रिमी झाले.
हेब्बार बद्दल सगळ्यांना
हेब्बार बद्दल सगळ्यांना अनुमोदन. मी पण फॅन.
https://www.timesofyouth.com/hebbars-kitchen-founder-archana/
ईथे फोटो आहे , दिसायला गोड आहे.
पदार्थांचं प्रेझेंटेशन पण छान असतं. उगीच फॅन्सी क्रॉकरी, चित्रविचित्र भांडी नसतात. साधं आणि सुटसुटीत.
तिच्या अंगठ्यात ती काळी रींग असते ती खूप आवडते मला. एकदा तिच्या हातावर भाजल्याचा मोठा डाग होता तर रेसिपीच्या कमेंट्समधे सगळ्यांनी त्याबद्दलच विचारले होते.
जास्त बडबड वाले बघू नाही शकत विडीओ रेसीपीचे. पटकन दाखव बाबा काय ते असं होऊन जातं. मधुराज रेसिपी मलाही नाही आवडत एवढ्या. तिच्या बोलण्यामुळेच असेल बहुतेक.
वाहशेफ च्या पण कधीतरी फॉलो करते. मजेशीर आहे तो शेफ जरा.
एकदा ताडी वापरून काय चिकन की काहीतरी दाखवत होता, मधे मधे ताडी पण पित होता
मग आमच्या सगळ्यांत जास्ती सफल झालेल्या रेसेपीज रणबीर ब्रार च्या आहेत. त्याने सांगितल्यानुसार केले की थोडे बदल करूनही रेसेपी हीट होते. अगदी पनीर पण त्याच्या पद्धतीने करून पाहिले तर एकदम क्रिमी झाले.>>>>>>>>>>>>>>> माशे इंडीया बघितल्यावर थोडे दिवस बघितले याचे विडीओ पण तेच खूप बोलतो असं वाटतं त्यामुळे रेसिपीकडे लक्ष नाही गेलं.
>>अरे तुम्ही लोक आद्य युट्युब
>>अरे तुम्ही लोक आद्य युट्युब रेसेपीकर्ता वाह शेफ ला विसरलात
माझा घरधनी, त्याचा एक मित्र ही मंडळी या वाह शेफवरून काही बाही करत असतात. सो मी याला नक्की वोट करेन. जरी मी त्याचा एकही पूर्ण विडो पाहिला नसला तरी. विकेंडला खाल्लेल्या ग्रीन चिकनची शप्पथ 
क्या बात है धनि. एकंदरित धनि लोकांचा हा आवडता शेफ असावा असं वाटतंय. धनि
मला वरची चर्चा वाचून मी ते काय म्हणतात नं ते बाय बुक्स (अर्थात वाचलेल्या रेसिपी) वाली आहे असं वाटतंय. मी फारच कमी रेसिपी व्हिडिओ पाहून करते. रेफ साठी ठीक आहे पण प्रत्यक्ष करताना लिहिलेलं दिसलं तर बरं पडतं. मेनली साहित्याची लिस्ट आणि एक एक स्टेप. सारखं पुढे मागे करायला नको.
मलाही hebbar आवडते पण ती फक्त
मलाही hebbar आवडते पण ती फक्त शाकाहारी आहे. मधुराने काही केले की तिच्याच तोंडाला इतके पाणी सुटते की बस्स! आणि प्रचंड बडबड! निशा मधुलिका पण बडबड करतात पण त्यांचा आवाज छान आहे, अतिशय शांत बोलतात. म्हणून त्याही कधी बघते. कविता /कबिता पण आवडते, नमस्कार चमत्कार करून डायरेक्ट रेसीपी सुरू करते.
अंजली थँक्यू हेब्बारच्या फोटो
अंजली थँक्यू हेब्बारच्या फोटो ची लिंक दिलीस. किती गोड आहे दिसायला.
स्ट्रीट पावभाजी ही तिची रेसिपी तिची आवडती आहे असं म्हणलीय ती. माझी ही तिची हीच रेसिपी सर्वात आवडती आहे.
मी सध्या रणवीर ब्रारच्या
मी सध्या रणवीर ब्रारच्या प्रेमात आहे. मी आजवर युट्युबवर जसे पिक्चर पहायचे तसे लोकांच्या रेसिपीज पाहत असायचे. रणवीर सापडल्यावर मात्र त्याच्या दोन रेसिपीज करूनही पाहिल्या. आणि ते केवळ यासाठी की त्याची सांगायची पद्धत इतकी सुटसुटीत आहे आणि रेसिपी इतकी व्यवस्थित क्रमवार असते की कठीण रेसिपी पण सोप्पी वाटते. काल रात्री टोमॅटो सूप बघताना अचानक लक्षात आले की सगळे घटक घरात आहेत, लगेच करायला घेतले आणि एन्ड प्रॉडक्ट चक्क आवडले. इतके सुंदर सूप हॉटेलात पण मिळाले नव्हते. गेल्या आठवड्यात जिलेबी केली आणि तीही आहाहाssss अशी झाली. दाल माखणीचा इतिहास सांगताना फाळणी, मोतीमहाल आला तेव्हा चिनूक्सची आठवण झाली. अन्न: वै प्राणा: चा पुढचा भाग कधी येणार रे बाबा????
मधुरा तेच ते बोलते म्हणून फारशी आवडत नाही. निशा मधूलिका व्यवस्थित टिप्स देऊन सांगते. तिच्या रेसिपीने बुरा साखर करून लाडू बनवून आनंद घेतलेला आहे.
श्यामा कुलकर्णीचे सीकेपी रेसिपीज अतिउत्तम आहेत. यांनी या वयात चॅनेल सुरू केलेय आणि इतक्या डिटेलिंगसकट त्या रेसिपीज सांगतात त्याचे खूप कौतुक वाटते. खमंग रेसिपीजवरची ताईही छान डिटेलिंग करते.
बाकी इतर नॉन शेफ मंडळी 'फक्त आमच्याच चॅनेलवर हे बघा, पाव बघा किती नरम' म्हणत त्याला चुरगळुन टाकतात ते बघायला कंटाळा येतो.
मी सध्या रणवीर ब्रारच्या
मी सध्या रणवीर ब्रारच्या प्रेमात आहे. >>> तो अँकरींग पण उत्तम करतो, त्याचे काही prgms लिविंग फूड channel वर बघत असते मी, मला आवडतो. ग्रेट इंडियन रसोई, food tripping, हिमालयात जाऊन केलेला पण एक कार्यक्रम आहे. रेसिपीज पण दाखवतो त्या prgm चं नाव विसरले मी.
मलाही आवडतो रणवीर ब्रार
मलाही आवडतो रणवीर ब्रार
Pages