Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> पाभात बटर ऑपशनल?? आर यू
>> पाभात बटर ऑपशनल?? आर यू किडींग मी... सीरीअसली...>> काल सिरियसली???? चा कोटा पूर्ण झाला जेव्हा पाभा पौष्टिक करायला लोकं वांगी, कोबी न इतर काय काय ढकलतात हे वाचलं
पावभाजीत अपारंपरिक भाज्या
पावभाजीत अपारंपरिक भाज्या हव्या का नको ही सेम चर्चा इथेच मागच्या पानांवर झालीय
पण मला चीकातून बाहेर पडायचं म्हणून विषयाला परत काडी लावली ☺️☺️
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/42587
फोडणीच्या भातावरील जूनी चर्चा
Wow, काय मस्त मस्त पर्याय
Wow, काय मस्त मस्त पर्याय मिळाले आहेत.


सीमा, क्वचित असं काही वेगळं करायचा उत्साह येत असल्याने हे असं होतं. :)) तरी बरं घरी जाहीर नव्हतं केलं.
तशी ही एक रेसिपी मिळाली आहे,
http://blessmyfoodbypayal.com/jalebi-recipe-with-leftover-rice-chawal/
पण आधी मायबोलीवर बघायचं आणि मग इतरत्र.
योकु, तुमचा मुद्दा लक्षात ठेवेन. घरीच असल्याने तेल पिणारे काही नकोच.
रीसोटो, फो.भा. आणि चकली यापैकी काही करेन.
परत धन्यवाद सगळ्यांना.
कोणाला हवी तशी पावभाजी करा.
कोणाला हवी तशी पावभाजी करा. दुसरे कसे करतात, का करतात त्याची चर्चा निरर्थक आहे खरंतर.. प्रत्येकाची पद्धत असते तसे ते करतात. इतरांची पद्धत कशी बरोबर नाही हे सांगायचा अट्टाहास करु नये खरंतर. जौद्या.
सगळ्यांच्याच गप्पा की कुणी
सगळ्यांच्याच गप्पा की कुणी केली सुद्धा? माझी मुलं हा धागा वाचत असावीत किंवा इथून त्यांना वाइब्स जात असाव्यात असं वाटत आहे. कालच पावभाजी फर्माईश होती. पहिल्यांदीच माझ्याकडे बीट होतं (आणि टाकायचं लक्षात पण होतं) ही टोटल टीम वर्क पाभा आहे. आईने (म्हणजे मी) भाज्या कुकरला लावल्या, बाबाने मॅश एकेए टर्र्र केलं, थोरली पात गॅसवर हे टाक ते टाक करायच्या वस्तू ढवळणे आणि धाकल्या पातीच्या मते "मोटिवेशन" दिलं


एंजॉय लोक्स. शुक्रवार येतच आहे
आणि हा जुना फोटो, पाव पण घरचे आहेत यात... दोन्हीमध्ये मला वाटतं वरची पाभा पब्लिकला जास्त आवडल्या गेली आहे. टिमवर्क जिंदाबाद.
मुलं मदतीला येतात तेव्हा
मुलं मदतीला येतात तेव्हा मज्जा येते
... अंतीम भाजीचा लालरंग मस्त दिसतोय.
भातात तिखट, मीठ, कच्चं तेल
भातात तिखट, मीठ, कच्चं तेल आणि कच्चा कांदा घालून मस्त लागतो. वर फरसाण/शेव/ चिवडा असेल तर वाहवा नसेल तरी वाहवा. मला असा भात प्रचंड आवडतो.
नवीन Submitted by वावे on 16 April, 2020 - 12:43>>>>+१११
वेका ताटलीत असलेल्या
वेका ताटलीत असलेल्या बटाट्याच्या भाजीला पाभा ची भाजी म्हणालात का काय?
हा हा मला वाटलंच होतं ते.
हा हा मला वाटलंच होतं ते. आमच्यात अशी पण पा भा असते. घुर्र करणारा माणूस बिजी झाला की मग सगळ्या भाज्या थोड्या थोड्या दिसतात आणि हो त्याला बी पाभाज म्हनत्यात. पाव बगा की पन
Beat paobhaji is looking
Beat paobhaji is looking terrible other one looks s bit sad. Good luck to team though for efforting.
अमा आमच्या लेवलच्या कुक्सच्या
अमा आमच्या लेवलच्या कुक्सच्या एक्सपेक्टेशनला आम्हाला आवडली इतकंच सांगेन. अर्थात देशाबाहेर वाढलेल्या पोरांचे टेस्टबड्स वेगळे असतात. पण ते असो.
@वेका, स्वयंपाक म्हणजे काय
@वेका, स्वयंपाक म्हणजे काय वेगळे असते. त्याच भाज्या, तेच मसाले, बनवण्याची पध्दत थोडी वेगवेगळी. बनवणार्याला समाधान आणि खाणार्याला चव मिळाली की झाल.
नवीन वेष्टनात जुनी गोष्ट सादर केली की लोकांना आवडते. काही दिवसांनी हेच फोटो " बटाट्याचे पिठले" या किंवा तत्सम वेगळ्या नावाने सादर करा. लोक तुटून पडतील बघा रेसिपी विचारायला. त्यावेळी पोटभरीसाठी आणि पौष्टिकतेसाठी इतर भाज्या घातल्या म्हणून सांगायचे. टेंशन नई लेने का. हाकानाका.
वेका, पाव भारी झालेत. पसंद
वेका, पाव भारी
झालेत. पसंद अपनी अपनी ! मलाही भाज्यांच गरगट केलेलं आवडत नाही.
हायला, वेका आयडी वाचून त्या
हायला, वेका आयडी वाचून त्या दुसऱ्या धाग्यावरची 'बरे झाले माझे लग्न दोन महिन्यापूर्वीच झाले' ही कमेंट आठवली आणि दोन महिने व 2 मुले यांचा ताळमेळ लागेना. नशीब, अचानक आठवले की ती कमेंट VB यांची होती...... घरात बसून बसून डोक्याची मंडई होतेय की काय..
नशीब, अचानक आठवले की ती कमेंट
नशीब, अचानक आठवले की ती कमेंट VB यांची होती...
>> हुश्श!
मागे कुणीतरी म्हटलं होतं वावे आणि वेका या आयडींमधे गोंधळ होतो म्हणून. म्हटलं मी कधी लिहिलं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं म्हणून?
शिळा भात राहिला तर माझा फेव
शिळा भात राहिला तर माझा फेव आणी कमी वेळखाऊ
आयटम दहिभात.
मस्त कढिपत्ता, हिरवी मिरची, उडीद डाळ, आल्याची फोडणी देउन. फार लाड करायचे असतील तर काजू बिजू घालायचे.
इतकी साग्रसंगीत फोड्णी पण नको असेल तर तळलेली भरली मिरची चुरून घालणे.
हाहा... पावभाजी काय इथुन रजा
हाहा... पावभाजी काय इथुन रजा घेत नाही ....
माझा शेवटचा प्रतिसाद आता पावभाजीवरचा. कधी सोलापुरला गेलात तर ‘सुप्रजा’ ची पावभाजी खायला अजिबात विसरु नका... अप्रतिम असते. ‘जास्त तिखट‘ घेऊ नका. नेहमीची घ्या. पुन्हापुन्हा सोलापुरला जाल.
सुनिधी, आता सुप्रजाची
सुनिधी, आता सुप्रजाची क्वालिटी राहिली नाही. कधीही दुकान बंद ठेवतात मनात आलं की
. आख्ख्या सोलापूरात हेच एक दुकान असेल जिथे कार्ड घेत नाहीत. सगळा व्यवहार कॅशमधेच! वैताग आला होता या ट्रीपमधे.
माझ्याकडे 2 कैऱ्या आहेत. एकाच
माझ्याकडे 2 कैऱ्या आहेत. एकाच लोणचं अथवा तत्सम तिखट काहीतरी करायच आहे पण लोणचं मसाला नाहीये. काय करता येईल ? दुसऱ्याच पन्हं किंवा मोरंबा करणार आहे. दोन्ही साठी मदत करा प्लीज.
एकाचे करमनी करा ना.
एकाचे करमनी करा ना.
कैरीच्या छोट्या किंवा लांब फोडी करायच्या , एका भांड्यात घेऊन थोडे लाल तिखट मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्या. थोडा वेळ तसेच ठेवायचे. मिठाचे पाणी होऊन तिखट मीठ कैऱ्यात मुरते. मग त्याला नुसते खा किंवा लोणच्या सारखे, दोन्ही छान लागते
https://youtu.be/jf_WxE1nkxM
https://youtu.be/jf_WxE1nkxM ...
या पद्धतीने छान लोणचे होते.
तक्कु किंवा मोहरी मेथी
तक्कु किंवा मोहरी मेथी मिक्सरमध्ये बारीक करून मसाला करता येईल ना
1. कैरी एवढं कांदा घ्या,
1. कैरी एवढं कांदा घ्या, दोन्हीच्या फोडी करा, मिक्सर जार मध्ये या फोडी हळद, लाल तिखट, मीठ, गूळ टाका आणि बारीक फिरवून घ्या. वरून मोहरी मेथी हिंग फोडणी. मस्त लागतं.
2. कैरीची डाळ, आंबे डाळ करा.
1 कैरी बारीक चीरा
1 कैरी बारीक चीरा
1 कांदा बारीक चीरा
दीड चमचे गुळ बारीक चीरा
अर्धा चमचा लाल तिखट
मीठ चविनुसार
तेल अर्धा चमचा ( गुळाचाच )
सर्व मिक्स करा
15 मीन नंतर खायला घ्या.
आम्ही नुसते च खातो. वरण भात , चपाती बरोबर ही मस्त जाईल
अरेवा !! मस्त रेसिपी मिळाल्या
अरेवा !! मस्त रेसिपी मिळाल्या आहेत. आता सिझन पण सुरु होतो आहे सर्च करून बघते. धन्यवाद!!
माझ्याकडे 2 कैऱ्या आहेत
माझ्याकडे 2 कैऱ्या आहेत
<<
मेथांबा.
यात दालचिनी घालावी. भन्नाट लागते.
**
कैरीची चटणी.
गूळ, तिखट, मीठ, मीठ, कैरी. मिक्सरला. भारी लागते.
सुपरमॉमची एक कृती होती कांदा
सुपरमॉमची एक कृती होती कांदा कैरी
आणि एक बहुतेक अल्पनाची होती तीळ घातलेल्या लोणच्याची. दोन्ही एकदम मस्त प्रकार होते.
सखुबत्ता?
सखुबत्ता?
आभा, एका कैरीच्या दोन फोडी
आभा, एका कैरीच्या दोन फोडी तिखट- मीठ लावून नुसत्याच खा...
Pages