Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा तेलगू चित्रपट नाहीये, पण
हा तेलगू चित्रपट नाहीये, पण ratsasan आवडला असेल तर हिंदी चित्रपट 404 एरर नॉट फाउंड नक्की बघा!
https://youtu.be/o_iqH3Clb9U
भागमती B h a r i c h aahe m
भागमती B h a r i c h aahe m o v i e
भागमती B h a r i c h aahe m o
भागमती B h a r i c h aahe m o v i e
Submitted by त्रिनेत्र on 24 March, 2020 - 15:07
नेमका कुठला?
या चार लिंक्सपैकी?
https://www.youtube.com/watch?v=of51ugIPrhk
https://www.youtube.com/watch?v=2JFEx1KnV6c
https://www.youtube.com/watch?v=-oHgU1XyeUQ
https://www.youtube.com/watch?v=gKAXu-5cWsg
96 पाहिलाय का?? खूप छान आहे ,
96 पाहिलाय का?? खूप छान आहे , हिंदी डब तामील, सेथूपती आणि त्रिशा, इमोशनल आहे खूप, यूटयुब वर आहे
पहिली लिन्क आहे ती ओरिजनल
पहिली लिन्क आहे ती ओरिजनल भागमतीची. अनुष्का शेट्टीची.
चायना टु चेन्नई मस्त आहे
चायना टु चेन्नई मस्त आहे
म्हणजे 7 ओम
धन्यवाद सुलु८२
धन्यवाद सुलु८२
Khatrnak khiladi छान सिनेमा
Khatrnak khiladi छान सिनेमा ....
रंगी तरंगा -
रंगी तरंगा -
रहस्यमय चित्रपटात ratsasan च्या तोडीचा हा चित्रपट. एक गाव, तिथे एक लेखक त्याच्या गरोदर पत्नीला घेऊन जातो, आणि त्यानंतर ती गायब होते. त्यानंतर अशा घटना घडतात, की सगळेच चक्रावून जातात.
रोलर कोस्टर राईड मध्ये तरी कमी धक्के असतील, इतके धक्के या चित्रपटात आहेत. सुरुवात संथ असली, तरीही नंतर चित्रपट जो वेग पकडतो, त्याला तोड नाही.
अत्यंत गुंतागुंतीची कथा, आणि तो गुंता सोडवण्याच कौशल्य पाहता, हा कन्नड चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड चित्रपट! यातलं थ्रिल, भय आणि रहस्य शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
हिंदी डब लिंक!
https://youtu.be/Nul5tY0nW60
धन्यवाद अज्ञातवासी.
धन्यवाद अज्ञातवासी.
किर्ती सुरेश आणि दलकर सलमान
किर्ती सुरेश आणि दलकर सलमान चा महानती मूव्ही पहिला...खूप छान...जुन्या साऊथ इंडियन अभिनेत्री सावित्री यांचा बायोपिक आहे...किर्ती सुरेश ला या मूव्ही साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे... अतिशय सुंदर अभिनय दोघांचाही...
https://youtu.be/dSBvr_xMkU0
https://youtu.be/dSBvr_xMkU0
कार्तिकेय 2 ट्रेलर
कार्तिकेय 1 सुद्धा आहे का ?
अजय चव्हाण यांच्या धाग्यावरून
अजय चव्हाण यांच्या धाग्यावरून साभार
सिनेमा रिव्यू- Kuttrame Thandanai -एक संथ सस्पेन्स तामिळ सिनेमा.
Submitted by अजय चव्हाण on 30 April, 2020 - 07:37
माणसाचं आयुष्य हे नेहमीच ज्याच्या त्याच्या कर्माने घडतं असतं. कळत नकळत आपण जे कर्म करतो त्यांची फळे आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच कधी स्पष्ट रूपात तर कधी अप्रत्यक्षरित्या आपल्याला भोगावी लागतात. ह्याच संकल्पनेवर आधारित ह्या सिनेमाचं शिर्षक निवडलं असावं असं माझं स्पष्ट मत आहे.
Kuttrame Thandanai चा अर्थ इंग्रजीत सांगायचा झाल्यास "Crime itslef is a punsihment" असा होतो. एव्हाना अर्थाने तुम्हाला कळलं असेलचं की, हा सिनेमा Crime based सिनेमा आहे ते. पण hold on हा सिनेमाची कथा थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात सहज घर करून जातो.
सिनेमा सुरू होतो आणि तिसर्या सिनमध्येच हा सिनेमा थोडा वेगळा आहे हे कळतं. कथेचा नायक रवीचंद्रनला ऊर्फ रवीला
टनल विझनचा प्रोब्लेम आहे. ह्या प्रोब्लेममुळे नायकाला फक्त समोरचं गोलाकार दिसतं आजूबाजूला फक्त अंधार. कळायला सोपं जावं म्हणून चित्रपटातलाच एक फोटो देत आहे -
images.jpeg
अशा या नायकाला बघून आपल्याला त्याच्याबद्दल नकळतपणे सहानुभती वाटते. चेकअप करायला जातो तेव्हा त्याला नव्यानेच कळतं की, त्याचा प्रोब्लेम खुप मोठा आहे आणि वेळीच आय ट्रान्सप्लांट नाही केले तर हळूहळू त्याची संपूर्ण दृष्टीही जाऊ शकते. लहानपणापासून त्याला हा प्रोब्लेम आहे पण त्याची अशी भाबडी समजूत असते सगळ्यांना इतकंच दिसत असावं. रवी हा एका एजन्सीमध्ये क्रेडीट कार्ड पेयमेंट कलेक्शनच काम करत असतो. त्याच्या आयुष्यात इन मिन तीन चार माणसं आहेत. एक म्हणजे त्याचा बाॅस, दुसरी त्याच्यावर अव्यक्त प्रेम करणारी कलिग अनु, त्याचा वयस्कर मित्र नासर आणि चौथी व्यक्ती म्हणजे त्याच्या घरासमोर राहणारी मुलगी श्वेता.
अशाच एका रात्री श्वेताच्या घराचं दार तो ठोठवतो. दार एक मध्यमवयीन माणूस उघडतो आणि कथा एका नव्या वळणावर येते. श्वेताचा खून झालेला असतो आणि दार उघडलेला माणूस श्वेताचा बाॅस विजयप्रकाश असतो. तिचा बाॅस येण्याआधीच तिचा खून झालेला असतो पण रवीने पोलीसांसमोर आपली साक्ष देऊ नये म्हणून तिचा बाॅस रवीला काही पैसे ऑफर करायची तयारी दर्शवतो आणि रवीलाही ट्रिटमेंटसाठी 320000 हवे असतात म्हणून रवी त्याच्याकडून तितकेच पैसे घेतो. जमा केलेले पैसे घेऊन जेव्हा रवी हाॅस्पिटलात जातो तेव्हा त्याला कळतं की, ह्याउपर अजून आयसीयू चार्जेस, डाॅक्टर फी ह्यांचे वेगळे पैसे भरावे लागतील. तेव्हा रवी पुन्हा विजयप्रकाशला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. मधल्या काळात पोलीस रवीच्या घरी चौकशीसाठी येतात आणि रवी साक्ष द्यायला तयार होतो. जेव्हा तो साक्ष द्यायला पोलिस स्टेशनला जातो तिथे आधीच एका आरोपीची पोलीस चौकशी करत असतात. आरोपी हा श्वेताचा बाॅयफ्रेड अरूण असतो. अरूणला काही लोकांनी श्वेताचा खून होण्याच्याआधी तिच्या घरातून रागाने येताना पाहीलेलं असतं आणि म्हणूनच पोलीस त्याची चौकशी करत असतात. जेव्हा तिथला पोलिस हाच का तो मुलगा? असं विचारतो तेव्हा रवी हाच तो म्हणून निघून येतो. जेव्हा अरूणच्या वकीलाला रवीविषयी कळतं तेव्हा ते त्याला साक्ष फिरवण्यासाठी पाच लाखाची ऑफर करतात आणि अरूणदेखिल ह्याला तयार होतो..
ह्या सगळया गुंत्यात खरा कुणी कोण? रवीच्या डोळयांचं ऑपरेशन होऊन तो ठीक होतो का? अनुचं प्रेम रवीला कळत का? बाॅस नेमका श्वेताच्या घरी कशासाठी आलेला असतो?
रवि नेमक्या कुणाच्या बाजूने साक्ष देतो? ह्या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसाठी सिनेमा पाहायलाच हवा.
ह्या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे ह्या सिनेमाची सिंपलीसिटी, नैसर्गिकपणे केललं डायरेक्शन आणि कलाकारांचा उत्तम अभिनय. बर्याचशा सिनला डायरेक्टरने कुठलही बॅकग्राऊंड म्युझिक दिलं नाहीये. आजुबाजूचा गोंगाट, ट्रॅफिकचा आवाज, रवी जिथे राहतो तिथल्या रहिवाशांचं पाठीमागे होणारं बोलणं ह्यामूळे संपूर्ण सिनेमा हा खुपच रिअलास्टीक वाटतो. अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर "रवी" साकारलेल्या विधार्तने भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे. त्याचा अभिनय हा अभिनय वाटतचं नाही इतकं त्याने समरसून काम केलं आहे. ऐश्वर्या राजेश (श्वेता) हिच्या वाटेला फारसे सीन नाहीत पण तिनेही ठीकठाक काम केलं आहे. पुजा देवरियाने अनुची भूमिका उत्तम साकारली आहे. स्पेशली तिच्या चेहर्यातला गावरान गोडवा आणि तिचा साधेपणा कायम लक्षात राहतो. नासर ह्या चित्रपटात का आहे हा प्रश्न खुप वेळा पडतो पण नासर आणि रवीच्या संभाषणातूनच रवीच्या मूळ कॅरेक्टरला एक्सप्रेस होण्याचा वाव आहे असं नंतर लक्षात आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाच लेखन आणि डायरेक्शन आणि छायाकंन ह्या तीनही बाजू मनिकंदनने सांभाळल्या आहेत आणि म्हणूनच हा सिनेमा चांगला जमलाय असं म्हणायला हरकत नाही कारण लेखक आपल्या कल्पनेतली कथा परद्यावर इतर डायरेक्टरपेक्षा जास्त प्रभावी मांडू शकतो असं माझं तरी मत आहे. कथेला कुठल्याच गाण्याची गरज नाही हे ओळखून केवळ लांबी वाढवण्यासाठी गाण्याचा वापर केला नाहीये हे आवडलं. (तसंही मूळ तामिळ गाणी हिंदित डब केल्यानंतर ऐकण्याजोगी नसतातच.) यु ट्यूबवर हा सिनेमा मोफत पाहता येईल त्यासाठी खाली लिंकसुद्धा देतोय नक्की पाहा.
https://www.youtube.com/watch?v=dpHaJKput7c
पात्रे :
रविचंद्रन (रवी) - विधार्त
श्वेता - ऐश्वर्या राजेश
अनु - पुजा देवरिया
रेहमान - विजयप्रकाश
नासर - नासर (पात्राच्या नावाचा उल्लेख कुठेच येत नाही म्हणून नासर)
शिरीष अरविंद- अरूण.
का पाहावा :
संथ आणि साध्या पद्धतीने साकारलेल्या एक वेगळ्या सस्पेन्स थ्रिलरचा अनुभव घेण्यासाठी.
IMDb Rating : 7.8/10
मानांकन : ****1/2
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=KdEOUnxizNU डिअर कॉम्रेड
Kuttrame Thandanai
Kuttrame Thandanai
इथे. माहिती वाचल्यावर पाहिला होता पिक्चर. छान वाटला.
मृणाली स्पोईलर टाकलाय तुम्ही
मृणाली स्पोईलर टाकलाय तुम्ही .
स्पोईलर काय असतो?
?
? पण टाकला आणि स्पोईलर पण
? पण टाकला आणि स्पोईलर पण उडवला. आवडले.
खरंतर स्पोईलर कसा असतो मला
खरंतर स्पोईलर कसा असतो मला माहित नाहिए.मी ईथे आधी मूव्हीज बद्दल कधी लिहिले पण नाहीए.
डिअर कॉम्रेड : लडाख
डिअर कॉम्रेड : लडाख जाण्याएव्हढे पैसे कुठून आले भावाकडे? 5000 साठी मॅच खेळत होते ना हे?
बाकी चित्रपट आवडला!
आज पुन्हा महर्षी बघितला,
आज पुन्हा महर्षी बघितला, पुन्हा आवडला.
आजकाल नवीन चांगले चित्रपटच येत नाहीयेत!
कुणी प्लिज सुचवा!!
Kaithi
Kaithi
https://www.youtube.com/watch?v=kaZFBTthNZM
धन्यवाद! विकी लिंक बघतो.
धन्यवाद! विकी लिंक बघतो.
येवरू बघा.
येवरू बघा.
Aa Karaala Ratri / घातक रात
Aa Karaala Ratri / घातक रात हा कन्नड चित्रपट पाहिला. चित्रपटाची दिड तासाचाच आहे. हळूहळू रंगत जातो. सर्वांची कामेही चांगली आहेत.
Dubbed चित्रपटांची अशी weird नावे का ठेवतात. ह्या चित्रपटाचे तरी ठीक नाव आहे. पण ratsasan ला " मैं हूॅ दंडाधिकारी" so odd
@mbhure - हो. या सी ग्रेड
@mbhure - हो. या सी ग्रेड नावांमुळे चांगले चित्रपट बघायचे राहून जातात.
मी पाहिलाय तो घातक रात सिनेमा
मी पाहिलाय तो घातक रात सिनेमा...चांगला आहे
आज पुन्हा महर्षी बघितला,
आज पुन्हा महर्षी बघितला, पुन्हा आवडला.>> हिन्दी डब असेल तर लिंक पाठवाल का?
Dubbed चित्रपटांची अशी weird
Dubbed चित्रपटांची अशी weird नावे का ठेवतात?
मायबोलीच्या सदस्यनामांवरुन प्रेरणा घेतली असेल.
स्नेहनिल >> लिन्क आहे का ?
स्नेहनिल >> लिन्क आहे का ?
Pages