तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कवचम बघितला. साई प्रस्थापीत हिरोंपेक्षा थोडा वेगळा वाटला म्हणून आवडला (मी पाहिलेला त्याचा पहिलाच चित्रपट) लाडका मुलगा, लाजरा प्रेमिक आणि पोलिसाचा अ‍ॅटीट्यूड ह्या तिन्ही छटा तो दाखवू शकतो नाही तर तेलुगु हिरो अ‍ॅटीट्यूडच्या पलीकडे सहसा काही दाखवू शकत नाहीत.

कथेत अनेक ट्विस्ट्स आहेत पण त्याकरता सतत सबटायटल्स वाचत रहावे लागते. काही काही लोकेशन्स आणि शॉट्स अप्रतिम आहेत. समुद्रकिनार्‍यावर बाईक चालवतानाचा एरीअल शॉट निव्वळ लाजवाब!

काजल अग्रवाल अगदीच फिकी पडली आहे यात. तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला फारसा वाव नाहीये म्हणा पण सिंघममधला स्पार्क कुठेच दिसला नाही तिच्यात.

सिनेमात नको तेवढी गाणी आहेत, ती कमी असती तर अजून मजा आली असती.

सुलू Sye Raa हा तेलगू चित्रपटासृष्टीतला दुसरा बाहुबली ठरेल असं मला आताच वाटतंय.
चिरंजीवी, सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि अमिताभ बच्चन! जबरदस्त स्टारकास्ट.
(फक्त अमिताभऐवजी मोहनलाल असता ना, तर साऊथ इंडियन इंडस्ट्रीचं एक जबरदस्त वर्तुळ पूर्ण झालं असतं.)

सय रा नर्सिम्हा रेड्डी आजच बघितला.
बाहुबली नंतर काहीतरी भव्यदिव्य बघितल्याच समाधान मिळालं. भारतात स्वातंत्र्ययुद्धावर बनलेला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट असं मी याचं वर्णन करेन.
चिरंजीवी, सुदीप, विजय सेतुपती, अमिताभ, रॉक्स!!!!

आज थडम बघितला.
डोकं चक्रावून टाकणारा suspense आहे.
Concept भारी आहे.

आज थडम बघितला.>> हिंदी version आहे का? असल्यास कुठे पाहिला. लिंक द्या जमलं तर.

स्वस्ति तुमचे प्रतिसाद आता बघितलेत.
महेशचा १ भारीच आहे, पण तुम्ही त्याच दिगदर्शकाचा नानक प्रेमथो बघा. अप्रतिम आहे.
मी सरीलरू नेककवरू आणि अला वैकुंटपुरमुलो दोन्ही बघितले. सरीलरू नेककवरू एक रेग्युलर एक्शन चित्रपट असून, त्यात बघण्यासारखं फक्त महेश बाबू आहे. मात्र अला वैकुंटपुरमुलो जबरदस्त फॅमिली ड्रॅमा आहे. दिगदर्शन, कॉमेडी, एक्शन आणि इमोशन्स यांची जबरदस्त भट्टी जमून आलीये. जमलं तर नक्की बघा.

नानक प्रेमथो --- butterfly effect ??? पाहिलाय. Interesting आहे.
हां , अला वैकुंटपुरमुलो चा चांगला रेको आलाय. माझा बघायचा राहिलाय.

रच्याकने , थडाम चा हिंदी रिमेक येतोय. सिद्धार्थ मल्होत्रा आहे.

हो बटरफ्लाय इफेक्ट. त्याचा रंगस्थलमही भारी आहे.
अरेरे, कशाला थडम ची वाट लावलाय मल्होत्राला घेऊन.
युट्युबवर ismart शंकर आलाय. नक्की बघा.

Ala Vaikuntapurramlooनेटफ्लिक्स वर आलाय , मस्त टीपी आहे

V1 मर्डर केस बघावा लागेल.

आज एका अप्रतिम चित्रपटाविषयी लिहितोय.

Ratsasan हा तमिळ चित्रपट. हिंदीत मैं हुं दंडाधिकारी. युट्युबवर अवेलेबल आहे.
हा चित्रपट एक रहस्यपट आहे, आणि बिलीव मी, अशा चित्रपटासारखा चित्रपट अजूनही भारतीय फिल्मइंडस्ट्रीमध्ये बनलेला नाही. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा, प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी उलगडणारा हा चित्रपट, आणि शेवटी जे रहस्य येतं, ते हलवून टाकणारं.

हो पाहिला. जबरदस्त आहे सिनेमा. चुकवु नका कोणी.
आणि नायिका चेहर्‍याच्या काही बाजुंनी दिपिका सारखी दिसते. डोळे खुप सारखे आहेत पण नाकापासुन खालची जिवणी दिपिकाची सुंदर व नाजुक आहे.

आज एका अप्रतिम चित्रपटाविषयी लिहितोय.

Ratsasan हा तमिळ चित्रपट. हिंदीत मैं हुं दंडाधिकारी. युट्युबवर अवेलेबल आहे.
हा चित्रपट एक रहस्यपट आहे, आणि बिलीव मी, अशा चित्रपटासारखा चित्रपट अजूनही भारतीय फिल्मइंडस्ट्रीमध्ये बनलेला नाही. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा, प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी उलगडणारा हा चित्रपट, आणि शेवटी जे रहस्य येतं, ते हलवून टाकणारं.

Submitted by अज्ञातवासी on 29 February, 2020 - 10:36

खूपच थ्रिल्लर आहे यात अगदी शेवटपर्यंत काय होईल काय होईल असे वाटते। फर्स्ट टाइम सौथइंडिअन सिनेमात फालतू डोक्याला शॉर्ट असणारी कॉमेडी व मारामारी नाही आहे.

काल कुडे हा मल्याळम मूवी पहिला . मराठीत अतुल कुलकर्णीचा हैप्पी जर्नी होता ना ती स्टोरी line .छान आहे.. नायक -पृथ्वीराज, नायिका- पार्वती आणि बहिणीचं काम नारझिया म्हणून आहे तिने केलं आहे. खूप गोड आहे ती . छान acting आहे सगळ्यांची... पण हैप्पी जर्नी मध्ये प्रिया बापटच शेवटी गायब होणं जस चटका लावून जात तस या मुवीत होत नाही.

Happy Journey mala faar rataal watla hota.. ha original bagahyala pahile..

आत्ताच ratsasan पहिला......पिक्चर सुरू झाल्यापासून जरासुद्धा releif nahi...phakt tension...dok दुखायला लागलं माझ...पण छान आहे मूवी.....

‘यु टर्न’ पण मस्त आहे. नक्की पहा.
‘वाईफ ऑफ राम’ पण मस्त आहे.
दोन्ही रहस्यमय आहेत.
युट्युबवर हिंदी डबिन्ग केलेले आहेत.

आत्ताच ratsasan पहिला......पिक्चर सुरू झाल्यापासून जरासुद्धा releif nahi...phakt tension...dok दुखायला लागलं माझ...पण छान आहे मूवी.....

नवीन Submitted by Ashwini_९९९ on 10 March, 2020 - 13:19>>>>>>>

हो, मन होते थोडे डिस्टर्ब मी थोडा थांबून थांबून बघितला सलग नाही बघवला असता। एका वळणावर जेव्हा तो सायको टीचर त्या इन्स्पेक्टर च्या भाचीला मोलेस्ट करू पाहतो तेव्हा तर अगदी घुसमटायला झाले होते।

Pages