अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खरोखरचा थरकाप उडवणार किस्सा कोणाकडे असेल तर द्या. मूळ लेखात टाकतो. प्रतिसाद वाचून वाचकांचा गैरसमज व्हायला नको.

आहे माझा एक.
मोठा आहे, या महिन्या अखेर वेळ मिळाला की लिहीन.

इकडे फक्त फुसके बार ( कपोलकल्पित) किस्से असणार आहेत. कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. नो रियल अॅण्ड रोमांचक घोस्ट स्टोरीज!

@आर्यन भयानक किस्सा! असे अजून खरे किस्से येऊ द्यात..

ते स्वप्न नव्हतं. तुमचा आत्मा खरंच प्रवास करून आला होता.>> +1111

म्हसोबाची कृपा आहे तुमच्यावर आर्यन _/\_
तुम्ही जरी खोटा म्हणत असाल तरीही म्हसोबा कृपेने तुमच्या सब कॉन्शस मध्ये गाडला गेलेला प्रसंग शब्दबद्ध झाला अशी माझी श्रद्धा आहे. मानवी मन अनाकलनीय पद्धतीने काम करते हेच खरे.
खरं/खोटं म्हणून इथल्या श्रद्धाळूना दुखवू नये ही नम्र विनंती.

ह्या ह्या. अगा जे घडलेचि नाही. त्याला खरं समजणं ही गफलत आहे. स्वप्न पडलं नव्हतं न् काय नाही. माझ्या विलक्षण? प्रतिभेतून रचलेली कहाणी आहे. डोन्ट टेक इट रियल, प्लीज!!

अजमेर वोही जाते है जिन्हे ख्वाजा बुलाते है.
तुमच्या अंतर्मनात दडलेला हा प्रसंग स्वामींच्या इच्छेनुसार अवतीर्ण झाला. तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारणं ही पण म्हसोबचीच लीला आहे.
असो! तर मुद्दा असा आहे की खरं की खोटं असा विचार न करता जे लिहायची उर्मी होतेय त्याचं पालन करा. तुम्ही फक्त माध्यम आहात हे समजून घ्या.

बरोबर व्यत्यय.
अन्यथा उद्या लोक माझा किस्सा पण खोटा ठरवायला मागे पुढे बघणार नाहीत.

मला स्वत:ला कधी ह्यातला अनुभव आलेला नाही. पण शाळेत असताना एकदा एक घटना घडली होती. बरीच म्हणजे बरीच वर्षे झाली ह्याला. आमच्या शाळेत तेंव्हा उन्हाळ्याच्या दिवसात शाळा सकाळी सुरु होत्या. त्यामुळे दुपारी साडेअकरा-बारा नंतर शाळेत सामसूम व्हायची. शाळेच्या मागे मुतारी होती. एकदा दुपारी शाळा सुटल्यावर एका मुलाला काही कारणाने वर्गात जास्त वेळ थांबावे लागले. तोपर्यंत सगळी शाळा सुटून सगळी मुले व सर सुद्धा घरी गेले होते. थोड्या वेळाने हा एकटाच घरी जायला निघाला. जाण्यापूर्वी लघुशंकेला म्हणून शाळेच्या मागे असलेल्या मुतारीत गेला. एकटाच होता. तिथे शाळा सुटल्यावर भर दुपारी एक प्रकारचा किरर्र सन्नाटा व शुकशुकाट असायचा. हि मुतारी म्हणजे चार भिंतींच्या मध्ये अजून एक भिंत घालून दोन विभाग केले होते. मधली भिंत फार उंच नव्हती. थोड्या टाचा उंच केल्या कि भिंतीच्या पलीकडे उभारलेल्याचा चेहरा दिसू शकत असे. तर हा मधल्या भिंतीशी उभारून खाली मान घालून सुसू करू लागला. तोच त्याला पलीकडे कसली चाहूल लागली. म्हनून सहज टाचा वर करून त्याने भिंती पलीकडे पाहिले. तर पलीकडे एक मुलगी शाळेचा युनिफॉर्म घालूनच उभी होती पण उभ्यानेच सुसू करत होती व ह्याच्याकडे बघून गालात विचित्र हसत होती. ते विचित्र प्रकार बघितल्यावर ह्याची बोबडी वळली. ह्याने खच्चून बोंब मारायचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाज फुटेना. कारण हि तीच मुलगी होती जिने शाळेच्या परिसरातच काही वर्षांपूर्वी झाडाला फास लावून आत्महत्या केली होती. तो कसाबसा धडपडत बाहेर आला ओरडला आणि मुतारीच्या दारातच बेशुद्ध पडला. नशिबाने शाळेत दोघे शिपाई व अजून एक सर होते. कसला आवाज आला म्हणून बघायला गेले तर हा तिथे पडलेला. त्यांनी ह्याला उचलून आणला. चड्डी सगळी ओली व घामाने थबथबला होता. तोंडावर पाणी मारून वगैरे कसाबसा शुद्धीवर आणला. तर ह्याला बोलता येईना. दातखीळ बसल्यासारखे झाले होते. जोरात धाप लागलेली. मुत्रीकडे बोट दाखवून थरथरत होता. कायतरी विचित्र घडले शंका आल्यावर त्याला घेऊन सगळ्यांनी शाळेतून पोबारा केला. घरी नेल्यावर डॉक्टरना बोलवले. दोन तीन तासांनी त्याला जरासे बरे वाटल्यावर त्याने जे पाहिले ते सर्वांना सांगितले तेंव्हा सगळ्यांच्या पुंगळ्या टाईट झाल्या. तर कुणी म्हणाले त्याला भास झाला असेल. पण त्यानंतर जवळजवळ आठ दिवस तो तापाने आजारी होता. त्यानंतर बरीच वर्षे शाळेत ह्या प्रकाराची चर्चा सुरु होती. दिवसाढवळ्या शाळेच्या मागे एकटे जायला कोणी धजावत नव्हते.

@परिचित भयानक किस्सा परिचित
थोडं अवांतर होईल पण..
मी वाचले आहे की washrooms सोडून इतर outdoor ठिकाणी लघुशंका करताना त्या जागेवर कोणाची कबर, मस्जिद, झाड, काही पवित्र स्थान, मंदिर, काही विशिष्ट स्थान असेल तर तिथे जाऊ नये. हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी लागू आहे. हे सांगायचे कारण हे माझ्या शाळेतील किस्सा आहे हा. 5 वी-6 वी ला असु तर आम्ही एका सहलीसाठी गेलेलो तेव्हा बस एका ठिकाणी थांबली जेणेकरुन नाश्ता करून fresh होता येईल. तिथे एक पीर चे स्थान असल्याचे आठवते. घाई घाईत निघायचे असल्याने काही मुली त्या बाजूला लघुशंकेसाठी गेल्याचे आठवते. नंतर सहल वगैरे झाल्यावर सगळे घरी गेलेलो. त्यातील एक मुलगी काही दिवसातच आजारी पडली. निदान लवकर झाले नाही की काय पण त्यातच तिचा मृत्यू झाला. Sad नीटसे आठवत नाही पण नंतर तिच्या आजारपणा विषय काही गोष्टी ही कानावर पडल्या ज्या अमानवीय होत्या. काही म्हणत तिच्या मेंदूत ताप गेल्याने असे झाले. खखोदेजा. तरीही याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी.

‘प्रियकर स्वप्नात येतोय, त्याला बाहेर काढा’ प्रेयसीने आई-वडिलांसमोर दिली हत्येची कबुली
जानू अचानक सोमवारी इन्साथच्या घरी गेली व त्याच्या आई-वडिलांसमोर हत्येची कबुली दिली.
लोकसत्ता ऑनलाइन | February 19, 2020 05:36 pm

मृत्यूनंतर प्रियकर सतत स्वप्नात येऊ लागल्याने घाबरलेल्या महिलेने प्रियकराच्या घरी जाऊन आपणच त्याची हत्या केल्याची कबुली दिली. महिलेच्या तोंडून हे ऐकून मुलाच्या आई-वडिलांना धक्का बसला. “दोन महिन्यांपूर्वी आमचे भांडण झाले. त्यानंतर मीच रशीने गळा आवळून त्याची हत्या केली व मृतदेह माझ्या रुममध्ये पुरला. कृपा करुन त्याला बाहेर काढा, तो रोज माझ्या स्वप्नात येतोय” असे तिने त्याच्या आई-वडिलांना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
इन्साथ मोहम्मद असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी इन्साथचा पुरलेला मृतदेह मंगळवारी रुममधून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. ती हत्या होती की, आत्महत्या हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल कारण जानू सिंह गोंद सतत तिची जबानी फिरवत आहे. जानू आणि तिची आई पार्वतीला पोलिसांनी अटक केली आहे.

रात्री दोनवाजता पुण्यात चांदणी चौकात लक्झरी बसमधून तो उतरला. त्याला पुण्यात कसबापेठेत जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं. रिक्षा मिळणार कशी तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा हळूहळू येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. रिक्षा पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. भुसारी कॉलनी जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आल. आपण मनुष्य वस्तीत आलोया विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल. समोरून एक वेगात कार आली कारच्या प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि एका देवळात जाऊन बसला. पाऊस संपला सकाळचे सहा वाजले तो देवळा बाहेर आला. तर समोर तीच एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला शिवी देऊन म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात चांदणी चौकात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू XXX त्यात बसला होतास तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली. Happy Wink

सगळे आता घरीच आहेत त्यानिमित्ताने हा धागा वर काढतोय, एकेक खतरनाक किस्से येऊ द्या.

आमच्या भागात हाकामारी फिरते रात्री. आमच्या समोर जे काका राहतात ते सांगत होते. रात्री 2 वाजता त्यांच्या घराचं दार कोणीतरी जोरात ठोठावत होतं. एव्हड्या रात्री कोण आलाय विचारावं म्हणून त्यांनी विचारलं तर त्यांना त्यांच्या मुलाचा आवाज आला. कोरोनामुळे प्रवास शक्य नाही आणि रात्री 10 वाजता मुलाशी बोलले तेव्हा त्याने पण येण्याबद्दल काही सांगितल न्हवतं. काकांना संशय आला त्यांनी तीन वेळा विचारलं तर बाहेर असणारी व्यक्ती मुलगा असल्याचं सांगत होती. तिसऱ्यांदा त्याच्या आवाजात विलक्षण चीड होती. चौथ्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा बाहेरून काहीही उत्तर आलं न्हवतं. त्यावरून काकांनी ओळखलं की ही हाकामारी आहे. हाकामारी तीन वेळा उत्तर देते त्यात तुम्ही दरवाजा उघडला तर तुमचा खेळ खल्लास. त्यामुळे नेहमी घरी कोणी दार वाजवलं की त्याला चार वेळा विचारत जा. चौथ्यांदा उत्तर आलं तरच दार उघडा.

मी लहान होतो त्यावेळी आमच्या गावात मानकाप्या यायचा. याला कमेरत वाकता येत नसे त्यामुळे हा जोरजोरात हात हालवायचा. याच्या हाताना खूप धार असे. जर कोणाची मान याच्या हाताला लागली तर धडावेगळी झालीच म्हणून समजा. याला सगळे घाबरायचे. कधीकधी हा घोड्यावर बसून यायचा. घोड्याच्या टापांचा आवाज ऐकला की सगळे घरी पळायचे. संध्याकाळ झाली की माणसं लवकरात लवकर घरी यायला बघायचे. लहान मुलांना शक्यतो याच्यापासून काही धोका नसे कारण त्यांची उंची कमी असल्याने मानकाप्याचे हात यांच्यापर्यंत पोहचत नसत.

बायकोसोबत भांडण करून त्याने वैतागुन उल्टा चलायचं ठरवलं थोडं डोकं ठण्ड करायला शीर्षासनमध्ये तर मग सगळेच एल बी डब्ल्यू होणार ना !

आमच्या गावात खूप पूर्वी एक भागी नावाची बाई होती. तिचा नवरा मेला होता आणि तिचं एका माणसाबरोबर लफडं होतं. तिने त्याला लग्न करण्याबाबत लकडा लावला होता पण तो तिच्या दोन लहान मुलांचे कारण सांगून तिला कटवत असे. म्हणून एके दिवशी तिने त्या मुलांना विहीरीत ढकलून दिलं आणि मुलं अपघाताने मेल्याची बतावणी केली. आता तरी तो आपल्याशी लग्न करेल असं तिला वाटलं पण त्याने तिला अर्थातच वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मग तिला मुलांना मारल्याचा भयंकर पश्चात्ताप झाला आणि तिनेही विहीरीत उडी घेतली.
यानंतर तिचं भूत झालं आणि गावातले जे पोर तिला एकटे सापडे त्याला आपलंच मूल समजून ती ओढत विहिरीत घेऊन जायची. गावातली पोरे माळावर खेळायला जात. त्यातले एखादे पोर काळोख पडल्यानंतर एकटे जायला लागले की तिने धरलाच त्याला. पोराच्या किंकाळ्या ऐकू आल्या की गावातले लोक 'भागल्यान् धरलो त्येका' म्हणून विहिरीकडे धावत. तिथे ते पोर विहिरीच्या तोंडावर आपला हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत 'सोड, सोड माका' म्हणून ओरडत उभे असे. मग लोक त्याला धरून घरी नेत. एकदोन पोरे बुडून मेली देखिल होती.
एकदा मलासुद्धा धरला होता तिने. दिसायला हॉट होती.

मी तेव्हा लहान होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. आमचं गाव खूप डेंजर आहे, चहुबाजूंनी दुष्ट आत्म्यांनी गावाला घेरलंय. रात्री साधारण दीड दोन वाजले असतील. कसल्याशा आवाजाने मला जाग आली. नंतर झोप येत न्हवती म्हणून मिडनाईट वॉकसाठी बाहेर पडलो. चालत चालत गावाबाहेर कधी आलो ते समजलं नाही. मस्त गार वारा सुटला होता. मी गावाबाहेर असलेल्या विहिरीजवळ आलो. या विहिरीवर रात्री एक बाई पाणी भरताना अनेकांनी पाहिली होती. मी जवळ गेलो तर तिथे कोणीही न्हवतं. मला चालून तहान लागली होती. विहीर साधारण 50 फूट खोल असेल. खाली सगळा अंधार होता. मी विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली गेलो. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता.30-40 फूट खाली उतरल्यावर मला पाणी लागलं. मी पाणी प्यायलो आणि पुन्हा वर यायला लागलो तसा मला पाण्यातून आवाज आला. कोणीतरी पाण्यात हळूहळू पोहत होतं. मी पुन्हा वर जाणार इतक्यात पाण्यातून आवाज आला 'मुला जाऊ नको पोहायला ये मस्त मजा येते ईथे'. मी दुर्लक्ष करून वरती निघालो तसं कोणीतरी झपाझप पायऱ्या चढून वरती यायला लागलं. मी घाई करून विहिरीबाहेर निघालो आणि पटकन दूर गेलो तसा आवाज आला 'यावेळी सोडला तुला, वाचलास जा'. हे शब्द ऐकल्यावर मी परत मागे वळायचा विचार केला होता पण बोललो जाऊ दे.

मागे वळून नाही पाहिलं ते खुप बरं केलं.
नाहीतर हां नंबर ३चा धागा वाचायचे भाग्य आम्हा पामरास कसे लाभले असते बर्र !!

कोणे एके काळी बोकलत भूत प्रेत हडळ पिशाच्च यांना पळवून लावायचे किंवा स्वतःच त्यांच्या मानगुटीवर बसायचे. त्यांना बटीक बनवायचे.
आता स्वतःच त्यांच्यापासून लांब पळतात.

नाही नाही नाही. तुमच्या सगळ्यांचा गैरसमज होतोय. काळोख असल्याने त्या दुष्ट शक्तीने मला ओळखलं नाही. ओळखलं असतं तर पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरायची वेळच आली नसती मला. आणि मी शेवटी लिहिलंय कि मागे फिरणार होतो ते त्या दुष्ट शक्तीला अद्दल घडवण्यासाठी पण झोप येत होती त्यामुळे दुर्लक्ष केलं.

सध्या लॉकडाउनमुळे भर दिवसा बाहेर शुकशुकाट असतो. रात्री ही परिस्थिती अजून भयंकर रूप घेते. मी गेले दोन तीन दिवस बघतोय आमच्या समोरच्या रस्त्यावरून रात्री दोन अडीचच्या दरम्यान एक बाई फिरते. असं वाटतं ही बाई चालत नसून ती स्त्री पिक्चरसारखी हवेत उडत आहे. माझ्या मनात तिचा पाठलाग करण्याचा विचार येतो पण लॉकडाउन असल्याने मी बाहेर पडू शकत नाही. विशेष म्हणजे त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर मास्क नसतो. कोरोना व्हायची भीती तिला नसते. एकदा ती जात होती आणि समोरून एक बाईकवाला येत होता. मला वाटलं आता याच्या बाईकवर लिफ्ट मागून पाठीमागे बसेल आणि थोडं पुढं गेल्यावर माझे पाय बघ उलटे आहेत की सरळ असं काहीतरी विचारेल पण तसं काही झालं नाही. वाचला बिचारा. वाघ(मी) पिंजऱ्यात आहे त्याचा गैरफायदा घेतात ईथले दुष्ट आत्मे.

Pages