अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप पूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी मी लहान होतो. रात्री दोन तीनच्या दरम्यान आमच्या गावात एक अजब आणि चमत्कारिक गोष्ट घडत असे. रात्रीचे 2 वाजले की सगळे गावकरी जीव मुठीत धरून घरात बसत असत. तर त्या एक तासात आकाशातून भेसूर हसण्याचा आवाज येत असे. कोण हसतंय हे कोणाला माहीत नसायचं पण एखादा सैतान आकाशातून उडतोय आणि जोरजोरात हसतोय असला काहीसा तो प्रकार होता. त्याच्या हसण्याच्या आवाजावरून तो साधारण दीडशे दोनशे फूट उंचीवरून उडत असावा असं मला वाटतंय. त्याच्या अंगात प्रचंड ताकद होती. दोन चार बैलगाड्या एकदाच हवेत उडवून द्यायचा. पण त्याची नजर जास्त तीक्ष्ण नसावी असं मला वाटायचं. गावकऱ्यांनी त्याची खूपच धास्ती घेतली होती. सगळ्या गावात दिवसभर तोच विषय चघळला जात होता. काहींच्या मते ती भानामती होती तर काहींच्या मते देवाचा नवस फेडला नाही म्हणून देव कोपला होता. कोणी त्या सैतानाला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करत होते अर्थातच तो खोटा असायचा. नंतर वर्षभराने तो प्रकार बंद झाला.

अजून भरपूर विलक्षण थरारक गोष्टी माझ्या लहानपणी घडल्यात. लॉकडाउनच्या निमित्ताने त्या इथे लिहीन. अशीच एक झाडाची गोष्ट आहे. आज रात्री नाहीतर उद्या सांगतो.

अजून भरपूर विलक्षण थरारक गोष्टी माझ्या लहानपणी घडल्यात.
>> पाळण्यात असतांना पण खेळता खेळता दोन चार भुतांना लाथाडलं असेलच तुम्ही. आठवत असतील तर त्या पण कथा सांगा. Proud

पाळण्यात असताना जसं श्रीकृष्णांना मारायला कंसाने राक्षस पाठवले होते तसेच मला मारायला अनेक दुष्ट शक्ती आल्या होत्या पण त्या सगळ्यांना मी पुरून उरलो. माझ्यावर एक धारावाहिक मालिका निघू शकते.

ईतकी फेकाडेगिरी करायला वेळ कसा मिळतो की तीही दुष्ट शक्तींनी दिलेली देणगी आहे>>> मी इथे लिहितो त्या सगळ्या सत्य घटना आहेत.

माबोवर कोणी निर्माते आहेत का विचारा. नावीन्यपूर्ण धारावाहिक तयार होईल. अमानवीय पर भारी मानवीय बोकलत की शक्ती. एक अद्भुत शख्स जो भूतों पर पडते है भारी.भूतों का कर्दनकाळ, माबो के सुपरस्टार, बोकलत के चमत्कार Light 1 (हलके घ्या)

अमानवीय पर भारी मानवीय बोकलत की शक्ती. एक अद्भुत शख्स जो भूतों पर पडते है भारी.भूतों का कर्दनकाळ, माबो के सुपरस्टार, बोकलत के चमत्कार >>> झी न्युजची आठवण आली.

‌खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी लहान होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. मे महिन्याची सुट्टी म्हणजे दोन महिन्यांचा आनंदोत्सव. असंच आम्ही सगळ्यांनी रात्री जेऊन झाल्यावर गप्पा मारल्या आणि झोपायला गेलो. थोड्या वेळाने लाईट गेली. घड्याळात रात्रीचे अडीच वाजले होते. मे महिना असल्याने खूपच गरम होत होतं त्यामुळे मी अंथरून घेऊन अंगणात झोपायला आलो. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. झोपणार इतक्यात समोर एक पांढरी आकृती दिसली. कोण आहे हे पाहण्यासाठी मी जवळ गेलो तर ती एक म्हातारी स्त्री होती. विस्कटलेले केस, पांढरे डोळे, वाढलेली नखं, जळलेला विद्रुप चेहरा, उलटे पाय असं रुप असलेली ती म्हातारी खूपच खतरनाक दिसत होती. ती खूप भुकेली दिसत होती. मी विचारलं आजे काय पाहिजे तुला? पाणी देऊ का? की मटण वडे पाहिजे? ती फक्त भेसूर हसली आणि म्हणाली फक्त वडे आणि पाणी आण. मी वडे आणि पाणी घेऊन आलो. म्हातारी नुसते वडे कसे खाईल म्हणून पापड पण घेऊन आलो. म्हातारीसमोर ते सगळं ठेवलं आणि परत जायला वळणार इतक्यात म्हातारीचा हात माझ्या खांद्यावर पडला. भेसूर हसत म्हणाली वड्यांसोबत मटण म्हणून तुला खाणार आहे हाहाहा हीहीही. मी तो हात पडकला तशी ती चेटकीण आश्चर्यचकित झाली. हात पकडून मी मागे वळलो आणि इतक्यात लाईट आली. माझा चेहरा पाहून चेटकिणीचा चेहरा पांढराफटक पडला. थरथरत्या आवाजात बोलली बो बो बो बोकलत तू????? तू क क कधी आलास मु मु मु मुंबईवरून???? मी उत्तर द्यायच्या मनस्थितीत न्हवतो. भलाईचा जमानच नाही राहिला आजकाल असं बोलत त्या चेटकीणीला बुकल बुकल बुकलला. शेवटी लंगडत लंगडत, माफ कर बोकलत परत नाही येणार माफ कर म्हणत ती तिथून निघून गेली.

बोकलत, किस्से टाकत नका हो बसु. भयकथा, रहस्यकथा लिहा! उगाच तुमच टॅलेंट वाया का घालवताय??
(सिरिअसलीच घ्या माझी कमेंट.) Happy

मन्या सगळ्यात प्रथम मला टॅलेंटेड बोलल्याबद्दल तुमचे खूप सारे मनापासून आभार. तसा मी लहानपणापासून टॅलेंटेड होतो पण शिक्षकांना माझ्यातला टॅलेंट हेरता नाही आला. यात लॉस त्यांचाच झाला मी बोर्डात पहिला आलो तर त्यांचच नाव झालं असतं. मी काय बोर्डात आलो नाय आलो अमानवीय धाग्यावर लिहिणारच होतो आणि दहावी मार्कशीटचा उपयोग फक्त वय पडताळणीसाठी होतो आपल्याला काय फरक नाय पडला. जाऊ दे बिचारे एकेकाचं नशीब अजून काय. बाकी तुमच्या सूचनेचा मी गांभीर्याने विचार करेन.

अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स प्रमाणे येत्या १३ दिवसात मस्त पैकी १३ कथा लिहून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करायची संधी आहे अजूनही ...

Boklat tumhi mahabharat baghta vatate..tyamule tumhala aakashtun bhesur hasnyacha .n bailgadi udnaycha bhas hot asel.

छे बोकलत ! तुम्ही फक्त भुतांचे किस्से लिहीता. जरा जादूटोणा, करणी, भानामती यांचा तुम्ही कसा सामना केलात त्याचेही येऊद्यात. Proud

तिथे बाभळीच्या झाडावर चढताना माझा हात खरचटला. सकाळी उठलो पाहतोय तर खरोखरच हात खरचटला होता. >>
दृष्ट शक्तींनी डाव साधलाच होता. खरचल्यावर निभावलं.

फार पूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळी खूपच लहान होतो. उहाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो कि नदीवर मासे पकडायला जाणे हा माझा आवडता छंद. असाच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मासे पकडायला नदीवर गेलो होतो. नदी मोठी होती पण उन्हाळा असल्याने पाण्याची पातळी खाली गेली होती. एका नावेत बसून मी नदीच्या मधोमध गेलो आणि गळ टाकून बसलो. समोर सूर्य मावळत होता. संध्याकाळ झाली असल्याने छान वारा सुटला होता. मनावरचे ताण तणाव पाण्याला घाबरतात, एकदा का होडीत बसून पाण्यात गेलो कि ते काठावरच राहतात अशी माझी खात्री होती आणि अजूनही आहे. थोड्या वेळाने सूर्य मावळतीला गेला आणि छान तांबूस तवंग क्षितिजावर पसरला. ती कातरवेळ मला भुरळ घालणार इतक्यात हाताला झटका बसला, एक मोठा मासा माझ्या गळाला लागलेला होता. मासे खेकडी पकडून झाल्यावर मी घरी यायला निघालो तोपर्यंत रात्र झाली होती. हि नदी भुताखेतांच्या अनुभवासाठी प्रसिद्ध होती. मी काठावर उतरून घरी जायला निघणार इतक्यात पाण्यात सळसळ झाली आणि चक्क एक पेटलेली बाई नदीतून बाहेर निघाली आणि माझ्याभोवती चार पाच गोल फेऱ्या मारल्या आणि पुन्हा नदीत गेली. दोन मिनिटांनी पुन्हा हा प्रकार झाला. ती पेटलेली बाई सारखी नदीतून बाहेर निघत होती माझ्याभोती गोल चकरा मारून पुन्हा नदीत जात होती. मी अजिबात लक्ष दिलं नाही. त्या दुष्ट शक्तीची हद्द संपेपर्यंत हा प्रकार सुरु होता. ती कोण होती माझ्याभोवती गोल गोल का फिरत होती हे अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.

पुढे मोठ्ठे झाल्यावर बोकलत इकडे येऊन आपला सध्याच्या दराराला कमी/नामशेष करू नये म्हणून ती मस्का लावायच्या उद्देशाने खेकड़ी आणि मासा भाजून कबाब करून देत तुम्हाला खुश करण्यासाठी मागेपुढे घोटाळत होती. पण अल्पवयामुळे तुमच्याकडून रितसर परवानगी न मिळाल्याने बिचारीची ही इच्छा अपूर्णच राहिली..

हर कहानी के पिछे एक कहानी होती है.

अज्ञातवासात असताना मी एका ठिकाणी जास्त काळ थांबू शकत नसे. अशाने त्या जागेचा मोह होऊन अज्ञातवास भंग होण्याची भीती असते.
असाच पायी भ्रमण करत असताना एका मनोहर गावात मी पोहोचलो. गाव तसं छोटंच होतं, मात्र त्या गावातल्या नदीच पात्र फार मोठं होतं.
नदी ही आपल्या सगळ्यांची जीवनरेखा. तिच्या जलावर सर्व प्राणीमात्र गुजराण करतात म्हणून प्रत्येक गावाच्या नदीला वंदन करूनच पुढे जायचं असा माझा दंडक होता.
नदीला प्रणाम करताना दूरवर माझ्या नजरेस एक लहान बालक पडला. हा बालक कुणी साधारण बालक नसून भविष्यात हा भूतनाशक बोकलत होईल हे मी माझ्या दिव्यदृष्टीने ताडले. या बालकावर माझाही अनुग्रह व्हावा आणि त्याचं कल्याण व्हावे या उदात्त हेतूने मी पाण्यावर चालू लागलो, पण असे करता बालकाला भय वाटेल हे उमजून मी परत फिरलो, आणि नदी किनाऱ्यावर बसून राहिलो.
बरेच मासे पकडून तो बालक किनाऱ्यावर आला. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते. मात्र त्याक्षणी पाण्यात सळसळ झाली, पाण्यातून तप्त लाव्हा निघावा तशी एक पेटती स्त्री पाण्यातून निघाली.
ती स्त्री आग्यावेताळची बहीण आगीनगाडी असल्याचे माझ्या लक्षात आले. ती भूत असूनसुद्धा तिला भविष्याची जाण होती, आणि त्यामुळेच ती या दिव्य बालकाचा अंत करण्यासाठी आली होती.
मी सिद्धमंत्र जपून अदृश्य राख हवेत फवारली, ज्यायोगे बालकाच्या आजूबाजूला एक अद्भुत कवच निर्माण झाले. हे कवच भेदणे फक्त वेताळला शक्य होते, त्यामुळे ती कवचाभोवती फेऱ्या मारून थकली, आणि वेताळला बोलवायला गेली.

क्रमशः

पुढे.

मनोवेगाने ती वेताळजवळ पोहोचली. वेताळाने तिला महसिद्धी दिली. आता खरा सामना होता, तिने महासिद्धीने कवच भेदण्यास सुरुवात केली. मीही मंत्रशक्तीने पुन्हा कवच निर्माण करू लागलो. आमचा हा सामना पराकोटीला पोहोचला. जेव्हा जेव्हा महसिद्धी थकून निघून जाई, तेव्हा तेव्हा ती परत तिला बोलावून आणत असे. अशाच एका क्षणी मी आगीनरेषा आखली. या रेषेच्या पलीकडे फक्त तो बालक जाऊ शकत होता, आगीनगाडी नाही.
बराच वेळ आमचं द्वंद्व चाललं, आणि शेवटी एकदाची त्या बालकाने रेषा पार केली, व तो या संकटातुन मुक्त झाला.
हे बघून आगीनगाडीने आक्रोश केला, व ती पाण्यात निघून गेली. (तिथून वेताळलोकात जाण्याचा मार्ग आहे.)
देवलोकातून माझ्यावर पुष्पवृष्टी झाली. देवतांनी मला अनेक आशीर्वाद दिले.
मी त्या बालकाला स्वतः भेटून अनुग्रह देऊ शकलो नाही, पण त्याने पकडलेल्या एका माश्यामध्ये मी माझ्या दिव्यदृष्टीने आत्मज्ञान प्रदान केल. त्या माशाच भक्षण करून त्या बालकाचा आत्मा सुखावला, व आत्मज्ञानाने त्याच्या आत्म्यात प्रवेश केला.
भविष्यात अनेकदा मी त्याला गुप्त रूपाने मदत केली, त्याची कथा पुढे कधीतरी!!!

Pages