अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हायला, त्या रोलिंग बाईंच्या,
"हरी कुंभार आणि अझ्कबानचा कैदी" या कथेत असाच एक प्रसंग आहे. "पितृदेव संरक्षणम" म्हणत तो हरी एकाला पिशाच्चांपासून वाचवतो.

हे सत्यघटनेवर आधारित असेल याची कांही कल्पना नव्हती. मागा रॉयल्टी. Biggrin

कोणे एकेक्काळी मी असाच अनेक नगरींमधून भ्रमण करत होतो. चौदा स्वर्ग, सप्त पाताळ यांच्या सीमेपलिकडे या नगरी होत्या.
एके ठिकाणी माझे पाय थबकले. मला त्या जागेहून हलताच येईना. माझे शिष्यही हे बघून कासावीस झाले. ब्रह्मांडात हलकल्लोळ माजला.
मी सर्वांना शांत करून दिव्य दृष्टीने बघितले, तर सत्ययुगात ती जागा हयग्रीव राजाने विश्वविद्यालय बांधण्यासाठी दान केल्याचे मला आढळले, आणि ते पवित्र कार्य माझ्या हातून व्हावं अशी त्या मूळमायेची इच्छा होती. मी खाली वाकलो. त्या भूमीला वंदन केले, आणि तिची माती माझ्या भाळी लावली, आणि मुक्त झालो.
माझ्या देशोदेशीच्या शिष्यांनी मंत्रशक्तीद्वारेत्या जागेची बांधणी सुरू केली, आणि हयग्रीव राजाने दाखवलेल्या वाटेच प्रतीक म्हणून त्या विश्वविद्यालयाचं नाव 'हयग्रीववाट' असे ठेवले.
कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन 'हॉगवर्ट्स' हे नाव रूढ झाले.

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा लहान होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. आमच्या गावाच्या वेशीबाहेर मोठं चिंचेचं झाड आहे. त्या झाडावर खूप चिंचा लागलात. त्यांची चव तर विचारूच नका. गावातले अनेक लहान मोठी माणसं चिंचा पाडण्यासाठी धडपडत असतात. पण चिंचा पाडणं वाटतं तेव्हडं सोपं नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या झाडावर एक जखीण राहते त्यामुळे रात्री आणि दुपारी तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. रात्री आणि दुपारी जर तुम्ही झाडाजवळ गेलात तर तुम्हाला अनेक चिंचा दिसतात. अगदी हाताने तोडू शकता एव्हड्या खाली. पण तो जखीणीने तयार केलेला भुलभुलैया असतो. चिंच तोडायला जाल तर जखीण सरळ झाडाच्या शेंड्यावर खेचून घेते. दुसरी गोष्ट म्हणजे ते झाड आमच्या गावतल्या एका तापट माणसाच्या मालकीचे आहे. त्याला सगळे पाटीलबा म्हणतात. सकाळी संध्याकाळी तो आजूबाजूच्या झाड झुडपात लपलेला असतो. माणसं चिंचेच्या झाडावर दगड मारायला लागली की हा त्याने पाळलेला गावठी कुत्रा त्यांच्या अंगावर सोडतो आणि मग सगळ्यांची पळता भुई थोडी होते. तर मी गावी गेल्यावर सगळे मित्र खरं की हिम्मत खेळत होतो. माझा टर्न आल्यावर मी हिम्मत निवडली. सगळे बोलले जा चिंच घेऊन ये. दुपारची वेळ होती. मी झाडाजवळ गेलो पाहतोय तर झाडाचं पान दिसत न्हवतं एव्हड्या चिंचा. पटीलबा दुपारी झोपला असेल म्हणजे हा जखणीचा भुलभुलैया आहे हे माझ्या चाणाक्ष मनाने लगेच जाणलं. मी लगेच मंत्र पुटपुटायला सुरवात केली. थोड्याच वेळात झाडाचं खरं दृश्य दिसलं, चिंचा एकदम शेंड्याला होत्या आणि तिथेच ती दुष्ट जखीण बसली होती. भेसूर हसत हसत ती झाडावरून खाली आली आणि म्हणाली 'बालक तेरी मौत तुझे यहा खिच लाई है'. मी मंद स्मित केलं आणि म्हणालो चिंचा दे ताई मला इथून जाऊ दे. तशी ती जोरात हसली आणि माझ्यावर काळ्या जादूचा प्रयोग करू लागली, माझ्याजवळ येऊन माझा गळा पकडायचा प्रयत्न करू लागली परंतु माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी गेलो चिंचा काढल्या आणि पुन्हा घरी आलो. तुम्ही सगळे आता विचार करत असाल की बोकलतवर जखणीच्या शक्तीचा काहीच परिणाम कसा झाला नाही. तर जेव्हा माझ्या मित्रांनी मला हिम्मत टास्क दिला मला खूप भूक लागली होती. घरी सुरमई फ्राय केली होती त्यामुळे मी चिंचेच्या झाडाखाली जायचा बेत कॅन्सल केला आणि माझी परछाई चिंचेच्या झाडाजवळ पाठवली आणि मी मस्त घरी जाऊन ताव मारला. तेव्हड्या वेळात माझी परछाई चिंचा घेऊन आली आणि माझा टास्क पण पूर्ण झाला.

खूप वर्षपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी लहान होतो. मी सुट्टीत मामाच्या गावी गेलो होतो. जाताना आगीनगाडीत मी सारखा मामाच्या गावाला जाऊ या गाणं बोलत होतो. लोक्स माझ्याकडे कुतुहलाने पाहत होते. गावी पोहचल्यावर मस्त जेवलो आणि खेळायला बाहेर गेलो. दुपारची वेळ असल्याने बाहेर कडक ऊन पडलं होतं. मी चालत चालत तळ्याजवळ आलो. या तळ्याचा मालक एक वेताळ होता. मी पाणी प्यायला जाणार इतक्यात वेताळ बाहेर आला आणि म्हणाला थांब, हे तळं माझ्या मालकीचं आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तरच तू पाणी पिऊ शकतोस. नुकत्याच वार्षिक परीक्षा संपल्या होत्या त्यात उत्तरं देऊन देऊन बोटांची सालटं निघाली होती, त्यामुळे हा काय नवीन शॉट डोक्याला म्हणून वेतळाला न जुमानता पाणी प्यायला लागलो. पाणी पिऊन झाल्यावर माझा घसा दुखायला लागला मी घसा दाबून तडफडायला लागलो. थोड्या वेळाने सगळं शांत झालं आणि माझा आत्मा शरीराबाहेर आला. माझा निष्प्राण देह बाजूलाच पडलेला होता. मला वेतळाचा खूपच राग आला होता मी स्त्री पिक्चरमध्ये ती स्त्री उडत जाते तसा त्या वेताळाजवळ पोहचलो. माझ्या डोळ्यातून आग निघत होती. वेतळाला बुकल बुकल बुकलला आणि पुन्हा माझ्या निष्प्राण देहाजवळ येऊन त्यात प्रवेश केला आणि घरी गेलो. ज्याप्रमाणे अंडरटेकरला सात जन्म आहेत त्याप्रमाणे मलापण सात जन्म होते त्यातला एक त्यादिवशी संपला.

मीटिंगमध्ये काढतो विषय.
Submitted by बोकलत >> लॉक डाऊनमध्ये मिटींग कसल्या घेता. ऐनवेळी भुतं जातील पळुन आणि तुम्ही.. Proud

पळून कसे जातील. वडाच्या झाडावर येतात त्यांच्या मर्जीने आणि खाली उतरतात माझ्या मर्जीने. मधूनच कोण पळाला तर महिनाभर रोज सकाळी संध्याकाळी लोकांच्या घरी पाणी भरायला लावतो.

ओह्ह
मला वाटलेले की मधूनच कोण पळाला तर महिनाभर रोज सकाळी संध्याकाळी अमानवीय धाग्याचे १०० प्रतिसाद वाचायला लावता

बोकलत, ही पोस्ट मी फक्त तुमच्या साठी लिहित आहे,मी मायबोलीवर 4 वरश्यापासून आहे, फारसे लिहीत नाही पण वाचनमात्र असते,अमानवीय धागा जो अशुचाम्प यांनी काढला होता तेंव्हा पासून वाचत होते,अमानवीय सर्व धागे वाचत होते, काही ठिकाणी प्रतिसाद पण दिले ,अनुभव पण सांगितले, शेवटच्या धाग्यावर तुम्ही आलात, आणी ध्याग्याला विनोदाचे रूप आले, आधीही लोकांनीं अनुभव सांगितले , वाद घातले, पण त्यामध्यें एक sacche पणा होता, पण तुम्ही आल्यावर खरोखरच धागा विनोदी झाला, काही लोकांनी तुमची निंदा केली, काहींना तुमचे लिखाण आवडलं, परंतु मला असे वाटते की कुठेतरी धाग्याचा आत्मा हरवला, हे फक्त तुमच्या मुळे झाले असे नाही तर अनेकांनी त्याला हातभार लावला ,शेवटी धाग्याची पण life असते, नवीन धागा तुम्हीच काढला तिथेही तेच, असो हे सर्व वाचावं की नाही याचे स्वातंत्र्य आहेच, तरीही राहवले म्हणून लिहिले आहे,
जेव्हा तुम्ही अमानवीय धाग्यावर कुठल्या तारी haunted हॉस्पिटल चे फोटो टाकले तेंव्हा कळाले की तुम्हाला अमानवीय जाणवते, पण याला विनोदाचे रूप का? तुम्हाला जर खरेच काही जाणवत असेल तर किमान अश्या भाषेंत लिहा की ते किमान गमतीचा भाग वाटणार नाही, तुमच्या इतर पोस्ट वरून तुम्ही सेन्सिबल आहात असे वाटते, म्हणून हा प्रपंच,
या यानंतर कोणत्याही चिखलफेकीला मी उत्तर देणार नाही,

बोकलात मी सुद्धा अश्विनी यांच्याशी सहमत आहे
कधीतरी भुताच्या गोष्टी वाचायचा मूड येतो तेव्हा इतर काही वाचण्यापेक्षा अमानवीय वाचावे असे वाटते,पाहिले काही भाग खरेच मस्त वाटतात वाचायला
पण तुम्ही त्यातल्या थ्रिल ची अक्षरशः वाट लावून टाकली आहे Angry

आमच्या नेताजी नगरमध्ये संध्याकाळि बागेत, झाडांमधुन धूर निघताना दिसे. बाबा शेवटी जवळ जाउन पाहून आले - तर झाडामधुन डासांचा तांडाच्या तांडा निघताना दिसला जो लांबून धूरासारखा वाटे.
हे सत्य आहे.

आजच माझ्याबाबतीत घडलेला एक खरा किस्सा तुम्हाला सांगतो. आम्ही जिथे झोपतो त्या खोलीत एक कपडे वाळत घालायचा स्टँड आहे. पहाटे तीन चारचा सुमार असावा. तो स्टँड कोणीतरी पकडून हलवत होतं. मुलगी लहान आहे त्यामुळे सकाळी ती उठून खेळत असेल असा समज करून मी दुर्लक्ष केलं. नंतर आवाज खूपच वाढला उठून बघतोय तर मुलगी शेजारीच झोपली होती, घड्याळात 3.40 वाजले होते. उठलो तसा तो आवाज बंद झाला.

आता तुम्ही सगळे बोलताय तर थांबवसं वाटतंय.>> नको नको. ह्या त्या धाग्यांवर उंडगण्यापेक्षा ह्याच धाग्याला धरून रहा, बरं होईल. Wink

अश्विनि दिक्षित >> अगदी बरोबर बोललात तुम्ही ...

बोकलात कुठे तरी हे थांबायला हवं असा नाही वाटत का तुम्हाला? भय रस म्हणून कित्येक लोक हा धागा वाचायचे पण तुम्ही धागा तर संपवलाच आणि अजूनही थांबत नाही. तुमचे इतर ठिकाणच्या प्रतिक्रिया पाहून तुम्ही सेन्सिबल आहात असे वाटले म्हणून सरळ सरळ म्हणतो बस करा आता

४-५ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. ऑफिस कामासाठी काही दिवसांकरीता दुस-या शहरात जाण्याचा योग आला. मुंबैची धावपळ, लोकलप्रवास यापासुन काही दिवस सुटका होणार असल्याने मी व माझे ३ सहकारी खुष होतो. रहाण्याची व्यवस्था शहराच्या गजबजाटापासुन दुर एका शांत वसाहतीत केली होती, एका छोट्या बंगल्यात. शेजारी बंद घरं, बंगल्यामागच्या वाड्यातला उंच वाढलेला पारिजातक आणि निरव शांतता यामुळे एकुणच गुढ वातावरण वाटायचं. नाही म्हणायला जवळच एक पोलीस चौकी होती सोबतीला आणि बंगल्याच्या समोर टाकलेल्या अपघातग्रस्त गाड्या. दिवसभर काम करुन रात्री मुक्कामाला येत असल्याने विचार करायचा फारसा वेळही नव्हता. असेच काही दिवस गेले अन एका रात्री सगळे गाढ झोपेत असताना २-३ च्या सुमारास स्रीच्या रडण्यासारखा आवाज यायला लागला. जाग आल्यावर क्षणभर वाटलं की बाहेर अंगणात कोणी महिला मोठ्याने रडते आहे. इतर दोघांनाही तसाच भास झाला. नंतर लक्षात आलं की आमचा तिसरा मित्रच झोपेत रडत होता. त्याला जागं केल्यावर विचारलं तर त्याला काहीच आठवत नव्हतं. दुस-या दिवशी आम्ही दिवसभर त्याला चिडवत होतो की समोरच्या अपघातग्रस्त गाड्यांमधील एखाद्या बळीनेच त्याला रात्री झपाटलं असावं. त्यानंतर तसा प्रसंग पुन्हा घडला नाही आणि आम्हीपण फारसा विचार केला नाही.
पण आता विचार करतो की खरच तसं काही असतं तर.

Submitted by उनाडटप्पू on 9 April, 2020 - 22:55>> हो तुमचं म्हणणं पटतंय. आता मला खरच थांबवसं वाटतंय.

Submitted by वीरु on 10 April, 2020 - 00:50>>> ती एक दुष्ट शक्ती असू शकते जी तुमच्या मित्राच्या अंगात आली असेल. त्या रात्री अजून काही घडलं का? म्हणजे मित्राचं शरीर हवेत उचललं जाणं, मित्र भिंतीवर चढणं वैगरे.

त्या रात्री अजून काही घडलं का? म्हणजे मित्राचं शरीर हवेत उचललं जाणं, मित्र भिंतीवर चढणं वैगरे.
>> नाही. सुदैवाने तसं काही झालं नाही.

कोणी कधी रात्रीच्या शांततेत लहान बाळाचा हसण्याचा आवाज ऐकला आहे का? ते दिवसाचे निरागस हास्य रात्रीच्या अंधारात किती भयानक वाटतं याचा अनुभव मी घेतला आहे.

आम्ही ट्रेक करून रात्री सापुताऱ्याजवळ एका छोट्या ३-४ रूम असलेल्या लॉज मध्ये थांबलो होतो. इतर सगळ्या रूम्स बंद होत्या फक्त आम्हीच होतो. बाहेर किर्र अंधार फक्त एक छोटा बल्ब चा काय तो उजेड होता बाहेर. रात्रीचे ३ वाजले असतील आणि अचानक लहान बाळाचा हसण्याचा आवाज येऊ लागला ... त्या आवाजानं सगळ्यांनाच जाग आली आणि एकदम तंतरली आमची. नंतर पहाटे पहाटे आम्ही जरा बाहेर आलो तेव्हा तिथल्या चौकीदाराने सांगितले कि आमच्या शेजारची खोली त्याने एका मजूर जोडप्याला दिली कारण ते लहान बाळा बरोबर बाहेर कुडकुडत बसले होते. ते ऐकून जीवात जीव आला, परंतु तो हसण्याचा आवाज कधी विसरणार नाही ...

Pages