अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

याच धाग्यावर आहेत सगळ्या गोष्टी. अमानवीय 2 धागा बघा.वेगळा असा धागा नाही. एक कल्पतरू यांनी काढलेला धागा होता तिथे काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत.
https://www.maayboli.com/node/67250

"याच धाग्यावर आहेत सगळ्या गोष्टी. अमानवीय 2 धागा बघा.वेगळा असा धागा नाही. एक कल्पतरू यांनी काढलेला धागा होता तिथे काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत." ----> ठीक आहे शोधतो की मी , आणि बाय द वे मला अरे तुरे बोल प्लिज! एक तर तुझं प्रोफाईल पिक बघून तू यंग आहेस अस माझ्या बुद्धीने पक्क केलय. हा! हा! ह!
थॅंक्स फॉर दॅट नोड बोकलत !

अहो तो त्यांच्या मुलाचा फोटो असू शकतो... आजकाल पब्लिक पोरांचे फोटो लावते प्रोफाईल मध्ये...
Boklat यांनी अमानवीय शक्तींशी लढण्यासाठी चोवीस वर्षे तपश्चर्या केली होती असे वाचल्याचे आठवतेय... Wink

त्या तपश्चर्येचं फलित म्हणून बोकलत वेगवेगळी रुपे धारण करू शकतात हडळींना वश करायला. त्यातलंच एक रूप असेल ते प्रोफाइल पीक Wink Wink Wink .

अजिबात वाट वगैरे काही नाही लावली. उलट जीव ओतला धाग्यात या माणसाने. फक्त हा धागा सोडून त्याने इतर कुठल्या धाग्यावर येऊ जाऊ नये एवढीच माफक इच्छा आहे Wink

बोकलत भाई मी तुमचा खूप मोठा आणि जूना पंखा आहे. लवकर येऊदे धडकी भरवणारे किस्से. किस्से वाचून कमजोर दिलवाले पळाले पाहिजेत धाग्यावरुन.

उलट जीव ओतला धाग्यात या माणसाने. फक्त हा धागा सोडून त्याने इतर कुठल्या धाग्यावर येऊ जाऊ नये एवढीच माफक इच्छा आहे >> याला जीव ओतणं म्हणतात??
तुम्ही दुसरीकडे थरारक अनुभव लिहा पाहु. ते पण धावत येतील त्यांचे अनुभव सांगायला. Happy

खरं सांगायचं झालं तर मी आता दमलोय. घोस्ट हंटिंग करून कंटाळा आलाय. शरीर आणि मन थकल्यासारखे वाटत आहे. असं वाटतंय आपल्याला जे आयुष्यात पाहिजे होतं ते सगळं मिळालंय. माझ्या आयुष्यात फार मोठ्या अपेक्षा न्हवत्या. गाडी बांगला नोकर चाकर ही भौतिक सुखं मला कधीच नको हवी होती. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुखावून जात होता, पण आता बस्स. मी दमलोय. पैलतीर कधी दिसतोय याची आतुरतेने वाट पाहतोय. #Broken

Pages