अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे काय बोकलत भाऊ? ही भाषा शोभत नाही गड्या. वाटेत चढ आले, घाट आले म्हणून थांबायचं नाही. जिंदगी एक सफर सुहाना... उड लै उडलै गाणं बघा किंवा म्हणा बघा कशी येनर्जी येते की नाही.

मलाच एक किस्सा आठवला, आईने सांगितलेला.
मी तेव्हा इंजीनियरींगला होते, माझी चूलत आजी वारली होती, आमच्या बिल्डिंगच्या पलिकडच्या बिल्डिंगमधे आजी आजोबा राहायचे, आजीच्या शेवटच्या काळात आईने तीची खूप काळजी घेतली होती. आजीचे अंतिम विधी करून आलेल्या दिवशी आजी रात्री आईच्या स्वप्नात येउन म्हणाली, तु माझ्या चपला घालून आलीयेस. आईने सकाळी दारात पाहिले तर खरच आजीच्या चपला होत्या, आई म्हणाली रात्री लाईट नव्हते म्हणून चुकुन घातल्या असतील. त्या नंतर मी आजीच्या घरी जायला खुप घाबरायचे.

इथे कोणीही अनुभव टाकला की त्याची टरच उडवली जाते असं लक्षात येतंय
कदाचित यामुळेच कुणीही आलेले अनुभव इथे शेअर करू इच्चीत नाही,मी सुद्धा मला सध्याच आलेला एक अनुभव मी इथे टाकून पुन्हा संपादित केला,
प्रत्येक वेळी ज्याला अनुभव आलेला आहे तो वेडेपणा कसा आहे तेच दाखवले जातेय,ज्याला आवडत नाही त्याने ये धाग्यावर येऊ नका ना,आमच्या सारख्या इतरांच्या मूड चा कशाला विचका करता,
काही अनुभव खरे असतात काही ऐकीव असतात पण ज्यांना आवडतात त्यांना तरी सुखाने वाचू द्या,जिथे तिथे आपल्या मताची पिंक टाकत बसतात Angry

आदू मी अनुभव नाकारला नाही, फक्त किश्श्याची नायिका आजीच्या स्वभावाबद्दल लिहिले आहे. मेल्यानंतर चपलेची तीला काळजी आहे हे पाहून तीचं पूर्वायुष्य कसं असावं हे माझ्या मनात आलं.

धन्यवाद जी. मी अजिबात टिंगलीनं लिहिले नव्हतं. आमच्याकडे संसारात फार जीव असलेल्या लोकांना ' चिरगुटचघळे' म्हणतात. चिरगुटाचा सुध्दा मोह सुटत नाही.

पैलतीर कधी दिसतोय याची आतुरतेने वाट पाहतोय. #Broken
Submitted by बोकलत >>
फारच भावुक झाले तुम्ही.
काळजी करु नका. जोपर्यंत प्रशासनाच्या नजरेत येत नाही, तोपर्यंत मा.बो.वर पैलतीर दिसत नाही. चिंता नसावी. Happy

अजून एक किस्सा आठवला.
आईचा अनुभव, माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते, आई त्यांच्या अंतिम विधी वरून, मावशी सोबत तिच्या घरी गेली होती, आई दार उघडून घरात प्रवेश करणार तोच काका म्हणजे मावशीचे मिस्टर समोर उभे होते आणि आईकडे बघून स्मित करत होते.

आई पायाळू नाहीए, पण खूप डेरींगबाज आहे, कशालाच घाबरत नाही आणि मी मात्र जरा भित्री होते लग्नाआधी, माझे आजोबा मी पहिलीत असताना वारले होते,त्यांचा घरात एक फोटो होता, तो बघितला की मी आणि माझा भाऊ घाबरायचो.झोपताना तर आम्ही तो फोटो उलटा करून झोपायचो.

बोकलत भाऊ>> का दमला आहेत तुम्ही आणि शरीर आणि मन थकल्यासारखे वाटत आहे. >>का वाटत आहे असे?? तुम्ही आता टाकाच कोणता तरी किस्सा.

माझा एक जबरी किस्सा आहे, पण मोठा आहे. एवढे लिहिणे जमेल तेव्हा देईन इथे.
Submitted by मानव पृथ्वीकर >>
अशी उत्सुकता वाढवु नका हो. जमल्यास क्रमश: लिहा. आम्ही गोड मानुन घेऊ. Happy

लहानपणी आई-वडील बाहेर गावी गेले आणि आम्ही भावंडेच घरी असलो की, अक्षय तृतीयेला पूजलेला करा घेऊन आम्ही त्यात पाणी भरून उशाला ठेवत असू. पितर रक्षण करतील अशी आशा वाटायची.

आई दार उघडून घरात प्रवेश करणार तोच काका म्हणजे मावशीचे मिस्टर समोर उभे होते आणि आईकडे बघून स्मित करत होते.

>>>> Rofl Rofl

आता माबोकर भुतांसारखे बोकलतच्या मागं लागलेत आणि बोकलत घाबरून लपून बसले आहेत. कर्माचा सिध्दांत !!

तसेही मला आठवणारे किस्से आता संपलेत.
आईला फोन करून विचारावे लागेल, बहिणीकडे पण बरेच किस्से असतात, दवाखान्यातले, होस्टेल मधले.
वेळ मिळाला कि विचारेन.

खरे तर हा योग्य धागा नाहिये विचारायला पण पंचकाबद्दल कोणाचे काही धागे आहेत का? एका ओळखिच्या घरात एक वयस्कर व्यक्ती अमावस्येच्या दिवशी वारली तर त्या नंतर दर वर्शी त्यांच्या घरात एका व्यक्तीचा मृत्यु होतो आहे. त्या व्यक्तीनंतर तीन व्यक्ती गेल्यात, बर्‍यापैकी तरुण. आजुबाजुच्यां मधे चर्चा आहे की पहिली व्यक्ती पंचकावर गेली म्हणुन असे होत आहे.

पंचक हे फक्त मृत्यू वेळी पाहतात. बरेचदा गुरुजींना विचारुनच अंत्यविधीची वेळ निश्चित करतात. काही तरी शांती असेल पंचकातील मृत्यूसाठी.

पंचकाबद्दल असे ऐकले आहे खरे,
आमच्या फॅमिली फ्रेंडच्या घरी कुणाचा तरी असा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबातील अजून दोन जणांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी कुठेतरी बघून कसलीशी शांती करून घेतली होती.

शांती वगैरे तर काय करुन नाही घेतली त्यांंच्या घरातल्या लोकांनी. सांगितले तर ऐकणारही नाहीत. घरातल्या बाकिच्या लोकांच्या मात्र जिवाला घोर.

Pages