केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वापरलेला.माझे केस गळत नव्हते. पण हो केस चांगले मौमौ झालेले.

माझ्या एका मैत्रिणीला केस गळु नये म्हणुन तिच्या डॉ. नी Himalaya चा anti hire fall वापरायला सांगितलेला.

माझे केस मोठे आहेत. नेहमी वेणी घालते(मोकळे सोडत नाही)तरीही खूप गुंततात.इतके की दोन भाग करुन विंचरताना दुसरा भाग विंचरेपर्यंत पहिल्या भागात परत गुंता होतो.असे का होत असेल .कोणाला अनुभव आहे का?

धागावर आलायच तर माझाही एक प्रश्न विचारते.

आयुर्वेदीक दुकानातुन रिठा आणि शिकेकाई आणलेय , दुकानदाराने सांगीतले होते की रात्री भिजत घालुन सकाळी शाम्पुसारखे वापरायचे पण ते काही निट जमत नाही.

कोणाला माहीत असेल तर कृपया सांगा.

माझे केस मोठे आहेत. नेहमी वेणी घालते(मोकळे सोडत नाही)तरीही खूप गुंततात.इतके की दोन भाग करुन विंचरताना दुसरा भाग विंचरेपर्यंत पहिल्या भागात परत गुंता होतो.असे का होत असेल .कोणाला अनुभव आहे का? >>

माझं बोरींगच्या पाण्यामुळे व्हायचं. आता नळाला फिल्टर बसवल्यामुळे प्रमाण बरेच कमी झाले. केस रुक्ष झाले की हा त्रास वाढतो.

Vb, आम्ही पूर्वी शिकेकाई थोड्या पाण्यात उकळून मग पंचात गाळून अशी वापरायचो, डोळे जाम चुरचूरायचे नंतर पण तो शिकेकाई चा वास खुप मस्त यायचा. आता शिकेकाई शांपू आणते

धन्यवाद नौटंकी. इथल्या पाण्यामुळेच होतंय खरं.आता इथे वाचून नारळाचे दूध, जास्वंद इत्यादी उपाय घरी जाऊन करणार आहे.कोंडा आहेच, केस दुभंगले आहेत, रुक्ष झाले आहेत. गळतात.फक्त पांढरे नाहीत एवढेच काय ते सुख

केस खुपच कोरडे झालेत. आणि गळायला ही लागलेत.. पिंजरल्यासारखे दिसत आहेत. Sad
काय करु जेणेकरुन केसांचा कोरडेपणा आणि केसगळती कमी होईल..

काय करु जेणेकरुन केसांचा कोरडेपणा आणि केसगळती कमी होईल..>>>> या धाग्यावर अनेकांनी लिहिले आहे बघा नारळाचे दूध.अनेकांना चांगले अनुभव आहेत

मऊ केसांसाठी आंघोळीच्या आधी अर्धा तास कापूर खोबरेल तेलात मिसळून केसांना लावायचा. आणि माईल्ड शॅम्पू वापरावा. ट्रेसेमे मध्ये सल्फेट कमी आहे त्यामुळे केस रुक्ष व्हायचं प्रमाण कमी होतं. आणि सगळं तेल २ ३ वेळा शॅम्पू लावून धुवून काढू नये. तेलाऐवजी अख्खं अंड किंवा कोरफडीचा गर पण चालेल.

ॲमॅझॉनवर शॉवर फिल्टर मिळतो. त्याचा चांगला फरक पडतो.

दोन भाग करुन विंचरताना दुसरा भाग विंचरेपर्यंत पहिल्या भागात परत गुंता होतो.असे का होत असेल .कोणाला अनुभव आहे का?

केसांची प्रथिने पाण्यातील क्षारांमुळे थोडी डीनेचर होतात. जितके पाण्यात क्षार जास्त तितके केस जास्त खराब होतात.

यामुळे केसाचे एकमेकांबद्दल स्थैतिक आकर्षण वाढते आणि ते एकमेकांना चिकटतात आणि त्यात गुंता होतो. यासाठी शाम्पू केल्यावर कंडिशनर लावतात तो पूर्ण धुवायचा नाही. कंडिशनर केसांवर एक अत्यंत सूक्ष्म असा (एक रेणूच्या जाडीचा) तेलाचा थर तयार करतो. त्यामुळे केसाचे एकमेकांबद्दल स्थैतिक आकर्षण कमी होते आणि केस अतिशय तलम आणि मुलायम दिसतात. लिव्हॉन सारखा केसांचा कंडिशनर पण लावू शकता.

The outermost layer of a hair follicle is called the cuticle and is composed largely of keratin. This is rich in cysteine groups which are mildly acidic.When the hair is washed these groups can deprotonate म्हणजे त्यातील हायड्रोजनचे अणू कमी होतात , giving the hair a negative charge.
Positively charged quaternary ammonium species, such as behentrimonium or polyquaternium in conditioner can then become attached to the hair via electrostatic interactions. Their long hydrocarbon backbone helps to lubricate the surface of each hair follicle, reducing the sensation of roughness and assisting combing.
The surface coating of cationic groups means that hairs are repelled from each other electrostatically, which reduces clumping. The compounds can also act as antistatic agents,

काही वेळेस प्रयोग करून आपल्याला कोणता कंडिशनर लागू पडतो ते पाहें आवश्यक आहे आणि जो आपल्याला सर्वात चांगला लागू पडतो (सूट होतो) तो वापरावा.

खोबरेल तेल केसांना कंडिशनर म्हणूनच काम करते त्यामुळे तेल लावले तरीही केस गुंतत नाहीत. परंतु खोबरेल तेलाचे रेणू बरेच मोठे असल्याने केसावर तेलाचा जाड थर राहतो आणि केस तेलकट दिसतात जे बऱ्याच लोकांना चालत नाही.

माहिती व सल्ल्याबद्दल धन्यवाद सुबोध खरे सर.
कोंड्यासाठी पण खोबरेल तेल+कापूर असा उपाय ऐकला आहे. तसेच कोंड्यासाठी तीळ+मेथी+ओले खोबरे एकत्र वाटून लावायचे असाही एक उपाय आहे.केस मऊ करण्यासाठी कोरफडीच्या गराचा उपयोग होतो.मेथीचाही उपयोग होईल असे वाटते.पण नारळाचे दूध एक नंबर

कनिका, खाण्यात बदल झालाय का?
फिल्टर लावून पाणी वापरा. प्रथिनेयुक्त जेवण घ्या.

वीबी, रीठा व शिकेकाई पाण्यात चांगली शिजवावी मध्यम आचेवर, मग उकळी आली की , मंद आचेवर ठेवून बुळबुळीत पाणी दिसली की गाळायचे, त्यात पाण्याच्या १/२ कोरपड गर आणि खोबरेल तेल जरासेच टाकून मिश्रण घुसळून घ्यायचे, मग केसाला लावून चोळून ठेवायचे. एक तासाने अंघोळीला गेले की, कोमट पाण्याने धुवायचे.
मौ रहातात. मी हा उपाय स्वछ केसांवर केलाय.

अतिशय घामट असतील तर रीठा शिकेकाईपेक्षा ज्यास्त घ्यायचा. नाहितर प्रमाण अर्धे अर्धे घ्यायचे.
केल्यावर कळवा उपाय लागू पडला की नाही, इतरांना उप्योगी होइल.

मी पण वापरते रीठा व शिकेकाई Happy

१ किंवा २ रीठे व ५-६ शेंगा शिकेकाई रात्री पाण्यात भिजवावी. सकाळी चांगली शिजवावी. शिजलेली कळते. नहातांना रिठे फोडुन बी काढून टाकावी व पाण्यात चुरडावे. पाणी बुळबुळीत होते. केसांना लावून चांगले चोळावे. केस स्वच्छ निघतात. तेल पण निघून जाते.

धन्यवाद धनुडी, झंपी अन विनिता झक्कास Happy

माझे केस मुळातच मऊ मुलायम आहेत, गळतही नाहीत पण खुप विरळ आहेत म्हणुन एकदा शाम्पुच्या ऐवजी शिकेकाई वापरुन बघावेसे वाटले.

विनिता, माझे केस फक्त खांद्यापर्यंत/ मानेपर्यंत आहेत, तर मला किती रिठा अन शिकेकाई किती घ्यावी लागेल, अंदाज सांगाल का? अन पाणी किती घ्यावे ते पण सांगा प्लिज.

विनिता, माझे केस फक्त खांद्यापर्यंत आहेत, तर मला किती रिठा अन शिकेकाई किती घ्यावी लागेल, अंदाज सांगाल का? अन पाणी किती घ्यावे ते पण सांगा प्लिज. >> माझे केस पण खांद्यापर्यंतच आहेत. मी दिलेले प्रमाण घ्या. शिजवायला पाणी अर्धा तांब्या घ्या.

एकदा करुन बघा, मग तुमचा तुम्हांलाच अंदाज येईल. Happy

मन्या, कोरफडीचा गर आणि थोडं पाणी मिक्सरमधून काढून स्प्रे बॉटल मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. प्रत्येक वेळी केस धुतल्यानंतर विंचरायच्याआधी केसांवर स्प्रे करा. हे सिरम सारखं काम करतं. गुंता पण होणार नाही आणि केस मऊ राहतील.

नौटंकी इतरवेळी नाही फक्त थंडीतच मला केसांची तक्रार असते.. धाग्याच्या सुरवातीला अर्धी वाटी नारळाच दुध केसांत मुरवायला कुणीतरी सांगितलेल. ट्राय केल तर सर्दी झाली होती. पण कोरफडीचा याआधी तसा काही त्रास झालेला नाही. नक्की ट्राय करते..

Aqua treatment, keraine, cystein यापैकी कोणती चांगली आहे?
केस खूप गळतात आणि volume पण कमी झालाय म्हणून मग करायची इच्छा आहे.
कुणी केलय का? आणि त्याचे काही तोटे असतील तर तेही सांगा प्लीज.
गुगल वर वाचून आणखी कन्फ्युजन होतयं. एकतर खर्चिक आहे आणि किती दिवस इफेक्ट राहील माहित नाही.
प्लीज योग्य पर्याय सुचवा.

कांदा,कोरफड एकत्र वाटून त्याच्या रसामधे खोबरेल,एरंडीचे तेल मिसळून केसांना अर्धा तास लावले. नंतर शांपूने एकदाच धुतले.छान मऊ झाले होते.अर्धे केस गळून गेल्यावर झालेली उपरती आहे.

कांद्यात सल्फर असतं ना?काही दुष्परिणाम तर नाही ना होणार त्याच्यामुळे? वास पण उग्र असतो ना कांद्याचा? रच्याकने केस कशामुळे गळत होते?
किती प्रश्न पडलेत मला!! राग मानू नका.

माझे केस प्र चं ड गळतात. इतके कि मी विंचरणच टाळते. कारण केस विंचरल्यावर कंगव्याला लागलेले आणि खाली पडलेले केस बघून काळीज तुटतं अक्षरशः. नारळाचं दूध वापरलय मी पण नारळ खराब निघाला तरच त्याचं दुध काढून डोक्याला वापरते. चांगल्या नारळाचं दूध डोक्याला म्हणजे केसासाठी वापरायला जीवावर येतय. इथलं वाचून मी एरंडेल तेल आणून लावलय , पण म्हणावं तसा परिणाम दिसत नाहीये.
आता नारळाचं दूध लावणे हाच उपाय करायला पाहिजे.

चांगल्या नारळाचं दूध डोक्याला म्हणजे केसासाठी वापरायला जीवावर येतय. >> केसांपेक्षा ३० रुपयांचा नारळ किंमती का?
नारळाचं दूध वापरा, फरक पडेल.

Pages