केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसांपेक्षा ३० रुपयांचा नारळ किंमती का?
नारळाचं दूध वापरा, फरक पडेल.>>>>कळतय गं, पण वळत नाहीये. बरोबरच आहे तुझं, केसांपुढे ३० रुपयांचा नारळ कमीच म्हणा, करून बघते आणि आधीच तुला थँक्यू म्हणते Happy

माझ्या साऊथ इंडियन बॉस ने सांगितलेला उपाय मी करून पाहिला आणि रिझल्ट पण चांगला आहे..तर २०० ml शुद्ध खोबरेल तेल घायच ( मी लाकडी घाना च पुण्यावरून मागवलेल) त्यात भरपूर कडीपत्ता सावलीमध्ये सुकवून त्याची पावडर करून, दोन चमचे मेथी दाणे कच्चेच पावडर करून आणि एक चमचा काळे जिरे पावडर करून घातले..१०/१२ दिवस ते तसेच ठेवले...तेलाला थोडा काळपट रंग येतो ..नंतर ते रात्री झोपताना scalp आणि मुळआना चोळून लावायचे..सकाळी नेहमप्रमाणे धुवायचे..

@बी.एस. - मी cystein केलंय सध्या आणि result बर्यापैकी चांगलाय. पण केस सरळ झाल्यावर volume कमी होतो जो तुमचा पण आहे तर मला वाटतं सध्या तरी काही ट्रीटमेंट करू नका. कारण कुठल्याही ट्रीटमेंट नंतर केस गळतातच थोडेफार तरी. बाकी इतर ट्रीटमेंटस् पेक्षा cystein कमी damageable आहे.

माझे केस प्र चं ड गळतात.>>>> पहिल्यांदा डॉक्टर गाठा.व्हिटॅमिन डी,हिमोग्लोबिन,थायरॉइडची टेस्ट करा.बाकी हे साईड बाय साईड उपाय करा.मी आधी ह्या टेस्ट्स करायला हव्या होत्या.
कनिका, माझे केस स्टीरॉईडने मुख्य गळले.बोअरिंगचे पाणी मिक्स झाल्यामुळे तसेच स्ट्रेस ,अपुरी झोप,हे सारे फॅक्टर्स आहेतच.

माझे केस प्र चं ड गळतात.>>>> पहिल्यांदा डॉक्टर गाठा.व्हिटॅमिन डी,हिमोग्लोबिन,थायरॉइडची टेस्ट करा.बाकी हे साईड बाय साईड उपाय करा.मी आधी ह्या टेस्ट्स करायला हव्या होत्या.या फेबमधे केल्या,त्या नॉर्मलला आल्या.
कनिका, माझे केस स्टीरॉईडने मुख्य गळले.बोअरिंगचे पाणी मिक्स झाल्यामुळे तसेच स्ट्रेस ,अपुरी झोप,हे सारे फॅक्टर्स आहेतच.

माझे केस प्र चं ड गळतात.>>> पहिल्यांदा डॉक्टर गाठा.व्हिटॅमिन डी,हिमोग्लोबिन,थायरॉइडची टेस्ट करा.बाकी हे साईड बाय साईड उपाय करा >>>>बरोबर देवकी ताई

स्ट्रेस ,अपुरी झोप,हे सारे फॅक्टर्स आहेतच.>>>> सहमत.हेही महत्त्वाचे घटक आहेत. म्हणून वरून काही उपाय करण्याबरोबर आवश्यक तेवढी झोप पूर्ण घेणे,ताणतणाव व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता इ.कडेही लक्ष द्या सगळ्यांनी

सर्व उपाय करून दमलेल्या स्त्री- पुरुष कोणालाही उपयोगी पडेल असा अनुभविक कमी कटकटीचा उपाय आहे -
कोट्टाकलचे कुंतलकांती तेल मिळते ते घेऊन या आणि त्यात २०-२०मिली कलोंजी तेल, virgin ऑलिव्ह ऑइल(शुद्ध खोबरेल तेलबी चालेल)आणि जास्वदींच्या फुलांचा रस टाका. ते रोज रात्री लावायचे किंवा घरात राहणार असाल तर सकाळी उत्तम.
तसेच धूतपापेश्वरच्या गंधक रसायनाच्या गोळ्या १-१ वेळ आणि रोज झोपताना त्रिफळा चूर्ण. सध्या आवळ्याचा सीजन असल्याने आवळा\मोरावळा घेतल्यास उत्तम. एक-दीढ महिन्यात केस गळती जवळपास शून्य होईल अर्थात बाकी साऱ्या गोष्टी नॉर्मल आहेत हे गृहीत धरून.

आस्मि,
तेल, कडिपत्ता, मेथि चे प्रमन सान्गाल क? नेट वर तर बर्याच ठिकणी boil करायला सान्गितले आहे instead of just soaking.

जिद्दू तुम्ही सांगितलेले सगळे तेलाचे प्रकार आणि गोळया मुंबईत कुठे मिळतील. कोट्टाकल केरळला आहे ना. तूनळीवर काही ठिकाणी कढीपत्ता तर काही ठिकाणी कडुलिंब सांगतात. कडुलिंबाची पाने आणि मेथीचे दाणे परतून, मिक्सर मध्ये पेस्ट करून खोबरेल तेलात मिसळून काही दिवस ठेवून मग वापरायचे असा एक व्हिडीओ बघितला मी तूनळीवर. काही देशी कंपन्यांची आयुर्वेदिक तेलं मिळतात पण खूपच महाग आहेत. परवडणार नाहीत नेहेमी वापरायला. पुण्याचे महाभृंगराज कोणी वापरता की नाही.

चंपा, तुम्ही तेल नेहमी लावत असाल हे गॄहीत धरून शाळा कॉलेजच्या वयात केलेले एक तेल सांगते.हे तयार झालेले तेल माझ्या आईने वापरले आणि तिचा रेपोर्ट "या तेलाने खरंच शांत,थंड वाटते" असा होता.त्या वयात मी तेलच लावत नसल्याने मला माहित नाही.
कोरफडीच्या एका पात्याला चिर देऊन त्यात १-१.५ चमचे मेथीदाणे भरायचे.दुसर्‍या दिवशी कोरफडीचा गर काढून,मेथीदाण्यासह मिक्सरमधून वाटायचा.एका भांड्यात खोबरेल तेल गरम करायला ठेवावे.गरम झाल्यावर वरची पेस्ट त्यात घालायची.पेस्टमधील पाणी नाहीसे होईपर्यंत शिजवायचे.ही बेसिक कॄती आहे.आता तुम्ही कढीपत्ता,जास्वंद,वासासाठी सोनचाफा घालू शकता.हे लिहिता लिहिता मलाही तेल करून पहायची इच्छा झालीय.पण आधीच भरपूर तेलं घरात आहेत.आठ्वड्यातून १ किंवा २ वेळ लावली जातात.

अगदी उत्साही असल तर एका नारळाचा जाड रस आणि वरची पेस्ट एकत्र करून शिजवा.तेल सुटेपर्यंत आटवा.

देवकी, कनिका जिद्दु धन्यवाद.
खरं आहे अपूरी झोप, स्ट्रेस हे नक्कीच आहे माझ्या बाबतीत. खाण्यात मात्र तेलकट आणि जंकफूड कटाक्षाने टाळते मी. थायरॉईड ची टेस्ट करून बघितली पाहीजे. मला बिपीच्या गोळ्या चालू आहेत.

आजचा प्रयोग : मागचेच घटक म्हणजे १/२ कांदा,ओले खोबरे,कोरफड गर कढीलिंबाची ३-४ पाने एकत्र वाटून रस काढला.त्यात लिंबूरस घातला.मेथीदाणे भिजत घालायला विसरल्याने ते वाटले नाहीत.१ तास लावून ठेवलाय.काल रात्री तेल लावले होते.

पुण्याचे महाभृंगराज कोणी वापरता की नाही.>>> मी गेले 2 महिने वापरतेय , रोज रात्री झोपताना लावतेय , रोजच. केस गळती थांबलेली नाही. पण माझी झोप खूप डिस्टर्ब असायची ती थोडीशी बरी झालीय. बाकी आता विंचरताना कंगव्यात आलेले केस आणि खाली पडलेले केस पाहून काहीतरी केलं पाहिजे असं रोज म्हणतेय पण प्रत्यक्षात माझ्याकडून काही होत नाहीये. जुने फोटोतले आपलेच केस पाहून आता कसंसच होतं.

धन्यवाद देवकी. केस धुताना आणि धुतल्यानंतर जास्त गळतात, त्यामुळे मी आता आठवड्यातून एकदाच धुते केस.

मी aqua ट्रीटमेंट केली आहे. एक महिना झाला result छान आहे अजूनतरी. बाकी गळती चा आणि याचा काही संबंध वाटला नाही. फ्रिझी केस असतील तर हे उत्तम आहे आणि स्ट्रेटनिंग सारखे damage होत नाहीत केस.

@एस, आत्ताच धागा सार्वजनिक केला आहे.सुंदर मी होणार ग्रूपमध्ये हा धागा आहे. चला, अशाप्रकारे 2000 पूर्ण झाले. तिकडे भेटू

Supruya 19, praman mi war lihile ahe, pan tine andajane sangitle hote, tiche kes khup chan, dat Ani kalebhor ahet, maze ata tase tar honar nahit pan galayche barech kami zalet..

पारंपारिक पद्धतींवर ज्यांचा विश्वास असेल त्यांनी करून बघायला हरकत नाही.
आजी बंगाली असल्याने केस आणि नारळाचं तेल याचा संबंध असतोच. शिवाय नारळाचा खाण्यात उपयोग आणि मासे यामुळे केसाच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असावा. कारण समुद्रकिनारी राहणा-या ब-याच लोकांचे केस दाट असतात. यावर काहींचे आक्षेप पण आहेत. कि बंगाली लोकांत टक्कल पडलेले लोकही असतात. मला याचे कारण माहीत नाही. पण कुणी डेटा ठेवलेला नाही किंवा ज्यांना टक्कल पडते त्यांच्या जीवनशैलीत किंवा त्वचेमधे, ताणतणाव यात काही वेगळेपण आहे का असा डेटा नसतो.

केरळातल्या एका काकू आमच्या शेजारच्या घरात होत्या. त्यांच्या घरात सगळेच जण स्नानाच्या आधी केसाला, अंगाला जसे शक्य होईल तसे नारळाचे तेल लावून उन्हात बसतात. किमान अर्धा तास. त्यांच्याकडे नारळाचे तेलच खाण्यात सुद्धा वापरतात.

कोकणात सुद्धा जेवणात नारळाचा वापर पाहिला आहे. डोक्याला नारळाचे तेल लावतात का हे माहीत नाही. पण कोकणी लोकांचे केस पण छान असतात. ते शिकेकाईचा वापर केस धुवायला करतात बहुतेक.
नारळाच्या तेलात अँटी ऑक्सीडंट असतं हे आता माहीत पडतंय. पण पूर्वीपासून या प्रांटात नारळाच्या तेलाचा वापर करतात. इतर ठिकाणी करतात का ? मला तरी आढळला नाही. किंवा तो थांबला असेल.

माझ्या केसात खूप कोंडा व्हायला लागलाय. मी दही, निंबु लाऊन पाहील दही निंबू मिक्स करून लाऊन पाहील तेलाने मसाज करून पाहील कोरफड लाऊन पाहील अंडा दही कोरफड मिक्स करून लाऊन पाहील ग्लिसरीन गुलाब जल अँटी danfruff शाम्पू सगळ लाऊन पाहील पण काही म्हणजे काहीच फरक पडलेला नाही.
घरी बोअरवेल च पाणी येत खूप शार युक्त असत त्यामुळे केस ड्राय पण झालेत. पुण्याला होती तेव्हा सॉफ्ट होते.
कोंद्यामुळे कपाळावर आणि पाठीवर बारीक पुरळ पण यायला लागलेत. आता डॉक्टर कडे जायचा विचार चालू आहे पण त्या आधी हा धागा दिसला म्हणून शेवटचा एकदा domestic उपाय करून पाहावा असं वाटतंय.
कुणी मदत करू शकेल का?

कोंड्याला आमच्याकडचा उपाय आहे. पण इथे रानटी वाटू शकेल. पटला तर करा.
कांद्याचा रस आणि नावाला नारळाचे तेल असं मिश्रण केसाच्या मुळांना लावायचं. (सहन होत असेल तरच करा) आणि नंतर केस बांधून टाकायचे (फडक्याने).

कांद्याचा रस आणि नावाला नारळाचे तेल असं मिश्रण केसाच्या मुळांना लावायचं. >>> ह्याने कोंडा नाही जात नविन केस मात्र उगवतात आणि लांब होतात केस. गळायचेही थांबत नाहीत. कांद्याचा रसात मध मिसळल्याने कोंड्यावर परिणाम होतो पण तात्पुरता. मी हा ऊपाय गेली ४ महीने करतेय. केस वाढले आहेत आणि नविन केस सुद्दा उगवले आहेत. पण कोंडा होऊन केस गळतातच. कोरफड आणि व्हिटामिन ई कॅप्सूल मिसळून लावल्याने ही परिणाम होतो. पण कायमचा ऊपाय हवा असेल तर डॉक्टरांकडे जाणेचं फायद्याचे असेल.

डोक्यावरून आंघोळीआधी १तासभर एका लिंबाचा रस ,स्काल्पला चोळून नंतर आंघोळ करा.माझ्या आईच्या डोक्यात असच भरपूर कोंडा झाला होता,त्यावेळी कोणीतरी सांगितलेला उपाय तिने अजिबात खंड न पाडता केला आणि कोंडा खरंच गायब झाला.पण आता तिला इतकी सवय झाली आहे की अजूनही ती लिंबू लावल्याशिवाय केस धूत नाही.

जीवनसत्व B12 आणि B6 कमी असेल तर कोंडा होतो सारखा (स्वानुभव) कितिही घरगुती उपाय केले तरी जात नाही (मी 1वर्षभर न चुकता केले) तात्पुरता जातो.

Pages