महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
४,७,१०, १२, एमबीबीएस
४,७,१०, १२, एमबीबीएस
खरेपण देणार आहेत का ?
खरेपण देणार आहेत का ?
कुठे देऊ सर्टिफिकेट , इथे की इ मेल मध्ये,
हे घे,
माझा चौथीचा गोंडस फोटो आहे , इथे
https://m.facebook.com/photo.php?fbid=2176935409271114&id=10000864027346...
खरेपण देणार आहेत का ?
खरेपण देणार आहेत का ?
आपण कोण? आपली लायकी काय?
4 , 7 , 10 ते MBBS मलाही
4 , 7 , 10 ते MBBS मलाही स्कॉलरशिप होती
अन फीमाफीही होती,
>>> स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिप परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळते ती.
एससी एसटी वगैरे विद्यार्थ्यांना मिळते ती नाही.
बाकी इयत्ता?
बाकी इयत्ता?
स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिप
स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिप परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळते ती.
फोटोत लिहिलेले वाचता येते ना ?
बाकी इयत्ता? ते पण टाक की लका
बाकी इयत्ता? ते पण टाक की लका
पैकी तुझं नाव काय?
पैकी तुझं नाव काय?
{त्यांना ट्रॉल करावे एवढे मी
{त्यांना ट्रॉल करावे एवढे मी त्यांना अजिबात महत्व देत नाही.एवढी त्यांची लायकीच नाही}
म्हणूनच दिवसरात्र त्यांच्या मागे फिरता, धाग्याच्या विषयाशी संबंध नसलेली त्यांची जुनी वक्तव्ये आठवून आठवून लिहिता? छान ! छान!
भरत आला परत.
भरत आला परत.
दिवसरात्र त्यांच्या मागे
दिवसरात्र त्यांच्या मागे फिरता,
हायला
कालबोक्याला गहिवरून आलं असेल आणि उचकी लागेल.
उगाच असं लिहू नका.
बाकी हा जोक छान होता.
अजून येऊ द्या
मरतुकडा दिसतोय आन् गोंडस
मरतुकडा दिसतोय आन् गोंडस म्हणतोय.
आता तुझे सातवीचे दे
आता तुझे चौथीचे दे काहीतरी
मग मी माझे दहावीचे देतो
अरे मी डॉक्टर नाही. अगदीच ढ
अरे मी डॉक्टर नाही. अगदीच ढ विद्यार्थी होतो मी.
असेना का, मला हवेच
असेना का, मला हवेच
अहो ,तुमचा प्रत्येक प्रतिसाद
अहो ,तुमचा प्रत्येक प्रतिसाद त्यांनाच उद्देशून असतो.
एवढंच प्रेम आहे, तर त्यांच्या विचारपुशीत लिहा किंवा दोघांपुरता एक क्लोज्ड सिक्रेट ग्रूप बनवा.
मला वाटलं तू सत्यवादी असशील.
मला वाटलं तू सत्यवादी असशील. अटी घालतोस अगदी कॉंग्रेसीच्या पोटी जन्माला आला आहेस.
>>> पैकी तुझं नाव काय? >>>
>>> पैकी तुझं नाव काय? >>>
त्याचे नाव गजानन विनायक कागलकर. तो डोकेदुखीवर धनगराकडून औषध घेतो.
सर्टिफिकेट सध्या नाहीत तरी पण
सर्टिफिकेट सध्या नाहीत तरी पण सांगतो.
चौथी - केंद्रात प्रथम
सातवी- शाळेत पहिला
दहावी - ७१.८३
बारावी - ६४
डिग्री - काठावर पास
मग मीपण सांगतो
मग मीपण सांगतो
चौथी सातवी स्कॉलरशिप
दहावी 90
बारावी 88 , ग्रुप दोन्ही 95 %
मग एम बी बी एस , शिवाजी
मग डिप्लोमा एच आय व्ही , इगणु
पुरावे पाहिजे असतील तर चौथी / सातविचे काहीतरी दाखवा
डायरेक्त एम बी बी एस चा
डायरेक्त एम बी बी एस चा पुरावा हवा असेल तर यादी कौन्सिल च्या वेब साईटवर फुकट उपलब्ध असते, तिथून चेक करणे
https://www.maharashtramedicalcouncil.in/frmRmpList.aspx
एंटायर पोलिटिक्स डिग्री वाल्यांची यादी कुठे मिळते ?
आम्ही करोडपती नाही , आमचे कागद घेऊन कोण काय करणार ?

आधार कार्डपासून बॅंक स्टेटमेंटपर्यंत सगळे एक्स्चेंज ऑफरमध्ये देण्यात येईल , आमचे 1 घ्या अन तुमचे एक द्या
ते त्यांना ठाऊक.
ते त्यांना ठाऊक.
मी आज खालील दोन गोष्टी शिकलो,
मी आज खालील दोन गोष्टी शिकलो,
१) बोलती बन्द करणार्याला फुरोगाम्यांमध्ये "एक्स्क्लुजीव्ह ट्रोल" असे म्हणतात.
२) टाकाउ फुरोगाम्यांकडुनही काहीतरी शिकता येते..
>>> २) टाकाउ
>>> २) टाकाउ फुरोगाम्यांकडुनही काहीतरी शिकता येते.. >>>
टाकाऊ फुरोगामी ही द्विरूक्ती आहे.
सर्व शासकिय, विना शासकिय
सर्व शासकिय, विना शासकिय महामंडळांवर माजपने केलेल्या नेमणुका माननिय मुख्यमंत्री ठाकरे साहेब रद्द करणार..
सर्व शासकिय, विना शासकिय
सर्व शासकिय, विना शासकिय महामंडळांवर माजपने केलेल्या नेमणुका माननिय मुख्यमंत्री ठाकरे साहेब रद्द करणार..
नवीन Submitted by सचिन पगारे on 7 January, 2020 - 15:55
<<
मुख्यमंत्री आहे का स्थगिती बहाद्दर ?
शपथ घेतल्यापासून फक्त स्थगिती द्यायचेच काम करतोय.
फडणविसांची महत्वाकांक्षी
फडणविसांची महत्वाकांक्षी योजना ' जलयुक्त शिवार' ला पण स्थगिती.
फडणविसांची महत्वाकांक्षी
फडणविसांची महत्वाकांक्षी योजना ' जलयुक्त शिवार' ला पण स्थगिती.
नवीन Submitted by सचिन पगारे on 7 January, 2020 - 16:09
<<
खिसे गरम व्हायचे आहेत अजून !
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या मधे इतकी धमक नाही की ते स्वतः (दस्तुरखुद्द) अशा काही लोकोपयोगी योजनांना स्थगिती देतील.
या सुपीक योजना भारताचे माजी संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कलियुगातील नवचाणक्य ( श्री "पगारे"ं (टिंब दिलाय हं) च्या मते) श्री शरद पवार यांच्या डोक्यातुन निघालेल्या असाव्यात.
महाराष्ट्राला योग्य व अनुभवी
महाराष्ट्राला योग्य व अनुभवी असे मंत्रीमंडळ मिळाले आहे येत्या पाच वर्षात ते उत्तम असा कारभार करुन पालिका व परिषदांवरही मविआची सत्ता आणतील यात शंका नाही.
Pages