महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
महाविकास मधली धूसफूस व नाराजी
महाविकास मधली धूसफूस व नाराजी काही संपत नाही. असेही you can't make everyone happy..
पण ईथे सरकारी कामे थकलेली, शेतकर्र्यांच्या समस्या अजूनही तशाच, राज्यातील सर्व प्रकल्प रखडलेले.. सरकारची सर्व ऊर्जा व वेळ मात्र 'खाते' दारांची नाराजी दूर करण्यात खर्ची पडत आहे. आणि यांना चिंता पडली आहे जे एन यु मधिल राड्याची. आपण आता मुख्यमंत्री आहोत याचा विसर पडलाय का? अजूनही वाचाळ गिरी व नुसतेच टीकास्त्र याची सवय जात नाही. नुसती सत्ता मिळून काय ऊपयोग? त्यातही शिवसेनेतील अंतर्गत वाद रोज नव्याने चव्हाट्यावर येतात.. काँग्रेस बरी आहे त्या मानाने. असली शुल्लक व फुटकळ भांडणे शक्यतो चव्हाट्यावर येऊ देत नाहीत.
honyemoon period is over...!
सगाळाच आनंदी आनंद आहे...! आलीया भोगासी..
फडणविस व राज ठाकरे यांची
फडणविस व राज ठाकरे यांची गुप्त भेट. महाराष्ट्राच्या राजकारणात अजुन एक अभुतपुर्व वळण येण्याची शक्यता.
खो खो खेळताहेत
खो खो खेळताहेत
पवार गेले , तिथे फडणवीस बसले
त्या पनवती राजूला दूरच ठेवा
त्या पनवती राजूला दूरच ठेवा हो भाजपवाल्याहो.
पनवती काय ?
पनवती काय ?
राजने इंटरव्ह्यू घेतला की सत्ता मिळते,
आता फडनविसचा इंटरव्ह्यू घेणार ते
भाजप महाराष्ट्रात एकटा पडलाय.
भाजप महाराष्ट्रात एकटा पडलाय. एकट्याच्या जिवावर महाराष्ट्रात सत्ता येणे कुठल्याही पक्षाला शक्य नाही.भाजपा जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी एकट्याने चालले की धडपडणार हे त्यांना माहित आहे त्यांना राजच्या हाताच्या आधाराची नितांत गरज आहे.
आधार नसला तर भाजपाचा महाराष्ट्रात 'कोल्हापुर' होणार हे नक्की.
त्यांना राजच्या हाताच्या
त्यांना राजच्या हाताच्या आधाराची नितांत गरज आहे.
जोक चांगला होता.
अजून येऊ द्या
जोक भाजपचा झालाय..राज
जोक भाजपचा झालाय..राज ठाकरेंशिवाय पर्याय नाही त्यांना.'लाव रे तो व्हिडियो' म्हणत भाजपला सळो की पळो करणार्या राज ठाकरेंशी गुप्त बैठका घ्यावे लागणे हे भाजपचे अपयश आहे.
हा हा हा अजून येऊ द्या
हा हा हा
अजून येऊ द्या
सचिन तूम अभी अंडेके बाहेर
सचिन तूम अभी अंडेके बाहेर निकलो. राज ठाकरे कडे काय पाठबळ आहे. तोंडबळ आहे फक्त. गद्दारांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची खेळी असेल. आता राजू काकाची लफडी बाहेर काढील.
>>> त्यांना राजच्या हाताच्या
>>> त्यांना राजच्या हाताच्या आधाराची नितांत गरज आहे. >>>
राजकडे फार तर अर्धा टक्का मते असतील. त्या मतांमुळे भाजपचा जास्तीचा एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही.
लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांना भरपूर शिव्या हासडून व माध्यमांनी डोक्यावर घेऊनही राज व त्याच्या बॉसची पूर्ण वाट लागली.
भाजप महाराष्ट्रात एकटा पडलाय.
भाजप महाराष्ट्रात एकटा पडलाय. एकट्याच्या जिवावर महाराष्ट्रात सत्ता येणे कुठल्याही पक्षाला शक्य नाही.भाजपा जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी एकट्याने चालले की धडपडणार हे त्यांना माहित आहे त्यांना राजच्या हाताच्या आधाराची नितांत गरज आहे.
आधार नसला तर भाजपाचा महाराष्ट्रात 'कोल्हापुर' होणार हे नक्की.
Submitted by सचिन पगारे on 7 January, 2020 - 20:01 >>
लईच काळजी लागुन राह्यलीया एका मानसाला भाजपाची...
धागा वर ठेवायला केवढ्या खटपटी !
धागा वर जाईल किंवा खाली जाईन.
धागा वर जाईल किंवा खाली जाईन. मात्र महाराष्ट्रात भाजपा खाली चाललाय व एकदम खोल खालीजाउ नये म्हणुन राज ठाकरेंचा हात चाचपतोय.
>>> धागा वर जाईल किंवा खाली
>>> धागा वर जाईल किंवा खाली जाईन. मात्र महाराष्ट्रात भाजपा खाली चाललाय व एकदम खोल खालीजाउ नये म्हणुन राज ठाकरेंचा हात चाचपतोय. >>>
पुन्हा एकदा मूर्खासारखा निष्कर्ष.
भाजपची जी पिछेहाट होतेय
भाजपची जी पिछेहाट होतेय त्याला कारण त्यांच्याकडे महाराष्ट्रात सक्षम नेत्रुत्व नाही. पवारांनी अत्यंत सहजपणे फडणविसांचे नेत्रुत्व उपटुन काढले..खडसेंसारखा नेता जर नेत्रुत्वस्थानी असता तर फरफट कमी झाली असती.
पुन्हा एकदा चुकीचे निष्कर्ष.
पुन्हा एकदा चुकीचे निष्कर्ष.
भाजपची पिछेहाट होण्यामागे पवारांचे शून्य कर्तृत्व आहे. आपल्या निष्ठावंत मतदारांना दुखावल्यामुळे भाजपचे काही मतदार मतदानापासून अलिप्त राहिले व त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या.
>>> पवारांनी अत्यंत सहजपणे
>>> पवारांनी अत्यंत सहजपणे फडणविसांचे नेत्रुत्व उपटुन काढले. >>>
ज्यांना सोनियाने दोन दशकांपूर्वीच भुईसपाट केले ते काय दुसऱ्याला उपटून काढणार?
फडणविसांना महाराष्ट्राचे
फडणविसांना महाराष्ट्राचे नेत्रुत्व देणे ही भाजपची चुक होती..मुंडे, खडसे यांनी पक्षांतर्गत विरोधामुळे आपण हरलो असे सांगितले.ओबिसी नेत्यांची घुसमट हा प्रश्नही चर्चीलि गेला.नेत्रुत्व हे पक्षाचा विचार करणारे हवे स्वताचा नव्हे..खडसे हे सर्वार्थाने योग्य होते पण त्यांना डावलण्याची कारणे निराळी होती..फडणविस हे बहुमत असतानाचे नेते आहेत कमी जागा आल्या तर सत्ता मिळवण्यासाठी जो आवाका लागतो तो त्यांच्यात नाही. भाजपचे जेष्ठ नेते गोटे यांनी त्यांची कार्यपध्दती सांगणारे जाहीर पत्रही लिहले होते.. महाराष्ट्रात पवारांसारखा धुरंधर प्रतिस्पर्धी असताना भाजपकडे त्या कुवतीचा नेता नसणे हे त्यांना भारी पडले.. पवारांनी सहजतेने फडणविसांचे नेत्रुत्व उपटुन टाकले व भाजपला पराभवाच्या गर्तेत अक्षरक्षा: ढकलुन दिले.
सचिन चमचेगिरी बास कर की रे
सचिन चमचेगिरी बास कर की रे आता.
>>> महाराष्ट्रात पवारांसारखा
>>> महाराष्ट्रात पवारांसारखा धुरंधर प्रतिस्पर्धी असताना >>>
सोनियासमोर हुजरेगिरी करून लोटांगण घालणे म्हणजे धुरंधर!
>>> सचिन चमचेगिरी बास कर की
>>> सचिन चमचेगिरी बास कर की रे आता. >>>
ते नाही थांबणार. पगारेंना पगाराबरोबर बोनसही मिळालाय.
थोडी झोकून वर काकाच्या पायाचं
थोडी झोकून वर काकाच्या पायाचं तीर्थ प्राशन करून काकाला चाणक्य ठरवायचंच हा चंग बांधलेला दिसतोय काकाच्या हुजऱ्यांनी.
सद्सद्विवेक बुध्दी जागी असेल तर काका कसा आहे, चाणक्य आहे की शकुनी मामा आहे हे कळायला पायजेल.
शकुनि मामा कैण आहे हे खडसे
शकुनि मामा कोण आहे हे खडसे व्यवस्थित सांगु शकतील हो अनिल गोटेपण.:-)
अनिल गोटे तेलगी प्रकरणात होता
अनिल गोटे तेलगी प्रकरणात होता आणि खडसेचे दाऊद बरोबर फोनवरून संपर्क होता हे ऐकून आहे. त्यांची विश्वासार्हता काय आहे?
मग त्यांना भाजपाने पक्षात का
मग त्यांना भाजपाने पक्षात का घेतले?
ते भाजपाला विचार णे. खडसेची
ते भाजपाला विचार णे. खडसेची हकालपट्टी केली होती बहुतेक.
शकुनि मामा कोण आहे हे खडसे
शकुनि मामा कोण आहे हे खडसे व्यवस्थित सांगु शकतील हो अनिल गोटेपण.:-)
नवीन Submitted by सचिन पगारे on 8 January, 2020 - 10:23
<<
हा गोट्या पावसाची दिशा बघून डराव-डराव करणारा बेडूक आहे. तेंव्हा त्याला कितीजण सिरियसली घेतात हा प्रश्न आहे.
खडसेंच्या बाबतीत, त्यांना निवडणुकी आधी भाजपाने सक्रिय राजकारणात स्थान दिले असते तर आजचे चित्र थोडे वेगळे असते.
---
बाकि सचिनजी पगारेजींचा पवारांवर जितका विश्वास आहे, तितका त्यांच्या आप्तस्वकियांचा देखील नसेल.
ते भाजपाला विचार णे. खडसेची
ते भाजपाला विचार णे. खडसेची हकालपट्टी केली होती बहुतेक.))))))))) चुकीची माहिती.त्यांची मनधरणी चाललीय पक्षात रहावे म्हणुन.
पवारांनी अत्यंत सहजपणे
पवारांनी अत्यंत सहजपणे फडणविसांचे नेत्रुत्व उपटुन काढले..
Submitted by सचिन पगारे on 7 January, 2020 - 23:09 >>>
कधी कधी लाकडी फर्नीचर्वर बुरशी वाढते. त्याने फर्निचर उपटुन निघाले असे म्हणता येत नाही. पुन्हा फर्निचर चमकवायला थोडा वेळ लागतो........
येथे वाळवी लागलेले फर्निचरची
येथे वाळवी लागलेले फर्निचरची तोडफोड होउन फेकुण देण्यात आले आहे.
Pages