महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
महाराष्ट्राला योग्य व अनुभवी
महाराष्ट्राला योग्य व अनुभवी असे मंत्रीमंडळ मिळाले आहे येत्या पाच वर्षात ते उत्तम असा कारभार करुन पालिका व परिषदांवरही मविआची सत्ता आणतील यात शंका नाही.
Submitted by सचिन पगारे on 6 January, 2020 - 23:38 >>>
वरील वाक्य ना चुकता रोज घोकत रहा....
तुम्ही दिल्ली केजरीवाल जाणार
तुम्ही दिल्ली केजरीवाल जाणार व मोदी येणार ये घोका,
मातोश्रीच्या दारात दंगा करणारा शेतकरी देशमुख म्हणून संघी भाजपि होता म्हणे , खरे का ?
श्री शरद पवार संघाच्या शाखेत
श्री शरद पवार संघाच्या शाखेत जात असत हे खरंय का?
बाकी दिल्लीत केजरीवालच येणार
बाकी दिल्लीत केजरीवालच येणार हे हि सत्य आहे.
कर्जमाफीच्या आश्वासनावर मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस निवडून आलीच की.
फुकट ते पौष्टिक आणि स्वस्त ते मस्त हे आपलं ब्रीद वाक्यच आहे.
सगळ्यात आधी उत्तर प्रदेशात
सगळ्यात आधी उत्तर प्रदेशात कर्जमाफीचं आश्वासन भाजपने दिलं आणि निवडून आले हे आपण विसरूया.
काय सांगताय ?म्हणजे हिंदुत्व
काय सांगताय ?
म्हणजे हिंदुत्व वगैरे काही नाहीच?
योगी आदित्यनाथ आणि भाजप तर जातीयवादी आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आले म्हणून गेली काही वर्षे सगळे विरोधक कंठशोष करत आले आहेत.
आमचे विद्वान मित्र तर गोरखपूरच्या रुग्णालयात बालकांचा मृत्यू आणि तेथील मुसलमान डॉक्टर वर कसा अन्याय म्हणून घसा फुटेपर्यंत बोंबलत होते.
सध्या त्यांना कोटा या जागेबद्दल निवडक विस्मरण (SELECTIVE AMNESIA) झाले आहे असे ऐकतो.
काँग्रेसची न्याय योजना जाहीर
काँग्रेसची न्याय योजना जाहीर होताच मोदींनी सगळ्या शेतकर्यांच्या बँक खात्यांत सहा सहा हजार रुपये जमा करवले होते हेही विसरूया.
कोटाला गेलात तसेच पुन्हा गोरखपूरला जा आणि गुजरातेतही जा.
फुकट ते पौष्टिक आणि स्वस्त ते
फुकट ते पौष्टिक आणि स्वस्त ते मस्त
शाळा इबीसी वर झाली ना , आणि मेडिकल कॉलेज सरकारी खर्चातच ना ?
चिन्मय तन्मयना म्हणूनच जे एन यु आवडत नाही , असे फेसबुकवर फिरत होते , सरकारी दरात आले तर सर्वाना मिळते.
आणि मग सरकारी तिजोरीचा उपयोग काय ? आमदारांचा पगार तिप्पट करणे अन आर्मीतल्या डोकटरना पेन्शन देणे इतकाच का ?
असं काय ते ? मागचं सगळं
असं काय ते ? मागचं सगळं विसरायचं असतं.
मोदींनी सगळ्या शेतकर्यांच्या
मोदींनी सगळ्या शेतकर्यांच्या बँक खात्यांत सहा सहा हजार रुपये जमा करवले होते.
अच्छा म्हणजे हा पोटशूळ आहे तर . शेतकऱ्यांना लाभ मिळाला आमच्या चेल्या चमच्याना नारळ मिळाला ( तो ही कुसका) हे दुःख आहे तर.
पण एक शंका आहे श्री मोदी २०१९ मध्ये पैसे देणार हे शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश च्या २०१७ च्या निवडणुकांच्या अगोदर अंतर्ज्ञानाने कळले होते कि क्काय?
शाळा इबीसी वर झाली ना , आणि
शाळा इबीसी वर झाली ना , आणि मेडिकल कॉलेज सरकारी खर्चातच ना ?
शाळा शिष्यवृत्ती वर झाली चौथी आणि सातवीची आणि डॉक्टरकी पण २० वर्षे लष्करी नोकरी करण्याच्या बॉण्ड वर(अर्थात त्याऐवजी मी ७५००० रुपये भरून सुटू शकलो असतो.)
असो
वैयक्तिक पातळीवर उतरून आपली लायकी दाखवून दिलीतच
बाकी -- ते तुम्ही लष्कराच्या सुखसोयींनबद्दल पोटात दुखल्यामुळे लष्करात भरती होणार होतात त्याचे काय झाले?
>>> काँग्रेसची न्याय योजना
>>> काँग्रेसची न्याय योजना जाहीर होताच मोदींनी सगळ्या शेतकर्यांच्या बँक खात्यांत सहा सहा हजार रुपये जमा करवले होते हेही विसरूया. >>>
शेतकऱ्यांना वार्षिक ७२,००० रूपये देण्याच्या थापांऐवजी खात्यात खरोखर जमा झालेल्या ६ हजार रूपयांवर जास्त विश्वास बसला.
कागलकर,
कागलकर,
खालील धाग्यावर जाऊन तुझा एक फोटो टाक.
https://www.maayboli.com/node/72955/
कोटाला गेलात तसेच पुन्हा
कोटाला गेलात तसेच पुन्हा गोरखपूरला जा आणि गुजरातेतही जा.
ते आमच्या विद्वान मित्रांना सांगा. मी काही गोरखपूर बद्दल कंठशोष केला नाही कारण गोरखपूरच्या लष्करी रुग्णालयात माझा मित्र बालरोग तज्ज्ञ होता त्याच्या तर्फे मला सत्य काय आहे ते माहिती होतेच.
तसाही मी काही कोटा बद्दलहि आरडा ओरडा केलेला नाही. पण आमच्या विद्वान मित्रांचा दुटप्पी पणा दाखवण्यासाठी त्याचा उल्लेख केला होता एवढेच.
ते स्वत: कोणत्या शिष्यवृत्ती
ते स्वत: कोणत्या शिष्यवृत्ती वर शिकलं आणि मेडिकलला अॅडमिशन घेताना मार्क किती होतं हे नाही सांगणार.
>>> आणि मग सरकारी तिजोरीचा
>>> आणि मग सरकारी तिजोरीचा उपयोग काय ? आमदारांचा पगार तिप्पट करणे अन आर्मीतल्या डोकटरना पेन्शन देणे इतकाच का ? >>>
रोजंदारीवर असलेल्या वॉर्डबॉयला पेन्शन देत नाहीत, हे खरं दुखणं आहे. त्यामुळेच वॉर्डबॉयच्या गुदद्वाराचा दाह होत आहे.
आर्मीतल्या डोकटरना पेन्शन
आर्मीतल्या डोकटरना पेन्शन देणे
अरेरे
अंधारात मारलेला तीर फुकट गेला
कारण मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही.
बाकी आमदारांचा पगार तिप्पट झाला मग त्याबद्दल तुम्ही उपोषणाला बसा की.
तेवढंच बद्धकोष्ठ कमी होईल. वैचारिक बद्धकोष्ठ कमी होईल का ते सांगता येणार नाही.
तुमची स्मरणशक्ती खरंच
तुमची स्मरणशक्ती खरंच कौतुकास्पद आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांआधी ती किसान सम्मान योजना आली हे तुम्हाला खरंच लक्षात नाही.
बाकी जाऊ द्या. ते ६००० फुकट आणि पौष्तिक आहेत की नाहीत ते सांगा. तसंच उप्र सरकारने केलेली कर्जमाफी फु आणि पौ आहे की नाही ते सांगा.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्राने सगळ्या अनधिकृत वस्त्या अधि कृत केल्या की नाही ते सांगा.
गळ्याशी आलं की मी काही केलं नाही का? छान छान.
शोभता बरं का.
बरं तुमच्या बाजूचे लोक कंपाउंडर म्हणतात , धर्म काढतात तेव्हा ते ते वैयक्तिक पातळीवर उतरून स्वतःचीच लायकी दाखवणं नसतंच . नाही का?
आमच्या विद्वान मित्रांना
आमच्या विद्वान मित्रांना intellectual constipation and verbal diarrhoea ( वैचारिक बद्धकोष्ठ आणि शाब्दिक अतिसार) हा आजार आहे. त्यावर उपोषण आणि मौन हा एक उपाय सुचवलाय.
तुमच्या बाजूचे लोक
तुमच्या बाजूचे लोक
म्हणजे कोण हो? मी कोणाच्याही बाजूचा नाही किंवा मी मायबोलीवर कोणालाही वैयक्तिक रित्या ओळखत नाही.
मी कोणावरही वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करत नाही तेंव्हा वड्याचे तेल वांग्यावर काढू नका.
इतर बाजूचे, विरोधी, मित्र, शत्रू इ चा माझा काहीही संबंध नाही.
आमच्या विद्वान मित्रांची थापेबाजी मी जालावर आणि सार्वजनिक न्यासावर अनेक वेळेस उघड केली आहे.
शिवाजी महाराजांबद्दल (आणि एकंदर हिंदू धर्माबद्दल) अत्यंत अनुदार उद्गार काढल्यामुळे त्यांनी सगळीकडे लोकांचा फार मोठा रोष ओढवून घेतला आहे त्याची जबाबदारी त्यांची स्वतःची आहे.
बाकी सार्वजनिक न्यासावर
बाकी सार्वजनिक न्यासावर जालावर व्हाटस एप वर सर्वत्र माझी एकच ( माझ्याच मूळ नावाने) ओळख आहे. आणि मी कधीही डू आय डी घेतलेला नाही किंवा माझा आयडी कधीही ब्लॉक झालेला नाही.
मी त्याच नावाने लष्करात होतो आणि आताही त्याच नावाने व्यवसायहि करतो.
टोपणनाव घेऊन उगाच लोकांवर टीका करण्याची किंवा आपली टिमकी वाजवण्याची मला कधीही गरज पडलेली नाही.
ओके. म्हणजे तुम्ही यांचे
ओके. म्हणजे तुम्ही यांचे exclusive troll आहात तर.
ब्लॅक कॅट , अभिनंदन ! तुम्हालाही (मला मिळाल)य तसा ) खास स्वतःचा असा एक ट्रोल मिळालाय. त्याची काळजी घ्या.
कायच्या काय
कायच्या काय
शिष्यवृत्ती मिल्ने अन शाळेची फी भरणे या भिन्न गोष्टी आहेत
4 , 7 , 10 ते MBBS मलाही स्कॉलरशिप होती
अन फीमाफीही होती,
तुमची थापेबाजी उघड झाली
exclusive troll
exclusive troll
हा हा हा
सुरुवातीला "पच पच" केल्यावर मी त्यांना "आपण कोण" म्हणून अनुल्लेखाने मारले होते.
त्यांना ट्रॉल करावे एवढे मी त्यांना अजिबात महत्व देत नाही.एवढी त्यांची लायकीच नाही
@ BLACKCAT
.
तुमचा मिसळपावी आयडी सुरू आहे
तुमचा मिसळपावी आयडी सुरू आहे का की गेला?
@ blackcat
@ blackcat
शाळा इबीसी वर झाली ना
हा जावईशोध कुठून लावलात?
मला कोणतीही फी माफी नव्हती अगदी लष्करी महाविद्यालयात सुद्धा मला फी होती आणि हॉस्टेलचा आणि राहण्याजेवण्याखाण्याचा खर्च आमच्या तीर्थरुपांनीच भरला आहे.
इ बी सी ची खोटी पारपत्रे भरण्यासारखा दळभद्री पणा करण्याची मला कधीच गरज पडली नाही.
कोणतीही खोटी गोष्ट बेलाशकपणे लिहिणे आणि खोटे उघड झाल्यावर निर्लज्जपणे अजून खोटे बोलणे यात आपला हात कोणीही धरू शकणार नाही.
4 , 7 , 10 ते MBBS मलाही
4 , 7 , 10 ते MBBS मलाही स्कॉलरशिप होती
अन फीमाफीही होती,
तुमची थापेबाजी उघड झाली
>> मार्कलिस्टी डकव बरं.
तुमचा मिसळपावी आयडी सुरू आहे
तुमचा मिसळपावी आयडी सुरू आहे का की गेला?
आपला काय संबंध?
हवं तर शोधून पहा
आपल्याला उत्तर द्यावे हि आपली लायकी आहे का हे तर पहा.
मार्कशीट कितवीचे हवे ?
मार्कशीट कितवीचे हवे ?
Pages