महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लइ मोठा इतिहास आहे तो,

भारतीय स्वातंत्र्य अन विलीनीकरण ह्या काळात , कॉंग्रेसप्रणित भारत हा सेक्युलर असणार , हे कळून चुकले होते , तेंव्हा काही कट्टर लोक संस्थानिकांना पत्रे लिहून भारतीय संघराज्यात सामील जाऊ नका, हिंदुराष्ट्र म्हणून आपापले हिंदू संस्थान स्वतंत्र ठेवा , असे सांगत होते, म्हणे !

पूर्वीचे हे पाप लपवायला आज त्यांचे लोक काँग्रेस व इतरांना तुकडे तुकडे पार्टी म्हणून चिडवत असतात.

पण इंग्रजव्याप्त देश , 350 संस्थानिकी तुकडे हे प्लॅस्टिक सर्जरी करून आम्हाला हा महान देश कोणत्या 4 वाघी अशोक स्तंभाने जोडून दिला , ते आम्हाला पक्के ठाऊक आहे.

अंधारपण पायजेच की
नायतर एक्स रे कसा निघेल ?

उगाच नै आम्ही वॉर्ड बॉय म्हणतो त्याला !!

काँग्रेस, राकाँ, शिवसेना ह्या तिघांनी पक्षात जे नाराज आहेत त्यांची समजुत घालावी तरी ही ते हट्टाला पेटले असतील तर त्यांची पक्षातुन हकालपट्टी करावी मग तो कितीही मोठा नेता असो..त्यांना विरोधी पक्षातच जायचे असेल तर त्याला कोण काय करणार.
उध्दव ठाकरेंनी राज्यकारभार करताना मोदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. त्यांना जे काही सांगायचे आहे ते जाहीर सभांमधुन अथवा महिन्यातुन एकदा टिव्हिवर येउन सांगावे. 'सरकार आपल्या हक्काचे' वैगरे कार्ययक्रमाचे
नाव ठेवावे. काउंटर अटँक होउ देउ नये, वन मँन शो भाषण करावे म्हणजे विरोधाचा प्रश्न येत नाही. तसेच पत्रकार परीषदा घेउ नयेत, पत्रकारांनी कितीही डिवचले तरी हसरा चेहरा ठेवावा. प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडु नये..।एक्स्क्लूजीव मुलाखत फक्त संजय राउतांना द्यावी.

वार्डबॉय सवलत घेऊन डागदर बनाया गेलतं काय?

Submitted by labad kolha on 1 January, 2020 - 06:59. >

त्याने सवलत मिळवून बायकोपासून (त्याच्या स्वतच्या) पिच्छा सोडवला.

बादवे पती पत्नी यामधील एका व्यक्तीने धर्मांतर केले की त्यांच्या अपत्याचा धर्म काय असतो बर? अपत्याचा कायदेशीर धर्म ठरवण्याचा हक्क कोणाचा असतो? अनुभवी जाणकार यावर प्रकाश (एक्स रे चा चालणार नाही) टाकतील काय?

असू द्या हो , शहा मोदी दिल्लीत भाषण करून गेलेत म्हणजे भाजपाच निवडून येईल

2020 मध्ये कुठे कुठे इलेक्शन आहेत ?

https://en.m.wikipedia.org/wiki/2020_elections_in_India

फेब्रुवारी दिल्ली - आप
नोव्हेम्बर बिहार - भाजपा

2020 भाजपाला जरा बरे आहे , जास्त इलेक्शना नाहीत, मोदी शहा सुद्धा प्रचार सोडून इतर देश कार्य करू शकतील

Proud

शिवसेना प्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/cm-uddhav-thackeray-should-act...

मोदी शाह फडणवीस हे सर्वत्र स्वच्छ सांगत आलेत कि आम्ही असा शब्द कधीही दिला नव्हता.

आता तुम्ही कर्णबधिरच नव्हे तर बुद्धी बधिर आहात त्याला कोण काय करणार?

खरी अभूतपूर्व वळणे आता येऊ घातली आहेतः
खालील साभार वॅपः

सुरवातीला जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा या युतीत असलेल्या शिवसेनेला 13 मंत्री पद होती.

मिळालेला जनादेश फाट्यावर मारून योग्य वाटा मिळावा म्हणुन युती तोडली आणि जनादेशाप्रमाणे जे खरे पहाता विरोधी पक्षात बसायला हवे होते त्यांच्याशी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांशी आघाडी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आणि हातात काय आलं तर खालीलप्रमाणे मिळालेली मंत्री पद...

शिवसेना ९
राष्ट्रवादी काँग्रेस १४
काँग्रेस १०

बरं यात शिवसेनेला मिळालेल्या ९ मंत्रिपदांपैकी ५ जण तर शिवसेनेत कधीही नव्हते.
राजेंद्र पाटील यद्रावकर (काँग्रेस अपक्ष) सेनेच्या कोट्यातून मंत्री
अब्दुल सत्तार (काँग्रेस कडून सेनेत) सेनेच्या कोट्यातून मंत्री
उदय सामंत (राष्ट्रवादी काँग्रेस कडून सेनेत) सेनेच्या कोट्यातून मंत्री
बच्चू कडू (अपक्ष) सेनेच्या कोट्यातून मंत्री
शंकरराव गडाख (पूर्वीपासून काँग्रेस घराणे) सेनेच्या कोट्यातून मंत्री

म्हणजे वरचे गणित बघितले तर ९ मंत्रिपदांपैकी फक्त ४ मंत्रीपदे शिवसेनेला मिळाली!

आता यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती हि की स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी "याजसाठी केला होता अट्टाहास" असा झाला आहे. आणि हे सांगणार करून दाखवलं.
तेव्हा जनतेने दिलेला जनादेश गेला खड्यात...!!!
दुनिया गेली तेलं लावत ...!!!

पेग्विंन सेनेच्या दहा रुपयात मिळणार्‍या शिवभोजन थाळीच्या अटी पाहून खाणार्‍याची भूक मरेल. झुणका-भाकर केंद्राच्या माध्यमातून शिवसेनेच्या गुंडांनी २० वर्ष्यापूर्वी मोक्याच्या जमीनी बळकावल्या होत्या, अगदी तसाच प्रयत्न "शिवभोजन थाळी"च्या माध्यमातून सध्याचे पेंग्विंन करत आहेत अशी शंका येते.

काय आहेत शिवभोजन थाळीसाठी अटी?

>> जेवण दुपारी १२ ते २ याचा कालावधीत उपलब्ध असेल.
>> प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला जास्तीत जास्त १५० जणांनाच जेवण मिळेल
>> जेवणात ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम वरण व दीडशे ग्रॅम भात मिळेल.
>> शिवभोजनालय चालवण्यासाठी संबंधिताकडं स्वत:ची पुरेशी जागा असावी.
>> भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल
>> एका भोजनालयात किमान ७५ ते कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.

गृह, अर्थ (वित्त), घरे (बिल्डर्स लॉबी), शेती, महसूल अशी सगळी मुख्य खाती राष्ट्रवादी स्वताकडे ठेवेल. हे म्हणजे सेने ला फक्त लेंगा, नाड्या सर्व राष्ट्रवादी कडे. बाकी ऊर्वरीत महत्वाची 'खाती' कॉम च्या घोटाळे फेम मंत्री लोकांमध्ये वाट्ली जातील. सेने ला पर्यावरण, टुरीझम, अवजड, ही असली खाती देऊन तोंडाला पाने पुसण्यात येतील. हे कमी म्हणून याकूब मेनन शी फाशी रद्द करावी म्हणून अर्ज करणारे महाशय देखिल या कॅबिनेट मध्ये असणार आहेत अशी बातमी आहे.
या पेक्षा भाजपा बरोबर सेने ला निश्चीतच अधिक अर्थपूर्ण खाती मिळालीच असती शिवाय केंद्रातूनही मोठा सहभाग मिळायची शक्यता होती.
हे सरकार एक वर्ष टिकलं तरी खूप आहे... शक्यता फार कमी आहे.

बिल्डर्स लॉबी, पतपेढ्या, सावकार, कंत्राटदार, व त्यांच्या सर्व दलालांसाठी मात्र महाराष्ट्रात अच्छे दिन येणार हे नक्की.

योगची पोस्ट भारी आहे.

प्रसाद, एक छानसे उदाहरण लोकप्रभात आले होते जेव्हा मनोहर जोशी मु होते. शिवसेनेची एका ठिकाणी ( दादरला ) सभा होती. ते सांगु लागले की १ रुपयात झुणका भाकर मिळेल. तेव्हा एक हमाल उठुन हातवारे करत सांगु लागला. त्याला आधी कोणी बोलु देईना . मग शेवटी त्याला विचारल्यावर त्याने सांगीतले की तिथल्या शिवसेनेच्या केंद्रात ५० पैशाला झुणका भाकर मिळते तर मग तुम्ही ती १ रुपयात कशी देता? ते ऐकुन लोक हसुन दमले. ( ही घटना लोकप्रभेत आली होती. लिंक सम्राटांनी ते खणावे. मी उत्खनन करणार नाही )

उठांना काम करायचे आहे, पण सोबतीला खाऊबहाद्दर असल्याने त्यांना कितपत सगळे झेपेल देव जाणे ! तसे उठा , एवढे डांबरट नाहीत जेवढे डांबरट उमु आहेत.

>.उठांना काम करायचे आहे, पण सोबतीला खाऊबहाद्दर असल्याने त्यांना कितपत सगळे झेपेल देव जाणे ! तसे उठा , एवढे डांबरट नाहीत जेवढे डांबरट उमु आहेत.
त्यांच्या नशीबात फक्त ऊठा बशा आहेत.. !
साहेब मंत्र सांगणार, दादा ऊदक सोडणार, आणि ऊठा फक्त मम म्हणणार. महा प्रसाद खायला काँ आहेच. अशी ही महाविकास आघाडी. Proud

Pages