महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
कोणीतरी त्यांना महाभकास
तसे उठा , एवढे डांबरट नाहीत
तसे उठा , एवढे डांबरट नाहीत जेवढे डांबरट उमु आहेत. >>> मला अॅक्चुअली हसू आलं पण पटतंय मला रश्मी, अर्थात मी डांबरट शब्द वापरला नसता, वेगळा काहीतरी वापरला असता. उपमुख्यमंत्री तर काय कुठल्याही पक्षासोबत गेले तरी तिथे हे पद त्यांना मिळतंच. आता भाजपचं सरकार असतं तरी ह्यांचे हात तुपात असते.
एकीकडे मला वाटतंय ते पुढे सी. एम. होणार, ह्याच अटीवर पुढे बोलणी झाली असतील.
अवांतर: जर आपण लेखावर क्लिक न
अवांतर: जर आपण लेखावर क्लिक न करता कमेंट्सवर क्लिक केलं तर आपण डायरेक्ट नवीन कमेंटवर येतो. कालच मी हा शोध लावला.
<जेवढे डांबरट उमु आहेत.>
<जेवढे डांबरट उमु आहेत.>
म्हणजे मी पुन्हा येईनवाल्या महाडांबरट फडण२० च्या सरकारात जे उपमुख्यमंत्री होते तेच ना?
म्हणजे मी पुन्हा येईनवाल्या
म्हणजे मी पुन्हा येईनवाल्या महाडांबरट फडण२० च्या सरकारात जे उपमुख्यमंत्री होते तेच ना?
नवीन Submitted by भरत. on 2 January, 2020 - 17:29
करेक्ट !
मात्र फडणविसांबद्दल महाडांबरट हा शब्द कधी ऐकला नाही.
उलट तो शब्द "महा डांबरट आघाडीतील" नेत्यांना अगदी शोभून दिसेल.
ऐकला नाही तर सवय करून घ्या.
ऐकला नाही तर सवय करून घ्या.
किती जळजळ रे बाबाबा
किती जळजळ रे बाबाबा

उठा म्हटले होते ना की चहा नाही किटली नाही तर फडकाच फार गरम झाला आहे
आणि हो, थोडेसे भक्तांच्याच
आणि हो, थोडेसे भक्तांच्याच लॉजिकने, प्रजासत्ताकदिनानिमित्त यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. तर पक्षप्रेमापुढे स्वतःची अस्मिता, राज्य ह्याला तुमच्या लेखी काही स्थान नाही का?
अवांतर: जर आपण लेखावर क्लिक न
अवांतर: जर आपण लेखावर क्लिक न करता कमेंट्सवर क्लिक केलं तर आपण डायरेक्ट नवीन कमेंटवर येतो. कालच मी हा शोध लावला.
Submitted by बोकलत on 2 January, 2020 - 17:12
>>>
माहीती नव्हते का?
मला कालच समजलं. सहज कमेंट्सवर
मला कालच समजलं. सहज कमेंट्सवर क्लिक केलं तर नवीन कमेंट्स समोर आल्या.
महाराष्ट्र पॅटर्न आता देशभर
महाराष्ट्र पॅटर्न आता देशभर राबवला जाणार अशी चिन्हं दिसत आहेत. तसं झालं तर चांगलंच आहे - केंद्रात भाजपा सरकार, आणि राज्यांत रिजनल पार्टिज. चेक्स अँड बॅलंस आपोआप अंमलात येतील...
जम्माडी जम्मत हे रे भो. मी
जम्माडी जम्मत हे रे भो. मी विरोधकांच्या चूका दाखवल्या तर त्याला उत्तरच नसते. उलट माझेच शब्द वापरुन त्याच्यावर कोटी केली जाते. अरेरे ! काय ही वाचन तर्हा. लोकांना नव्या लिंका सापडेना.
बरं ! फडण२० डांबरट आहेत म्हणे, मग मिशीवाला बेडुक, फराळे, पेपि, उमु ( १२ मती भ्रष्ट्कर) खादाडे, कळीचा नारद हे कोण आहेत बरे !
मिशीवाला बेडुक, फराळे, पेपि>>
मिशीवाला बेडुक, फराळे, पेपि>>>>> हि नक्की कोण माणसं आहेत? कालपासून नावं ऐकतोय.
सगळ्या सत्ता धारी मंत्र्यांना
सगळ्या सत्ता धारी मंत्र्यांना नीट बघा म्हणजे कळेल. काय आहे, लोक फडवीसांना अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने फडण२०, टरबुज, नाना, पंत असे संबोधतात तर मग म्हणलं की आपण पण तेवढ्याच प्रेम आणी जिव्हाळ्याने मविआच्या लोकांना का संबोधु नये.
शोधा म्हणजे सापडेल.
महाराष्ट्राच्या चित्ररथात
महाराष्ट्राच्या चित्ररथात नक्की काय दाखवले जाणार होते म्हणून यावेळी तो रिजेक्ट झाला..?
आणि हो, थोडेसे भक्तांच्याच
आणि हो, थोडेसे भक्तांच्याच लॉजिकने, प्रजासत्ताकदिनानिमित्त यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. तर पक्षप्रेमापुढे स्वतःची अस्मिता, राज्य ह्याला तुमच्या लेखी काही स्थान नाही का
Maharashtra tableau did not make it to the parade in 1972, 1987, 1989, 1996, 2000, "2005, 2008, 2013," 2016 as well
Interestingly, in 2013, the state and Centre were both governed by Congress-led coalitions and in 2016, both were helmed by BJP-led governments and yet the tableau did not make it to the short-list for the parade.
https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-tableau-not-in-republi...
Minister Jitendra Awhad said, "India has a federal structure, Modi-Shah are destroying it just because there is a non-BJP government in West Bengal and Maharashtra. This is childishness.
Shiv Sena leader Sanjay Raut : -This is a big conspiracy against Maharashtra.
https://www.aninews.in/news/national/general-news/rajasthan-madhya-prade...
मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगढ या काँग्रेसी राज्यांचे चित्ररथ आहेत परेड मध्ये.
कुठलीही गोष्ट केवळ द्वेषाच्याच नजरेने पाहिली कि असंच होणार. मग ते राजकारणी असोत कि मायबोलीवरील भाजप द्वेष्टे
आणि वगळायचा रूल गुजरातला 2014
आणि वगळायचा रूल गुजरातला 2014 पासून लागू आहे का ?
पच पच केल्याशिवाय जेवण जात
पच पच केल्याशिवाय जेवण जात नाही का?
' कोल्हापुर' पुर्णता
' कोल्हापुर' पुर्णता भाजपमुक्त करण्यात महाविकास आघाडिला यश आलेले आहे..प्रदेशाध्यक्षांच्याच होम ग्राउंडवर भाजपा सपशेल त्रिफळाचित झाली आहे.खासदार, आमदार, पालिका, पंचायत, झेड पी येथून भाजपचा सुपडा साफ करण्यात मविआ यशस्वी.
2014 पासून गुजरात कितीदा
2014 पासून गुजरात कितीदा वगळला ?
सांगलीत म्हणे शिवसेनेने भाजपा
सांगलीत म्हणे शिवसेनेने भाजपा चे निवडून दिले


आता किती दिवसात हे लोण मुंबईला पोचते ते बघायचं
कुमारस्वामी सरकार इतकं तरी टिकणार का
>>केंद्रात भाजपा सरकार, आणि
>>केंद्रात भाजपा सरकार, आणि राज्यांत रिजनल पार्टिज. चेक्स अँड बॅलंस आपोआप अंमलात येतील... Wink
सहमत आहे! पण त्यात बहुजनांचे हित हे गृहित धरले तरच संतुलन राखण्यास मदत होईल. अन्यथा, त्याचं स्वरूप सध्या तरी चेक मेट असे दिसत आहे, जे मारक आहे.
ऊ.दा: CAA, NRC, हे कडू पण आवश्यक औषध आहे. पण काही राज्ये मात्र याने रूग्णच दगावला जाणार आहे असा अपप्रचार करून थेट लोकशाही प्रक्रीयेच्या व संविधानाच्या विरोधात मनमानी करू पहात आहेत. त्यामूळे वचक व संतुलन (चेक अँड बॅलंस) हे निव्वळ स्वप्न आहे.
2014 पासून गुजरात कितीदा
2014 पासून गुजरात कितीदा वगळला ?
तुम्ही शोधून सांगा
आईन्स्टाइन - गणित-
आईन्स्टाइन - गणित- गुरुत्वाकर्षण फेम पियुष गोयल म्हणतात महाराष्ट्राचा चित्ररथ चांगला नव्हता . प.बंगालचा पण. म्हणून वगळले.
छे छे
छे छे
असं कसं असं कसं
महाराष्ट्रात भाजपचे सरकार पाडून विरोधकांनी आपले सरकार स्थापन केलंय
म्हणूनच महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी दिली नाही
मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगढ या काँग्रेसी राज्यांचे चित्ररथ आहेत परेड मध्ये.
ते कसं झालं ते आम्हाला माहिती नाही.
ते कसं झालं ते आम्हाला माहिती
ते कसं झालं ते आम्हाला माहिती नाही.
नवीन Submitted by सुबोध खरे on 3 January, 2020 - 18:40 >
भरत व BC यावर लवकरच प्रकाश टाकतील.
आमच्या विद्वान मित्रांच्या
आमच्या विद्वान मित्रांच्या मेंदूत डावी बाजू आणि उजवी बाजू यात संपर्क नाही. (agenesis of corpus callosum) . त्यामुळे ते इकडचा प्रतिसाद तिकडे टाकतात आणि तिकडचा इकडे.
दिल्लित JNU विद्यार्थ्यांवर
दिल्लित JNU विद्यार्थ्यांवर मवाल्यांकडुन बुरखा घालुन हल्ला करण्यात आला.
यावर महाराष्ट्रात असे प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत अशी तंबीच माननिय मुख्यमंत्र्यांनी दिली. व बुरख्याच्या मागचे खरे चेहरे उजेडात आणावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राला योग्य व अनुभवी असे मंत्रीमंडळ मिळाले आहे येत्या पाच वर्षात ते उत्तम असा कारभार करुन पालिका व परिषदांवरही मविआची सत्ता आणतील यात शंका नाही.
>>> दिल्लित JNU
>>> दिल्लित JNU विद्यार्थ्यांवर मवाल्यांकडुन बुरखा घालुन हल्ला करण्यात आला. >>>
मवाली म्हणजे कॉंग्रेसी आणि डावे.
>>> महाराष्ट्राला योग्य व अनुभवी असे मंत्रीमंडळ मिळाले आहे येत्या पाच वर्षात ते उत्तम असा कारभार करुन पालिका व परिषदांवरही मविआची सत्ता आणतील यात शंका नाही. >>>
खिक . . . फिदी फिदी फिदी . . .
लवकरच बुरख्यातील मावाली
लवकरच बुरख्यातील मवाली म्हणजे एल्गार परिषदेत असलेले अर्बन नक्षलवादी उघडे पडतील.
Pages