महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
तर तेव्हा कोणाची पोटं भरत
तर तेव्हा कोणाची पोटं भरत होती, याबद्दल आपल अभ्यासू, विचारपूर्वक मांडलेले मत द्याल का?>>>>> त्यात घोटाळा झाला असेल तर, दोषींना त्यांची संपत्ती जप्त करुन जेल मध्ये सडवावे.
भरत, तुम्ही पुण्यात किती वेळा आलात मागील १० ते १२ वर्षात? टँकर लॉबी म्हणजे काय हे पुणेकरांना आणी बाकी खेड्या-पाड्यातील लोकांना विचारा. मी जास्त लिहीणार नाही, पण नळाला २-४ दिवस पाणी येत नाही, पण बोलवता क्षणी टँकर मात्र लग्गेच येतो हे जनसामान्यांना पडलेले कोडे आहे. आणी मला हे सांगा की कुठल्या खात्यात भ्रष्ट्राचार नाही ! कोणतेही सरकार वा पक्ष घ्या, त्यात तुम्हाला ही अशी खाणारी माणसे दर वर्षी सापडतील. मोठ्यांच्या आशीर्वादाने त्यांचे काहीच बिघडणार नाही. महापालिकेत खाणारी लोक आहेत म्हणूनच टँकर्स आले. फडणवीसांना हेच नको होते म्हणून त्यांनी ही योजना राबवली. पण आता काय ? मदारी आलाय ना नाचवायला. मला आणी माझ्या मुलाला नेतेपद हवे होते, मिळाले, बास्स ! जलयुक्त शिवारेत घोटाळा झाला, मेट्रोत घोटाळा झाला, समृद्धीत घोटाळा झाला, फक्त लोकांच्या जमिनी लाटतांना झाला नाही.
बाय्दी वे, तुम्ही आतापर्यंत राणीच्या बागेविषयी कुठेच काही लिहील्याचे दिसत नाही. लिहीले असल्यास दाखवा.
लोकांना पिण्याचे पाणी
लोकांना पिण्याचे पाणी मुन्शीपल कार्पोरेशन पुरवते , मुख्यमंत्री किंवा संसदेचा विरोधी पक्ष नेता नाही.
पुणे कार्पोरेशन एकहाती भाजपाच्याच हातात आहे .
माजी मुख्यमंत्र्याच्या होम
माजी मुख्यमंत्र्याच्या होम ग्राउंडवर जि.प निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झालाय काँग्रेसकडुन तर दुसरीकडे खडसेंनी त्यांचा गड राखलाय. भाजपाने खडसेंकडे नेत्रुत्व दिल्यास फरफट थांबेन..
अकोल्यात भाजपचा खासदार आहे तिथेही जि.प वंचितकडे गेलिय. वंचितही भाजपला भारी पडु लागली आहे.
अहो जामोप्या, पाणी
अहो जामोप्या, पाणी कॉर्पोरेशनच पुरवते. पण ही केव्हाची घटना आहे? भाजपा तर आत्ता निवडुन आलेत. आधी कोण होतं? जरा शोधा की वाईच.
उलटीपालटीत खाणारी माणसे आहेत, म्हणून पण लॉबी चालतेय हे वाक्य तुम्ही वाचलेले दिसत नाही.
६ जिल्हा परीषदांपैकी किती
६ जिल्हा परीषदांपैकी किती ठिकाणी महाराष्ट्राचे धुरंधर नेतृत्व व आधुनिक चाणक्य यांचा पक्ष जिंकला?
https://www.bhaskar.com
https://www.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/maharashtra-nagpur-akola...
जिला परिषद चुनाव / महाराष्ट्र की 6 में से 2 सीट पर कांग्रेस जीती, भाजपा और शिवसेना की 1-1 पर बढ़त, नागपुर में ही हारी भाजपा
<आणी मला हे सांगा की कुठल्या
<आणी मला हे सांगा की कुठल्या खात्यात भ्रष्ट्राचार नाही ! कोणतेही सरकार वा पक्ष घ्या, त्यात तुम्हाला ही अशी खाणारी माणसे दर वर्षी सापडतील. मोठ्यांच्या आशीर्वादाने त्यांचे काहीच बिघडणार नाही.>
चान चान.
पण तुम्हाला फक्त राष्ट्रवादीतलेच खाणारे दिसले होते की हो.
जलयुक्त शिवार मधल्या भ्रष्टाचा राबद्दल या आधी तुम्ही कधी लिहिले होते का? ते दाखवा. मग मी राणीच्या बागेत फिरून येईन.
बरं. तो प्रियांका गांधी - मुस्लिम राष्ट्रवाला मॉर्फ्ड फोटो किती लोकांना पुढे पाठवलात. ?
नागपूरला भाजपाला हुसकले
नागपूरला भाजपाला हुसकले
https://m.facebook.com/home
https://m.facebook.com/home.php#!/photo.php?fbid=3144532745576303&id=100...
मविआ ने वंचितशी युती करणे हे
मविआ ने वंचितशी युती करणे हे योग्य राहील. वंचितने पण अकोल्यात भाजपची दाणादाण उडवली आहे.
मविआने पंचायत, जि.प, पालिका सर्वत्र युती करुन लढावे.
वंचित महाराष्ट्रात वंचितच
वंचित महाराष्ट्रात वंचितच राहणार! अकोला म्हणजे सगळा महाराष्ट्र नव्हे.
अकोला तर अकोला.. स्टेप बाय
अकोला तर अकोला.. स्टेप बाय स्टेप गेले पाहिजे।.भाजप हा पुर्ण कोल्हापुर मुक्त झालाय तसेच अकोला मुक्त करण्याचा प्रयत्न मविआने केला पाहिजे.
>>> तर दुसरीकडे खडसेंनी
>>> तर दुसरीकडे खडसेंनी त्यांचा गड राखलाय. >>>
अहो, सतत-पार्श्वभागावर-आपटेकर पगारे,
आपल्या बाळबोध अज्ञानाचे वारंवार प्रदर्शन करून किती वेळा पार्श्वभागावर आपटणार?
निवडणुक धुळे जिल्हा परीषदेत झाली आणि खडसे जळगावचे आहेत हो. पप्पूगिरी किती दिवस करत राहणार?
>>> अकोला तर अकोला.. स्टेप
>>> अकोला तर अकोला.. स्टेप बाय स्टेप गेले पाहिजे।. >>>
धुळे जिल्हा परीषद भाजपने कॉंग्रेसकडून हिसकावून घेतली तर नंदुरबार जिल्हा परीषदेत भाजप १ वरून २३ वर पोहोचून सर्वात मोठा पक्ष झालाय. स्टेप बाय स्टेप महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होतोय. तुमच्या चाणक्याच्या पक्षाची तर पूर्ण वाट लागली. साधी एक जिल्हा परीषद जिंकता येत नाही आणि निघाले राष्ट्रपती बनायला. आणि त्यांना राऊत्या राष्ट्रपती करणार म्हणे ज्याला स्वत:च्या भावाला साधं उपमंत्री सुद्धा करता आलं नाही.
(No subject)
अहो खडसे आमच्याच इथले उ.
अहो खडसे आमच्याच इथले उ. महाराष्ट्राचे त्यांचे जळगाव आहे हे माहित आहे तोच त्यांचा गड म्हणालो.तुमचा गैरसमज झाला जसे अच्छे दिन येणार म्हणुन झाला होता तसा.
सतत-पार्श्वभागावर-आपटेकर मस्त शब्द शोधुन काढलाय भाजपला सुट होतोय.
चाणाक्यांच म्हणाल तर आता तिनही पक्षांचे तेच मार्गदर्शक आहेत.
काँग्रेसने नागपुरात जोरदार
काँग्रेसने नागपुरात जोरदार मुसंडी मारुन भाजपला उडवुन लावले.
>>> अहो खडसे आमच्याच इथले उ.
>>> अहो खडसे आमच्याच इथले उ. महाराष्ट्राचे त्यांचे जळगाव आहे हे माहित आहे तोच त्यांचा गड म्हणालो. >>>
आज जिल्हा परीषद निवडणुकीचे निकाल लागले व त्यात भाजपने धुळ्यात कॉंग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आपल्या बाळबोध अज्ञानातून लिहिले की खडसेंनी आपला गड राखला. पण जळगावमध्ये निवडणुक झालीच नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे बाळबोध अज्ञान उघड पडले.
>>> तुमचा गैरसमज झाला जसे अच्छे दिन येणार म्हणुन झाला होता तसा. >>>
माझा काहीही न गैरसमज झालेला नाही. आपले बाळबोध अज्ञान लपविण्याची केलिलवाणी धडपड करू नका. आणि अच्छे दिन बद्दल म्हणाल तर त्याचे उत्तर मे २०१९ मध्ये जनतेनेच दिले आहे.
>>> सतत-पार्श्वभागावर-आपटेकर मस्त शब्द शोधुन काढलाय भाजपला सुट होतोय. >>>
अमेठीपासून नांदेडपासून गुणापर्यंत दारूण पराभव होऊन सुद्धा पडलो तरी नाक वर हे सतत-पार्श्वभागावर-आपटेकर यांनाच लागू होतंय.
>>> चाणाक्यांच म्हणाल तर आता तिनही पक्षांचे तेच मार्गदर्शक आहेत. >>>
साधी एक जिल्हा परीषद जिंकता येईना आणि म्हणे मार्गदर्शक. हेच मार्गदर्शक सोनियासमोर नाक घासत लोटांगण घालतात.
साधी एक जिल्हा परीषद जिंकता
साधी एक जिल्हा परीषद जिंकता येईना आणि म्हणे मार्गदर्शक. हेच मार्गदर्शक सोनियासमोर नाक घासत लोटांगण घालतात.)))))) जसे भाजप शिवसेनाप्रमुखांपुढे घासत होती
>>> जसे भाजप
>>> जसे भाजप शिवसेनाप्रमुखांपुढे घासत होती >>>
म्हणजे तुमचा चाणक्य सोनियासमोर नाक घासतो हे कबूल केलंय. धन्यवाद!
भाजपने सेनेला ५ वर्षे कोणती खाती दिली होती आणि निवडणुक निकालानंतर सेनेला कशी धूप घातली नाही याची जरा माहिती घ्या.
म्हणजे तुमचा चाणक्य
म्हणजे तुमचा चाणक्य सोनियासमोर नाक घासतो हे कबूल केलंय. धन्यवाद!))))))) आता तुमच सारख चाललय तर म्हटलो होउ द्या तुमच समाधान..
पण एक आहे
सतत-पार्श्वभागावर-आपटेकर सध्या भाजपलाच सुट होतय
>>> आता तुमच सारख चाललय तर
>>> आता तुमच सारख चाललय तर म्हटलो होउ द्या तुमच समाधान.. >>>
ही वस्तुस्थिती आहे. माझे समाधान बाजूला राहू दे.
>>> सतत-पार्श्वभागावर-आपटेकर सध्या भाजपलाच सुट होतय>>>>
बाळबोध अज्ञान अजून किती वेळा दाखवणार?
ही वस्तुस्थिती आहे. माझे
ही वस्तुस्थिती आहे. माझे समाधान बाजूला राहू दे.))))).बर बाबा ही वस्तुस्थिती आहे.. खुश

सर्व ठिक आहे पण तो शब्द भाजपलाच सुट होतोय हे तुम्हीही कबुल करा
>>> ही वस्तुस्थिती आहे.. >>>
>>> ही वस्तुस्थिती आहे.. >>>
+ ७८६
>>> तो शब्द भाजपलाच सुट होतोय हे तुम्हीही कबुल करा >>>
सुट होत असता तर कबूल केलं असतं. पण तसं होत नाही.
अहो म्हातार माणुस किंवा लहान
अहो म्हातार माणुस किंवा लहान बाळ हट्टाला पेटले की तात्पुरते हो हो म्हणायचे . खर तर ती वस्तुस्थिती बिती काही नाही. तुम्ही वापरलेला तो शब्द भाजपला सुट होतोय हीच वस्तुस्थिती आहे.
आणी हो +786 हे काय? नावडत्या लोकांचा आवडता सिम्बोल घेताय...तो अडीच दिवसाचा आयडी aadesh रागावेल हो तुमच्यावर
>>> तुम्ही वापरलेला तो शब्द
>>> तुम्ही वापरलेला तो शब्द भाजपला सुट होतोय हीच वस्तुस्थिती आहे. >>>
बाळबोध अज्ञान.
चान चान. >>>>>> किती दिवस
चान चान. >>>>>> किती दिवस बोबडे बोलणार आहात?
पण तुम्हाला फक्त राष्ट्रवादीतलेच खाणारे दिसले होते की हो.>>>>> काय आहे जे आपल्याला सोयीस्कर वाटते तेच तुम्ही उचलता, आता मी लिहीले की ज्यांनी भ्रष्ट्राचार केलाय त्यांना जेल मध्ये सडवा ते तुम्हाला दिसले नाही किंवा तुम्ही नजरेआड केलेत.
मी शक्यतो फॉर्वर्ड करत नाही कारण उद्या माझ्यावरच लटकायची वेळ येईल. फोटो मला आला म्हणून मी इथे लिहीले. आणी दुसरे म्हणजे प्रियंका त्या घटनेला जबाबदार आहे असे मी कुठेही म्हणलेले वा लिहीलेले नाही. उग्गाच उड्या मारु नका.
बरं, राणीच्या बागेत फिरायला गेलात तर तिथले पेंग्विन आहेत ना त्यांची पण विचारपूस करा. त्यांना बरे वाटेल.
Rashmi Nice!!
Rashmi
Penguins.. Nice!!
Bharat
सतत-पार्श्वभागावर-आपटेकर.
<स्टेप बाय स्टेप महाराष्ट्र
<स्टेप बाय स्टेप महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होतोय. >
संघाचे मुख्यालय असले ला, फडणवीस आणि गडकरींचा नागपूर जिल्हा भाजपमुक्त आणि काँग्रेस ही काँग्रेसयुक्त झाला. तो महाराष्ट्रात नाही काय?
रश्मी, त्या फेक फोटोला घेऊन
रश्मी, त्या फेक फोटोला घेऊन तुम्ही स्वतः किती उड्या मारल्यात ते तुमच्या प्रतिसादातच जाऊन वाचा. जयचंद आणि कोण कोण आठवले तुम्हांला.
फोटो तुम्हांला आला म्हणून् तुम्ही लिहिले.?
मी हेच लिहिलं होतं की हे मी माझा, पुरोगामी, युनिस सारखे बनेल लोक असे फेक फोटो पसरवून तुमच्यासारख्या भोळ्या भाबड्या लोकांच्या डोक्यात विष भरवतात. ते वाचलेत ना तुम्ही?
Pages