महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जलयुक्त शिवार बंद केली. का? आमचे प्वाट भरायला नको का? आम्ही कोण तर राष्ट्रवादी पुरस्कृत गुंडा टँकर लॉबी.

रश्मी, ही बातमी वाचल्याचं आठवतंय का बघा बरं. जून २०१९ मधली आहे.
https://www.loksatta.com/mumbai-news/corruption-jalyukt-shivar-tanaji-sa...
मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामातील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असून या आरोपात तथ्य असल्याचेही सावंत यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे. केवळ पुरंदर तालुक्यातच नव्हे तर आणखी १३०० प्रकरणांत अनियमितता झाल्याच्या तक्रारी असून त्याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनीच सांगितल्यामुळे सत्ताधारी पक्षाची कोंडी झाली. अखेर सभापती रामराजे निंबाळकर यांनी हा प्रश्न राखून ठेवला.
हा तांत्रिक विषय असून सध्या विभागाकडे या १३०० गैरव्यवहार प्रकरणांबाबत चार प्रमुख विभागांचे अहवाल आले असून उर्वरित दोन अहवाल आल्यानंतर त्याचा अभ्यास करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उत्तर मंत्र्यांनी दिले

तर तेव्हा कोणाची पोटं भरत होती, याबद्दल आपल अभ्यासू, विचारपूर्वक मांडलेले मत द्याल का?

जलयुक्त शिवार बंद केली. का?
<<

जलयुक्त शिवारचे पाणी "पेंग्विन" संवर्धनासाठी वळवले असण्याची शक्यता आहे.
नोटबंदीने बरिच आबाळ झाली होती पेंग्विन्सची.

जलयुक्त शिवार योजना अत्यंत पारदर्शकपणे राबवली गेली. थोडीफार भ्रष्टाचारी लोकांनी घाण केली असेल, पण इतर योजना शंभरातील साठ टक्के हडप करतात तिथे जयुशि मध्ये ५टक्के पेक्षा कमी भ्रष्टाचार झाला आहे.

आता राज ठाकरे काय भाषण करतील. आधी मोदींच्या आंघोळीचं पाणी प्यावं काही वर्षापुर्वी. नंतर पुलवामा हल्ला मोदींनी घडवला, मोदी शहांना पाडा, लावरे तो व्हिडीओ, आर्थिक मंदीवरुन लक्ष वळवण्यासाठी नागरीकत्व बिल आणलं ते आता परत बहुतेक टोटली यु टर्न, मोदींच्या आंघोळीचं पाणी प्यावं सांगतील की काय.

भाजप का महत्व देतेय आता परत. स्वहिमतीवर मिळाली तर घ्यावी सत्ता, आदरवाईज मला नाही पटत रा ठा यांच्याबरोबर जाणं.

भाजप का महत्व देतेय आता परत.)))))))))))) महाराष्ट्राच्या राजकारणाने असे वळण घेतले आहे की कुठलाही पक्ष स्वतंत्र लढुन सत्तेपर्यत जाउ शकत नाही.शिवसेना ही भाजपला विरोधी पक्षात बसवुन काँ, राकाँ बरोबर निघुन गेली आहे.भाजपा एकटी पडलीय त्यांना टिकुन रहाण्यासाठी मनसेची गरज आहे.

रा ठा यांनाही मुख्यमंत्री व्हायची महत्वाकांक्षा आहे की, चुकीचं काहीच नाही त्यात. तेही उद्या जास्त जागा मिळाल्या तर उ ठा यांच्यासारखं करु शकतात.

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
<<

योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर नविन सरकारने, भ्रष्टाचारात लिप्त असणार्‍यांवर खटले भरवून जेलमधे पाठवावे. संपूर्ण योजनाच बंद करणे कितपत शहाणपणाचे आहे ? अर्थात पवारांच्या हातातील एक कठपुतली, ह्यापेक्षा जास्त लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री पदावर बसल्यावर त्याकडून अपेक्षा तरी काय करणार ?

>>> महाराष्ट्राच्या राजकारणाने असे वळण घेतले आहे की कुठलाही पक्ष स्वतंत्र लढुन सत्तेपर्यत जाउ शकत नाही. >>>

महाराष्ट्राचे धुरंधर नेतृत्व असलेला चाणक्याचा
पक्ष सुद्धा नाही? मग काय उपयोग त्या चाणक्यनीतिचा?

ज्यांना स्वबळावर कधीही बहुमत तर सोडाच पण २५ टक्के सुद्धा जागा जिंकता आल्या नाहीत, जे कायम दुसऱ्यासमोर हुजरेगिरी करून लोटांगण घालून समोर फेकण्यात आलेल्या शिळ्यापाक्या तुकड्यांवर तृप्तीचा ढेकर देत आले, ते म्हणे चाणक्य आणि धुरंधर नेतृत्व.

>>> पवारांच्या हातातील एक कठपुतली, ह्यापेक्षा जास्त लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री पदावर बसल्यावर त्याकडून अपेक्षा तरी काय करणार ? >>>

+ ७८६

>>> भाजपा एकटी पडलीय त्यांना टिकुन रहाण्यासाठी मनसेची गरज आहे. >>>

पुन्हा एकदा मूर्खासारखा निष्कर्ष. २६ टक्के जनाधार असलेल्यांना म्हणे टिकुन राहण्यासाठी पाव टक्के मते असलेल्याची गरज आहे.

गरज राजलाच आहे. पवार आणि सोनियाची चाटूनही त्यांनी लाथाडले. आता भाजपने भीक घालावी अशी गयावया करतोय.

जलयुक्त शिवारची मुदत २०१९ पर्यंतच होती.
http://cgwb.gov.in/Bhujal-manthan/bm3-file3.pdf
A Program to make Maharashtra Water Secure by 2019

यापुढे गरज पडली तर ही कामे रोजगार हमी योजनेतून करा असे आदेश आहेत.

महाराष्ट्रात मोदी- शहा यांच्या कमी सभा होणे हे काँग्रेससाठी घातक ठरले.जर ह्या जोडीच्या जास्त सभा महाराष्ट्रात झाल्या असत्या तर काँ- राकाँ हे शिवसेने शिवाय सत्तेवर आले असते.
वंचिचशी युती न होणे व मोदी- शहा यांनी कमी घेतलेल्या सभा ह्यामुळे विजयी आकड्यापासुन आघाडी दुर राहिली.

>>> महाराष्ट्रात मोदी- शहा यांच्या कमी सभा होणे हे काँग्रेससाठी घातक ठरले.जर ह्या जोडीच्या जास्त सभा महाराष्ट्रात झाल्या असत्या तर काँ- राकाँ हे शिवसेने शिवाय सत्तेवर आले असते. >>>

अजून एक मूर्खासारखा निष्कर्ष.

नारायण राणें व त्यांच्या दोन दिवट्यांना जवळ करुन भाजपाने जी चूक केली होती तशीच चूक, पुन्हा राज ठाकरेंना जवळ करुन भाजपाने घेऊ नये. राज हा राजकारणातून संपलेला इसम आहे. त्याच्या पार्टीकडे ना धोरण ना ध्येय ! त्याला जवळ करुन काही फायदा होईल असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर ते नेते महामुर्ख आहेत असेच म्हणावे लागेल.

वंचिचशी युती न होणे >>> वंचितशी युती करतील असं वाटलेलं मला, ३३ जागा वंचितमुळे पडल्या त्यांच्या.

बाकी अजुनही मला वाटतं की भाजप शिवसेनेने थोडे आपापले इगोज बाजुला ठेवायला हवे होते. शेवटची एक दोन वर्ष मुख्यमंत्रीपद सेनेला द्यायला काही हरकत नव्हती.

नारायण राणें व त्यांच्या दोन दिवट्यांना जवळ करुन भाजपाने जी चूक केली होती तशीच चूक, पुन्हा राज ठाकरेंना जवळ करुन भाजपाने घेऊ नये. >>> सहमत आहे मी याच्याशी.

अजून एक मूर्खासारखा निष्कर्ष.
नवीन Submitted by पुरोगामी on 8 January, 2020 - 13:02
<

वाट्टेल ते निष्कर्ष काढून, इथे लिहियाचे (मग ते कितीही विपर्यास करणारे असोत) याचाच तर बोनस बरोबर पगार मिळतो त्यांना.
तेंव्हा लिहू दे त्यांना.

उदयनराजे व पंकजा मुंडे यांच्यासाठी मोदी- शहा जोडगळीने तुफानी प्रचारसभा घेतली होती. पण त्या तुफानात ह्या दोघांच्याही सिट गेल्या.

येथे वाळवी लागलेले फर्निचरची तोडफोड होउन फेकुण देण्यात आले आहे.

नवीन Submitted by सचिन पगारे on 8 January, 2020 - 11:49 >>

नाही बाळ, वाळवी लागलेले तीन लाकडी पाय जमा करुन टेबल बनवायचा प्रयत्न चाललाय.
बाकी तुझा पोरकट्पणा कधी जाणार काय माहीत...

>>> उदयनराजे व पंकजा मुंडे यांच्यासाठी मोदी- शहा जोडगळीने तुफानी प्रचारसभा घेतली होती. पण त्या तुफानात ह्या दोघांच्याही सिट गेल्या. >>>

उदयन व पंकजा कसे पडले व त्यांना कोणी पाडले हे समजत नसेल तर अजून राजकारणाच्या बालवाडीतच आहात.

उदयनराजे व पंकजा मुंडे यांच्यासाठी मोदी- शहा जोडगळीने तुफानी प्रचारसभा घेतली होती. पण त्या तुफानात ह्या दोघांच्याही सिट गेल्या.
नवीन Submitted by सचिन पगारे on 8 January, 2020 - 13:08
<<

मित्रा,
निवडणुकीतील जय/पराजय मतदारांच्या सदसदविवेकबुध्दीवर अवलंबून असतो, तसे नसते तर "राष्ट्रीय विदुषक" अमेठीतून पडला नसता. तेंव्हा कुणी, कुणासाठी, किती सभा घेतल्या ही बाब गौण आहे.

अजून एक मूर्खासारखा निष्कर्ष.

Submitted by पुरोगामी on 8 January, 2020 - 13:02 >>

तुम्ही काय त्याला उत्तर देत बसलाय भाउ.. त्याचा स्क्रु ढीला झालाय, नि काहीही बरळत सुटलंय.

फडणवीस सरकारचे कर्तृत्व एकच , आमदारांचा पगार तिप्पट करणे

निवडणुकीतील जय/पराजय मतदारांच्या सदसदविवेकबुध्दीवर अवलंबून असतो,

Happy

म्हणून तर 67 वर्षे तुम्हास लोक विचारत नव्हते, सदुसष्ठविवेकबुद्धी !!!

------

नागपुरी विवेक बुद्धी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरच्या मैदानावर मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल भाजपाच्या विरोधात लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागले आहे. येथे काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला आहे. नागपूरातील भाजपाच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जातं असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपाने उमेदवारी नाकारली होती

निवडणुकीतील जय/पराजय मतदारांच्या सदसदविवेकबुध्दीवर अवलंबून असतो,

Happy

म्हणून तर 67 वर्षे तुम्हास लोक विचारत नव्हते, सदुसष्ठविवेकबुद्धी !!! >>

सुबह का भुला शाम को घर आयें तो उसे भुला नही कहते !

Pages