महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली.

>>

काँग्रेस काही गुगली वगैरे टाकत नव्हती. ती आपली गप गुमान सेकंड स्लीप मध्ये उभी होती.

महाविकास आघाडी आणि तिच्या सर्व शिल्पकारांचे मनापासुन अभिनंदन..!
कर्नाटकप्रमाणे इथे घोडाबाजार भरला नाही आणि भाजपचे थोबाड कायमचे फुटले हे एक बरे झाले. आता पुढे कोणत्या तोंडाने आमदार फोडतात ते बघु.

छान लेख.... आवडला. संजय राऊत यांनी अगदी हिमतीने किल्ला लढवला.

पुढचा काळ परिक्षेचा आहे. अजुन बहुमत सिद्ध करायचे आहे, मग मंत्र्यांची नावे, खाते वाटप... रुसवे फुगवे... केंद्राकडून (अ) असहकार्य , राज्यपाल.... सर्व प्रकारच्या दिव्याला सामोरे जावे लागणार आहे. घोडामैदान दूर नाही. नव्या सरकारला शुभेच्छा.

या सगळ्या प्रकरणात पवार छा गये म्हणायला लागेल,
माझ्या पिढीतल्या लोकांनी पवारांबद्दल फक्त ऐकले होते, पण त्याना इन ऍक्शन पाहणे (प्रचार सभे पासून) एक अनुभव होता.

न्यायालयाचा निकाल जर अपेक्षेप्रमाणे आला नसता तर अजित पवारांनी राजीनामा दिला असता का ?

भाजपा विरुद्ध खरं आवाज सर्वप्रथम राज ठाकरेंनी उठवला होता. पण आता महा विकास आघाडी मुळे त्याला व्यापक स्वरूप मिळाले आहे.नगरपरिषदा, महापालिका ताब्यात घेणे हे आता त्यांचे उद्दिष्ट असेल.मनसे, वंचित ह्या पक्षांना ही ह्या सरकारने आघाडीत घेवून एक व्यापक आघाडी तयार करायला हवी.

राज ठाकरे आणि नंतर शिवसेना. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आवाज उठवला असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल. बीड मधे अजितदादांनी फडणवीसांसोबत धनंजय मुंडेला जिंकवण्यासाठी लावलेली सेटींग असो किंवा भाजपाचे ४२ अपक्ष आमदार विजयी करण्यासाठी १८ जागेवर त्यांना मतदान करून सेनेला पाडण्याचा निर्णअसेसो, त्याबदल्यात आपल्याही काही जागा भाजपच्या व्होटींगमुळे आल्याने ते आवाज उठवतील असे कधी झाले नसते.

महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी भाजपला असलेली संघाची शिकवण कामी आली. विजयातुन पराजय कसा खेचुन आणायचा हे खरे तर यांच्याकडुनच शिकावे..!!

ढॅन्ट्ढँड.......!!!!!!
"पगारे" इज ब्याक :))
मा. श्री. सोनिया गांधी व श्री. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला जी अभुतपुर्व अशी कोणाच्या स्वप्नातही येवु न शकणारी कलाटणी दिलीय त्याबद्दल त्यांचे व त्या निमित्ताने "पगारे" ना लेख लिहायची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.

न्यायालयाचा निकाल जर अपेक्षेप्रमाणे आला नसता तर अजित पवारांनी राजीनामा दिला असता का ?...गुप्त मतदान असते तर बाजी भाजपाच्या हातात होती असे मला तरी वाटतय. त्यांचा इतर राज्यातला पराक्रम बघता.

पगारेंना टार्गेट करून महाराष्ट्रातल्या फटफजितीवरून लक्ष्य अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न म्हणावा का हा ?

>>कलाटणी दिलीय त्याबद्दल त्यांचे व त्या निमित्ताने "पगारे" ना लेख लिहायची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
Proud
अलोकडे राऊत वगैरेंचा जमाना आला आहे.. तेव्हा हे ओघाने आलेच. Proud
पण त्या विजयोन्मादात अजित दादा पवार यांना पण श्रेय देणे म्हणजे नाईट वॉचमन म्हणून आयत्या वेळी आलेल्या खेळाडूला सामन्यात थोडी चुरस निर्माण केली म्हणून मॅन ऑफ द मॅच देण्या सारखे आहे. असो.
संजय निरूपम, अबू आझमी, ऊध्दव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी अशा लोकांना एकाच जागेवर बघितल्यावर वाटसरूला आपण सुखद वळणापेक्षा चकव्यामधेच फिरतोय असे वाटण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा जरा जास्तच दिवे सोबत घेऊन चलावे.

इश्श !
फडणवीस ज्यांना चक्की पिसायला३ पाठवणार होते त्यांनाच मांडीवर घेऊन बसलेले दिसले तरी तुमच्या मेंदूचा डोळ्यांवर विश्वास आहे?

राऊतांबरोबर आशिष शेलारांचाही जमाना आला आणि आता तर राणेसुपुत्र. अगदी बहार उडवून देताहेत.

त्यांचे मेंदू ,, डोळे अाणि विश्वास.. असे त्रिभाजन जालेले आहे ..
लंब्या चवड्या लाजिकल पोस्टींंचा आव आणून लिहून नंतर नाका वर पडले की गलित्छ शाब्दिक भि कार विनोद करून वरतून ख्याख्या दाताड दाखवने ही यांची भाजपरेंडी ..

स्वताच आमितशा असल्या गत लिहलेल्या यांच्या दिव्य भविष्यवानीवाल्या जुन्या पोस्टी चेक करा ,, ढुंगणा वरच्या तिळा चेही लाड करून घेणारं एखादे अतरंगी कारट अतिखेळून ढुंगणावर पडलं तरी घरात कुणाला काही न सांगता ख्याख्याखीखी करत राते ।। तशी गत झाली आहे यांची

बात करते है । उससे अच्छा है की दवादारू करो ।। दुवा करो ..

थोबाड फुटलं सारखे शब्दप्रयोग न केलेले बरे .
नवीन Submitted by भरत. on 27 November, 2019 - 10:48
<<
जी नही.

ज्या पद्धतीने भाजपा सूडाचे राजकारण नीच पातळीवर जाऊन करीत आहे, तसे काँग्रेस करू शकत नाही, ते त्यांच्या प्रकृतीत नाही, हे राहुलने सिद्ध करून दिलेच होते, पण तो आता पिक्चरमधे नाही.

आता माझं पुढचं प्रेडिक्शन साम्गतो.

शिवसेना ही मुख्य सत्ताधारी असल्यावर रासवटपणे वागण्याचे खुले लायसन तिला प्राप्त आहे. भाजपापेक्षा जास्त निर्लज्ज बनू शकते ते कोण?

तेव्हा या टिनपाँटांना चेचण्याचे काम; पाहुण्याच्या लाठीने मेलेला साप दिसल्यावर सुफळ संपूर्ण होईल असे मला तरी वाटते!

केंद्रीय मंत्रीमंडळाचा आदर्श घ्यायचा असेल तर अजितदादा पवार यांना गृहमंत्रीपद द्यावे लागेल. अर्थ खाते भाऊ कदमला तर शिक्षण खाते रस्मृती इराणी यांच्याइतक्या शिकलेल्या व्यक्तीला शोधून द्यावे लागेल.

योग यांचे गेल्या काही दिवसांतले लांबलांब प्रतिसाद एकत्र केले तर त्यातून एक छान विनोदी लेख /लेखमाला तयार होईल. अर्थात त्यातला विनोद त्यांच्याकडून अभावितपणे झालेला आहे.

नैराश्य, जळजळ यामुळेही असेल कदाचित.
आता नव्या सरकारला संधी दिली पाहीजे, त्यांना वेळ दिला पाहीजे असे म्हणणारे कुणी दिसत नाहीत.

@पुरोगामी गाढव मी म्हणतोय..की नव्या सरकारला किमान 2 वर्ष तरी द्यायला हवीत. त्या २ वर्षांत सर्वांना स्वतच्या मर्यादा कळून येतील आणि महाराष्ट्रातील जनतेला पुढे नक्की कुणाला पुन्हा निवडून द्यायचे हे कळेल..

महाराष्ट्रात आज नवे सरकार स्थापन होतेय त्यांना शुभेच्छा.शिवसेनेचा आक्रमकपणा, पवारांचे मार्गदर्शन,काँग्रेसचा विधायक दृष्टिकोन,अनुभव यांच्या जोरावर हे सरकार टिकावे अशीच महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेची अपेक्षा.
ह्या सरकारने सद्यस्थितीत पालिका, परिषदा जेथे भाजपची सत्ता आहे तेथे लक्ष केंद्रीत करुन सत्ता हस्तगत करण्याचा यशस्वी प्रयत्न करावा. भाजपला महाराष्ट्रात तर रोखलेच आहे पण देशपातलीवर असाच प्रयत्न व्हायला हवा.

शिवसेनेचा आक्रमकपणा, पवारांचे मार्गदर्शन,काँग्रेसचा विधायक दृष्टिकोन,अनुभव यांच्या जोरावर हे सरकार टिकावे अशीच महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेची अपेक्षा.
"पगारे" ंच्या (आदरार्थी आहे टिंब दिलाय जरी क्वोट्च्या बाहेर असला तरी) या मनोभावांना भाबडे म्हणावे की त्यांची राजकारणाची "पवारणीय" (सेम अ‍ॅज दवणीय हं) जाण म्हणावी. करावे तितके कौतुक कमीच म्हणावे लागेल.
फक्त हे "काँग्रेसचा विधायक दृष्टिकोन" आणी हे "बहुसंख्य जनतेची अपेक्षा" ह्याबाबत थोडी शंका आहे. तसही "पगारे" पुढे देतील त्या प्रतिसादात याचा योग्य तो उलगडा करतीलच म्हणा.

हे सरकार फार काळ टिकणार नाही हे नक्की. किंबहुना कर्नाटकातील कुमारस्वामीचे सरकार अमित शहांनी व येडीयुरप्पाने जिवाचा आटापिटा करून शेवटी पाडलेच, तसेच हे सरकार सुद्धा अमित शहा व फडणवीस जिवाचा आटापिटा करून पाडण्याचा प्रयत्न करणार.

शिवसेना व इतर दोघांमधील अंतर्विरोध व केंद्राचा असहकार सुद्धा या सरकारच्या पतनास कारणीभूत ठरेल. २०२० किंवा २०२१ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेची मध्यावधी निवडणुक होईल.

तसेच हे सरकार सुद्धा अमित शहा व फडणवीस जिवाचा आटापिटा करून पाडण्याचा प्रयत्न करणार. >> कितीही शहाजोगपणा केला तरी सत्तेची खाज आणि माज जात नाही हेच खरं

Pages