महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शा-२० नैतिकतेच्या टिर्‍र्‍या बडवत पिसारा फुलवुन नाचत होते, तेव्हा पार्श्वभाग उघडा पडाला ह्याकडे दुर्लक्क्ष झालं काय

आज उध्दव ठाकरेंचा भव्य असा शपथविधी झाला.शपथविधी असा असतो पहाटे चार लोकांनी येउन केलेला नसतो.हजारो लोकांच्या साक्षिने हा शपथविधी झाला.
अमित शहांची हतबलता ही त्यांच्या मुलाखतीतुन दिसुन येत होती. काँग्रेस, राकाँ यांची भक्कम व अनुभवी साथ असल्याने उध्दव ठाकरे हे सत्तेचे धनुष्य यशस्विरीत्या पेलतील यात शंका नाही.

शपथविधी असा असतो पहाटे चार लोकांनी येउन केलेला नसतो

मुहूर्त वगैरे काही असतो की नाही? २३ नोव्हेंबर ला भागवत एकादशी आणि उच्च शनी का काय असा शुभ मुहूर्त होता सकाळी सकाळी.

कर्नाटकात 15 जागांची निवडणूक आहे. घोडे , खेचर लागतील

कर्नाटक सध्या तरी भाजपच्याच ताब्यात राहील. भाजपने ० जागा जरी जिंकल्या पोटनिवडणुकीत, तरी कुमारस्वामी पाठिंबा देतील भाजपला

मा. जावेद्_खान
तुम्ही कळत नकळत "पगारे" ंच्या भक्तिस्तंभावर (उसना) व्हाट्सपीय हल्ला करत आहात, याची नम्रपणे जाणीव करुन देत आहे.
फक्त ते "भारताबाहेर राहुन" म्हणजे नक्की कुठे याचा खुलासा झाला असता तर बरे झाले असते. (ते मनशांतीसाठी बौद्धनिती अंगिकारलेल्या देशात जातात अस ऐकुन आहे)

नवी दिल्ली: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. निवडणूकपूर्व वा निवडणुकीनंतर झालेल्या आघाडीत कोर्टाने हस्तक्षेप करण्याचे कारणच काय? राजकीय पक्षांना आघाडी करण्यापासून कोर्ट रोखू शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या याचिका स्वीकारल्या गेल्या तर या देशात लोकशाहीच राहणार नाही, असं अत्यंत महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळताना नोंदवलं.

महाराष्ट्रात निवडणुकीनंतर स्थापन झालेली महाराष्ट्र विकास आघाडी अनैतिक असून या आघाडीचं सरकार घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली करणारं आहे, असा आक्षेप घेत अखिल भारत हिंदू महासभेचे नेते प्रमोद पंडित जोशी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. शिवसेना आणि भाजपने युती करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढल्या. या युतीने हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली आणि आता भाजपची साथ सोडून शिवसेनेने सत्तेसाठी अन्य पक्षांसोबत आघाडी केली आहे. ही मतदारांची फसवणूक आहे, असे नमूद करत जोशी यांनी महाराष्ट्र विकास आघाडीला याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

https://m.maharashtratimes.com/india-news/sc-dismisses-plea-challenging-...

महाराष्ट्र केस मध्ये सुप्रीम कोर्टानेही धडाकेबाज दे दणादण भूमिका बजावली आहे. आंबेडकरी लोकशाहीत सुप्रीम कोर्ट हा कोहिनूर हिरा आहे.

महाराष्ट्र केस मध्ये सुप्रीम कोर्टानेही धडाकेबाज दे दणादण भूमिका बजावली आहे. आंबेडकरी लोकशाहीत सुप्रीम कोर्ट हा कोहिनूर हिरा आहे.

चुकीच्या माहीतीवर बेधडक लिहून मोकळे होण्याची आपली हातोटी वाखाणण्यासारखी आहे.

न्या. एन वेंकट रमण यांनी लिहिलेली मूळ निकालपत्रीका वाचली असतात तर बरं झालं असतं.

"Constitutional morality is different from political morality. Courts cannot be asked to go where there is no jurisdiction" observed justice N V RAMANA .

हि बाब न्यायालयाच्या "अधिकारक्षेत्राच्या" बाहेर आहे असा याचा अर्थ होतो.

असू दे हो , फडणीस अयोध्येला जाणार होते, तुम्हीही जाऊन या, मनशांती मिळेल,

महाराष्ट्र केस म्हणजे ही व याआधी झालेली , दोन्ही संदर्भात वापरलेले,

युतीपूर्व निर्णय निकालानंतर युतीवर लादता येत नाहीत , इतकी समज अल्ला की दुवा से हमकू है,
जोशींना कोर्टाने हे समजावून दिले, हेही कोर्टाचेच काम ,

मला केन्सरमध्ये काही समजत नाही, हे माझ्या कक्षेत येत नाही हे
पेशंटला समजून सांगणे , हेही माझेच काम असते .

संजय राऊतांचे सुखद विधान... आता गोव्यामध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली.
महाराष्ट्रात ज्या सत्तास्थापनेच्या हालचाली झाल्या त्यात प्रमुख भुमिका राउतांनी निभावली.त्यांच्या स्टेटमेंटना टिंगलीच्यि स्वरुपात घेतले गेले. पण शेवटी राऊतांनी त्यांचे शब्द खरे केले.
गोव्याबाबतही असेच होत आहे. मात्र राऊत बोलतायत म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच.
भाजप हा आता केंद्र सोडले तर राज्यांमध्ये कमजोर पडला आहे.ही संधी विरोधकांनी सोडु नये

>>> राऊत बोलतायत म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. >>>

Rofl

राऊतचेही चाहते असतात हे आज समजलं.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-girish-chodankar-on-s...

जरा हे पण वाचा.

महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंही ते म्हणाले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही तर काँग्रेसनंच त्यांना मोठा दणका दिला आहे. आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचं गोवा काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.

गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

>>> भाजप हा आता केंद्र सोडले तर राज्यांमध्ये कमजोर पडला आहे.ही संधी विरोधकांनी सोडु नये >>>

कल्पनेच्या नंदनवनात विहार करा.

शरद पवारांनीसुद्धा आपण विरोधी पक्षातच बसणार असं सांगितलं होतं. Wink
बास कां म्हणजे....
कुठे शाम भटाची तट्टाणी....नी कुठे गंगु तेल्याचे गाढव.

> भाजप हा आता केंद्र सोडले तर राज्यांमध्ये कमजोर पडला आहे.ही संधी विरोधकांनी सोडु नये >>>

कल्पनेच्या नंदनवनात विहार करा.^^^^^^^^^

भाजपाची ताकत आहे त्यापेक्षा मोठी करुन दाखवली जात आहे.२९ पैकी १० राज्यात भाजपाला बहुमत आहे.
३ राज्यात ते ० आकडा सोडायला तयार नाहित.
ज्या राज्यात त्यांची युती आहे तेथे त्यांचे कमी आमदार आहेत.

काँग्रेसमुक्त भारत म्हणता म्हणता भाजपच चौथ मोठं राज्य वर्षभरात गमावून चुकलंय!! आता अस्तित्वाची लढाई दिल्लीत अन बिहार अन बंगालमध्ये होणार!!

२०२४ पर्यंत सुपडा साफ, भाजपचा.

२०२४ पर्यंत सुपडा साफ, भाजपचा.)))))))))

प.बंगालमध्येही भाजपा काही खास करु शकणार नाही. दिल्लितही त्यांचे चान्सेस कमीच वाटतायत.राज्या राज्यातील ताकत कमी होउन भाजपला २०२४ पर्यत सक्षम विरोधी पक्ष बनण्याची संधी आहे.

पश्चिम बंगाल मधे कम्युनिस्ट पक्षाने भाजपला मदत केली. अजूनही चालूच ठेवली तर कम्युनिस्ट साफ होऊन तृणमूल आणि भाजप हे दोनच पक्ष उरतील.

>>> प.बंगालमध्येही भाजपा काही खास करु शकणार नाही. दिल्लितही त्यांचे चान्सेस कमीच वाटतायत.राज्या राज्यातील ताकत कमी होउन भाजपला २०२४ पर्यत सक्षम विरोधी पक्ष बनण्याची संधी आहे. >>>

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत समान मुद्द्यांवर मतदान होत नाही. त्यामुळेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक अशा अनेक राज्यात विधानसभेत तुलनेने कमी जागा मिळूनही लोकसभेत भाजपने जवळपास क्लीन स्वीप केला. या राज्यात २०२४ पूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप परत सत्तेत येईल.

महाराष्ट्र आता गमाविले असे वाटत असले तरी आताचे सरकार काही काळात पडेल व २०२० किंवा २०२१ मध्ये मध्यावधी निवडणुक होईल.

ते विरोधी पक्ष म्हणूनपन नको. आप किंवा तत्सम मंडळी चालतील.>> असे कसे? विरोधी पक्षात कायम भाजपच राहिली पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून इतरांच्या तुलनेत त्यांचा अनुभव आणि काम फार उजवे आहे. Wink

हे सरकार कसं काम करत आहे हे दिसेलच
थोड्या दिवसात.
आता सत्ता स्थापनेच्या वेळी जी काही राजकीय उलथा पालथं झाली त्या वर मत मांडणे ठीक नाही.
कोणता ही पक्ष चांगला किंवा वाईट हे त्या पक्षात असलेल्या लोकांवरून ठरते.
त्या मुळे हा पक्ष वाईट हा पक्ष चांगला अस मत व्यक्त करणे मला तरी पटत नाही
समाजहिताचे जो निर्णय घेतो आणि राबवत ते सरकार चांगले

पहिलाच निर्णयः-आरे कार शेड चुलीत घातली आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टीला मान्यता दिली, विरोध याचिका फेटाळल्या त्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली आहे. धन्य आहे!
हे सरकार काय फार दिवस टिकत नाही..

अजित पवारांना फडण२०नी मांडीवर घेतल्यापासून त्यांची म्हणजे पवारांची सगळी पापे धुतली गेली.
त्या ७२ तासांत या महाभागांनी अजित पवारांबद्दल किती छान छान लिहिलंय ते आठवतंय बर्का.

Pages