ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅमेझॉनवर आहेत की. फ्लिप कार्टवर आहेत पण तिथुन कधी काहीच घेतले नाही. अ‍ॅमेझॉन वरुन मात्र मी रेडीमेड ड्रेस घेतले, बरे निघाले. विशेषतः कॉटन प्लाझो चांगल्या निघाल्या.

Myntra

आयटोकरीवर बघा. लॅक्मे 9 ते 5, 300 ला मिळत आहेत लॅक्मे इंडिया डॉट कॉमवर पण बऱ्याच शेड संपल्या असं दाखवत आहेत. दोन मागवल्या आहेत मी तरी, उद्या मिळतील. नायकावर सगळ्या शेड आहेत पण चारशेला. नायकावरून मी मिसेलर वॉटर मागवलं पण वापरल्यावर कळतंय की ते काही उपयोगाचं नाही. बरंच महाग आहे आणि खूप वापरावं लागतं, त्यापेक्षा साधं cleansing मिल्क परवडतं. दोन चार थेंब पुरे आहेत असं मी तूनळीवर बघितलं आणि नायकावर पण कौतुक केलं आहे त्या मिसेलर वॉटरचं पण ते तद्दन खोटं आहे.

अ‍ॅमेझॉन वरुन कपड्यांचा माझा अनुभव तितकासा खास नाही. सेलर वर अवलम्बुन असाव
त्या मानाने फ्लिप्कार्ट बरे आहे, मीन्त्रा छान वाटले

लॅक्मे 9 ते 5, 300 ला मिळत आहेत>>>> ही ऑफर लॅक्मे चीच आहे. एखाद्या कॉस्मेटिक्स च्या शॉप मधे हवी असलेली शेड मिळेल.

वेल, बाकी कुठेही खरेदी करा पण इलेक्ट्रॉनिकस फेबु वरून खरेदी करू नका. फसवतात.
मोबाईल म्हणून डमी मोबाईल पाठवला होता. Angry

सारेगामा कारवान बद्द्ल माहिती हवी होती. ऑनलाईन पाहिलं तर मोस्ट पॉप्युलर मॉडेलमध्ये मराठी व हीन्दी असे पर्याय आहेत. कुठला घ्यावा? कोणी वापरत आहे का?

माझ्या एक कलीग नी घेतला आहे. काय ५२००/- ला मिळाला बहुतेक. अतिशय चांगले गाणे एकापाठोपाठ आहेत. ऑक्स, ब्लूटूथ वगैरे कनेक्टिव्हिटी चे पर्याय आहेत.
याहून एक सोपा उपाय मी स्वतः करता वापरतो, तो म्हणजे अ‍ॅपल म्युझिक चं पेड स्बस्क्रिप्शन. मात्र ९९/- प्रतिमहीना ५० मिलिअन गाणी आहेत. यातच बहुतेक सगळे जुने गाणे आणि याच सारेगामा च्या क्युरेटेड प्लेलिस्ट्स पण आहेत. अ‍ॅन्ड्रॉईड फोन, आयफोन, आयपॅड विंडोज पिसी सगळीकडे चालतं हे. लिरिक्स पण येतात सोबत प्र्त्येक गाण्याच्या. काही देवनागरीत सुद्धा येतात.

स्पॉटिफाय, सावन, गाना, प्राईम म्युझिक यापेक्षा अ‍ॅपल म्युझिक मध्ये कलेक्षन जास्त आहे. अगदी वपु आणि पुलंची कथाकथनं सुद्धा आहेत.

धन्स योकु.
मला स्वतःसाठी नकोय. घरच्यांना गिफ्ट द्यायला हवा आहे. लो-टेक आहे हेच मुख्य आकर्षण आहे.

कारवाँचे दोन तोटे आहेत आजघडीला:

१. त्याला ऑडिओ आउटची चांगली सोय नाही. ऑक्स आउट आहे पण ते quality आवाजाकरता उपयोगी नाही. समजा माझ्याकडे चांगले स्पिकर्स आहेत तरी त्यावर मला कारवाँची मजा घेता येणार नाही. मला मारून मुटकून त्या डब्ब्याच्या स्पिकर्सवरच गाणी ऐकवी लागतील. (एक हार्मनचा पर्याय उपलब्ध आहे पण तो महाग आहे आणि माझ्याकडे स्पिकर्स असताना मी अजून खर्च का करावा?)

२. समजा मी हिंदी कारवाँ घेतला आणि मला मराठी कारवाँची गाणी हवी आहेत. तर मला सगळाच्या सगळा मराठी कारवाँ device विकत घ्यावा लागतो. नुसत्या कार्ड / चिप बदलून काम चालणार नाही.

माधव बरोबर शोधलेस. माझ्याकडे कारवा होता. पण एक खराब झाला. आता मी जुन्या फोनला गुगल म्युझिक लावते. घरी दिवस भर चालू राहायला( कुत्र्यासाठी सोबत म्हणून) व मला ऐकायला तीच गाणी जी हवी ती युट्युब / गूगल म्युझिक प्लस बोस सिस्टिम फॉर लॅपटॉप जोडलेली आहे त्यावर ऐकते.
मला हिंदी मराठी तमिळ तेलुगु मूड आला की काही ही मिक्स ऐकायला आव्ड्ते त्यासाठी प्रत्येकी कारवा कसा घेता येइल. परत एक धार्मिक गाण्यांचा पण आहे हे मला संकु चित मनोवृत्ती डेव्हलप करण्यासारखे वाटले.

जुने बिनाका मस्त होते कारवावर. ते मात्र मिस कर्ते. बघू ते ही सापडेल.

अमा ट्राय अ‍ॅपल म्युझिक. स ग ळं आहे इथे.>> अरे आमच्याक डे मी एंड्रोइड आणि लेक अ‍ॅपल अशी सेपरेट व समांतर इकोसिस्टिम आहे. नेट्फ्लिक्स फक्त जॉइन्ट आहे आणि हॉट स्टार तिचा मी शेअर करते.

काल सकाळी गडबडीत बिग बास्केट वर ऑर्डर केली रात्री आली पण बिचारे पावसात. त्यात त्याने चुकीचे सामानाचे क्रेट आणले मग परत जाउ न माझे घेउन आला. बिचारा. मग लक्षात आले की अमूल गोल्ड दुधाचे सहा पॅक आलेत. मी दिवाळीत बासुंदी करायला एक लिटर फक्त आयोजित केले होते. पण उरलेले पाच काय करायचे? त्याने चेक केले तर मीच ऑर्डर दिएलेले. माझ्याकडे अश्या गडबडी फार होतात. साइज क्वांटि टी चेक करायचे ते गडबड होते माझ्याकडून.

आता मला दुधाने दिवाळी स्नान कर ता येइल.

माझ्याकडे नॉर्मली एक थेंब पण दूध नसते म्हणजे ही किती मोठी इमरजन्सी आहे बघा. दुग्ध योग आहे. संवत २०७६

मी त्याला दिवाळी विश म्हणून एक अत्तरा चा पॅक दिला.

टेट्रा पॅक असेल तर tension घेऊ नका 180 दिवस बहुतेक शेल्फ लाइफ असते. तसेच नकोच असेल तर अजूनही return करता येईल. मोलकरणी, house keeping ( सोसायटीचा केर-फरशी) च्या बायका ह्यांना एकेक पॅक दिलंत तर लगेच संपेल. स्नान करणे पण छान आयडिया आहे.

"समजा माझ्याकडे चांगले स्पिकर्स आहेत तरी त्यावर मला कारवाँची मजा घेता येणार नाही. मला मारून मुटकून त्या डब्ब्याच्या स्पिकर्सवरच गाणी ऐकवी लागतील. " - माधव.

- उपाय असतात. थोडी खटपट करणारा होतकरू इलेक्ट्रोनिक्स हौशी हवा. ग्यारंटी काळ संपल्यावर तो कारवा उघडायचा आणि स्पिकरच्या आतल्या वायरी कापून त्यामध्ये हेडफोन सॉकेट टाकायचे. झाले एक्सटर्नल ओडिओ आउटलेट.

- च

ही ही तुझीच आठवण आलेली. तेच करणार् आहे सर्व्च इन्ग्रेडिअन्ट आहेत. मुळात फक्त अंडी आणि मीठ संपलेले असताना बाकी सामानाची
ऑर्डर द्ययलाच नको होती. पण पावसात टेस्कोत जायचा कंटाळा आला होता. शिवाय तिथे पायर्‍या आहेत. घसरून पडले तर अंडी फुटायची.

टेट्रा पॅक डेट पासून 6 महिने फ्रिजबाहेर किंवा मध्ये टिकतात.
उघडले की 2 दिवसात संपवावे लागतात.
कॅल्शियम साठी रोज 1 ग्लास दूध हळद प्यायले तर 3 महिन्यात 6 टेट्रा पॅक आरामात संपतील.

मी_अनु यांनी किल्लीला केलेली विचारपूस बघितली. Happy
लगे हाथ ' घे भरारी ' फेसबुक ग्रुपपण बघितला. तर या नावाचे खूपच ग्रुप्स आहेत.
त्यातला एक ओपन ग्रुप उघडला. काही गोष्टी खरंच छान आहेत. आजच्या नुसत्या ऐकायच्या मिटींग्स सत्कारणी लावल्या. Happy
त्यातल्या त्यात ' शॉपिंग कट्टा ' आणि 'सायली कुलकर्णी' यांचे आवडले.
तर कोणी यांच्याकडून काही घेतले आहे का? quality कशी आहे?

एकूणच कधी फेसबुक ग्रुप वरून खरेदी नाही केली. तेव्हा पैसे कितपत पाण्यात जायची तयारी ठेवावी?

घे भरारी राहुल कुलकर्णी आणि नीलम एदलाबादकर अ‍ॅडमिन असलेला ग्रुप आहे.
त्यावर बर्‍याच वस्तू विकल्या जातात. वाईट रिव्ह्यू पण असतील. पण बरेच चांगले आहेत.
अर्थात फेसबुक वर जेन्युईन चांगले खरेदी ग्रुप बरेच आहेत
आपल्याला बघून सेफ आणी त्यातल्या कॉमन ओळखीतून माहित असलेला जॉईन करावा.
पुणे लेडीज वर फक्त बायका असतात, पण तिथे सर्व प्रकारच्या (खरेदी लेख साहित्य फोटो रिव्ह्यू) इतक्या पोस्ट असतात की शोधणे कठीण पडते. शिवाय पोस्ट आली की वाचली जाते, मग वेळ जातो.
पुणे इट आऊट वर होते पण बाहेर पडले. आयुष्यात काहीच आश्चर्य राहणार नाही, सगळेच माहित होईल म्हणून Happy
पुणे लेडीज वरुन पण बाहेर पडणार आहे.

मग मी बघितलेला ग्रुप तो नव्हे.
या ग्रुपवर review वगैरे काही दिसलं नाही.
टिप्ससाठी धन्यवाद. Happy
मी नेहमी हटके साड्या - दागिने यांच्या शोधात असते. Happy
तुम्हाला काही ग्रुप्स माहित असतील तर सांगणार का?

पुणे लेडीजबद्दल ऐकले आहे. पण अजून जॉईन करावंसं नाही वाटलं.
आता तुम्ही सांगितलंय तसं आहे तर नाही करणार. सध्या तेवढा वेळ नाही. Sad

आभा फॅशन्स अँड फॅब्रिक्स चे पेज बघा
घे भरारी वर मिक्स मिडीया ज्वेलरी बनवून बर्‍याच जणी विकतात.
थोडे वेगळे आणि हायर रेंज चालत असेल तर नी चे पेज बघा (लोगो मराठीतला नी आहे)
प्रेशियस खड्याचे आणि जेमस्टॉन चे जरा महाग चांगल्या लुक चे हवे असेल तर अझिला.कॉम बघा.
तिजोरी.कॉम आणी आय्टोकरी.कॉम वर पण वेगळी ज्वेलरी मिळते.
बजेट छोट्या मोठ्या फंक्शन वापरासाठी टेम्पल ज्वेलरी हवी असेल तर नवराबीडस.कॉम बघा (बायकोबीडस नाहीये मात्र Happy )
बाकी फार जास्त मलाही माहिती नाहीत.
चांदीचे, थोडे नाजूक असे हवे असेल तर आद्या फॅशन्स ची साईट.

अरे व्वा. धन्यवाद Happy
बघेन आता सगळे हळूहळू.
आता कोणती पार्टी इ. नसल्याने आरामात बघता येईल.

आता धागा वर आलाच आहे तर मला कोणी सांगेल काय जर ऑनलाईन डोहाळे जेवणासाठी ज्वेलरी घ्यायची असेल तर कोणत्या साइटवर चांगली मिळते. अमेझॉन, फ्लिपकार्ट वर
ज्या आवडल्या त्यांचे रिव्ह्यू चांगले नाहीयेत .

छान माहिती
Business networl चे एक दोन गृप पाहिलेत
पोस्ट केलीये बवहू

Pages