Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
paytm sudhha chan aahe..navin
paytm sudhha chan aahe..navin option online kharedi sathi..
थर्मल घ्यायचेत कोणती site
थर्मल घ्यायचेत कोणती site चांगलीय?
भारतात वापरण्यासाठी कोणत्या ब्रँड चे थर्मल चांगले आहेत? आम्हाला आताच पुण्यात खूप थंडी वाजतेय
घरात एकीला एक्झीमा आहे. थर्मल कोणत्या कापडा/धाग्याचे बनलेले असतात?
ॲमी,थर्मल प्युर वूल किंवा
ॲमी,थर्मल प्युर वूल किंवा सिंथेटीक वूलचे असतात,फ्लिपकार्टवर डिल्स ऑफ द डे चालू आहे,डिस्कांउंटमध्ये मिळतील.
धन्यवाद सिंजि बघते
धन्यवाद सिंजि
बघते फ्लिपकार्ट. आधी एक सेट मागवून बघते मटेरियल सूट होतंय का ते.
Monte Carlo, jockey (i think
Monte Carlo, jockey (i think not sure)
मॉंते कार्लो, जॉकी, बॉडी केअर
मॉंते कार्लो, जॉकी, बॉडी केअर इ चे असतात थर्मल.
प्युअर वुल चा त्रास होवू शकतो एक्झीमा वाल्यांना बहूतेक.
कॉटनचे पण असतात थर्मलवेअर्स.
पुण्यात वापरायला हवे असतिल तर खूप गरम कपडे चालणार नाहीत कदाचीत.
एखादा कपडा घेवून बघा. पहिल्यांदाच घेत असाल तर दुकानात जावून कपडा हाताळून घेतलेले बरे. बऱ्याच क्वालिटीज असतात, कितपत कमी तापमानात कपडे वापरायचे आहेत यावर क्वालिटी ठरते.
मराठी इबुक्स कोणी विकत घेतात
मराठी इबुक्स कोणी विकत घेतात काय अमेझॉन वरुन? कसं काय आहे मार्केट?
आभार राजसी आणि अल्पना.
आभार राजसी आणि अल्पना.
कॉटनचे थर्मल फारसे उपयोगी नाहीत असे एका लेखात वाचले कारण ते घाम/moisture पकडून ठेवतात, लवकर सुकत नाहीत, त्यामुळे ओले वाटत राहते. पण लोकर बहिणीला सूट होणार नाही. माझ्यासाठी लोकर आणि तिच्यासाठी मिक्स मटेरियलचे मागवून पहाते.
उत्तरेच्या मनाने पुण्यात कमी थंडी आहे. पण आम्हा दोघीना फारच थंडी वाजते. त्यामुळे उत्तरकडची थर्मलच ठीक पडतील बहुतेक.
उत्तरेच्या मनाने पुण्यात कमी
उत्तरेच्या मनाने पुण्यात कमी थंडी आहे. >>> काय म्हणता?? पुण्याचा अपमान केला तुम्ही
जिथे शक्य तिथे मोजे घालून
जिथे शक्य तिथे मोजे घालून वावरत जा. थंडी बरीच कमी होते. अचानक उकडायला लागलं तर थर्मल काढणं त्रासदायक होतं.
क्राफ्ट्सव्हिला वरून कुणी कधी
क्राफ्ट्सव्हिला वरून कुणी कधी खरेदी केली आहे का?
ड्रेस मटेरियल्स छान आणि स्वस्त दिसतायत. क्वालिटी कशी असते वगैरे कुणी इनपुट्स देऊ शकेल काय?
क्राफ्ट्सव्हिला वरून मी
क्राफ्ट्सव्हिला वरून मी २०१४ मध्ये काही खरेदी केली होती. कान्था, लखनवी ड्रेस मटेरियल्स, मिरर-वर्क इ. केलेल्या हॅन्डबॅग्स, इ. त्या साइटवर वेगवेगळे वेन्डर्स त्यांचे प्रोडक्ट्स विकतात, तेव्हा तरी असंच होतं. त्यामुळे काही मटेरियल्स खूप चांगल्या प्रतीची तर १-२ ठिक-ठाक होती. एका वेन्डरनं ऑर्डर घेउन मग वेळेत तो आयटम नसल्याचं सांगितलं. हॅन्डबॅग्स एकाच वेन्डरकडच्या होत्या पण कापड, शिवण, त्यावर केलेलं काम सगळंच खूप चांगल्या प्रतीचं होतं. डिलिवरी, रिफन्ड आणि रिटर्न्सचा अनुभव चांगला होता. किंमतींबद्दल अनुमोदन. दुकानांमध्ये, इतर साइट्सवर आहेत त्यापेक्षा यांच्या किमती कमी आहेत.
मराठी इबुक्स कोणी विकत घेतात
मराठी इबुक्स कोणी विकत घेतात काय अमेझॉन वरुन? कसं काय आहे मार्केट?>>
हो मी घेतलियेत, मेहता वाले जुणे लोकप्रिय पुस्तकं ईबुक्स मध्ये आणतायेत. प्रिंट आणि इ किमती मध्ये फारसा फरक नहिये, फक्त पोस्टेज, थोडाफार डीस्काउंट आणि त्वरित पोच, हे फायदे आहेत, एकदा पुस्तक घेतल्यावर तुमच्या अकाउंट वर डालो होतं. ते तुम्ही मोबाइल (कीडल अॅप डालो कराव लागेल), किंडल आणि कॉम्प वर वाचु शकता. सध्या नावाजलेले जवळपास सगळे ईबुक्स अमझोन वर आहेत. श्रिमान योगि, ययाती, उगंधर, छावा, संभाजी, स्वामी आणि बरेच..
सिंडरेला धन्यवाद
सिंडरेला धन्यवाद
Craftgully वरून कोणी काही
Craftgully वरून कोणी काही घेतलं आहे का??
ऑन लाईन खरेदीत स्पर्श गंध चव
ऑन लाईन खरेदीत स्पर्श गंध चव यांचा 'फील' येत नाही. पण कधी ऑनलाईन वस्तू स्वस्त मिळतात. मी रेमंड च्या दुकानात गेलो तर तिथे सूट ज्या किमतीत होते तेच त्यांचेच सूट त्यांच्याच वेबसाईटाला /ऑनलाईनला जवळपास ४० टक्के स्वस्त होते. पण परत फिटिंग चा फील मिळत नाही. अशी भानगड आहे. दुकानदाराला विचारले तर म्हणाला ऑनलाईनचे डिस्काउंट आमच्याकडे नसतात.
दुकानदाराला सतराशे साठ खर्च
दुकानदाराला सतराशे साठ खर्च असतात. ऑनलाइन डिस्काउंट म्हणजेच दुकानदाराचा खर्च + नफा
फ्लिप्कार्टला शूज घेतले,दोन
फ्लिप्कार्टला शूज घेतले,दोन आठवड्यात फाटले .फ्लिपकार्टपेक्षा अमेझॉन चांगले आहे असे वाटते.
आता पर्यंत मराठी पुस्तकांची
आता पर्यंत मराठी पुस्तकांची खरेदी बुकगंगा आणि ग्रंथद्वार मधून केली आहे . अनुभव चांगला
साडी खरेदी साठी युनिक साईट
साडी खरेदी साठी युनिक साईट आहे का?
अगदी झगमग डिझाईनर नको पण हटके तरी डौलदार साड्या शोधते आहे.
कशिदा केलेल्या, पारंपरिक साड्यांना थोडा वेगळा टच दिलेल्या.
तथास्तु ची साईट छान आहे. होम
तथास्तु ची साईट छान आहे. होम मिनिस्टर ची पैठणी असते तथास्तुची.
धन्यवाद सस्मित. नक्की बघते ती
धन्यवाद सस्मित. नक्की बघते ती साईट.
तसंच मोत्यांचे आणि इमिटेशन चे दागिने ऑनलाईन चांगले असतात का?
तशी दागिने खरेदी दुकानातच होते पण काही स्टेज शोसाठी एकसारखे हवे आहेत. साईट असेल तर एकमेकीना दाखवून ठरवणे सोपे.
voyalla आहे एक. अमेझॉन्वर पण
voyalla आहे एक. अमेझॉन्वर पण आहे ज्वेलरी.
आद्यापण चेक करू शकता एफबीवर.
आद्यापण चेक करू शकता एफबीवर. पण दागिनेे मलातरी खूप महाग वाटतात.
अगदी झगमग डिझाईनर नको पण हटके
अगदी झगमग डिझाईनर नको पण हटके तरी डौलदार साड्या शोधते आहे.
कशिदा केलेल्या, पारंपरिक साड्यांना थोडा वेगळा टच दिलेल्या. >>> >>>>>> मग 'तेजाज्ञा' (अभिज्ञा भावे & तेजश्री पंडित) च्या फेसबुक पेजला भेट देवुन साड्या पहाच. त्या दोघींचं बुटिक आहे आणि मटेरिअल पासुन ते डिझायनिंग पर्यंत त्या दोघीच सगळं बघतात. फोटोज तरी आवडले मला. https://www.facebook.com/Tejadnya-532494213549407/
फॅशन ज्वेलरी प्रत्यक्ष बाजार
फॅशन ज्वेलरी प्रत्यक्ष बाजार रेट पेक्षा ३० ते ५० रु महाग मिळेल.
सगळ्यांना धन्यवाद. फेसबुक पेज
सगळ्यांना धन्यवाद. फेसबुक पेज नक्की बघेन.
हो, ज्वेलरी ऑन्लाईन महाग मिळते पण सगळ्यांना एकदम जाणेपण शक्य नाही आणि जे काही १-२ दिवस मिळतील त्यात फोटो काढून, पाठवून, चर्चा करून ठरवणे प्रॅक्टीकल नाहीये.
फॅशन ज्वेलरीपेक्षा ट्रॅडीशनल शोधते आहे.
तेजाज्ञा चं फेबु पेज सॉलिड
तेजाज्ञा चं फेबु पेज सॉलिड आहे. मस्त कलेक्शन.
तेजाज्ञा चं फेबु पेज सॉलिड
तेजाज्ञा चं फेबु पेज सॉलिड आहे. मस्त कलेक्शन. >>> हो कलेक्शन चांगलं आहे पण स्टिचिंगचं फिनिशिंग जरा गंडलेलं वाटतं. अर्थात ते फक्त डिझाइनचं फिल देण्यासाठी आहे. सेमी स्टिच्ड ब्लाउजेस असल्याने, चांगल्या प्रोफेशनल टेलरला देवुन त्याला फाइन लुक मिळेल.
पण जिथे साड्यांची तोडाफोडी करुन, दोन वेगळ्या साड्या किंवा वेगळ्या रंगाचे पिसेस शिवले आहेत, तिथे मात्र जरा निट पाहुन घ्यावं लागेल.
मला तेजस्विनी पंडीतने नेसलेली
मला तेजस्विनी पंडीतने नेसलेली मेहंदी कलर साडी खुप आवडली.
Pages