ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगल करून उत्तर येतंय त्यामुळे सांगूनच टाकतो- हंगा(पारनेर) येउद्या पुढचा क्लू ,,,,

लहान माझे गाव वाडी
तेथे छोटी आगगाडी
रेल्वेने तीर्थक्षेत्र जोडी

कृष्णा तुमचंही बरोबर असेल कारण, एक गाव इनामी आहे ता एक जन्मगाव आहे .. मला नक्की माहित नाही. द्या पुढचा क्लू

बरं मी देतो.

सोलापूर जिल्ह्यात
इथे कुंकू बनवायचे खूप कारखाने
नाव पडले एका राजा वरुन
अगदी छोटेसेच नाव.

महाराष्ट्र देशी गडकोटांची भरमार, एकेकाची महती काय सांगता,
पण किल्ला माझ्याजवळ असा, ज्यावर जन्मला महाराष्ट्राचा भाग्यविधाता.

आदिलशहाची जहागीर मी
रुग्णसेवा पण भारी माझी
सतार आमची काय न्यारी
थोर संगीतकार न्यायला येती.

इथे प्राचीन-मध्ययुगीन संस्कृतीचे अवशेष सापडतात
इथल्या भूमिपुत्रांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेला
ऐतिहासिक कागदपत्रे-सन्दर्भ शोधायला लोक इकडे भेट देतात

धुळे आहे उत्तर
द्या पुढचा क्लू कोणीतरी. मी जातोय ,माझी झोपेची वेळ झालीय Happy

त्रिशक्ती पैकी एकीचे निवासस्थान
पण उकाडय़ाने येथे जिव होई हैराण (सोप्पं आहे खुप)

अमरावती >> नाही

Pages