Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
( बाकी लोक घरून काम करतात )
( बाकी लोक घरून काम करतात ) >>> मी वाचलं "बाकी लोक घोरून काम करतात "
घ चं घो कसं काय दिसलं बुवा
घ चं घो कसं काय दिसलं बुवा तुला?
मला ते धरून dharoonअसं दिसलं होतं .:फिदी:
मला ते धरून dharoonअसं दिसलं
मला ते धरून dharoonअसं दिसलं होतं . (बाकी लोक धरून काम करतात) >>>
ह ह पु वा.
ह ह पु वा.
कंडक्टर चा कीस्सा भारीच
कंडक्टर चा कीस्सा भारीच मधुकरराव !!!
झक्या, कित्ती ओळखतोस मला
झक्या, कित्ती ओळखतोस मला
हा हा मस्त
हा हा
मस्त
आज सकाळचाच किस्सा ७ वाजता
आज सकाळचाच किस्सा
७ वाजता ऑफिस ला जायला म्हणुन हेल्मेट, गाडीची चावी, जर्किन, स्कार्फ वगैरे सर्व न विसरता घेवुन निघाले
पार्किन्ग मधे आले तर गाडी पन्क्चर
म्हणुन भैय्याला बोलवले बस स्टॉप वर सोडयला
हेल्मेट ठेवायला परत घरात गेले
निघताना भैय्या म्हणे तुझ्या गाडीची चावी घे, माझी स्कूटी ना... सकाळी सकाळी गेअर च्या गाडीची कटकट नको म्हणुन तो बर्याचदा स्कूटी वापरतो जवळच जायच असेल तर, म्हणुन मी पण जास्त विचार न करता ठेवलेली चावी परत हातत घेतली
पार्किन्ग मधे आलो, त्याने माझी गाडी काढली आणि मग दोघांच्याही लक्षात आले की काय वेन्धळेपणा झाला तो
हा माझ्या मित्राच्या
हा माझ्या मित्राच्या आयुश्यातला प्रसंग आहे........
तो ५ वीत असताना(मराथी माध्यम) चेन्नइ ला काही स्पर्धेसाथी चालला होता.
विशय निघाला राशिंचा......त्याची कन्या रास ( माझि सुद्धा )
पण सांगता येइना........
कन्या म्हनजे मुलगि.....किंवा english नध्ये girl एवधच थाउक ....
तो म्हने ....I am girl
shrikkk |
shrikkk |
SJJ भैय्या म्हणजे भाउ की
SJJ भैय्या म्हणजे भाउ की युपी वाला भैय्या

SJJ भैय्या म्हणजे भाउ की युपी
SJJ भैय्या म्हणजे भाउ की युपी वाला भैय्या >> सकाळाची वेळ आहे म्हणजे दूधवाला भैया
sjj तु पार्किंग मध्ये आली का
sjj तु पार्किंग मध्ये आली का आलो?
मलाच कस तरी होतय म्हणुन सांगते.
sjj तु पार्किंग मध्ये आली का
sjj तु पार्किंग मध्ये आली का आलो?
बहुतेक हं
मलाच कस तरी होतय म्हणुन सांगते.>>> मी आले.... तो आला... आम्ही आलो....
(No subject)
एक रिसेंट किस्सा : नुकतीच एक
एक रिसेंट किस्सा :
नुकतीच एक दे धमाल हाणामारी फिल्म लागलीये, परवा सहकुटूंब चित्रपट पहायला जाताना बाजुच्या अय्यरने विचारले
" क्युं किधर जा रहे है परीवारसमेत " ( तो असंच बोलला चुकीचं हिंदी वाटलं तरी )
"`ब्ल्यु' फिल्म देखने जा रहे है" मी उत्तरलो, आर्ध्या रस्त्यात आल्यावर मला त्याच्या वासलेल्या तोंडाचं रहस्य उलगडलं.
त्या ब्ल्युच तर नकाच
त्या ब्ल्युच तर नकाच सांगु!!
गुगल मध्ये सर्चला ब्ल्यु टाकल तर रहमानचा सोडुन भलताच ब्ल्यु यायचा,
मी तर वैतागुन गेले होते म्हणुन दर वेळेस ब्ल्युसोबत रहमान हा शब्द न चुकता टाकत होते.
मी आत्तापर्यंत ३ वेळा
मी आत्तापर्यंत ३ वेळा टेलरकडून चुकीचा ड्रेस घेऊन आले आहे. आणि त्यापैकी २ वेळा टेलरकडे जाऊन त्याला तो ड्रेस नीट न शिवल्याबद्दल बोलायला सुरुवात केल्यावर त्याने मला सान्गितले आहे की ताई,हा तुमचा ड्रेस नाही. एकदा मात्र मला घरी आल्यावर स्वतःहून कळले की हा आपला नाही.
एकदा आम्ही तिघी मैत्रिणी
एकदा आम्ही तिघी मैत्रिणी कॉलेजजवळच्या फ्रूट डिशच्या हॉटेलमधे गेलो होतो. एका टेबलावर (म्हणजे खुर्च्यांवर) १ मुलगा आणि १ मुलगी समोरासमोर बसले होते आणि एक मुलगा टेबलाजवळ उभा होता. मी त्याला मोठ्या आवाजात सांगितलं 'हे टेबल जरा पुसून घ्या ना' आणि तो प्रचंड संकोचून खाली त्या दुसर्या मुलाच्या जवळ बसला. ती मुलगी त्याला म्हणाली,' तरी मी तुला सांगत होते, असा उभा राहू नकोस'. माझ्या मैत्रिणी हसायला लागल्या, मला खूप ऑक्वर्ड झालं. आणि 'खरा' वेटर हसत हसत टेबल पुसायला आला.
हॉटेलचा किस्सा लय भारी
हॉटेलचा किस्सा लय भारी
ववे, हा हा हा.. मी पण अस
ववे, हा हा हा.. मी पण अस बर्याच वेळा दुकानात सेल्स्मन ऐवजी दुसर्या गिर्हाईकालाच किंमत विचारली आहे, आणि त्याचे विचित्र लूक्स पाहिले आहेत!
भारी आहेत सगळेच किस्से
भारी आहेत सगळेच किस्से
गोडगोजिरी, ववे नाही, वावे
गोडगोजिरी, ववे नाही, वावे आहे ते...माझ्या गावाचं नाव आहे.
माझी एक मैत्रीण आणि तिची लहान बहीण यांना त्यांच्या आजीने बाहेर जाताना 'गॅसवरच्या दुधाकडे लक्ष ठेवा' असं सांगितलं. त्या दोघीही विसरून गेल्या. दुधाचा कोळसा झाला. मग त्यांनी, हे आजीला कळू नये म्हणून ते पातेलं बाहेर रस्त्यावरच्या कचरापेटीत टाकून दिलं. आजी बाहेरून आल्यावर तिच्याही लक्षात नव्हतं. मग ३-४ दिवस आई आणि आजी ' आपलं एक पातेलं कुठे दिसत नाहीये' अशी चर्चा करत होत्या.
वावे, आजच्या दिवसापर्यंत किती
वावे, आजच्या दिवसापर्यंत किती पातेली उरलीयेत?
ओके वावे!
ओके वावे!
आत्ताच बॉसला विचारलं, सर न्यु
आत्ताच बॉसला विचारलं, सर न्यु दिल्ली दिल्लीतच येतं का??
बॉस खाली पडायचा बाकी होता..
योगे, हा काही वेंधळेपणा नाही
योगे, हा काही वेंधळेपणा नाही बरं का.. याला अज्ञान म्हणतात..
आता याकरता नवीन बी बी चालू कराया पायजेल..
कालचीच मज्जा... मी आणि आमचा
कालचीच मज्जा...
मी आणि आमचा VP आम्ही office बाहेर सिगरेट ओढायला गेलो होतो.
टपरीवाला गायब होता. म्हणुन स्वतः VP साहेब सिगरेट हुडकत होते ...
तेवढ्यात एक मुलगा आला आणि VP ला म्हणाला..... "दोन माणीकचन्द द्या हो..."
आणि VP ने गुमान दिले सुद्हा ...
------------------------------------------------------------
Python Kid
याला वेंधळेपणा म्हणत नाहीत.
याला वेंधळेपणा म्हणत नाहीत. त्याला फॅसिलेटेटर म्हणतात....
किर्या
किर्या
Pages