Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
`ब्ल्यु' फिल्म देखने जा रहे
`ब्ल्यु' फिल्म देखने जा रहे है" मी उत्तरलो>>>
माझा चुलत भाऊ आजारी होता,
माझा चुलत भाऊ आजारी होता, डॉक्टरानी शेजारच्या वार्डात जाउन एक्सरे करायला सांगितल.
जाताना मधेच दुसरे डॉ. भेटले, त्यानी विचारलं.
डॉ : काय शोधताय ?
मी : (टेन्शन व गडबडीत )भावाचा झेरॉक्स काढायचा आहे.
-----------------------------------------------
काल रात्री ढब्बू मिरच्या
काल रात्री ढब्बू मिरच्या चिरून त्याचं वेस्टेज स्वयंपाक घरात एका बाजूला ठेवून दिलं फेकू नंतर म्हणून... मग गवार निवडली, त्याची देठं दुसर्या पेपरवर होती.... निवडलेल्या गवारीचं ताट घेऊन आत फ्रिज मध्ये ठेवायला गेले, ध्यान कुठे होतं कोण जाणे, ते निवडलेलं सगळं मटेरियल त्या ढब्बुच्या वेस्टेज मध्ये ओतून दिलं. मग निवडत बसलेले पाऊण तास...
वेळ कमी असला की बरोब्बर असले उद्योग होतात हातून.
दक्स..... खरयं ग ... नेमकं
दक्स.....
खरयं ग ... नेमकं घाईगडबडीत होत ना असं... पण हे वाचायला मज्जा येते 
दक्षे, खरं सांग, इथे लिहायचं
दक्षे, खरं सांग, इथे लिहायचं होतं म्हणून मुद्दाम केलास की नाही हा 'वेंधळेपणा'??
अगदी खरं खरं सांग..
किर्या हो हो अगदी तुला कसं
किर्या हो हो अगदी तुला कसं कळ्ळं रे गुलामा...
किर्या हो हो अगदी तुला कसं
किर्या हो हो अगदी तुला कसं कळ्ळं रे गुलामा... << किरू वेंधळेपणाच्या Manufacturing plant मधे कामाला आहे..
(No subject)
माझा एक किस्सा. हा माझ्या
माझा एक किस्सा.
हा माझ्या वेंधळेपणाचा किस्सा नाही पण दुसर्या कुणाचा वेंधळेपणा आणि माझी फजिती म्हणुन इथे पोष्टत आहे.
विलेपार्ले येथिल दिनानाथ नाट्यगृहात घडलेला हा किस्सा:
सह्री रे सही चा शो बघण्यासाठी माझे मित्र आणि घरचे सगळे आम्ही गेलो होतो, मी घरच्यांबरोबर असल्यामुळे लवकर आत गेलो व खुर्ची वर बसुन होतो, मित्रांच्या खुर्च्याही कुठे आहेत त्या अगोदर पाहुन ठेवल्या (म्हणजे ते आल्यावर त्यांना लगेच सापडाव्यात म्हणून) शो सुरु होण्यास वेळ होता, म्हणुन मी आत बाहेर ये- जा करित मित्रांची वाट बघत होतो. इतक्यात मित्र आले मि लगेच माझ्या मोबाईल ची बॅटरी ऑन केली आणि त्यांन त्यांच्या खुर्च्या दाखवित होतो.
इतक्यात पहिल्या रांगेतील एका महीलेने मला बोलविले आणि एक तुटलेली खुर्ची दाखवित म्हणाली.
महिला: ही खुर्ची बघा
मी: मोडली का?
महिला: आम्हालाच विचारा
मी: म्हणजे (अजून मलाही काही उलगडा झाला नव्हता)
महिला: या खुर्चीवर तिन तास कसे बसणार?
मी: हो बरोबर आहे
महिला: बरोबर काय? जाऊन सांगा तुमच्या मॅनेजरला नाहीतर बोलवा इथे त्यांना, नुसते बॅटरी घेऊन काय फिरताय? (एव्हाना माझ्या लक्षात आले होते, माझे मित्र हसत होते)
मी: मी पण नाटक पहायला आलो आहे (हे ऐकून ती आवाक)
महीला: सॉरी सॉरी, पण तुम्ही मघाशी ते तिकीट बघुन खुर्ची दाखवित होता म्हणून मला वाटले की.... सॉरी (ती पुरती ओशाळली होती)
मग काय माझ्या मित्रांना एक आठवडा भर ते खाद्य मला चिडविण्यासाठी पुरलं
नुसते बॅटरी घेऊन काय फिरताय?
नुसते बॅटरी घेऊन काय फिरताय?
ओब्ट्रेटिकचे पहिलेच पोस्टिंग
ओब्ट्रेटिकचे पहिलेच पोस्टिंग होते... हिस्टरी घेताना काय काय विचारायचे यावर लेक्चर झाले... आणि प्रत्यक्षात पेशंट बघताना मित्राने त्या प्रेग्नंट बाईला पहिलाच प्रश्न विचारला- लग्न झालय का?
ती बाई मारक्या म्हशीगत बघायला लागली... तो मित्र ती बाई डिस्चार्ज होइपर्यन्त त्या वॉर्डात फिरकला नव्हता..
(No subject)
हो बरोबर आहे.. वैभव >> लग्न
हो बरोबर आहे.. वैभव >>

लग्न झालय का? >>
आज सकाळी चपाती भाजी बनवायचा
आज सकाळी चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला म्हणुन चिकन बिर्याणी केली. संध्याकाळी नवर्याचे मित्र जेवायला येणार आहेत म्हणुन जास्तीची बनवुन ठेवली. नवरा बाहेरुन आल्यावर जेवायला बसलो. त्याने मीठ कमी आहे म्हणुन मागितले आणि मी त्याच्यासमोर डबा ठेवला. त्याने एक घास घेतल्यावर यात गोड काय घातले आहे असे विचारले.
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी बिर्याणी करताना पण त्यात मीठ समजुन साखर घातली होती. आणी आता जेवताना पण त्याला साखरच दिली. इकडे साखर पण मिठासारखी बारिक असल्यामुळे हा घोळ झाला.
नशिब माझ्या हातून मीठ नेहमी जास्त पडते म्हणुन मी कमी मीठ(साखर) घातले होते.
लग्न झालय का?
लग्न झालय का? >>>>>>>>>
झालंय, त्या वेळी पत्नी पण मित्रांच्या सोबत मला चिडवित होती
अस्मि, अरे वा एक नवी रेसपीच
अस्मि, अरे वा एक नवी रेसपीच की
अश्मी कशी लागते गोड चिकन
अश्मी

कशी लागते गोड चिकन बिर्याणी??
हो आरती हि रेसिपी पाकक्रुती
हो आरती हि रेसिपी पाकक्रुती मधे टाकावी म्हणते आहे.
किरुभौ एकदा तुम्ही खाउन बघाच. लै झ्याक लागते. :)..........................................
(साखर अगदी थोडी घातली होती त्यामुळे गोड लागत नव्ह्ती....)
वावे व्वा काय पराक्रम केला
वावे व्वा काय पराक्रम केला होतास .. मग नंतर तरी सांगितल कि नाहिस आजीला?
परवा कामासाठी आदित्य बिर्ला
परवा कामासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये फोन करायचा होता...
फोन लावला, किती वेळ झाला फोन कुणी उचलेना, तोवर कुणाशी तरी बोलले बाजूला आणि तिकडे
फोन उचलला गेला... आणि मी विचारलं "हॉटेल आदित्य बिर्ला..??" पलिकडच्याने २ मिन्टं काही उत्तरंच दिलं नाही.....
<< मी विचारलं "हॉटेल आदित्य
<< मी विचारलं "हॉटेल आदित्य बिर्ला..??" पलिकडच्याने २ मिन्टं काही उत्तरंच दिलं नाही..... >>
बिरबीरला ((भीरभीरला)असेल...
दक्षीणा... खि खि खि... कशा ग
दक्षीणा... खि खि खि... कशा ग सुचते तुला अशा गमतीजमती करणे
(करीअर च्या सुरुवातीला programming करत असताना माझ्याकडुन भरपुर चूका व्हायच्या , अशा की टीम मधील मुला-मुलीना त्या दुरुस्तच करता यायच्या नाहीत, तेव्हा एक मुलगा एकदा वैतागुन बोलला होता, 'कस ग तुला जमते इतक्या भयंकर चूका करायला?' ) त्या वर आधारीत लिहिले दक्षि. 
सुनिधी माझी एक मैत्रिण तर
सुनिधी माझी एक मैत्रिण तर माझ्यापेक्शा वेंधळी आहे, तिच्याबाबतीत मला ही असंच वाटतं की तिला कसं काय जमतं इतका वेंधलेपणा करायला म्हणून
`ब्ल्यु' फिल्म देखने जा रहे
`ब्ल्यु' फिल्म देखने जा रहे है">>>

लग्न झालय का? >>
काय स्सही धागा आहे हा
काय स्सही धागा आहे हा !
'माझिया जातीचे....' इतके सगळे लोक बघून आनंद झाला !
मी एकदा ए.टी.एममधून पैसे काढले आणि कार्ड तिथेच (मशीनच्या स्लॉटमधे) विसरून घरी आलो. पैसे साधारण दुपारी साडेबाराच्या सुमारास काढले होते आणि कार्ड विसरलोय हा गोंधळ रात्री नऊच्या सुमारास लक्षात आला. सुदैवाने दुसर्या दिवशी बँकेत ते कार्ड व्यवस्थित मिळालं.
एकदा तर बँकेच्या ड्राईव्ह थ्रू ए.टी.एममधून पैसे काढले आणि ट्रॅन्झॅक्शन करण्यासाठी तिथे ठेवलेला डबाही घरी घेऊन आलो. बायकोने विचारले तेव्हा जाणवलं की आपण काय केलंय ते ! पुन्हा बँकेत गेलो... ड्राईव्ह थ्रूच्या तीन लेन्सपैकी एक बंद होती. मी त्याच लेनमधे गाडी नेली. कॅशियर म्हणाला, "सर ! दॅट विन्डो इज क्लोज." मी म्हटलं," या आय नो ! इट्स क्लोज बिकॉज ऑफ मी !! हिअर इज युअर ट्रॅन्झॅक्शन बॉक्स !!" कॅशियर बघतच बसला
आँ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आँ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! वासलेला आ.
तुम्हा सगळ्यांना इतके भयंकर
तुम्हा सगळ्यांना इतके भयंकर अचुकपणे वेंधळेपणा करणे कसे काय जमते बुवा
माझा एक मित्र घरून निघून
माझा एक मित्र घरून निघून भारतात जायला दोन तासावर असलेल्या विमानतळावर गेला. तिकडे गेल्यावर त्याने मला फोन केला, "तिकीट बरोबर घेऊन आलो, पण पासपोर्ट घरी राहीला'. मग त्याला विमान चुकलेच. मला फोन करताना त्याने तिकीट तिथल्या टेलिफोन बुथ मधे ठेवले.....आणि घरी आला...
विनय
मला फोन करताना त्याने तिकीट
मला फोन करताना त्याने तिकीट तिथल्या टेलिफोन बुथ मधे ठेवले.....आणि घरी आला...>>
आणि बायकोने त्याला शिल्लक ठेवलं?
ठाकरे बुवा, लोक या बीबी वर
ठाकरे बुवा, लोक या बीबी वर लिहिता यावे, लोकांची करमणूक व्हावी म्हणून मुद्दाम वेंधळे पणा करतात, त्यातील मुद्दे लिहून ठेवतात आणि नन्तर इथे पोस्टतात....
Pages