बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ती वीणा कशी बोलते ताईंशी, उडवून लावते अगदी, बाकी जाऊदे पण तिची आई त्यांच्याशी नीट वाग हे सांगून गेली. त्या पण कशाला मला नको करू नॉमीनेट सांगायला जातात, गेली उडत केलं तर केलं. अग नम्रपणे बोल, तुला हवं ते कर पण बोलताना नीट बोल.

बाकी हिनाने मात्र पाठीमागे वार केला ताईंवर, तोंडावर कायम गोड राहून, बिचुकलेशी बोलताना, ती जे म्हणाली त्यावरून तिचं ठरलंय आणि गेम व्यवस्थित खेळतेय.

बाकी ताईंना पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट मान शिवने दिला, चांगला पोरगा. बाकी सर्वानी त्यांना hurt केलंच. अशा ठिकाणी यायचं तर हे सहन करावे लागणार म्हणा.

Btw आज बिचुकलेला किंग का केला आणि त्याला नॉमीनेट करू शकत नव्हते का, कारण काय दिलं. गेस्ट आहे सांगितलं का.

या सिझनला खरं तर कोणीच नाहीये टिआरपी क्वीन्/किंग !
सिझनची सुरवत दणक्यत झाली होती बिचुकले, पराग , शिवानी हे पब्लिक सेन्सेशन क्रिएट करत होते, टीआरपी देत होते मग २ आठवड्यत सगळी इक्वेशन्सच बदलली, अख्खा सिझनच ढेपाळला तो अजुन ढेपाळलेलाच आहे, नथिंग कॅन सेव्ह धिस सिझन !>>> +१
कोणीच consistently फेव्हरेट नाही ठरवू शकत या सिझनमधे. नेहा बर्याचदा त्या येड्यांच्या बाजारात बरी वाटते. सध्या आरोह आवडतोय बर्यापैकी. बाकी गेमा करत असताना केळ्या, नडायला लागली की हीना, टास्कदरम्यानच्या उत्साहामुळे किशोरी आणि वीणा वजा करता उरतो तेव्हा शीव हे काहीवेळा आवडून जातात. पण तात्पुअरेतेच. अजूनही हाच्/हीच जिंकावी असं एकाबद्दलही वाटत नाही.

मला शिव जिंकावा अजूनही वाटतं.

शिवानी नेहा भांडणात सहानुभूती नेहाने मिळवली बऱ्याच जणांची मात्र.

शिवानी आवडत नाहीच अजिबात, पण आज दिसत छान होती पण डोक्यात अति जाते.

वीणा आज जाम वाईट दिसत होती फक्त झोपेतून उठली तेव्हा मस्त दिसत होती.

नेहा शिवानी वादात, शिव वीणा नेहाला चांगलं समजावत होते एकीकडे पण दुसरीकडे शिवानी तोऱ्यात होती आणि केळकर आणि ताई तिच्या हो ला हो मिळवत होते. इथे शिव वीणाचं कौतुक वाटलं त्यांनी फायदा नाही घेतला किंवा शिवानी वाईट हेही ठसवले नाही. नेहाला छान मानसिक सपोर्टही दिला.

वीणाला जास्त चांगला चान्स असून शिवानीला nominate का केलं नाही काय माहिती. शिवसमोर किशोरीताई जाईल असं वाटतय का तिला. आरोह पहिला सेफ झाला म्हणून तिच्या मनात भीती आहे की काय.

शिवानी लकी आहे खूप.

हिनाने किशोरीताईला केलं म्हणून बिचुकलेला वाईट वाटलेलं दिसलं.

केळकरला वाटतंय समोरच्या टीमला गेम कळत नाही. यालाच कळतोय. पण त्याला votes कमी पडले तरी काढतील असं वाटत नाही मला. यावेळी शिवला जास्त votes मिळतील पण दाखवतील की नाही काय माहिती.

सोशल मिडियावर तरी सर्वत कमी सपोर्ट केळ्याला आहे, सर्वात भरमस्सट सपोर्ट शिवला, त्या खालोखाल आरोहला , आरोहसाठी कित्येक मोठी इन्फ्लुअन्सर अकाउंट्स वोट करतायेत आणि बरेच पब्लिक असे देखील आहे जे केळ्या जावा म्हणून आरोहला करतायेत ढिगानी वोट्स.
अर्थात मी जी ट्विटर अकाउंट्स फॉलो करते ते सगळे मागच्या सिझनचे मेघस्टर्स मेघा फॅन्स आहेत, जे यावेळी शिव आणि नेहामधे डिव्हाइड झालेत.
मला तरी वीणा,किशोरी, हिना यांचे फॅनक्लब्स वगैरे नाही दिसत कुठे जरी वोट्स मिळत असली तरी, शिवसाठी कसे ट्रेंड्स वगैरे चालु असतात, एकदम अ‍ॅक्टिव फॅन्स आहेत.

आरोहने केळ्याला पाच लाख बोली लाऊन nominate केलं म्हणून पब्लिक खुश झालंय. आरोहला त्यामुळे voting करूया असं म्हणतायेत काही जण fb वर.

आरोहला या आठवड्यात सपोर्ट चांगला मिळणार. त्याला नेतील फायनलपर्यंत.

बाकी शिवला आहेच सपोर्ट चांगला.

वीणाला fanclubची गरज नाही. तिच्यासाठी कलर्स channel हाच fanclub. त्यांना वाटेल तोपर्यंत ती राहणार.

मी खूप आधीही लिहिलेलं की वीणाने अति मोठी चूक एखादी केली नाही, नशिबाने साथ दिली नाही, आजारपण वगैरे काही आलं नाही मध्ये किंवा तिच्यापेक्षा महत्वाची असणारी आणि ती या परिस्थितीत channelला निवडीची वेळ आली तर आणि तरच वीणा फायनलच्या आधी बाहेर पडेल otherwise तिची एन्ट्री फायनलला नेण्यासाठीच झालेली आहे. कोणी कितीही विरुद्ध असेल आणि तिला कितीही नावं ठेवली तरी ती असणार फायनलला. हा ते सगळे मिळून काढतात वगैरे तसं झालं तर सांगता येत नाही. एरवी ती channel ची आहे त्यामुळे फायनलला नेणार channel आणि तोच तिचा आधार.

सध्यातरी channel ओढून नेतंय bb. जाहिराती पण खूप कमी झाल्या आहेत. खूप जाणवते बघताना, आधी किती adds मिळायच्या पण आता नाही ती परिस्थिती.

जाईल ती फायनलला, फक्तं शिवने त्याची ट्रॉफी हिच्या हतात नाही दिली म्हणजे मिळवलं, कारण त्याचे टॉप २ केळ्या आणि वीणा, तो स्वतः नाही!

शेवटी काय आहे तुम्ही trophy जिंकलात तरी पुढे कामं किती मिळतील हेही नाही सांगू शकत. मेघापेक्षा पुष्कर आणि स्मिता खूप बिझी आहेत आणि ते आधीही होते. सई काय करतेय काय माहिती.

जाईल ती फायनलला, फक्तं शिवने त्याची ट्रॉफी हिच्या हतात नाही दिली म्हणजे मिळवलं, कारण त्याचे टॉप २ केळ्या आणि वीणा, तो स्वतः नाही! >>> Lol नाही देणार. वीणा आणि केळकर तिघांत असतील की नाही हीच शंका आहे.

शेवटी शिव नेहात झाली स्पर्धा तरी चालेल पण शिवानी नको. अर्थात शिव पहिला आणि नेहा दुसरी यावी.

मला तर आता वाटतंय की आरोहला न्यावं फायनलला आणि त्या झटके येणाऱ्या शिवानीला काढावे.

नेहाला ढसाढसा रडता येण्याची कला चांगली अवगत आहे. शिवानी नसतानाच्या एका शनिवारी केळकरने तिला " शिवानी तुझ्याऐवजी आमच्यासोबत असती, तर क दाचित अजूनही बिग बॉसच्या घरात असती" असं म्हटल्यावर ति ने गळा काढलेला.
आता शिवानी तिला माधव बाबत तेच म्हणतेय. मग पुन्हा गळा काढला.
माधवच्या शेवटच्या आठवड्यापासून तिचा एक नवीन डायलॉग आलाय. मला जे वाटतंय ते मी व्यक्तही करायचं नाही का? रडावंसं वाटतं य तर रडायचंही नाही का? हाच डायलॉग काल वीणासमोर मारला.

अधी ती unrestrained aggression दाखवायची. आता unrestrained emotions दाखवतेय. चिडकी आता रडकी झाली. दोन्ही डोक्यात जातात.
---------
ते टॉप २ वगैरे सांगणं टास्कचा भाग होते. शिवला लोक अगदीच बावळट समजतात की काय?
----------
काल शि वानी बिचुकलेंना काय सांगत होती ट्रॉफी आणि पैशांबद्दल?
नवर्‍याने आणि मित्राने सार खं रडू नकोस असं सांगितलं नाही का तिला?

शिवानी सांगत होती ट्रॉफी तुम्ही घ्या, पैसे मिळतील ते मला द्या. तिला ट्रॉफी मिळाली तरी बहुतेक किंवा बिचुकलेला मिळाली तरी असं वाटलं मला, एकंदरीत तिच्यासाठी पैसे महत्वाचे, ट्रॉफी नाही.

शिवने आपण सोडून दोन सांगायचे होते म्हणून घेतलेलं का केळकर आणि वीणाचं नाव, ते मी नीट बघितलं नव्हतं. तसं असेल तर तो योग्य होता पण स्वतःचं घेतलं तरी चालणार होतं असं असेल तर त्याने स्वतः चं घ्यायला हवं होतं.

शिवला शेवटी सगळ्याचा फायदा होणार आहे नक्की, अगदी वीणाशी bonding केलं त्याचाही.

आधी स्वतः आणि केळकर घेतलं होतं. मग बदललं. पण आपण सोडून दुसरी दोन नावं घ्यायची असं आणखीही लोकां ना वाटलेलं. किशोरीने आधी इतर दोघांची नावं घेतली. मग एक बदलून स्वतःचं घेतलं.

ते हेलो अ‍ॅप कोणी वापरतंय का? तिथे कमेंट्स वगैरे करायची सोय असेल, असं वाटतंय. त्यावर कदाचित उत्साही प्रेक्षकांची ट्रेंड कळेल.
ट्विटर वापरणार्‍यांपेक्षा न वापरणार्‍यांची संख्या काही पट आहे.

अच्छा असं झालं का, थँक्स भरत.

शिव वीणा जोडी कलर्सवाल्यांना आवडली असेल तर त्यांना सिरीयल ऑफर होऊ शकते लीड पेअर म्हणून किंवा TV 18 तर्फे पिक्चरही मिळू शकतो. प्रेक्षक विचार करतायेत त्याचा पुढचा विचार त्या लोकांनी केला असेल. ते हे सर्व encash करतील पुढे जाऊन.

बाकी लग्न वगैरे ते आपण काय सांगणार, ते दोघे ठरवतील पण ते ठाम असतील तर होईल नाहीतर दोन्ही घरातून विरोध होईल अशी चिन्हे दिसतात कारण त्या दिवशी वीणाची आई काही म्हणाली असली, तरी शिवची आई बहीण काय म्हणाली, त्यांच्या मनात काय आहे हे तिला समजलं असेलना telecast झाल्यावर, त्यामुळे आपली मुलगी आवडत नाही त्यांना किमान हे तरी ओळखलं असेल. ते बघून विरोधच करेल बहुतेक.

एनिवे पुढची गोष्ट पुढे, तो आपला विषयही नाही मात्र आत्तातरी मला त्यांची जोडी आवडते आणि दीड तासांत 5 मिनिटे त्यांचं bonding दिसणार असेल तर आवडतं बघायला.

मेघाच्या सीझनला पुष्कर रनर अप होता. त्यालाही सोशल मीडियावर काहीच सपोर्ट नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावरील सपोर्टचा तिथे टिकण्याशी फारसा संबंध नसावा.
आणि त्यातून तो मराठी खबरी अकाउंट केळकर सपोर्टर आहे ना? बाकी यावेळी अनेक अकाउंट पेड पीआर आहेत त्यामुळे ट्रेंडवर विश्वास ठेवता येत नाही. परवा तर शिवला भरपूर शिव्या घालत होते लोक त्याने आरोहला ढकललं म्हणून.

आता बहुतेअ चँनेल ठरवेल तेच होणार.शेवटी उनके भी इज्जत का सवाल है.चँनेल वॉरमध्ये टिकून राहायच आहे.
गेल्या वेळी शेवटच्या चार आठवड्यात मेघाच्या विरोधात गेल्यावर पुष्करबद्दल सोमिवर खूप निगेटिव्ह कमेंट्स होत्या,आस्ताद,सई सुध्दा अपवाद नव्हते,पण गेले टॉप 5मध्ये.
पुष्कर तर रनर अप झाला
म्हणजे ज्याच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स जास्त तो टॉप मध्ये अस आहे का चँनेलच?

पहिलाच सीन बघतेय आजच्या एपिसोडचा, अरे यार, ती नेहा खरच कॅमेराज अ‍ॅडजस्ट करून रडारड करतेय, बोलतेय वीणाशी पण बघतेय कॅनेराकडे Proud
अर्थात शिवानीही कमी नाही, ती आणि नेहा दोघी तशाच पण शिवानीला रडण्याचं अ‍ॅक्टींग जमत नाही म्हणून चिडतेय ती नेहावर Biggrin
Btw , त्या वीणचं स्क्रीन प्रेझेन्स किती अनॉयिंग आहे, कसली भयनक विचित्रं चेहरे करते, आयशॅडोज वर शिव लिहिताना तर अक्षरशः माकडतोंडं करत होती, चिचुंद्री फेस करतेय कि मंकी फेस विचारात पडावं. काल तर खाताखाता तोंड उघडून बोलत होती, यक्स.. गलिच्छ आहे अगदी.
अशी अनप्लेझन्ट पर्सनॅलिटी कलर्सच्या टि.व्ही शो ची लिड अ‍ॅक्ट्रेस होती का खरच ? आणि पब्लिकला आवडायची ? Uhoh

Lol

होय काय, असं असेल तर परत तो सीन बघायला हवा नेहा शिव विणाचा.

आता असं असेल तर मी माझे पहिले दोन बदलणार. आता शिव वीणा माझे पहिले दोन. नेहा बाद Lol

मागच्यावर्षी मेघाचे जे डेडीकेशन होतं bb जिंकायचं, ते मात्र एकातही दिसत नाही या सिझनमध्ये.

पहिलाच सीन बघतेय आजच्या एपिसोडचा, अरे यार, ती नेहा खरच कॅमेराज अ‍ॅडजस्ट करून रडारड करतेय, बोलतेय वीणाशी पण बघतेय कॅनेराकडे Proud >>>+११११ मी पण बघीतले ते काल

मला अजुनतरी शिवानी आवडतेय, कमित कमी फेक तरी वाटत नाही, पण तीचे जिंकायचे चॉन्सेस कमी आहेत

रच्याकने , मी हल्ली अंजुच्या पोस्ट ओलांडायला लागलेय, एकतर तेच तेच असतात आणी शंभरात किमान ७० पोस्त असतात तीच्या, रात्र दिवस कधीही म्हणुन थोडे आश्चर्य वाटायचे , आता हसु येते
ईतके डेडीकेटली तर कंटेस्टट्च्या घरचे पण फॉलो करत नसावेत बहुदा Proud

, त्या वीणचं स्क्रीन प्रेझेन्स किती अनॉयिंग आहे, कसली भयनक विचित्रं चेहरे करते, आयशॅडोज वर शिव लिहिताना तर अक्षरशः माकडतोंडं करत होती, चिचुंद्री फेस करतेय कि मंकी फेस विचारात पडावं. काल तर खाताखाता तोंड उघडून बोलत होती, यक्स.. गलिच्छ आहे अगदी.
अशी अनप्लेझन्ट पर्सनॅलिटी कलर्सच्या टि.व्ही शो ची लिड अ‍ॅक्ट्रेस होती का खरच ? आणि पब्लिकला आवडायची ? >> दिपांजली पोस्ट आवडली, मला सुद्दा नेहमी हा प्रश्न पडतो की विना सारख्या रडक्या चेहर्याची लीड कशी? लोकंना कशी आवडते. माझ्या ओळ्खीतल्या बर्याच् जणांनी सांगीतले की फक्त सचित मुळे सहन करायचे तीला.

रच्याकने , मी हल्ली अंजुच्या पोस्ट ओलांडायला लागलेय, एकतर तेच तेच असतात आणी शंभरात किमान ७० पोस्त असतात तीच्या, रात्र दिवस कधीही म्हणुन थोडे आश्चर्य वाटायचे , आता हसु येते
ईतके डेडीकेटली तर कंटेस्टट्च्या घरचे पण फॉलो करत नसावेत बहुदा >>> सर्व मान्य आणि sorry त्याच्यासाठी. बाकी रात्रंदिवस मला जागे का राहावं लागतं तो फार personal विषय आहे आणि तो काही जणांना इथे माहितेय.

प्रयत्न करेन कमीत कमी पोस्ट लिहायचा, आणि असतील तर प्लीज ignored.

रच्याकने , मी हल्ली अंजुच्या पोस्ट ओलांडायला लागलेय, एकतर तेच तेच असतात आणी शंभरात किमान ७० पोस्त असतात तीच्या, रात्र दिवस कधीही म्हणुन थोडे आश्चर्य वाटायचे , आता हसु येते
ईतके डेडीकेटली तर कंटेस्टट्च्या घरचे पण फॉलो करत नसावेत बहुदा Proud>>>>>>> असु देत मला तरी आवडतात त्यांच्या पोस्ट्स . त्या आवडत्या कंटेस्टट्च्या निगेटिव्ह गोष्टी आणि नावडत्या कंटेस्टट्च्या चांगल्या गोष्टी अगदी निपक्ष पणे लिहितात .
प्रयत्न करेन कमीत कमी पोस्ट लिहायचा,>>>>>>>> काही नको .लिहा तुम्ही आम्ही वाचू. आम्हाला आवडतात.

अंजुताई तू लिही ग बिनधास्त काही गरज नाहीये माफी वैगरे मागायची. मला आवडतात तुझ्या पोस्ट्स आणि मी पूर्ण पोस्ट्स वाचते तुझ्या. लब्यु ग.

बाकी रात्रंदिवस मला जागे का राहावं लागतं तो फार personal विषय आहे आणि तो काही जणांना इथे माहितेय >>> यासाठी सॉरी. मला तुमच्या खाजगीबाबी बद्दल मला काही लिहायचे नव्हते की माझा त्यावर काही आक्षेप नाहीये. मी तर तुम्हाला कमी पोस्ट लीहा असेही बोलली नाही. माझ्यापुरता सोय मी केली. ईथे लिहीले फक्त तसे पण तुम्हाला दुखवायच हेतु नव्हता. लिहा तुम्ही, मला आवडत नाही सो मी ओलांडते ती पोस्ट

अन्जू तू लिही तुझे प्रतिसाद. इथे बिग्ग बॉस वर आपल्याला काय वाटते यावर लिहण्यासाठी च हा धागा काढलाय. जर रोज बीबी पहात असलो तर इतके प्रतीसाद लिहणे साहजिक आहे.मी पण रोज बीबी पाहते.
आणी ज्याना बीबी आवडते आणी त्याना वेळेवर पहायला मिळत नाही त्याना तुमच्या पोस्ट वाचल्यामुळे एपिसोड मध्ये काय झाले ते कळते.

अरे thank u सर्वांनाच. its ok. मी सर्वांच्या पोस्टचाच रिस्पेक्ट करते, त्यामुळे ज्याला जे वाटतं ते तो लिहू शकतो. त्यांना वाटलं त्यांनी लिहिलं. याआधी पण माझ्या पोस्ट रिपीटेटीव्ह असतात हे काहीजणांनी या आधीही सांगितलं आणि मला ते मान्य आहे.

मला जे उत्तर त्यांना द्यायचं ते मी दिलं त्यावर त्यांनीही लिहिलं. माझ्या पोस्टस आवडतात त्यांनाही धन्यवाद आणि आवडत नाहीत त्यांनाही. खूप सोपं आहे सर्व. उगाच ताणायचं नाहीये. पण काही जणांना पोस्टस आवडतात वाचून बरं वाटलं नक्कीच.

Biggrin अन्जू.
अभिजित केळकर सारखा बोलत असतो की कुणाला गेम समजला नाहिये. जसे काय ह्याला एकट्यालाच गेम समजलाय. उलट नेहा बरोबर खेळली असे वाटले मला. ति आणी शिवानि एकत्रबोली लावायला आल्यामुळे दुसर्या ग्रुप मधले एक जण nominate होणार होते. सो नेहा ने कमी बोली लावली. तिथे शीव नौमिणटाए झाला. आरोह ने तर 5लाख बोलुन केळकरला chance च दिला नाही. पण 5लाख रक्कम कमी झाल्याने त्याला महेश सर ओरडतील का? किशोरी ताई नी परत आरोह वर 1लाख का लावले. 75लावायचे ना 25वाचले असते. आणी हीना ने पण डायरेक्ट 3लाख. किशोरी स्वत: चुकीचा गेम खेळल्या आणी दुसर्यांना गेम समजला नाही बोलत होत्या. गेम हा प्रतिस्पर्धी ना nominate करणे आणी बक्षीसा तिल रक्कम वाचवने असा होता.
हीना ने किशोरी ताई ला nominate केल्या बद्दल सगळ्याना आश्चर्य वाटले.

Pages