बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा मोबाईल लहान आहे आणि त्यात जवळच्या चष्म्याचा नं वाढलाय बहुतेक त्यामुळे कंटाळा येतो आणि वेळ जातोय असं वाटतं. डेस्कटॉपवरून सोय नाहीये द्यायची.

भाडिपा चा व्हिडीओ आलाय बिबॉ वर Proud
https://youtu.be/MaPv_naigck
शिव = जीव, शिवानी= भवानी, वीणा=मीना, सत्यजीत=अभिजित , नेहा=स्नेहा
भारी जमलाय, सगळ्यात नेहाची पॅरेडी झकास.

बोअर झालाय बिग बॉस . एवढे सगळे पाहुणे आले तरी कंटाळाच आला .
मी तर पावणेअकरा वाजता बघायचं थांबवलं . बस झालं.

खूप कलकलाट.

बिचुकले नेहाच्या मैत्रिणीचेच कान तिच्याबद्दल फुंकतोय.

टास्क में अभिजीत केळकर छा गया.

मी तर काल पाहुणे आल्यानंतर चे पहिलेच नाही. फारच बोर होते.>>>>हो खरंच, काही खास घडत नव्हतं, प्रसाद ओक ची एन्ट्री पण ऑब्वियस केली, उगीचच आरडाओरडा! कोणीही घाबरले नाही उलट हसतच होते. आणि तिजोरीची चावी न देण्यामागचं लॉजिक काही कळलं नाही बुवा. म्हणजे तिजोरी फोडली तरी चावी देणार नाही हे काय???

केळ्याचा चेहरा नॉमिनेट झल्यावर थोबाडीत मारल्यासारखा झाला होता, आणि उगीच काही फरकच पडला नाही असे दाखवत हसत किशोरीला म्हणत होता शिवानी नेहाला गेम कळत नाही>>+१
माझ्याकडून कोणीतरी द्या आरोहला वोट्स. त्याने केळ्याला नॉमिनेट केल्यामुळे १ एक्स्ट्रा द्या. Wink

शिवानीचा खेळांमध्ये अजिबात सहभाग नसतो . बिगबॉस पण नेहमीच तिला सुरक्षित ठेवतात . तिला ओरडताना त्यांचा सावध पवित्रा असतो Happy .
बक्षिसाची रक्कम कमी होते आहे ह्याचा कुणालाही फरक पडत नव्हता . म्हणजे त्यांना मानधन भरपूर मिळत असेल पण प्रेक्षकांसाठी साठी तरी कमीत कमी व्यवस्थित खेळाल पाहिजे होत . ५ लाखांची अचानक बोली का लावली ते अजूनही समजला नाही . संजय ने बिचुकलेची खेचताना मजा आली . बिचुकलेच्या गाण्यांचा अल्बम लवकरच यायची शक्यता आहे . हा हा हा .

केळ्याचा चेहरा नॉमिनेट झल्यावर थोबाडीत मारल्यासारखा झाला होता, आणि उगीच काही फरकच पडला नाही असे दाखवत हसत किशोरीला म्हणत होता शिवानी नेहाला गेम कळत नाही>>>
तो अजून त्याच धक्क्यात आहे.
बाहेर जावा केळकर..
नंतर शिवानी..
btw colors ला भाडिपाची मदत घ्यावी लागतेय..
'भवानी' character मस्तच जमलंय..

काय बकवास एपिसोड, बिग बॉस सिरेयसली गंडलेत.
इतके सेल्ब्ज पाहुणे आले घरात म्हणून असून एकाकडेही एन्टरटेन्मेन्ट व्हॅल्यु नाही, सतत त्या बिचुकल्याकडे कॅमेराची धाव आणि सेलिब्रिटीजही बिचुकल्यालाच मस्का मारत होते, हा माणुस लगेच मृण्मयी गोडबोलेच्या मागे.
बाकी त्या बिचुकल्याला जे फुटेज मिळतय मला नाही वाटत बिबॉला त्याला घालवतील म्हणून, सर्कशीतला जोकर/तमाशामधे नाच्या असतो तसा हा लागणारच बिबॉला कोणीही लिड काँटेस्टन्ट्स असले तरी.
वीणाचा गलिच्छापणा कंटिन्युज .. नाकात बोटं घालत होती सारखी, बिचुकलेची बहिण शोभेल!
केळ्या-किशोरी कित्ती चुगलखोर अंटिज सारखे आरोहची टिंगल करत होते, जेलस दोघेही !
बाकी हे येरेयेरे पैसा वाले स्वतःच्या मुव्हिजच प्रमोशन कमी आणि बिबॉ ३ ची ऑडीशन जास्तं देत होते !
यातले कोण कोण दिसणार सिझन ३ मधे (आला तर )पहायला हवं !

पाहुण्यानी रात्री मुक्काम पण केला बीबी च्या घरात. Uhoh
ते बिचुकले मृण्मयी ला काही पण सांगत बसले बाथरूम ड्यूटी and ऑल. आणी भातातले वाटाणे काढून खातो तेही. हा माणुस घर च्यां ना
पकवत होता आता पाहुण्याना ही.

आरोहची मेंटॅलिटी चिप वाटली. केळकरला नॉमिनेट करणे वगैरे ठिक पण एकदम ५ लाख लावून विनर चे पैसे कमी करणे हे पटले नाही. त्याला माहीती आहे की तो आत्ताच २-३ आठवड्यापुर्वी आलाय व त्याला काही ही ट्रॉफी मिळणार नाही. म्हणून लगेच डायरेक्त ५ लाख कमी करणे म्हणजे तुलाही नाही आणि मलाही नाही अशा मेंटॅलिटीतून खेळला आहे.

केळकरने हिर्‍याचा टास्क मस्त खेळला. मी माझी सगळी मते त्याला, शीव आणि किशोरी यांच्यात वाटून टाकली. आरोहला शुन्य मते माझ्याकडून.

बाकी बिचुकल्यांची पाहूण्यांनी मस्त खेचली. प्रसाद ओकने आल्या आल्या त्यांना भेटताना "काय ते तुमचे बोलके डोळे" असे काहीतरी म्हंटले. उगाच त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवले. बिचुकल्यांनी किशोरी त्यांची वेणी घालत असताना म्हणालेली कविता मात्र आवडली. (हे एवढेच आत्तापर्यंत त्यांचे मला आवडले आहे).

केळ्या-किशोरी कित्ती चुगलखोर अंटिज सारखे आरोहची टिंगल करत होते, जेलस दोघेही !>>> मलाहि बिल्कुल नाहि आवडलं ते... हे दोघं मोठे खेळणारे..
आरोह छान खेळतोय तो जाता नये.. अन आताच्या सगळ्यातच मला तो डिसेंट वाटतो.. वागण्यात.. बोलण्यात.
खरच का त्या बिचुकलेला ठेवलय अजुन बिबॉ मध्ये.. पाहुणे इतका काळ राहतात का घरात?

किशोरीला अजून रिअँलिटी माहितच नाही की शिवने तिला नॉमिनेट करण्याचा इशारा हीनाला केला होता,यामागे केळकर असणारच.ते सिक्रेट तिला कळू नये म्हणून वीणाविरोधात कान भरत आहे,पण तिला घराबाहेर काढायला टपलेल्यांबरोबरच बसली आहे.
सरळ जाऊन हीनाला विचारता येत नाही की बाई,का केलस मला नॉमिनेट?
बघू ,ममां तरी सांगतील का?

कधी संपणार १०० दिवस अस झालय. काहीच कसे आवडत नाहीये.
केळ्या आहेच चोंबडा. आधी वैशाली आता किशोरी. वीणाने त्याला कधीच जवळ नाही केला. शिव त्याला उगीचच मदत करतो. बिचुकले राहतील अजुन. बाहेरुन आलेल्या लोकांनी त्यांनाच डोक्यावर घेतले. त्यांचे ते गाणे विरासत वाले ,गणपती मंडळात हिट जाउ शकते.

आरोह पण स्वगतं म्हणत फिरत होता, किशोरी ताईंना आणि हिनाला उठवलं तर मला का नाही उठवलं केळ्याने? भ्या :रडणारी बाहुली: दुसर्‍यांदा की तिसर्‍यांदा झालं म्हणे. बालिश आहेत का हे लोकं?

कालचा एपि. महा कंटाळवाणा. फा. फॉ. केला . बिबॉ हॅज कंप्लीटली लॉस्ट इट. मूव्ही प्रमोशन काही दिसतच नवह्तं. नुस्तीच गर्दी केलीय घरात. हिरा पळवण्याच्या खेळाचा पॉइन्टच कळला नाही मला. एक तर लप्वणे चोरणे वगैरे फारच रिपिटेटिव वाटतेय. अन काय फायदा जिंकण्या न जिंकण्याचा? मागच्या वेळी ७-१२ वर इतका वेळ घातला आणि कॅप्टनशिप साठी त्याचा काहीच फरक पडला नाही. वेस्ट ऑफ टाइम.
बिचुकलेला मुलीचा ड्रेस्स वगैरे किळसवाणे वाटले अक्षरशः. बिबॉ ला कळले नाहीये अजूनही की त्या माणसाची एंटरटेनेमेन्ट व्हॅल्यू संपलेली आहे कधीच.
केळ्याला रडायला काही कारण लागत नाही. वीणा वेगळंच वागतेय आपलाच गेम खेळते म्हणून रडला? सिरियसली? किशोरी सध्या तो जे जे काय म्हणेल त्याला बिनडोकसारखे नुस्ते हो ना हो ना करते ते डोक्यात जातंय.

इकडे बहुतेक जणांना कळले नाही आरोह ने असे का केले ते.
स्मार्ट खेळलोय तो.
केळकर नॉमिनेशन ला घाबरतो, सर्वाना माहित आहे.
आता समजा आरोह ने 50 हजार ची बोली लावली असती केळकर ला नॉमिनेट करायला. केळकर ने 1 लाख लावली असती स्वतःला वाचवायला . मग आरोह ने समजा 2 लावली असती ,केळकर ला उप्पर हॅन्ड मिळालाच असता वाचायला किंवा आरोह ला नॉमिनेट करायला बोली वाढवून . शेवटी जो 5 लाख पर्यंत जाईल तोच वाचला असता. केळकर ला त्याने मौकाच दिला नाही वाचायला .

कालचा टास्क छान झाला. परवाचा मात्र बोरिन्ग होता. केळकर, हिना छान खेळले. शिवानी सुद्दा खेळू लागली आहे.

किशोरीताई गेममध्ये आली आहे वाटत. वैशालीची जागा घेतली तिने.

स्मिता गोन्दकर नाही आली ते बर झाल. बिचकुल्याने तिलाही पकवल असत.

आरोह पण स्वगतं म्हणत फिरत होता, किशोरी ताईंना आणि हिनाला उठवलं तर मला का नाही उठवलं केळ्याने? भ्या :रडणारी बाहुली: दुसर्‍यांदा की तिसर्‍यांदा झालं म्हणे. बालिश आहेत का हे लोकं? >>>>>>>> ++++++++१११११११११११

बाकी बिचुकल्यांची पाहूण्यांनी मस्त खेचली. >>>>>>>> अगदी अगदी

बिचुकलेला मुलीचा ड्रेस्स वगैरे किळसवाणे वाटले अक्षरशः. बिबॉ ला कळले नाहीये अजूनही की त्या माणसाची एंटरटेनेमेन्ट व्हॅल्यू संपलेली आहे कधीच. >>>>>>>> उलट एपिक बेईज्जती केली बिबॉने त्याची. तो आधी नाही म्हणत होता मुलीचा गेटअप करायला. त्याला टॉयलेट साफ करायला नको, म्हणे, माझे केस मुलीपेक्षा सुन्दर आहेत. भोग म्हणाव आता.

मला अस का वाटतय की बिचकुले या आठवडयात जाणार आहेत म्हणून त्याला काल एवढ चढवल असेल.

मूव्ही प्रमोशन काही दिसतच नवह्तं. >>>>>>>>>> उलट मुव्ही प्रमोशन नाही केल तेच बेस्ट होत.

बिचुकल्यांनी किशोरी त्यांची वेणी घालत असताना म्हणालेली कविता मात्र आवडली.>>>>>>> ' आई माझ्या लग्नाची का तुम्हालाच पडली घाई' ओरिजनल गाण आहे हे. त्याची कविता नाही ती.

सन्जय नार्वेकरने बिचकुलेला हिरा शोधायला बाथरुममध्ये पाठवल तो सीन आवडला. बिचकुल्याची कॉपी छान केली त्याने. Lol

यातले कोण कोण दिसणार सिझन ३ मधे (आला तर )पहायला हवं ! >>>>>>>> मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव ह्यानी असायला हव सिझन ३ मध्ये. सन्जय नार्वेकर, पुष्कर सुद्दा ओके आहेत. प्रसाद ओक मला त्याच्या इमेजमुळे बिबॉ मटेरियल वाटत होता. पण काल त्याचा वावर शान्त, गोड होता. त्याने शिवानी का नेहाला ' कशी आहेस तू?' विचारल ते इतक गोड वाटल ऐकायला आणि बघायला. प्रसाद ओक सुद्दा नेहाचा मित्र आहे तर.

केळकर आणि नेहाने एकमेकान्ची केलेली नक्कल परफेक्ट होती.

काल शिवानी टिमने चोरलेला हिरा पुन्हा म्युझियममध्ये ठेवला ना?

सुलू दुसरा धागा काढाना 2000प्रतिसाद
होत आहेत.
केळकर आणी बाप्पा पण सुरुवातीच्या टास्क मध्ये मुलगी झालेले.
बिचुकले ना मुलगी नव्हत बनायचे ते मला गुलाबजाम नको म्हणत होते.
किशोरी बिचुकले ला तेल लावत होती तेंव्हा वीणा नेहाला बोलली की ताई ला त्याच्या केसात हात घालावा लागतोय हेच कीती घाण आहे.

बिग बॉसमध्ये हातात काम नसलेले लोक येतात ना? या सगळ्यांकडे थोडेफार तरी काम आहे.
त्या सगळ्यांची एकमेकांशी ओळख असणारच. मित्रच असतील असं नाही. कधी एकत्र कामही केलं असेल.
नेहा आणि अभिजीत केळकर सीनियर आहेत त्यामुळे त्यांच्या जास्त ओळखी असतील.
त्या लोकांनी आल्या आल्या सिनेमाबद्दल सांगितलं. त्यांची कॅरॅक्टर्स, स्टोरी लाइन इ.

बिग बॉसमध्ये हातात काम नसलेले लोक येतात ना? या सगळ्यांकडे थोडेफार तरी काम आहे.
<
असं वाटत नाही, मराठीत इतके बिझी कोण आहे अत्ता ? कदाचित डेली सोप /सिरीयल्सचे लोक सोडून , ज्यांच्या मुव्हीजचं शुट चालु आहे असे लोक सोडून कोणीही येऊ शकतं .
स्व.जो, अंकुश, मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर , अमृता खानविलकर वगैरे मराठीतले ए लिस्टर्स बिझी अ‍ॅक्टर्स म्हणून येणार नाहीत हे समजु शकतो.
पण ते येरेयेरे पैसा वाले जणु सदस्य होण्याची ऑडीशन द्यायला आल्यासारखेच वागत होते.
बिबॉ सुरु होण्या आधी जितेन्द्र जोशीनी मागच्या सिझनच्या लोकांना विचारल होतं कोणाला या सिझनमधे पहायला आवडेल, कोणीतरी म्हंटलं केळकर, त्यावर जितुची रिल्फ्लेक्स अ‍ॅक्शन, ‘तो बरा येईल ? केवढा बिझी आहे तो, त्याचे नाटकाचे दौरे इतके सुसाट चालले आहेत ते सोडून येईल ? ‘
थोडक्यात चांगली प्राइस ऑफर केली तर येतील कोणीही, तसेही पुष्कर श्रोत्री मधे केळकर पार्ट २ , झालच तर अस्ताद + केळकर बनायचे पूर्ण पोटेन्शिअल दिसले Wink

केळकर बिझी असतो? कशात काम करतो तो नक्की? मला नव्हता माहित तो, चेहरा ओळखीचा नव्हता आणि नाव पण नव्हते ऐकले.
पुष्कर श्रोत्री बरा वाटेल संभाव्य स्पर्धक म्हणून, मृण्मयी गोडबोले पण चांगली वाटेल .
आज पण ते लोक तिथेच मुक्कामाला दिसत आहेत आणि पैसे शोधा खेळ आहे असे दिसते. कंटाळा येणार. सिनेमाचे प्रमोशन करायचे तर करा, बसा तास दोन तास आणि निघा म्हणावे.

केळकर बिझी असतो? कशात काम करतो तो नक्की? मला नव्हता माहित तो, चेहरा ओळखीचा नव्हता आणि नाव पण नव्हते ऐकले.
<<
He's acted in Manjrekar movies !
Kaakshaprsh: Ketaki's husband who dies soon .
Shivaji raje bhosale: Sachin khedekar's son.
Also played a character in Balgandharva.

मला त्याचा पहिला रोल आठवतोय तो ये मेरी लाइफ है - शमा सिकंदरची मालिका. नायिकेच्या बहिणीचा बॉयफ्रेंड..
मालिकांत लीड रोल केलेला आठवत नाही.
पुष्कर हसवाफसवी करतोय. संजयची पण नाटकं चालू आहेत.

Pages