बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वीणाच्या आई च्या कालच्या वागण्यामुळे तिला असलेला पाठिंबा कमी होऊ शकेल का? शिवाय वीणाला आता यापुढे घरात ऑकवर्ड वाटेल.
शिवच्या बहिणीने घेतलेला स्टँड चांगला होता. सगळ्यांत मिसळून रहा. तिची भांडणं भांडायला ती समर्थ आहे. मैत्री करा, पण डिस्टन्स ठेवा. स्टुडन्ट्स बघतात इ. (पहिल्या बिग बॉस हिंदीतला आर्यन वैद आणि ती एक मॉडेल यांच्यातला रोमान्स आठवतोय का कोणाला? ते सुरू झाले की तेरे मेरे सपने अब एक रंग है, हे गाणं वाजवायचे. त्यामुळे ते गाणं माझ्या आवडत्या गा ण्यांच्या यादीतून बाद झालं. गंमत म्हणजे फिनालेला दोघे एकमेकांचं तोंडही बघायला तयार नव्हते. Lol )

आईने वीणासुद्धा धाकटी बहीण आहे म्ह्टलयावर शिवने खळखळ केली. आईला वाटतो तितका काही वांडपणा शिवने केलेला नाही. अगदी क्वचितच त्याचा संयम ढळलाय. अगदी आरोहशी वाद घातला तेव्हासुद्धा त्याची बॉडी लँग्वेज अ‍ॅग्रेसिव्ह झाली तरी तो मारेल बिरेल असं अजिबात वाटलं नाही. शिवानी या सगळ्या बाबतीत खूप पुढे होती.

वीणाला आईशी बोलू दिलं नाही असं दाखवताहेत. शिवची आई असताना इतरांना रिलीझ केलं तेव्हा तिला केलं नाही, हे तिने बोलून दाखवल्याचा बिग बॉसने लगेच वचपा काढला का?

उठा बशांची शिक्षा आधी साधी वाटलेली, पण चांगलचं दमवलं सगळ्यांना. शिवानी सगळात जास्त.

वीणाची आई काही चुकीचं बोलली नाही मी तर म्हणेन परफ़ेकट बोलत होती शिवानीला . शिवानी वीणा बद्दल बोलली होती "मला तिच कॅरेक्टर कस आहे ते माहिती आहे . असं नि तस "आणि वीणा नुसतं परागला बोलत म्हणाली ते सुद्धा परागच्या वक्त्यव्यावर " हो मी पण असं ऐकलंय शिवानी बद्दल " तर हिला एवढा तमाशा करण्याची काय गरज ? घरात आल्यापासून सतत तेच तेच तेच तेच . शेवटी वीणाने तर शिवानीच्या आई- वडिलांची माफी पण मागितली . आणि हिला साधी किशोरींची माफी मागायला झालं नाही ते पण एका प्रेक्षकाने सांगितलेली शिक्षा . शिवानी म्हणजे नुसता माज माज आणि माज आहे . आवडली मला वीणाची आई जे काही बोलली ते . वीणाच्या आईने तिला हे पण सांगितलं तुझं आणि शिव च हे जे काही चाललंय ते गेम संपल्यावर आम्ही काय ते बघून घेऊ . पण आता तू लक्ष देऊ नको गेम वर लक्ष काँसंट्रेट कर . एकदम पर्फेकट . खूप आवडली वीणा ची आई

उठाबशांच्या शिक्षेमध्ये सुद्धा शिवानी पूर्ण खाली बसत नव्हतीच . वरच्या वर थोडीशी गुढग्यात पाय दुमडत होती . बाविसाव्या वर्षी हिला दम लागतो एवढे सगळे आजार आणि त्या छोट्या खोलीत जाऊन सिगरेट फुकताना दम लागत नाही वाटत हिला . ?

फॅमिली वीक अपेक्षेपेक्षा चांगला चाललाय...... प्रत्येक फॅमिली मेंबर स्वताचा एक वेगळा फ्लेवर घेउन येतोय..... so much variety Happy

माझं म्हणणं होतं, वीणा एक स्वतंत्र प्रौढ मुलगी आहे. बिग बॉसमध्ये राहायला आलीय तर इथे काय काय होऊ शकतं हे तिला माहीत होतं. सगळे जण म्हणतात तसं तिची भांडणं भांडायला ती समर्थ आहे. तिच्यासाठी तिच्या आईने येऊन भांडणं हे शाळकरी वाटलं.
शिवानीचा तो अ‍ॅटॅक तिने व्यवस्थित टॅकल केला. बिग बॉसला दोघींना कन्फेशन रूम मध्ये बोल वून मॅटर सेटल करायला लागलं. वीणाची आई जे म्हणाली ते मांजरेकां नी सांगून झालंय. वीणा आणि शिवानी दोघींनी ते मुद्दे मागे सोडून पुढे जायचं ठरवलंय.
वीणाच्या आईने शांतपणे तू असं असं बोललीस, त्याचा मला त्रास झाला, असं सांगितलं असतं , तर त्याचा अधिक चांगला परिणाम झाला असता.

शेवटी आई हि आई असते . तिच्या मनाला जी गोष्ट लागते ती गोष्ट बोलून दाखवणारच भले मुलं कितीही पौढ असले तरी आईकरता ते लहानच असते आणि आपल्या मुलाला बोललेलं कुठल्याही आईला आवडत नाही ते सुद्धा शिवानी सारख्या माजलेल्या व्यक्तीकडून . शेवटी तो तिचा ओरिजिनल स्वभाव पण आहे . प्रयेक जण आपापल्या स्वभावानुसार समजावत असतो बोलत असतो . हिंदी बिग बॉस मध्ये त्या श्रीसंत ची बायको तर तिला मिळालेला अख्खा वेळ त्या सुरभीला च बोलत होती . तू माझ्या नवऱ्याला असं बोलते तस बोलते Happy

वीणाच्या आईने शांतपणे तू असं असं बोललीस, त्याचा मला त्रास झाला, असं सांगितलं असतं , तर त्याचा अधिक चांगला परिणाम झाला असता.+11 खरच ..तुमच्या मनातल साचलेल बाहेर येऊ दया पण संयमाने... त्याच बरोबर आपल्या मुलीला पण तिने काही सल्ले द्यायला हवे होते.. फार सोना सोना चालल होत..जस काही वीणा च काही चुकलच नव्हत का... अशाच अती लाड केल्याने मुलांंन्ना कळत नाही आपण कुठे चुकलो ते...नेगटीव केल वातवरण फार त्यानी.. याउलट शिव ची आई सगळ्यांच्या चेहर्यावर हात फिरवत बोलत होती..शिव म्हणे मला निघताना हात फिरवला.. ती आपल्या मुलाला सुधार अस सांगत होती बाकिच्याना नाही.. (शिव ची आई पण जास्त बोलली असावी.. शिव वीणा प्रकरणा वर जे थोड एडिट केल असाव..थोडा वेळ चिमटे काढण ठिक पण सारख तेच तेच बोलणं कोणालाही नको वाटणार..त्यात ते सगळे स्टैच्यू होते) शिव ची बहिण त्या मानाने संयत वाटली फार
मला वाटत वीणा च रडण्याच कारण त्या दोघी जे बोलल्या ते होत ..ते आपल उगीच मला बोलायला मिळाल नाही हे कारण होत..किती अती करते पण ती..तोंड काय वाकड..गादी वर झोपून रडण काय.. total spoiled child.आणि शिव उगीच तिच्या पुढे पुढे करुन माती करतोय

सॉरी टु से, शिवची फॅमिली जितकी क्युट, जेन्युइन आणि करेक्ट फीडबॅक देणारी होती तितकीच वीणाची आई अत्यंत उथळ आणि ड्रामेबाझ वाटली !
शिवच्या आई आणि बहिणीने जणु आपल्याच मनातला फिडबॅक दिला, मैत्री ठिक आहे पण डिस्टन्स ठेवा ,नेलओएन्ट वगैरे लावत बसतोस चांगलं दिसत नाहीये, तुझे पपाही बघत असतात, स्वतःच्या गेमकडे बघ, तिचं ती पाहून घेईल ! मधेच लाटण्यानी हाणलं , धमाल आणली त्याच्या आईने आणि बहिणीने.
याविरुध्द वीणाची आई येताच एग्झॅक्ट उलटा फिडबॅक, ती बाई येतानाच वाकडं तोंड करून निगेटिव व्हाइब्स घेऊन आली, वीणाचं त्या घरात अस्तित्व शिव शिवाय काही नाही , फुटेज फक्तं शिवमुळे आहे माहित असल्याने जे चाल्लय त्याला प्रोत्साहन देत होती.
नो वंडर वीणाचा असा अ‍ॅटीट्युड आहे.
शिवच्या फॅमिलीला हिला भेटु दिलं नाही , स्टॅचु ठेवलं म्हणून कंप्लेंट करत होती, जसं काय खरीच शिवची बायको आहे! शिवची बहिण इतकं सांगून गेली अंतर ठेवा, आयसोलेट होऊ नका. तरी वीणा हिनाला सांगत होती मला जराबशिवशी एकट्याशी बोलु देत तू मधे बोलु नकोस.
शिव ठोंब्या तरी लगेच वीणाच्या मागे, आईने सांगितलेलं किती इंप्लिमेन्ट करणार काय माहित !
आज शिवानीनी वीणाच्या आईची हेट्रेड व्यावस्थित हॅण्डल केली, या आठवड्यात शिवानी पॉझिटिव दिसत होती.
बाकी आज केळकरच्या बायकोला सगळ्यांना का नाही भेटु दिलं ?
पोरं कित्ती क्युट आहेत केळ्याची, मस्तं हॅप्पी चौकोनी कुटुंब दिसत होतं, आज केळकर स्वतःची फॅमिली आल्यावर रडला नाही हे फार आवडलं.
एक ऑब्झर्व केलं, सगळ्या फॅमिलीजनी केळ्याला , किशोरीतींना चांगला फिडबॅक दिला.

Submitted by तुरू on 2 August, 2019 - 10:05 >>>+१११११

मला शिव . विणा अजिबात नाही आवडत, शिव तरी एकवेळ ठिक, पण विणा नाहीच

शिवानी बद्दल खुप वाईट लिहेले जाते पण माला आवडते ती, बिग बॉस मध्ये जसे असायला हवे तशी आहे ती
फक्त ती हायलाईट झालीए ईतकेच नाहीतर तिच्या पेक्षा वाईत ती हीना, विना आहेत.

सगळ्यांचे घरचे मस्त एक विणाची आई सोडली तर, लेक आईवर गेलीये दोघी ऊद्धट

मला वाटतं शिवानी रुपालीला जे सांगत होती वीणाबद्दल ते काढलं वीणाच्या आई ने ते योग्य होतं, कारण याबद्दल कुठे काही समोर आलं नाही ते घरच्या सर्वांच्याच समोर आलं ते बरं झालं, शिवानीने सगळ्यांसमोर विणाचे काढलं मग तिचंही यायला हवं होतं आणि शिवानी ज्या attitude ने हे करत होती, तोच attitude वीणाच्या आईने ठेवला. पण शिवानी घराबाहेर पडायच्या आधीच्या गोष्टी वीणाच्या आईने काढायला नको होत्या, ते अति झालं. परवाचं taskचं पण काढायला नको होतं. शिवानी पण अति वागली एकंदरीत वीणाबाबत, सतत पाण्यात पहात होती, तरी त्यांनी संयम ठेवायला हवा होता. शिवानी माफी मागायला आली तर माफ करायचं तिने, ह्यात वीणाच्या आईचा मोठेपणा दिसला असता. ती सिंधी आहे बहुतेक, उल्हासनगरमध्ये रहातात.

शिव वीणा च्या बाबतीत शिवच्या घरच्यांना जे वाटतंय त्याचा आदर वीणाच्या आईने करायला हवा पण ते तिला काल एपिसोड बघून समजलं असेल.

कदाचित सिंगल मदर म्हणून अनेक वर्षे दोघीं मुलींना वाढवताना, कडवटपणा जास्त आला असेल स्वभावात.

बिग बॉस मध्ये participate करण्यासाठी वीणाची आई एकदम योग्य candidate वाटते, असं मनात आलं. शिवानीसारखी गप्प झाली असती कधीच. बिग बॉसना असंच हवं असतं ना.

कदाचित सिंगल मदर म्हणून अनेक वर्षे दोघीं मुलींना वाढवताना, कडवटपणा जास्त आला असेल स्वभावात.>>वीणा 12वीत असताना गेले वाटत बाबा तिचे..

एकंदरीत बिबॉस टीआरपी साठी फारच हतबल झाले आहेत.
काल जवळजवळ 15 ते20 मि.सिरियलचे प्रोमो दाखवत होते,म्हणजे स्पॉन्सर्स पण कमी झाले असावेत.
अगदीच गळफटला हा सिझन.
निदान तिसरा तरी चांगला असू देत.
बाकी मला 100%खात्री आहे,वीणाच्या आईला पढवून पाठवल असेल.,पण तिला अँक
टिंग येत नसल्यामुळे ओव्हर झाल.
पण मला नाही वाटत याने काही फरक पडेल कारण हे लोक त्यांना हव तसच वागतात,बिबॉस वागायला भाग पाडतात.

मला वाटतं शिवानी रुपालीला जे सांगत होती वीणाबद्दल ते काढलं वीणाच्या आई ने ते योग्य होतं, कारण याबद्दल कुठे काही समोर आलं नाही ते घरच्या सर्वांच्याच समोर आलं ते बरं झालं, शिवानीने सगळ्यांसमोर विणाचे काढलं मग तिचंही यायला हवं होतं आणि शिवानी ज्या attitude ने हे करत होती, तोच attitude वीणाच्या आईने ठेवला. >>> नाही पटले
शिवानीचे वय काय विनाच्या आईचे वय काय? बिल्कुल शोभले नाही तिचे वागणे
शिवानी जेव्हा रुपालीला सगळे बोलली तेव्हा विणाच्या वाक्यामुळे तिला राग होता. सुरुवात विणाने केली होती. विणा खुप काय काय बोलते शिवानीबद्द्ल रादर सगळ्यांबद्दल. प्रचंड घमेंडी आहे ती, जायला तीच हवी यावेळी पण जाणार नाही, कलर्सचा चेहरा ना

शिवानी, बिचुकले आणूनही bb trp खाली, ऍड पण मिळत नाहीयेत आता जास्त, failed सिझन.

UP तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे.

परागचे फॅन्स बघत नाहीच बहुतेक, त्यानंतर trp खालीच आलाय. मी परागची फॅन नसल्याने रोज trp इमानेइतबारे वाढवते, अगदी समोर बसून बघत नसले तरी tv सुरू असतो. काल काहीतरी टेक्निकल prblm पण झालेला.

बाकी trp द्यावा आपण असा हा सिझन नाहीच, त्यामुळे कधी कधी स्वतः चा राग येतो Lol

शीव ची आई आणी ताई दोघी पण भारी होत्या. शीव ची आई तर अखंड बडबड करत होती.शीव च्या आई ने वीणा सांगितलेले की रुसवे फुगवे सोड तरी पण बीबी नी रिलिज नाही केले म्हणुन रुसुन बसली. वीणा च्या आई चा attitude नाही आवडला. शिवानि ला बोलले ते ठीक आहे . पण ती सगळ्याना असे बोलत होती की वीणा अगदी साधी आहे आणी बाकीचे उगीचच तिला त्रास देतात. स्वत: च्या मुलीच्या चुका बद्दल काहिच बोलली नाही. आपला तो बाब्या दुसरयाच ते कारटे. या मोड मध्ये होती ती.

हीना ने वीणा ला विचारले की शीव ची आई नेहा बद्दल काय बोलत होती. तर तिने खोटे का संगितले की काही नाही . शीव ची आई बोलली ना की नेहाशी भांडलास ते नाही आवडले. वीणा ने हीना ला फक्त किशोरी ताईं शी नीट बोला म्हणाली एवडेच सांगितले. शिवानिने गमंत म्हणून लाटणे दिले होते त्याचा वीणा ला ईतका का राग आला.

वीणाचा पत्ता कट होणार वाटतं लवकरच, काल फुगून बसली शिवच्या आईसमोर रिलीज केले नाही म्हणून त्याचा राग म्हणून तिची स्वतःची आई आली तरी BB ने तिला बोलू दिले नाही, सगळ्यांना रिलीज केलं तिला सोडून... BB च्या bad books मध्ये आली बहुतेक ती..

बिचुकले बिग्ग बॉस चे खुपच लाडके आहेत वाटत त्यांची बायको 2मुले आई पूर्ण फैमिली ला बोलवले आहे. मुलगी खुप गोड आहे त्यांची.

मला पण केळकरची फॅमिली खूप छान वाटली. शिव ची पण फॅमिली आवडली. वीणाच्या आईचा ड्रमा जास्त वाटला जरा.
वीणा आणि शिव मधे कसलाही फरक पडेल असे वाटत नाही मात्र त्यांच्या येण्याने. वीणाला शिव च्या आई -बहिणीसोबत वेगळा टाइम दिला नही म्हणून रडली? सिरियसली? तिला काय मूहदिखाई कार्यक्रम, खानदानी कंगन असे काहीतरी अपेक्षित होते की काय? Happy
शिवानी ने सगळ्यांच्या फॅमिलीज ची माफी मागून आणि हग्ज, नमस्कार इ. करून पॉजिटिव अ‍ॅटीट्यूड दाखवला या २-३ दिवसात. अर्थात तिचे पण ये रे माझ्या मागल्या होणार लगेचच यात शंका नाही.
इकडे ते उठा बशा वगैरे काही दाखवल्याचे आठवत नाही. पनिशमेन्ट होती का? अर्थात मी फा. फॉ करत होते म्हणून मिसही झाला असेल.

हो शिक्षा म्हणुन ऊठाबशा काढायला लावल्या .हीना च्या आई ला स्टच्यू असताना मिठी मारली आणी बोलल्या म्हणून शिवानि नेहा हीना आणी रुपाली लाशिक्षा दीली

धन्स अन्जू. Happy

शिव च्या घरच्यांनी खरंच खूप इंटरटेन केलं . पण सारखा विणापासून दूर राहा सांगण्याचा पराकोटीचा प्रयत्न चालू होता ते पटलं नाही. >>>>>>> अगदी अगदी. सारख सारख तेच तेच बोलून इरिटेट करत होते.

विणाच्या आईने मस्त झापले शिवणीला कलेजेमे थंडक .वीणाच्या आईने किशोरीताईनची माफी मागितली ते बरं झालं, वीणा खूप बोलली होती. वीणाला पण चुकलीस तर माफी माग आणि बरोबर असले तुझं तर योग्य stand घे सांगितलं.शिवची आई फार साधी आहे पण मत ठाम आहे तिचे, अर्थात मुलाने नको नको म्हणत असताना bb मध्ये भाग घेतलाय तर फोकस्ड असावं हे त्यांचे म्हणणे काहीही चुकीचं नाही. >>>>>>>>+++++११११११११

केळकरची मुले क्यूट आहेत.

मुलगी खुप गोड आहे त्यांची. >>>>>>>++++++२२२२२२२२२२२

अरेच्चा काल नक्की किती वेळ होता bb? विणाची आई शिवाणीला बोलली ते सगळे स्टेचू असताना तेवढंच पहिलं मी? त्यानंतर संपलं होतं न? टाटा स्काय hd वाले सांगा की . मी ११ वाजता बंद केलं add नंतर परत लागलं होतं का?

मला आवडलं वीणाच्या आईच वागणं जशास तस . आणि शिवानीला तर पाहिजेच पाहिजे . शिवानी घरात परत येताना निगेटिव व्हाइब्सच घेऊन आली होती . खुन्नस घेऊन . वीणाकडून माफी वगैरे वसूल करून घेतली त्या शिवाय स्वस्थ बसलीच नाही आणि आता तर सदस्य झाल्यापासून परत जोरदार ड्रॅमेबाज पणा सुरु केला. खर तर शिवानीच्या वडिलांनी तिला चार सणसणीत लगावून द्यायला पाहिजे होत्या . पण ते पडले एकदम गुळमुळीत. मग ते काम वीणाच्या आईने केलं पर्फकट . सारखी शिवानीनेच दादागिरी करावी आणि इतरांनी सहन करावी कि काय ? कोणी तरी सणसणीत भेटली तिला शाब्दिक फटकारणारी . आवडली एकदम वीणाची आई

काल ऑल्मोस्ट २० मिनिटं सलग प्रोमोज दाखवले. त्यामुळे थोडं पुढे गेलं.वीणाची आईच शेवटची पाहुणी होती, त्यामुळेच फार काही मिसलं नाही. बाकी सगळं वर आलंच आहे.
वीणा रडली कारण शिवच्या घरच्यांच्या वेळी इतर सगळ्यांना दुसऱ अनफ्रीझ केलं. तिला केलं नाही, त्यामुळे तिला त्यांच्याशी बोलता आलं नाही.
हाइट म्हणजे वीणाची आई असतानाही तिला शेवटपर्यंत फ्रोझन ठेवलं. आज तिला आईशी बोलू देतात का पाहू कारण काल आईची जायची वेळ झाली असं सांगितलं होतं.
वीणाने शिवशी सुत जुळायच्या आधीच स्वतःची जागा बनवली होती.
शिवा सुरुवातीला शिवानीच्या मागे होता. मग मांंंजरेकरांनीच त्याला वीणाकडे डायव्हर्ट केलं.
शिवानीशी मारामारी, परागच्या विरोधात बोलणं , टास्कमधली इन्व्हॉल्वहमेंट यांततूनही ती दिसली.

शिवा सुरुवातीला शिवानीच्या मागे होता. मग मांंंजरेकरांनीच त्याला वीणाकडे डायव्हर्ट केलं.>>>> हो शीव ने सुरुवातीलाच पहिल्या दिवशीच शिवानीला काहितरी विचारल्यामुळे ती त्याच्या वर वैतागली होती.

वीणा bb वर रुसली ते बरोबर नाही केलं, आता तिला धोका असू शकतो, पण bb ला trp वीणा शिव ने दिलाय भरपूर. यंगस्टर्सना बऱ्याच आवडते जोडी.

बिग बॉसने आदर्श काय ठेवलाय समोर मला लीगल धमकी दिलीत तरी मी झुकणार आणि तुम्हाला परत घेणार.

त्यामुळे आता फार सिरीयसली कोणी घेत नाही bb ना, नियम सतत तोडतात, त्यामुळेच bb जागे झाले आणि उठाबशा काढायला लावल्या. आता वीणाला काय शिक्षा देतात ते बघू.

वीणा bb वर रुसली ते बरोबर नाही केलं, आता तिला धोका असू शकतो, पण bb ला trp वीणा शिव ने दिलाय भरपूर. यंगस्टर्सना बऱ्याच आवडते जोडी.

बिग बॉसने आदर्श काय ठेवलाय समोर मला लीगल धमकी दिलीत तरी मी झुकणार आणि तुम्हाला परत घेणार.

त्यामुळे आता फार सिरीयसली कोणी घेत नाही bb ना, नियम सतत तोडतात, त्यामुळेच bb जागे झाले आणि उठाबशा काढायला लावल्या. आता वीणाला काय शिक्षा देतात ते बघू.

शिवची जर लव्हस्टोरी ही स्ट्रॅटेजी असेल तर वीणा हा योग्य मार्ग त्याच्यासाठी, वीणा कलर्सची लाडकी हिरॉईन हे तर त्याला माहिती असणार, मला ती सिरीयल आवडायची नाही पण तुफान trp होता त्या सिरीयलला. हे डोक्यात ठेऊन शिव वागत असेल तर तो smart आहे, नाहीतर प्रेमात खरोखर आंधळा झालाय.

Pages