Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अजुन एक गोष्ट कोणाला जाणवली
अजुन एक गोष्ट कोणाला जाणवली का ..... बिबॉने आता खेळात संचालक ठेवणे बंद केले आहे. रुपाली आता पुन्हा पुन्हा संदेशपत्र वाचत असते. कदाचित पुढ्च्या भागत बिबॉ नचिकेतला ऑफर देतील. तसेच आपल्या माणसाबरोबर ईतरांनाही भेटा हे निक्षून सांगितले आहे असे वाटले. नाहीतर मी असते तर ज्याने कोणी माझ्या माणसला त्रास दिला त्याच्याकडे बघितले सुद्धा नसते. तसेच अजुन एक वाक्य बिबॉ म्हणायला सांगते ते म्हणजे तुम्ही सगळेच छान खेळताय, अरे कधीतरी एखादा म्हणू शकतो ना की अमुक एकाच खेळण मला नाही आवडत.
मागच्यावर्षीसुद्धा सगळ्यांशी
मागच्यावर्षीसुद्धा सगळ्यांशी बोलत होते घरचे आलेले, bb तसं सांगत असतील आणि ते योग्य आहे.
शिवला झापलं ते बरे केलं, पण शिव वीणा trp मिळतो म्हणून bb नीच चढवल आहे, विकेंड डावात कोणी आलं तरी शिव वीणा आवडतात सांगायला लावतात, फोन पण तेच करायला लावतात. मागच्यावेळी म मां नी ती गेस्ट आलेली वाशीहून तिच्याशी ओढूनताणून शिव वीणा विषय काढला. मग आवडतंय म्हणून करा असं एकीकडे सांगतात आणि शिवने एक वैयक्तिक task नीट नाही केला फक्त. बाकी त्याचा फोकस कुठे हललाय. तो ज्या टीममध्ये असतो त्यांच्याशी प्रामाणिक असतो.
जिंकायला तोच हवाय. नेहा केळकर शिवानी नको.
नचिकेत, बॉबी छान वाटले.
नचिकेत, बॉबी छान वाटले. शिवानी, नेहाची पत्रे छान होती. सॉरी फॉर पर्सनल कमेण्टस, पण शिवानीच्या पत्रावरुन थोड थोड कळल की ती अशी विचित्र का आहे ते.
प्रिकॅप एपिक होता.
बिचुकले गेम खेळायला लागला हा, जाम काड्या टाकतो. त्या हिनाशी फार फिजिकल होतो, किळस वाटते बघायला. >>>>>>> अरे देवा, का आणल ह्याला परत?
सुरुवातीपासूनच बघायला मिळाल नाही. मी हिना विणाला थॅन्कयू म्हणते तिथून बघायला सुरुवात केली.
आरोह- शिवानी- नेहा नक्की काय बोलत होते?
विणा आणि हिनाच काय भाण्डण झाल? केळकर काय म्हणाला ह्यावर? दोघीन्च पॅचअप कस झाल?
आरोह- शिवानी- नेहा नक्की काय
आरोह- शिवानी- नेहा नक्की काय बोलत होते? >>> मी आज बघितला तो शॉट. नेहा म्हणाली दुसरा चान्स मिळाला असता तर मी हिनाला वाचवलं असते असं मला तुम्हाला सांगायचं आहे, तर आरोह थोडा नाराज झाला पण शिवानी बाईसाहेब तुच्छतेने म्हणाल्या की माझ्या लिस्टमध्ये हीना कुठेही नाही. जाम मग्रुरीत हे वाक्य बोलली.
विणा आणि हिनाच काय भाण्डण झाल? केळकर काय म्हणाला ह्यावर? दोघीन्च पॅचअप कस झाल? >>> कपडे धुण्यावरून झालं. हीना फुल टू भांडायच्या मूड मध्ये होती, वीणाने कॅप्टनला मध्ये आणून तिचा पार कचरा केला.
हिनाची आई साधीसुधी वाटली पण हीना जिथे मिळेल तिथे वाद घालायला पुढे असते.
शिवानी आणि बिचुकलेंकडून हवा
शिवानी आणि बिचुकलेंकडून हवा असलेला टीआरपी बिबॉसला मिळाला नसावा,म्हणून परत गाडी शिव आणि वीणाकडे आली
आज जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राच लक्ष आजच्या भागाकडे लागल आहे ,कारण काय तर शिवची आई वीणासोबत कस वागते,काय बोलते,
बर एक कोणी नोटिस केल का,की हे मागच्या वेळीही झाल नव्हत,फक्त एकट्या शिवच्या घरातले दोन सदस्य बिबॉसने बोलावले,
केळकरची मुल अर्थात एकटी येऊ शकणार नाहीत म्हणून बायकोलाही आणल
पण शिवची आई आणि ताई दोघही.
किती टीआरपी मिळत असेल देवाला माहित
पण सध्या त्या घरात एकच नाव ऐकायला येत आहे
वीणा आणि त्यामुळे शिव.
बघितला प्रोमो . मस्त झापलं
बघितला प्रोमो
. मस्त झापलं आहे शिवला. पण तो एकटाच वीणाच्या बाजूने भांडत नाही, वीणाही त्याची बाजू घेते, त्याला कोणी बोललं तर रडते.
घरातल्यांना जाम काळजी वाटतेय की, अशी उद्धट उर्मट मुलगी आपल्या घरात आली आणि शिवने सतत तिच्या मागे मागे केलं तर कसं होणार.
ह्यावरून एक आहे मात्र. शिव trp देतोच, त्याच्या घरच्यांनी पण सॉलिड trp मिळवून दिला bb ना. खरंतर तोच जिंकायला हवाय.
आता वीणाची आई काय सांगते बघूया, तिलाही हे पटत नसणार.
https://twitter.com
https://twitter.com/LdUacgsI4LLLwSh/status/1156931029782999040?s=20
शिवचा हा एक sweet video.
शिवच्या बहिणीचा आवाज ऐकून
शिवच्या बहिणीचा आवाज ऐकून वैशालीची आठवण आली!
शिवचा हा एक sweet video......
शिवचा हा एक sweet video......।
हा काय खरच प्रेमात पडला आहे की काय वीणाच्या,तस असेल तर मग मात्र ताईचा सल्लाही वाया जायचा.
रड्या अभिजीतला रडताना पाहिलं
रड्या अभिजीतला रडताना पाहिलं की रड्या सुशांतची आठवण येते, सेम रडतात दोघेपण.
घरातल्यांना जाम काळजी वाटतेय
घरातल्यांना जाम काळजी वाटतेय की, अशी उद्धट उर्मट मुलगी आपल्या घरात आली आणि शिवने सतत तिच्या मागे मागे केलं तर कसं होणार.
<<
अन्जु जाम लोड घेतेय
घरच्यांना सुध्दा माहित असतील त्याच्या स्ट्रॅटेजीज , रोडीजमधेही अशीच कोणी पकडली होती म्हणे शिवने टेंपरर्री फेक गर्लफ्रेंड , ट्विटर वरून समजले.
हो का ? इंटरेस्टिंग! बघताना
हो का ? इंटरेस्टिंग! बघताना जेन्युइन वाटतो अगदी. असे असेल तर खरंच बडा खिलाडी आहे शिव.
BB कोणी बघतेय का, टेक्निकल
BB कोणी बघतेय का, टेक्निकल prblm झालाय का, कित्ती वेळ, कलर्सच्या सिरियल्सचे प्रोमोज दाखवतायेत, तेच तेच मोठे.
का आमच्याच tv वर असं दिसतंय
आता झालं सुरू. पण प्रोमोज
आता झालं सुरू. पण प्रोमोज खूपच वेळ दाखवले.
हो झालं सुरू.
हो झालं सुरू, थँक्स.
रोडीजमधेही अशीच कोणी पकडली
रोडीजमधेही अशीच कोणी पकडली होती म्हणे शिवने>>> पकडली न्हवती, त्याला आवडायची. राखी नाव होतं, नेहाच्या गँगमध्ये होती.
अरे पण अनकट मध्ये सांगितल आहे
अरे पण अनकट मध्ये सांगितल आहे त्याने हिनाला की त्याच 9वर्ष एका मुलीबरोबर अफेअर होती,त्यानेच ब्रेक केल कारण तिला लग्न करायच होत आणि त्याला करियर करायच होत
दरम्मान कोणीतरी वेता मेहता नावाची पण कोणी गर्लफ्रेंड होती
हे सगळ या 9वर्षांच्या काळात होत का?
शिवच्या ताई,टाळी एका हाताने वाजत नाही.....।हा.हा
काय झाल मग,शेवटी बांधली का
काय झाल मग,शेवटी बांधली का एकदाची राखी वीणाला?
रोडीजच नाव वर आल म्हणून सहजच पडलेला प्रश्न
रोडीज आणि खतरों के खिलाडी मध्ये फरक काय?
मी दोन्हीही पाहात नाही,पण ऐकल आहे बरच.
शिव च्या घरच्यांनी खरंच खूप
शिव च्या घरच्यांनी खरंच खूप इंटरटेन केलं . पण सारखा विणापासून दूर राहा सांगण्याचा पराकोटीचा प्रयत्न चालू होता ते पटलं नाही. त्यांनी छान confort झोन शोधलाय तर राहू देत ना त्यांना सोबत. रोडीज विनर आहे तो दुधखुळा थोडाच आहे.
विणाच्या आईने मस्त झापले
विणाच्या आईने मस्त झापले शिवणीला कलेजेमे थंडक . बरोबर बोलल्या की तुला पर्सनल कंमेंट ने त्रास होतो तर बाकीच्यांना नाही होणार का. तिने तर ऐटीत विनाकडून माफी मागून घेतली तिच्या parents ची आणि स्वतः कधी कुणाला सॉरी म्हणत नाही.
रोडीजमध्ये चार ते पाच गॅंग
रोडीजमध्ये चार ते पाच गॅंग लीडर असतात,प्रत्येक लिडरची टीम असते, टीममध्ये पाच रोडीज असतात, त्यांचे आपापसात टास्क होतात, रोडीजमध्ये व्होटआऊट असते ज्याला जास्त व्होट मिळतात तो घरी जातो, त्यामुळे एखादा स्ट्रॉंग रोडीजही बाद होऊ शकतो,सोबतीला भांडणं वैगरे होतात. खतरो के खिलाडी मध्ये फक्त टास्क होतात जो हरला तो घरी, इथे टीम गॅंग लीडर अशी काय भानगड नसते.
बोकलत......thanx
बोकलत......thanx
रोडीज विनर आहे तो दुधखुळा
रोडीज विनर आहे तो दुधखुळा थोडाच आहे.>>> शिव सेमी फायनलिस्ट होता, विनर नाही तो.
शिव सेमी फायनलिस्ट होता, विनर
शिव सेमी फायनलिस्ट होता, विनर नाही तो. >> ओके मला वाटलं विनर होता . खूप सुरुवातीला रोडीज बघायचे.
धमाल आली. आज राधा मल्हार,
धमाल आली. आज राधा मल्हार, शिव आई बहीण आणि वीणाची मम्मा सर्वांनी मस्त trp दिला.
राधा मल्हार गोड आहेत खूप आणि मल्हार smart आहे. बिचुकले मस्त खेळतो असं बोट दाखवलं त्याने विचारल्यावर. सर्वांची नावं पाठ दोघांना. तेव्हा केळकर अजिबात रडला नाही, मुलं रडत होती. पण त्याच्या बाबांचा व्हिडीओ दाखवल्यावर जाम रडला.
शिवच्या आईने आणि बहिणीने जाम प्रेशर टाकलं त्याच्यावर, फोकस्ड होतोय का बघूया. वीणाला अजून भेटायचं होतं दोघींना, bb खडूस आहे एक नं. केळकरच्या बायकोला पण भेटायचं होतं सर्वांना, नाही दिलं नीट भेटू.
वीणाची मम्मा एकदम तडकफडक बोलणारी आणि बिनधास्त आणि strong वाटली. शिवानीची जी काही तासडलीना की बास रे बास आणि रूपालीला पण योग्य सुनावलं. वीणा तिच्यासारखीच आहे पण हळवी आहे थोडी, आईइतकी strong नाही वाटत.
राखी वगैरे वीणासाठी नव्हती, शिवच्या बहिणीने शिवला बांधली, आता रक्षाबंधन येणार म्हणून. प्रोमोत उल्लू बनवतात
. चांगले मित्र आहात तसेच राहा, सगळ्यांबरोबर रहा असं सांगितलं वीणाला आणि शिवला सांगत होते जरा नीट वाग, लहान मुलं शो बघतात etc. मनापासून हादरलेत बहुतेक. वीणाला अमरावतीला यायचं आमंत्रण दिलं बहिणीने.
वीणाची आई म्हणाली तुमचं आवडतंय बाहेर, तुम्ही मस्त वाटताय. कोणाचं ऐकायची गरज नाही. बाहेर आल्यावर मग बघू पुढे. हे घरातल्यांसाठी असेल सुनावणे पण तिला तेव्हा माहिती नसेल की शिवच्या घरी पसंत नाही हे.
वीणाच्या आईने किशोरीताईनची माफी मागितली ते बरं झालं, वीणा खूप बोलली होती. वीणाला पण चुकलीस तर माफी माग आणि बरोबर असले तुझं तर योग्य stand घे सांगितलं.
आता बघू पुढे काय होतं ते. शिव मनावर घेतो का. पण दोन्हीकड्च्यांची दोन टोकं वाटली. शिव वीणा मध्यममार्ग काढतात का बघूया.
वीणाच्या आईचा एकंदरीत अवतार बघितल्यावर, शिवच्या घरचे अजून धास्तावतील
किंवा bb नेच वीणाच्या आईला पढवून पाठवलं की काय शिव वीणा bonding बद्दल अशी शंका कारण ह्या दोघी आधी विरोध करून गेलेल्याना.
Btw ही वरची रोडीज मधली राखी
Btw ही वरची रोडीज मधली राखी आहे तिला कुठेतरी बघितलं आहे. मस्त आहे ती. हिंदी सिरीयलमध्ये होती का कुठल्या.
सो मि वर बऱ्याच जणांनी
सो मि वर बऱ्याच जणांनी वीणाच्या आईच्या attitudeला विरोध केलाय. शिवची आई एकदम साधी, त्याला योग्य सांगत होती पण वीणाच्या आईला आपल्या मुलीची चूक दिसली नाही असं होतं एकंदरीत.
शिवानीची तासडली वीणाच्या आईने ते मला आवडलं खरंच कारण शिवानी ज्या attitude मध्ये सुनावत होती एकंदरीत वीणाला पूर्वी, ते तिला returned, तिच्याच शब्दात मिळालं.
शिवची आई फार साधी आहे पण मत ठाम आहे तिचे, अर्थात मुलाने नको नको म्हणत असताना bb मध्ये भाग घेतलाय तर फोकस्ड असावं हे त्यांचे म्हणणे काहीही चुकीचं नाही. पण शिव जास्त पाठीमागे असतो वीणाच्या, आता वीणा गुंतली उशिरा त्याच्यात पण तो आधीपासून गुंतलाय. अर्थात हे सर्व scripted आहे असं काही जणांचे म्हणणे आहे, तसं असेल तर आपण प्रेक्षक मूर्ख आहोत
जर हे सर्व scripted नसेल तर वीणाच्या आईने शिवच्या आईला जे वाटत त्याचाही रिस्पेक्ट करावा. सर्वांनी telecast झाल्यावर बघितलं असेल. शीवच्या आईबहिणीला काय म्हणायचं आहे आणि वीणाच्या आईला ते त्या लोकांना पण telecast झाल्यावर समजलं असेल.
वाणाची आई मराठी नाहीये का?
वाणाची आई मराठी नाहीये का?
विणाची आई मराठी नाहीये का?
विणाची आई मराठी नाहीये का? वेगळंच मराठी बोलत होती
वीणाची आई सिंधी आहे.
वीणाची आई सिंधी आहे.
Pages