तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच झटपट लग्न बुवा.. एवढ्या मोठ्या बिजनेसवुमन चं लग्न असं गुपचूप? ऑफिसमधल्यांना माहित नाही, कोणी बाकीची फॅमिली नाही, मित्रपरिवार नाही. दादासाहेबांना आता एकदम कळलेय की चाळीत राहणार? तो सीन तर म्हणजे अगदी कहरच होता. मुलाची इतकी साधी चौकशी पण नसेल केली का? कुठे राहतो वगैरे. एका रात्रीत सुभाची वाणी पण सुधारली. काल अचानक शुद्ध बोलत होता. सगळंच अचाट आहे.

ती ऑफिसमधे एकदम डायरेक्ट सगळ्यांना हे माझे मिस्टर ओळख करून देते ते पण विचित्रच. वाडेकर मॅडम पण असतात ना यांच्याकडे आधीपासून? त्या नाही दिसल्या ते?

'अश्रूंची झाली फुले' चा भावे प्रयोग पाहिल्याचे स्टेटस अपडेट फेसबुक वर येऊ लागलेत. मालिकेचे उरलेले शूटिंग उसैन बोल्ट च्याच स्पीडने संपवून सुबोध भावे दौऱ्यावर निघून गेला असावा.

याची शंका परवा आली होती जेव्हा लाल्या स्टाईल मध्ये झेंड्याबरोबर चहा आणि वडापाव खाताना चा सीन आऊटडोअर न घेता सेट वर घेतलेला पाहिला होता.

आता तर नन्दूने कहरच केला. अस एका दिवसात कुणाला सीईओ बनवता येत का? एवढच वाटत नवर्याविषयी तर घर सोडून राहा म्हणाव त्याच्याबरोबर चाळीत. स्वतःचा बिझनेस सुरु करुन दाखव.

कालच्या एपिसोडवरुन अभिताभ- अक्षय कुमारचा एक रिश्ता (२००१) आठवला. अभिताभ हा श्रीमन्त उद्योगपती असतो. अक्षय कुमार आणि जुही चावला त्याची मुले असतात. मोहनीश बहल त्यान्च्या कम्पनीत एम्पलॉयी असतो. तो जुहीशी प्रेमाच नाटक करुन लग्न करतो, घरजावई बनतो. अक्षय कुमार त्याला कुठल्या तरी प्रोजेक्टवरुन सुनावतो. त्याला मोहनीशच त्यान्च्या बिझनेसमध्ये अति इन्टरफिअर करण आवडतन नसत. अक्षयच वागण बरोबर असत. सो, मोहनीश जुहीकडे त्याची चहाडी करतो. जुही रागावून ' ज्या घरात माझ्या नवर्याला मान नाही, त्या घरात मी राहणार नाही' बोलून त्याच्याबरोबर निघून जाते. मोहनीशच्या घरी आल्यानन्तर तिला त्याच खर रुप कळत. त्याच्यामुळे अमिताभचा बिझनेस बरबाद होतो. शेवटी मोहनीशच हदयपरिवर्तन होत, पण जुही त्याला शेवटपर्यन्त माफ करत नाही. ती कुठेतरी निघून जाते. हुश्श!

अरे काय चाललंय काय हे??????? >>>>>>>>> काय झाल स्वस्ति? Uhoh

मालिकेचे उरलेले शूटिंग उसैन बोल्ट च्याच स्पीडने संपवून सुबोध भावे दौऱ्यावर निघून गेला असावा. >>>>>>> म्हणूनच फ्लॅशबॅक सुद्दा उसैन बोल्ट च्याच स्पीडने पळतोय.

मंदिरात , लग्नाच्यावेळी सगळ्यात भारी एक्स्प्रेशन झेन्डेंचे होते . गपाच्या गप्पा ऐकुन ! >>>>>>>> अगदी अगदी Proud

सो, दासान्ची रिटर्न फ्लाईट यायला अजून अवकाश आहे तर. अस वाटल होत की गपा दासाला पेपरवेट फेकून मारतोय की काय. Lol

गपा दासाला पटवतो का त्याआधीच दासा ढगात जातात?

नन्दू केबिनमधून गेल्यावर गपा त्या खुर्चीत बाजीगरच्या शाहरुखप्रमाणे बसणार की काय अस वाटल होत. >>>>>>>> बसलाच शेवटी

सुलू मी नाही हो भविष्य सांगत Sad जगू दे बापडी केसांचा कापूस, दाताचे बोळके, पाठीची धनुकली होईस्तोवर ... >>>>>>> आ, कारवी मग गपाच्या प्लॅनच काय? Uhoh

नंदिनी नंदिबैलासारखी मान हलवते. >>>>>>>>>> कारण तिला माहितीये की आपला पुनर्जन्म कुणाच्या घरी होणार आहे ते.

सुलू आदर शतगुणित..... सगळी इंद्रिये एकवटून बघणार्‍या तुम्ही एकमेव. असं काही वाजतय आणि ते एकच आहे हे जाणवतं तुम्हाला??????????? >>>>>>>>> त्याच काय आहे कारवी, आपला एक फण्डा आहे, वाईटातही चान्गल शोधायच. Happy

सूर आहेस की....
मौन आहेस तू.... का कळेना मला......
कोण आहेस तु ?
बोलक्या डोळ्यात दिसते.... ओठ मिटली शांतता... तुला पहाते रे.....गाण्यासाठी धन्स, अबोल. Happy एखादया व्हिलनची स्तुती करण्यासाठी कोणी गाण लिहेल अस वाटल नव्हत. बाकी सुभाचे डोळे आहेतच बोलके.

याला शितु ला भेटून अक्षरश ४ दिवस झालेत आणि सीईओ ????????
निदान मॅनेजर तरी बनवायचं की . >>>>>>>>> ++++++++१११११११११

शितु ला पाहयच म्हणून एक एपि पाहिला, ७ मीनीटे फक्त सहन करु शकले
पिवळा धगळ ड्रेस होता काहितरी
शितु ला ईबेबी सारखा सपक, सपाट मेकप केलाय आणि ती थोराड दिसतेय

ईबाळ शितू चा पुर्न जन्म असावा यावर एक पुष्टी:काल दिवस भर.ऑफ़िस मध्ये वावरुन घरी येउन डिनर झाला तरी शितू चा एकच पिवळा ड्रेस अंगावर.

कंटिन्युटी च्या नानाची टांग: ऑफ़िस सीन मध्ये शितू च्या गळ्यात एकदम 20 rs वाल मंगळसूत्र.. नंतर सुपारी सुभाला देताना ते गायब..परत दासा सोबत बोलताना प्रकट झाल गळ्यात..

अरे काय चाललंय काय हे??????? >>>>>>>>> काय झाल स्वस्ति? >>>> हेच हेच सुलुताई जे तु लिहिलं आहेस .
याला शितु ला भेटून अक्षरश ४ दिवस झालेत आणि सीईओ ????????
निदान मॅनेजर तरी बनवायचं की .

कंटिन्युटी च्या नानाची टांग>> जे बात!!! हेच मला केव्हापासून लिहायचं होतं .. मी घाबरून लिहीत नव्हते .. एडिटर्स/डायरेकटर अजून कोणी असेल त्यांना शिव्या शिव्या शिव्या आणि X X X Angry Angry Angry :चिडचिड:
#कंटिन्युटीच्यानानाचीटांग सोबत #लॉगिकरानोमाळ

काल नंदिनी प्रोजेक्ट च्या रिपोर्ट ची फाइल घेऊन डासांना दाखवायला अली .. बोलून झाल.. उत्तर मीही उद्या ऑफिस मध्ये देईन असं म्हणून वरती जायला वळली .. आईसाहेबानी "राजनंदिनी " अशी आणि एवढीच हाक मारली पण तेवढ्यात वायुवेगाने जवळजवळ १५ ते २० पायऱ्यांचा जिना चढून नंदू वर जाऊन पोहोचली सुध्हा !!!! #कंटिन्युटीच्यानानाचीटांग काय एडिटर ची माया आहे .. काय कमाल आहे ... जोरा जोरात एडिटर च डोकं भिंतीवर आपटणारी बाहुली Angry

शिवाय जो पान -सुपारी चा डबा नंदू ने गपा ला वरच्या बेडरूम मध्ये दिला सेम टू सेम पान -सुपारी चा डबा खाली सोफ्यावर असा डासांना देत होत्या .. घरात जितकी जोडपी तितके सेम सेम पान -सुपारी चे डबे आणलेत वाटतंय यांनी ... होपलेस पणा Angry

आता तर नन्दूने कहरच केला. अस एका दिवसात कुणाला सीईओ बनवता येत का?>>अग एका दिवसात प्रेम आणि लग्न होत तर ceo करणं किस झाड कि पत्ती ...!!

शिवाय जो पान -सुपारी चा डबा नंदू ने गपा ला वरच्या बेडरूम मध्ये दिला सेम टू सेम पान -सुपारी चा डबा खाली सोफ्यावर असा डासांना देत होत्या .. घरात जितकी जोडपी तितके सेम सेम पान -सुपारी चे डबे आणलेत वाटतंय यांनी >> +1.. मला पण हे लिहायचं होत पण कंटाळला की बोर्ड

ऑफ़िस मध्ये वावरुन घरी येउन डिनर झाला तरी शितू चा एकच पिवळा ड्रेस अंगावर. >>>> हो ना , आणि आसा पण नेहमीसारख्या मेकप करून .
फक्त दासानी काय तो नाईट ड्रेस घातलेला.

गपा दासाला पटवतो का त्याआधीच दासा ढगात जातात?>>>>ढगात!! Biggrin Biggrin :खोखो

काल नंदिनी प्रोजेक्ट च्या रिपोर्ट ची फाइल घेऊन डासांना दाखवायला अली >>>> डासांना Biggrin Biggrin :खोखो
...... कासवछाप लावा
डासांना ढगात पाठवा Rofl
..... ष्टोरी ज्या वेगाने धावत आहे त्यावरून मला एक नर्सरी rhyme आठवली..
Solomon grundy born on monday,
Christian on Tuesday.....
आठवड्यात खेळ खल्लास!!

मरो .. एवढ्या फालतू चुका हे एवढे मोठे लोक करतात त्या चुका लिहिताना मी सुद्ध लिहायचा त्रास कशाला घेऊ म्हंटल . Wink
डास तर डास मरणारच आहे या आठवड्यात .. डासा मरतय !! Wink

@anjali_kool>>> मला दासा ऐवजी डासा एकदम भारी वाटलं... तसंही सुभा डास मारतात तसंच माणसांना मारतो आहे... तेव्हा डासांची गच्छंती अटळ आहे...
सुलूचे " ढगात" पाठवणे पण भारी होते.. म्हणून डासांना कासवछाप लावून ढगात पाठवायची कल्पना सुचली..
तुम्ही चुकून डासांना लिहिलेत हे माझ्या ध्यानीमनी पण नाही आले...
इथे फक्त तु पारे वर किती आणि कशी पिसं काढली जाताहेत एवढेच पहायला येते मी...
Rofl Rofl

एकूणात दिग्दर्शकाला (व पटकथाकाराला) शूट अ‍ॅट साईट च्या वरून ऑर्डर आलेल्या दिसतात. म्हणजे जे ज्या वेळी जसे कसेही अ‍ॅव्हेलेबल असतील तसे शूटींग ऊरकून टाका. अशा वेळी कंटीन्युईटी वगैरे बघायची नसते. असेही या मालिकेत अख्ख्या हत्ती मध्ये कंटीन्युईटि नव्हती ती शेपटात कशी येईल? Proud
रच्याकने: 'भयमूल्य' यादीत, मित्रों नंतर 'सर' चा क्रमांक लागतो. Proud

मला दासा ऐवजी डासा एकदम भारी वाटलं... तसंही सुभा डास मारतात तसंच माणसांना मारतो आहे... तेव्हा डासांची गच्छंती अटळ आहे...>>>> Biggrin Biggrin Biggrin

एकूणात दिग्दर्शकाला (व पटकथाकाराला) शूट अ‍ॅट साईट च्या वरून ऑर्डर आलेल्या दिसतात. म्हणजे जे ज्या वेळी जसे कसेही अ‍ॅव्हेलेबल असतील तसे शूटींग ऊरकून टाका>>+1.. आज ही संपाच बोलायला युनियन वाला परांजपे आणि दासा ना बाहेर भेटला..ऑफ़िस मध्ये नाही.. तो असाच सेट वरचा आउटडोअर शूट वाटला..ऑफ़िस मध्ये सुभा चे सीन घ्या..बाकीचे उरले सरले कुठेही वाटेत..कोपर्यात..अस चालल आहे प्रकरण.. आणि आज रान ला मोबाइल गीफ़ट दिला सुभा ने..मला आधी वाटल परत काय तन्मणी..बॉक्स तर.दागिन्यांचा वाटत होता..

मोबाईल होता का तेव्हा. शितूच्या ऐवजी वर्षा ऊसगावकरला तरी घ्यायचं, निदान मेंटेन केलंय तिने स्वत:ला. ती सुभापेक्षा वयाने मोठीही वाटली असती.

देवळातले गुरूजी नवीन "जोडप्यांना" आशीर्वाद म्हणतात. जोडपे एकच असते तेथे पण. हे आदरार्थी वगैरे आहे का? Happy

दादासाहेबांचे घर मशीद कन्व्हर्ट केल्यासारखे का दिसते आतून? त्या निळ्या व तपकिरी बॅकग्राउण्ड वर उभे असलेले दादासाहेब आधी दिसतच नाहीत. तो सगळा सेटप एखाद्या इलेक्ट्रॉनिक गेम सारखा दिसतो. मग दादासाहेब एकदम हलले/बोलले की टर्मिनेटर २ मधल्या फ्लोअर सीन सारखा भास होतो.

फारेंड, LOLLLLL
परवा रा.नं चा ड्रेस तसल्रंच भरतकाम केल्यासारखा दिसत होता. तीही मर्ज झाली होती थीम मधे.
अंबाबाईवाली बाई पिढीजात दिसतंय. तिच्या मुलीचा कायतरी लोचा आहे असं वाटतंय. पण मुलगी स्मार्ट आहे त्यामुळे "तीच" इशा किंवा तिची भन असू नये.

जुनं परांजपे मस्त आहे. मोठ्ठं झाल्यावर आताचं परांजपे असेल तसंच दिसतं.

मला ते अंबाबाई वालं मुझीक खूप आवड्तं आता काहीतरी व्हनार व्हनार असा फील येतो. तो एक पीस मस्त आहे.

असे सीइओ होत अस्ते तर काय हवे होते. एक तर प्रेम अर्धे कच्चे, प्लस लग्न पण भिकार पद्धतीने. अस्या उद्योग पतींच्या मुलांच्या लग्नात किमान चार रिसेप्शन्स होत असतात. मी १९८६ पासून असली लग्ने अटेंड करतेय. व दोन दिवस नाही झाले तर एक प्रपोजल चेअर्मन ने बघितले नाही म्हणून
इसाळ्याने लगेच राजिनामा देउन नवर्‍याला सी इ ओ?

अरे बोर्ड मीटिन्ग वगिअरे माहीत नाही काय?

लगे च झेंडे ला पण जॉब लागला.

रानं व इशाचा आयक्यू एकच दिसतो आहे. भंपक बोट.

दागिन्यांच्या बॉक्स सारख्या दिसणार्‍या बॉक्स मधला मोबाईल कोणा कोणाला दिसला?...
मला तर नाही बाई दिसला!!!
त्या काळातील मोबाईल प्रेक्षकांना नाहीच दाखवला...
... Proud Proud :

Pages