तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Biggrin
सगळ्या कमेंट्स लोल!
स्नेहलता....!!!! Lol
बाय द वे, ते विस ने (दुसर्‍या!!) लग्नात मारे ब्रेसलेट घेतलेलं.. मीही मंगळसूत्रा सारखं घालीन म्हणून...ते तर काही दिसलं नाही नंतर?

बाय द वे, ते विस ने (दुसर्‍या!!) लग्नात मारे ब्रेसलेट घेतलेलं.. मीही मंगळसूत्रा सारखं घालीन म्हणून...ते तर काही दिसलं नाही नंतर? >> पी एन जी वाल्यांनी भाड्याने दिलं नसेल Biggrin

किती सावळा गोंधळ असावा , सख्ख्या मुलीचं लग्न इतक्या साध्या पद्धतीने आणि जो जावई आहे - तोही फ्रॉड - त्याचं आणि बाळाचं लग्न मात्र एकदम दणक्यात.

विक्रांत नाव का दिलं ह्याचा शोध काल लागला.

दासा मुलीपुढे इतके नमले की जावई चाळीत राहतो हेही त्यांना माहीत नसावं ?

दासा एका एपिसोड मध्ये स्नेहलता का कायसे म्हणाले आसांना.>> हो ना! पण नेमकं इलेकशन कार्डावरचं नाव नव्हतं दाखवलं ..
बिटवीन इलेकशन च्या त्या लिस्ट वर गजा चं वय ३९ आणि जयदु च वय ३७ दाखवलं होतं .. पण इथे प्रत्यक्षात तर बरंच दिसतंय अंतर .. अहो डायरेकटर साहेब आणि एडिटर साहेब जरा तरी ताळमेळ असलेलं दाखवा हो ... एवढ्या फालतू चुका करता येत असतील तर मी पण होऊ शकेन डायरेकटर .. Angry Angry Uhoh
कालचा पूर्ण एपिसोड होपलेस होता .. एकदम सुपर फास्ट फॉरवर्ड टाईप ... "भेटलो, वडापाव खाल्ला, गप्पा मारल्या, प्रेमात पडलो, घरी गेलो, लग्न केलं ... ...अरे मला लिहायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा फास्ट झालं लग्न ... आणि अगदी टिपिकल संवाद तू चाळीत कशी राहणार ? काळ्या पिवळ्या टॅक्सी ने कशी जाणार ? अहो दासा , परवा कार चं टायर फूस झालं तेव्हा तर रिक्षा केली होती ना तिने !? मग टॅक्सी ने गेली तर प्रॉब्लेम काय आहे ? आणि हे सगळे प्रश्न आणि चर्चा असं लग्न करून सासरी निघाली मुलगी कि मग करायच्या असतात का ?कालची रात्र होती ना सगळं समजवायला ..
आपण कितीही डोकं फोडलं तरी ह्यांच्या पालथ्या घड्यावर पाणीच !!

दासा मरतंय बहुतेक येत्या आठवडय़ात!!!>>> मरतंय!! Rofl Rofl
बा केड्या, हात जोडून प्रार्थना रे... चांगलं पटेल असं काहीतरी लीहशील ना!!!>> अगदी माझ्या मनातलं ..

विक्रांत नावाचं काय? का दिलं ते नाव.>> त्या तुला पहाते रे पुस्तकात नायकाचं नाव विक्रांत आहे असं ती सांगते .. मला खूप आवडलं हे नाव आणि प्रेमकथा वगैरे .. तर गपा म्हणतो मग पण माझं नाव ठेऊया / बदलूया आणि विक्रांत करूया .. तुम्ही बायका बदलता नाव लग्नानंतर आपण नवा पायंडा पडू नवऱ्याने नाव बदलायचा वगैरे वगैरे ..
गपा म्हटलं कि मला सारखं हपापा चा माल गपापा हीच म्हण आठवते Happy Lol

गोष्ट येता एक हाती
वाट तिची लाऽविली
वेगळे सूडनाट्य
वेगळा सापळाऽऽ
कोण जाणे निर्मात्याचा
खेळ आहे हा कसा
छळ मांडिला असा हा
का पाहशी प्रेक्षका
का पाहतो रे

पाहिले काय सुभाने
कथेत वा ईशात
राहता राहिली
इतर पात्रे ही अशी
पाहताना वाटतो हा
कचरा फक्त हाती
वैताग आम्हा दिला ज्याचे
नाव आहे केऽड्याऽऽ
का पाहतो रे
प्रेक्षका का पाहतो...
- अवल

मी मूळ सिरिज बघत नाही. पण आई बघते, मग कानावर पडत रहातं. इथली चर्चा मात्र नेहमी वाचायचे. सगळेच अफलातून लिहितात इथे. खुप मजा आली. सो या चार ओळी तुम्हा सगळ्यांसाठी Happy

नाव मिळालं पण आडनाव पण का दिलं ते क्लीअर नाही झालयं अजून. झेंडे पण शिफ्ट झाला का विसा बरोबर पाठराख्या म्हणून Lol

नाव मिळालं पण आडनाव पण का दिलं ते क्लीअर नाही झालयं अजून>> तेच ते .. लग्नानंतर नवऱ्या मुली ऐवजी त्याने स्वतःच संपूर्ण नाव बदललं असणार .. "विश्वास " मिळवण्याच्या नावाखाली . पण दासांना आता याने लबाडी केली हे कळलं आहे . सो मला वाटतंय त्यांनीच हे ठरवलं असणार कि काही झालं तरी विक्रांत सरंजामे च्या नावाने इस्टेट करायची नाही .. विक्या उगाच शेंड्या लावतोय मीच सांगितलं असं करायला वगैरे ..
अवल >> विडंबन एक्दम अव्वल !! Happy अक्षरश: कचरा फक्त हाती...

@अवल >>>> lyrics अप्रतिम... धागा followers च्या मनातील खदखद व्यक्त करणारी अचूक शब्दरचना

एवढ्या फालतू चुका करता येत असतील तर मी पण होऊ शकेन डायरेकटर ..>>>>seriously, चालतंय की..जाऊया लगेच.. मी पण येईन ;तुमची सहाय्यक दिग्दर्शिका बनून!!! चलोsss

मला घेता का एडिटर म्हणून? पण आता शेवटाला बनू नका दिग्दर्शक, सहा दिग्दर्शक, वैतागलेल्या लोकांकडून पिटाल उगाच, ज्यांनी पाप केलय ते मजेत राहतील.

Happy अरे वा अवल पण ?? मस्त आहे .... निष्कर्ष-गीत

दासा मरतंय बहुतेक येत्या आठवडय़ात!!! >>>>>
खरे की काय? लग्नानंतर २च दिवसात? जावया चा पायगुण बरा नाही.
मग राजनंदिनीचा नंबर १२ तारखेला महएपिसोडमध्ये? अष्टमी आहे त्यादिवशी.

मला घेता का एडिटर म्हणून? >> लग्गेच .. सुषमा ताई तुम्ही पण !! माबोवरचे सगळे पात्र आहेत
पण आता शेवटाला बनू नका दिग्दर्शक, सहा दिग्दर्शक, वैतागलेल्या लोकांकडून पिटाल उगाच, ज्यांनी पाप केलय ते मजेत राहतील>> अज्जीबात नाही उलट दाखवून देता येईल ना कि लॉजिक म्हणजे काय असतं आणि वयातल अंतर लोकं मोठे झाले तरी तेवढंच राहतं .. एडिट करताना चुका बघायच्या असतात .. निदान त्या नजरेत येणार नाहीत असा काहीतरी जुगाड करावा हे दाखवता येईल .. कपडेपट तर सगळ्यांचा बदलायला हवाय ..गेला बाजार दिवसभर घातलेले कपडे रात्री झोपताना बदलायचे हे तरी आपण नक्की करू ... अजून बऱ्याच गोष्टी आहेत .. आणि मग त्यामुळे निदान उरलेली शिरेल तरी सुसह्य होईल .
मग राजनंदिनीचा नंबर १२ तारखेला महएपिसोडमध्ये? अष्टमी आहे त्यादिवशी.>> अग थांब ... अजून तिला प्रेग्नन्ट व्हायचंय .. (बहुतेक ) म्हणजे तसं विक्या परवा बोलला ना ? ते खरं असलं तर ..

मग राजनंदिनीचा नंबर १२ तारखेला महएपिसोडमध्ये? अष्टमी आहे त्यादिवशी.>> अर्थात लग्नाचा स्पीड बघता ती लगेच उद्या प्रेग्नन्ट होऊच शकते म्हणा ... निदान पाटी तरी दाखवा .. अमुक महिन्या/वर्षानंतर ... Angry :चिडचिड:

आ.सां च खरं नाव कोणाला कळलं का??? >>> दासा एका एपिसोड मध्ये स्नेहलता का कायसे म्हणाले आसांना. >>> बरोब्बर !
आणि दासा च्या पहिल्या बायकोचे नाव अरुन्धती .
जालिन्दरच्या कंपनीच नाव सांगा आता Happy

अवल परफेक्ट

गजनी, गजराज. Rofl

झटपट प्रेम, झटपट लग्न ? मधल, दासाचा विरोध, रडारड, विरह, गपाच दासाला पटवण, आसाच दासाला पटवण, मग लग्न अस काहीच नाही. आजचा काळ झटपट प्रेम ते झटपट ब्रेकअपचा आहे. ९० च्या काळात प्रेम इतक फास्ट नव्हत.

अजून बऱ्याच गोष्टी आहेत .. >>>>>>>>> हम्म मेन नायिकेचा चेहरा बदलायचा आहे .

मग राजनंदिनीचा नंबर १२ तारखेला महएपिसोडमध्ये? अष्टमी आहे त्यादिवशी. >>>>>>>> कारवी, तुम्ही भविष्य ( ज्योतिष) चान्गल सान्गता.

लग्नानंतर नवऱ्या मुली ऐवजी त्याने स्वतःच संपूर्ण नाव बदललं असणार >>>>>>>>>> घरजावयाच संपूर्ण नाव मुलीने बदलल हे दासाला कस चालल?

गपा म्हटलं कि मला सारखं हपापा चा माल गपापा हीच म्हण आठवते >>>>>>>>>>>> मलाही. नाहीतरी गपा सरन्ज्याम्याचा माल हपापाच करणार आहे.

नन्दूच्या खोलीत आणि नन्तर ऑफिसमध्ये, गपाची नजर अधाशासारखी फिरत होती, नन्दूच्या बोलण्याकडे त्याच लक्षच नसत ते सुभाने परफेक्ट दाखवल.

नन्दू केबिनमधून गेल्यावर गपा त्या खुर्चीत बाजीगरच्या शाहरुखप्रमाणे बसणार की काय अस वाटल होत.

दासाचा खुन होणारेय वाटत आज.

जालिन्दरच्या कंपनीच नाव सांगा आता>> यशोदा का बहुतेक ? >> करेक्टे !
नन्दूच्या खोलीत आणि नन्तर ऑफिसमध्ये, गपाची नजर अधाशासारखी फिरत होती, नन्दूच्या बोलण्याकडे त्याच लक्षच नसत ते सुभाने परफेक्ट दाखवल. >>> अगदी अगदी .
मंदिरात , लग्नाच्यावेळी सगळ्यात भारी एक्स्प्रेशन झेन्डेंचे होते . गपाच्या गप्पा ऐकुन !

यशोदा का बहुतेक ?>>>>बरोबर आहे पण स्पेलिंग yashodha(धा)...
साउथ इंडियन स्टाइल...
जालिंदर हे नाव पण दाक्षिणात्य आहे का?...

हपापाचा माल गपापा >>>> Rofl

स्वस्ति तुम्ही काय तुपारे MCQ विचारताय....?
Happy लोकांनी कंटाळून आपला जीव रमवायला सुरूवात केली, यांचे भयाण मनोरंजन पाहून !! माणसे बघवत नाहीत तर आजूबाजूचा परिसर / पाट्या बघा

सुलू मी नाही हो भविष्य सांगत Sad जगू दे बापडी केसांचा कापूस, दाताचे बोळके, पाठीची धनुकली होईस्तोवर ...
सुषमाताई म्हणाल्या दासांची रिटर्न फ्लाईट या आठवड्यात म्हणून त्यानंतरची अष्टमी पाहिली तर १२ तारखेला निघाली. तुपारेवालेच अष्टमी अष्टमी अष्टमी घागर फुंकत असतात जेव्हा तेव्हा.

गजराज , गजनी Happy छान आहेत नावे.
गजानंदी पण चालेल -- गजा समोर नंदीबैलासारखी / ब्रह्मानंदी असते तसे गजानंदी

काल मलाच राहवले नाही म्हणून लोकाग्रहास्तव थोडा भाग पाहिला. काहीतरी यशोदा वाल्यांनी मेहतांबरोबर "टाय अप" केले आहे आणि त्यामुळे सरंजामेंबरोबरचे तसेच कसलेसे टाय अप - जे आधी केले होते- ते म्हणजे फ्रॉड होते असले काहीतरी बिझिनेस लॉजिक होते. आता हे टाय अप म्हणजे फक्त तुमच्याबरोबरच काम करणार, इतर कोणाबरोबर नाही अशा exclusive टाइप चे होते त्याची कल्पना नाही. आधीचे भाग पाहिले नाहीत. दोन कंपन्यांबरोबर टाय अप करण्यात काय प्रॉब्लेम आहे समजले नाही.

पण खरी गंमत त्यातला सस्पेन्स घरगुती पद्धतीने कसा सोडवण्यात येतो याची आहे. एका कंपनीने तुमच्याबरोबर केलेले कॉण्ट्रॅक्ट जर पाळलेले नाही अशी तुम्हाला शंका येत असेल, तर तुमचा वकील त्यांना प्रश्न विचारतो. उत्तर समाधानकारक आले नाही तर लीगल केस होते. पण ती झाली प्रोफेशनल पद्धत. तुपारे घरगुती पद्धत म्हणजे तो मेहता जेव्हा जालिंदर ला भेटायला येणार आहे बरोब्बर तेव्हाच तेथे जाउन आडोशाला उभे राहून त्यांना रंगे हाथ पकडायचे. आणि त्यांना स्पष्टीकरण देउ न देता तुम्ही दोघे इथे भेटत आहात म्हणजे नक्कीच तुम्ही फ्रॉड करत आहात असे ठरवून तेथून एक डेअरिंगबाज डॉयलॉग मारून स्लोमो मधे एक्झिट घ्यायची.

कोणालातरी "टाय अप" हा शब्द नव्याने समजल्याने तो 'कूल' वाटून त्याचा वापर सतत करतात तसा तो पेरला आहे जेथे तेथे.

धन्स अंजली, बघितला तो एपि रिपिट. विक्रांत नविन नाव कसे धारण करतो ते फारच विनोदी आहे. नंदिनी नंदिबैलासारखी मान हलवते. पुभामध्ये तो म्हणतो की मी आता सरंजामेपण होतो. जयदीप बोलवायला जातो तेव्हा ती जिन्यामध्येच उभी असते वाट बघत की कधी हाक मारतात. किती भयाण कपडे घालते राजनंदिनी.
पाठराख्या Rofl

पाठराख्या.. Rofl

बाकी, नंदू व गजा ची रीक्षा भेट पासून ते थेट विक्रांत शिफ्ट... किती तो वेग...? हे म्हणजे वीस षटके वाट न बघता, डायरेक्ट सुपर ओव्हर..! तर्कसंगत लिहायचे व दाखवायचे नसेल तर एक एपिसोड देखिल पुरे आहे हे यांना माहित होते तर अख्खी मालिका १३ भागातच संपवायला हवी होती. ऊगाच ते तेलाचे डबे, पोळीचा लाडू, चकल्या यात वेळ घालवला. Happy ऊर्वरीत सर्व मालिका एका आठवड्यात संपवू शकतील, मनात आणले तर! लवकर मुक्त करा प्रेक्षकांना..
आणि ईशा, शिल्पा यांचा दगड का माती खेळ सुरू असताना दासांनी तर चक्क प्रत्येक भागात अथ पासून इती पर्यंत ज्या एकाच टोन व एक्सप्रेशन मध्ये सगळे संवाद म्हटले ते पाहून खेळा मध्ये दगडगोटे पण अलाऊड आहेत हे पटले. Happy
कहाणी, कास्टींग, पात्रे, अभिनय, नक्की काय काय गंडलय हे कळेपर्यंत बहुतेक नविन मालिका येईल. एक ते तरूण परांजपे जरा शोधून मॅचींग करून आणले वाटते.

रच्याकने: सुभा या तरूण आवतारात जास्त बागडला असे वाटले. झेंडे मात्र तसाच..

Pages