तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वरच्या बर्याचश्या पोष्टीना अनुमोदन !! सुषमा ताई विडंबन एक नंबर ! मस्त !
किल्ली जेव्हा मला बालुशाही देईल ना .. Wink त्यातल्या मी तुम्हाला वाटेन सगळ्यांना .. मला नाही आवडत बालुशाही खूप ... Lol
झीम पार्टीला मी आहे ...... गुंड्याभाऊसारखी सोटा घेऊन... व्हेन्यू कळवा फक्त>> अगदी अगदी !! मी तर म्हणते बोलवाच आम्ही काढलेल्या पिसांच्या टोप्या घालतो तुम्हाला.. कसल्या फालतू फालतू चुका केल्या आहेत गेल्या ३-४ भागात .. एडिटर ,डायरेक्टर काय झोपा काढत असतात कि काय !? बघत नाहीत का एकदा एडिट केल्यावर आधी ?
वयाचं गुणोत्तर तर पार गंडलेलं दिसतंय .. सर्जेराव च वय तर अजिबातच नाही घेतलंय विचारात ..
आणि असे काय शेकड्याने लाडू वळायचेत का बोटं दुखायला .. एकदा सारण तयार असलं कि लाडू काय कोणीही वळून देईल .. त्यासाठी साचा !!?? चिवड्याचा सामान आणलंय म्हणजे बहुधा दिवाळी असावी .. कसली लाडे लाडे आणि सावकाश बोलते तोंडात काहीतरी ठेवल्यासारखी .. अजून तरी नाही आवडलं मला तिचं काम एवढं .. पण इशा पेक्षा बरंच म्हणायचं .. असो करा म्हणावं चुका .. मारतो आम्ही फटके

ज्याच्यात मिपा वरील निवडक प्रतिक्रिया छापूयात, कॅरिकेचर सहित. >>>>>> Happy प्रताधिकार भंग होईल अनुराज.... अ‍ॅडमिन मारतील.... बाकी माबो-तुपारे कुटुंब बाबत सहमत.

आणि असे काय शेकड्याने लाडू वळायचेत का बोटं दुखायला .. एकदा सारण तयार असलं कि लाडू काय कोणीही वळून देईल .. त्यासाठी साचा !!?? >>>>>>>>>>>>
!! लाडू वळून कोणाची बोटं दुखतात? लाडूही हसतील ऐकले तर !!
समस्त घरगुती लाडू विकणार्‍या बायकांनी कपाळाला हात लावला असेल.
आर्थ्रायटिस साठी चेकप करावा लागेल मग.... साचे आणण्याऐवजी. नाहीतर स्वतः वळावेत इतकी काळजी असेल तर.
लाडवांचे साचे? मोदक, डोनट, बिस्कीट, कटलेट, रांगोळीचे पाहिलेत.

नाही सुलू, मलातरी ती ४० अन सुभा ३५ चा वाटला काल त्या रिक्षात >>>>>>> तेच तर ना, वयाचा झोल कायम आहे.

दहा महीन्यानी ना >>>>>>>> ओह बरोबर अबोल. गलती से मिश्टेक Proud

जयदीप झालेला मुलगा सुभाचा धाकटा मुलगा आहे? >>> हो >>>>>>>>> धन्स अबोल. फार क्यूट आहे तो. Happy

आसा छान दिसतात पूर्वी, त्या गुलाबाच्या फुलासारख्या गोड. >>>>>>>>> ++++++++१११११११११

किल्ली, बालूशाही बॉक्स मलाही.

गेले दोन दिवस गजा पाटीलने धमाल आणली. एकदम कडॅक! झेण्डेसुद्दा मस्त!

जालिन्दरला पहिल्यान्दाच एवढ मनमोकळेपणाने हसताना पाहिल. बाकी त्याचा नन्दूवर क्रश ब्रिश आहे का? तिच्या सान्गण्यावरुन लगेचच गपाला नोकरी दिली?

गपा मुलखाचा आयतोबा आहे. त्याच्या कामचुकारपणामुळे एक दिवस जालिन्दर त्याला हाकलून देईल ऑफिसमध्ये, आणि हा पोहोचेल सरन्जामे इण्ड्रस्टीत.

शितु पहिल्या भागात आवडली नव्हती. पण जालिन्दरसमोर नन्दू कॉन्फिडण्ट वाटत होती.

ही बाई साचे वापरून लाडू बनवते , ती बेबी लाडवाच्या वड्या बनवते >>>>>>>> ते साचे बघताना विचार करत होते की ह्याच्याने लाडू कसे बरे बनवता/ वळवता येईल? Proud

स्टोरी फास्ट जातेय हे त्यातल्या त्यात चान्गलय. सध्यातरी गजाचा प्लॅन बघण्यात मजा येतेय.

सुषमाताई Lol

अनुराज, कारवी पुस्तकाची आयडिया मस्त. Happy

ते कूकी कटर्स , नंदूने लाडवांसाठी आणलेत ?????
ही बाई साचे वापरून लाडू बनवते , ती बेबी लाडवाच्या वड्या बनवते
अरे काय चाल्ल्लयं काय ????

.... मनापासून धन्यवाद .......

.... किल्ली, जरा परातभर बालूशाह्या असलेलं छायाचित्र मिळतंय का पहा.. द्या पोस्टुन धाग्यावर...
सगळे मिळून वाटून चाटून पुसून खाऊ...
पिसं सोलून शिणलेले माबोकर परत एकदा तरतरीत होऊन, पिसं काढायला लागतील..
पार्टीला पिसाच्या टोप्या घेऊनच जायचंय ना... दंडुका कोणकोण आणणार आहे ते पण ठरवावं लागेल..

अनुराज>>>> खरंय तुम्ही म्हणताय ते, न कळत कोण कुठली, कशी कॉमेंट करणार हे आपोआपच समजायला लागलंय.. किंबहुना बरेचदा आयडी न पाहताच कोणाचा प्रतिसाद आहे हे अचूक कळते...
दक्षिणा, कारवी, फारएण्ड, किल्ली, सुलू, UP, आणि बरेच जण (टायपायचा कंटाळा आलाय) सर्वांचीच एक उत्तम स्वतंत्र लेखनशैली आहे...

सुलू-८२..... गपा.. नवीन नामकरण मस्तच
Biggrin Biggrin :खोखो

b4_0.jpg

सुभाचा तरूणपणचा गपा ( सुलू-८२>>> मस्त नाव!) जरा लाल्याच्या वळणानी जातोय असं वाटतयं.. संवादफेक , ॲटिट्युड सगळच. थोडा लाल्या-इफेक्ट कमी करून गपा सजवला तर छान वाटेल

सुट्ट्या पैशांचा हिशोब कुणी सांगेल का. आधीचे चार एपिसोड मिसले मी. त्यामुळे आज पैशाची देवाणघेवाण उमगली नाही बा.

Happy थँक्यू किल्ली, मी २ घेतल्या

आज बाळाने 20वर्षानंतर उघडलेल पुस्तक कोरकरीत होत >>>>>>> काल परवाच बेशुद्ध पडली होती Sad डोकेदुखी इतक्यात परत पण आली? त्या इंग्लिश सिनेमात मानेवर मारून बेहोष करतात तसे करायला हवे मधून मधून.

अजून एक रानमोळ logic:

इबाळ चा जन्म झाला असेल तेव्हा ती जन्मतः अंध असेल. आणि तिच्या जन्मानंतर नंदू expire झाली असेल..तर नंदू चे डोळे इबाळला दिले असतील..नेत्रदान...म्हणुन...तुला पाहते रे....असे असेल..

पण हे लॉजिक चांगलं आहे, लॉजिकल आहे, रानोमाळ नाही. म्हणून सिरीयलवाले या शक्यतेकडे ढुंकूनही बघणार नाहीत!!!
Happy

एवढे प्रतिसाद बघून मलाही हुरूप आलाय.

आक्षराला हासू नका!!!

तुपारे रॅप!

इशा, इशा, इशा.... यो, यो, इशा.
ब्रेक कचकून लावल्यावर टायर कसं कोकते,
तसा तुझ्या घशातून आवाज कायम निघते,
अपनी मुंबई के गर्मी से अपना जीव जाते,
तू दिवसभर पार्टीवेर घालून हिंडते,
तुला काहीच कसं ग होत नाही,
तुझ्या चेहऱ्यावरची माशी का हलत नाही,
तुला बघितल्यावर आम्हाला चैन पडत नाही,
तरीही तुला काहीच फरक पडत नाही,
इशा, इशा, इशा.... यो, यो, इशा.
(मागे बॅकग्राउंड सर्रर्रर्रर्रर्रर्र....सर्रर्रर्रर्रर्रर्र...)

पुष्पा... पुष्पा... पुष्पा... यो बेबी पुष्पा....
या सिरियलीत तुझाच थाट,
डायबेटीसवाल्या माणसाची लावशील वाट,
पोळीच्या लाडूचा कायम घाट,
काही केलं तर गल्लीभर वाट,
तुझया नवऱ्याची, येते कीव,
निमकराचा घेशील, कधीतरी जीव,
कंपाससारखी फिरते तुझी मान,
ढमकन बोलून वाढवते ताण...
पुष्पा... पुष्पा... पुष्पा... यो बेबी पुष्पा....
(बॅकग्राऊंड मुजिक - बोलले....बोलले...)

पण हे लॉजिक चांगलं आहे, लॉजिकल आहे, रानोमाळ नाही.>>>> धन्यवाद अज्ञातवासी Happy

म्हणून सिरीयलवाले या शक्यतेकडे ढुंकूनही बघणार नाहीत!!!>>>> Rofl Rofl

खीखी, पुष्पाचं फार भारी जमलंय. सुभाला चढा भाव देऊन घेतल्याचं सार्थक करून घेण्याची वेळ आली आहे एकदाची मालिकावाल्यांची. झेंडे कागरमध्येपण आहे, परवा एकदम कडकमध्ये आला होता. त्याला चांगल्या भूमिका मिळूदे.

एकदम ८०-९० प्रतिक्रिया वाचायच्या राहिल्या होत्या. नाहीतर मी स्वतः लिहीले नाही लिहीले तरी तुमच्या सर्वांच्या पोस्ट्स वाचतोच. आता तर शैलीवरून कोणाची पोस्ट आहे ते ही ओळखू येते आणि बर्‍याचदा बरोब्बर निघते Happy नीट वाचतो आता. आठवण काढल्याबद्दल आभार Happy बर्‍याच उचक्या लागल्या.

Pages