Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
still early days but ईशा
still early days but ईशा पेक्षा नवी नायिका म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार दिसतोय एकूणात!
मायराच बरी म्हणायची वेळ आली आता..
रच्याकने: परवा, हवा २ मध्ये झेंडे अन मायरा ने मस्त सादर केला विनोदी भाग. झेंडे चा टोन आणि देहबोली तुपारे सटाईलच होती. पण अभिज्ञा ने मात्र मस्तच बेअरींग घेतलं होतं. थोडस ते नाक ऊगारून बोलणं बदललं तर ती अधिक सुसह्य होवू शकेल. पण तीला वेगळ्या भूमिकेत बघून बरे वाटले.
(No subject)
आर्या
इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न
इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न असल्याचा अभिनय मळमळतंय पण उलटी होत नाही टाईप्सचा होता....>>>>अअगदी मनातलं बोललात.
करवि......कमाल आहात तुम्ही. भन्नाट लिहिलंय.
इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न
इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न असल्याचा अभिनय मळमळतंय पण उलटी होत नाही टाईप्सचा होता....>>>>अअगदी मनातलं बोललात ........आज दिल का दर्शन इबाळान ?
दिल्या दिल्या आर्यांनी भिं-डो
खालचा ससुल्या जास्त छान आहे आर्या
UP --- पिसं काढायाचीच स्थिती आहे अजूनही.
आपण सगळ्यांनी घालूनही एक दुकान टाकता येईल पिसांच्या टोप्यांचे, इतकी निघतील. उदा --
१. रा नं चा टॅटू वर म्हटल्याप्रमाणे,
२. रा नं दा सां शी बोलताना मर्जरबद्दल मीटिंग म्हणते पण प्रत्यक्षात बोलणे होते अॅन्युअल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट टाईप कामाबद्दल.
३. रा नं गाडीत बसताना मोरे ड्रायव्हरना पर्स फाईल द्या म्हणून स्वतःकडे घेते. ते दार उघडतात. ती आत रिकामीच बसते मग ते मागून पुन्हा पर्स फाईल तिच्याकडे देतात.
४. ईशा चक्कर येऊन २ टप्प्यात पडते. आधी डोके हातात दाबून गुढग्यावर बसते मग पडते, हे दोन वेगळे सीन घेतलेत. तशीच सलग पडती तर जमिनीवर जाऊन ड्रेसिंग टेबल / खुर्चीवर डोके आपटण्याची शक्यता होती. सो, गुढगे टेकून बसायच्या कंटिन्यूटीत नाही पडत ती. कारण गुढगे टेकायचा जाजमावरचा भाग आणि पडायचा भाग वेगळे आहेत.
५. वर रमड, सुलू म्हणाल्या तसे ९६-९७ चा काळ असेल ( रिक्षातील पोस्टरवरून) तर तेव्हा मरोळ नाका रस्ता दुतर्फा जंगल,मैदान, तळे.... एखादीच रिक्षा जातेय, बाकी लोक रिकाम्या रस्त्यात पायी चाललेत असा नक्कीच नव्ह्ता.
हे सरळ दिसलेले.... शोधले तर अजूनही मिळतील
शि तु येऊदे नाहीतर रंभा उर्वशी मेनका येऊदेत शिफ्ट ड्यूटीत. कथेचे कडबोळेच करणार हे लोक.
दादासाहेब बहुतेक शर्वरी पाटणकरांचे काका-मामा-आजोबा दिसतायत... चेहर्यात साम्य वाटले.
आज शितु नेहमीची वाटली,हळूहळू
आज शितु नेहमीची वाटली,हळूहळू बेअरिंग पकडत आहे,गजा मस्तच.मजा येईल बघायला ,अस विटत आहे,अर्थात केड्यावर अवलंबून आहे ,सगळ
पण सर्रर्र पासून सुटका झाली काही दिवस तरी.
सर्जेराव आणि रा नं एकाच वयाचे
सर्जेराव आणि रा नं एकाच वयाचे वाटतात.
सर्जेरावांचं वर्तमानकाळातलं वय बघता ते तेव्हा चाळिशी पार तरी दाखवायला हवे होते.
रा नं आज ते दोन ऐतिहासिक साचे घेऊन आली.
कसले लाडू वड्यांमध्ये कन्व्हर्ट करणार आहे ते नाही कळालं. ज्या प्रमाणात सामान आणलंय चिवडा- लाडूचं ते बघता दिवाळी सुरू असावी.
धन्यवाद आर्या!
धन्यवाद आर्या!
ऐतिहासिक साचे अजुन गंजले कसे नाहीत? प्लॅस्टिकचे तर नव्हते..
मला एक कळत नाहीए....एव्हढी
मला एक कळत नाहीए....एव्हढी हवा करुन.....मुळात थोराड दिसणार्या शिल्पा तुळसकर ला घ्यायचे कारणच काय होते ? ती नाहीतरी तरुणपणीच मरणारे ना....मग? कुणी ही चालली असती की......!
आणि कैच्या कैच.......पेजर काय, डॉस ओएस काय, सीआरटी मॉनिटर्स काय, विक्या च्या गळ्यातला काळा ताईत काय.....!!
दादासाहेबांना जयदीप एव्हढा लहान मुलगा शोभतो तरी का? ते पंचाहत्तरीचे वाट्तात!
दादासाहेबांना जयदीप एव्हढा
दादासाहेबांना जयदीप एव्हढा लहान मुलगा शोभतो तरी का? ते पंचाहत्तरीचे वाट्तात! >> जशा तरूण आईसाहेब तसेच तरूण दादासाहेब
शिल्पा तुळसकर तरुण दिसत नाही
शिल्पा तुळसकर तरुण दिसत नाही पण वाक्य आणि प्रसंगाला अनुसरून अभिनय तरी करते. कमीत कमी चेहऱ्यावरचे स्नायू हलतात तरी. पण तरुण ईशा ना ही सुंदर दिसते आणि ना ही अभिनय येतो. एकुणातच कास्टिंग गंडलेलं आहे.
दादासाहेबांना जयदीप एव्हढा
दादासाहेबांना जयदीप एव्हढा लहान मुलगा शोभतो तरी का ?? >>>> अगदी अगदी .
नशीब आताच्या सर्जेरावाना , विग लावून तरूण नाही बनवले फ्लॅशबॅक मध्ये
तरूण आईसाहेब म्हणून मालू घेतली पाहिजे होती .
पिसं काढून काढून थकले बाई मी.
पिसं काढून काढून थकले बाई मी...
प्रेरणा श्रेय "कारवी"
प्रेरणा श्रेय "कारवी"
छोटासा प्रयत्न...
वय मोजूनी जीव शिणला,
एपी मागूनी एपी सरला,
क्लायमॅक्सआलानिघूनगेला,
कास्टींगमधेही झोलच झाला,
सखे गsssमाबोकरणी ||धृ||
केड्याने लिवलंया वयच विसरला,
न बघता एपी दिला प्रसारणाला,
प्रेक्षक कॅल्क्यूलून बधिर झाला,
रानोमाळ लॉजिक शोधू ग लागला,
सखेगssssमाबोकरणी ||१||
विकीईशा जोडी जोडीनं फिरती,
फ्लॅशबॅक मध्ये शि तु येत राहती,
दोघी मिळूनी सुभाला पाहती,
कथेचा चोथा कोणी ग केला,
सखे गsssमाबोकरणी ||२||
एकच नंबर.. कमाल लिहिलाय सुषमा
एकच नंबर.. कमाल लिहिलाय सुषमा ताई... तुम्हाला माझ्याकडून आज 20 बालुशाही च्या बॉक्स ची भेट!!!
धन्यवाद, किल्ली..
धन्यवाद, किल्ली..
तुम्हाला माझ्याकडून आज 20 बालुशाही च्या बॉक्स ची भेट!!!
Submitted by किल्ली>>>> नंदू कडून गंजलेला साचा बॉरो करून बालूशह्या केल्यात की काय??

भारीच उरका हों!!
बादवे... मला आवडते बालूशाही
सुषमाताई....++++++++
सुषमाताई....+++++++++111111111++++++++
काल एकदा डोकावलो तेव्हा
काल एकदा डोकावलो तेव्हा सरंजामे फॅमिली देवळात आली होती,
दादा साहेब 3 पीस सुटात होते,
मुंबई च्या हवेला, देवळात जायला कितीही मोठा उद्योगपती असेल तरी 3 पीस सूट घालून येईल का?
हे 80स च्या मराठी पिक्चर सारखे आहे, उद्योगपती म्हंटला की सगळीकडे सूट आणि सिगार घेऊनच फिरले पाहिजे.
कपड्यांचा विचार करा रे जरा...
जियो सुषमाताई.... मस्त
जियो सुषमाताई.... मस्त लिहीलय
श्रेय मला कशाला? जीव शिणला की उद्वेग बरोबर वाट शोधत बाहेर येतो
किल्ली १२ नाहीत, २५ नाहीत... २०च बालुशाह्या का? आणि आमाला पण .....?
जे नेहमी हा अत्याचार सहन करतात त्यांना एकावर एक जास्त.... उत्तेजनार्थ. मोजा किती लागतील...
करावी तुम्हाला जे म्हणाल ते
करावी तुम्हाला जे म्हणाल ते करून देईन, फक्त मला करता आले पाहिजे आणि मी बनवलेले तुम्ही खाल्ले पाहिजे
20 हा एक random आकडा आहे, इथे लॉजिक वर्ज्य आहे ना, म्हणून
तुम्ही उकडीचे मोदक घ्या, 21, माझ्याकडून तूर्तास
सुषमा ताई आम्ही साचे नाय
सुषमा ताई आम्ही साचे नाय वापरत हो.. हाताने आकार देतो manually
तुपारे बद्दल इथे लिहून त्या
तुपारे बद्दल इथे लिहून त्या सिरीयल ला name and fame मिळवून दिल्याबद्दल झीम पार्टी देणार आहे
कपड्यांचा विचार करा रे जरा...
कपड्यांचा विचार करा रे जरा...
Submitted by सिम्बा>>>> नै तर काय!!!
पण tpr च्या परंपरेनुसार एक त्रैराशिक मांडा..
जर एक ईशा बाळ अख्खा दिवस भर घामाघूम झाले तरीही जरतारी पार्टी वियर ड्रेस + सोनेरी चप्पल घालून मिरवते आणि घामट यक्क तशीच झोपत असेल...
तर तिच्या सवतीच्या पित्याने किती काळ आणि कुठे कुठे थ्री पीस सूट घालून घालून ऐन उकाड्यात फिरावे?..
काहीही डोकं वापरायचे नाहीच असे आवाहन केले असावे निर्मात्याने तमाम क्रू मेंबर्सना... थोडी जरी अक्कल पाजळली तरी पेमेंट कट करत असावेत..
दादासाहेबांना जयदीप एव्हढा
दादासाहेबांना जयदीप एव्हढा लहान मुलगा शोभतो तरी का ?? नाहीतर काय
आई साहेब तरुण म्हणजे पस्तिशीच्या दिसतात ना ? हे पंचावन्न चे दिसायला पाहिजेत
अहो समजुन घ्यायला शिका जरा
अहो समजुन घ्यायला शिका जरा
किल्ली मला पण बालुशाही चालेल
किल्ली मला पण बालुशाही चालेल हो, सगळे मिळून खाऊया, शेवटचा चुराही टिपून टिपून.... मजा येईल
उकडीचे मोदक व्याप होईल...
झीम पार्टीला मी आहे ...... गुंड्याभाऊसारखी सोटा घेऊन... व्हेन्यू कळवा फक्त
फारएण्ड कुठे गेलेत किती दिवस? वैताग येऊन हिमालय गाठलात का हो?
तिथे धागा निघालाय हिमालयात मोठी मोठी पावले उमटली म्हणून...... तुम्हीच का ते?
परत या.... सगळे वाट बघतायत ...... तुम्हाला कोणीही तुपारे सिरीज रोज बघायला सांगणार नाही.
Ok करावी तुम्हाला पण 20
Ok करावी तुम्हाला पण 20 बलुशाही
बालुशाही कशाबद्दल?
बालुशाही कशाबद्दल?
निवडक 'तुला पहाटेच रे!' या
निवडक 'तुला पहाटेच रे!' या नावाने एखादि कादंबरी तयार करूया. ज्याच्यात मिपा वरील निवडक प्रतिक्रिया छापूयात, कॅरिकेचर सहित.
अनुक्रमणिका (लेख/लेखकांची नावे)
कारवी स्पेशल
UP वाले
किल्ली का खजाना
सुषमाताईचा बायोस्कोप
फारएंडचे मास्टरस्ट्रोक
मेधाविचे शेरे
आणि बरेच जण....
ह्या मालिके मुळे नकळत आपण एक कुटुंब झाले आहोत. बरेच दिवस एखाद्याची प्रतिक्रिया आली नाही तर चुकल्या सारखे वाटते. एकमेकांचा सपोर्ट पाहून आश्चर्य वाटते. मजा येते. वरील प्रमाणे पुस्तक तयार केले तर आपल्यासाठी एक 'ठेवं' होईल. पुन्हा पुन्हा हसण्यासाठी.
कारवी... करता का विचार, तुमचे शब्द प्रभुत्व चान्गले आहे.
सस्मित कारवी सुषमा ताई आणि
सस्मित कारवी सुषमा ताई आणि बाकी सगळेच
प्रतिक्रिया, कविता वाच तुपारे वरच्या, epic आहेत
त्यासाठी appreciation म्हणून बालू शाही1
Pages