तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किल्ली>>>> बालूशाहीने मन तृप्त जाहले आहे!!!! थँक्यू

एक कल्पना आहे.... अनायासे नंदू "वरुन" खाली आलीच आहे तर तिच्या "खाली" डोक्यात अक्कल ओतावी म्हणतेय... पण भीती वाटते आहे की अक्कल खाली सांडेल आणि मी वेड्याच्या इस्पितळात!!!

अजून एक रानमोळ logic:

इबाळ चा जन्म झाला असेल तेव्हा ती जन्मतः अंध असेल. आणि तिच्या जन्मानंतर नंदू expire झाली असेल..तर नंदू चे डोळे इबाळला दिले असतील..नेत्रदान...म्हणुन...तुला पाहते रे....असे असेल>>>>> खूपच तर्कशुद्ध कल्पना आहे... TPR ना विचारून बघा....पण कथेत काहीही लॉजिक नसलेल्या पुरवण्या जोडल्या जातात (हमखास)..

अज्ञातवासी>>>>पुष्पा रॅप भारीये... पुष्पा शिळ्या पोळ्यांचे लाडू गावभर वाटत सुटलीय असं इमेजिनलं मी

अज्ञातवासी, घ्या हो बलुशाही आपल्यासाठीच आहेत.. रॅप भारी आहेत दोन्ही Lol
फार एण्ड एखादी झक्कास पोस्ट लिवा की.. जनता वाट पाहतीये Happy

इशाच्या अकलेचा अंदाज आधीच आल्यानं राजनंदिनीनं तिला डायरेक्ट 70 mm चा शिणेमा करूनच कंप्लीटच स्वप्न दाखवलंय. नाहीतर अर्धवट माहीती घेऊन, दुडक्या चालीनं बाळ लोखंडावर विटकर घासल्याच्या आवाजात किरकिरत चाळभर बागडलं असतं. (शांत! मेधावि शांत!)

राजनंदीनी साड्यांचे ड्रेस करणं ही जशी अद्भूत कल्पना होती तितकीच अद्भूत कल्पना काल लाडू कसे वळावेत ह्यासंदर्भातली होती. त्या साच्यातले लाडू ह्या कल्पनेनं आई साहेब ज्या प्रकारे भाळल्या ते पाहून मला विक्रांतच चुकून त्यांचा आधीच्या लग्नापासून झालेला मुलगा आहे की काय असा डाऊट येऊन राहीलाय Happy

वयाचं गणित.
रानं च्या लग्नाला बराच उशीर झालाय. म्हणजे ती 27 ते 30 ची आहे. म्हणजे विक्या पण तेवढ्याच वयाचा असणार. नंतर काही काळ संसार करून ती गेली आणि ह्या सगळ्याला आता पंचवीस वर्षे उलटली आहेत. म्हणजे
तेव्हा
रानं - 30, विक्या 30, झेंडे 30
आई- 40 दादासाहेब 70, जयडु 7, सर्जा 25

आज
विक्या 55, झेंडे 55, आई 65 (हे चिकन 65 सारखं वाटतंय), सर्जा 50, जयडु 30
थोडंफार इकडं तिकडं.

स्वप्नातल्र्या भुत राजनंदीनीपेक्षा स्वप्न संपल्यावर दिसलेल्या इशाची जास्त भिती वाटली.

आज बाळाने 20वर्षानंतर उघडलेल पुस्तक कोरकरीत होत.>>> आली का ती ब्याद परत???? :डोक्यावर हात मारून घेणारी बाहुली:

फ्लँशबँक बघताना सतत वाटत आहे की पुष्पा हवी होती,दादासाहेब आणि आसा ,जयडू ला बघून नक्की विचारल असत"अग बाई,दादासाहेब, जयडू नक्की तुमचाच ना,तुम्ही आसांचे मिस्टर वाटतच नाही.
अग बाई, मला वाटल की तुम्ही आसांचे सासरे आहात की काय?"

पुष्पा शिळ्या पोळ्यांचे लाडू गावभर वाटत सुटलीय असं इमेजिनलं मी>>>>>
राधिका मसाले आणि पुष्पा शिळे लाडूवाले जुगलबंदी!!!!!

माह्या मसाला, माझे लाडू!

दोन्ही रॅप मस्तच .. कॉपीराईट घ्या नाहीतर वायरल होतील फुका दुसऱ्या कुणाच्या नावाने.

संपादनाची मुदत उलटून गेलीये तरीही!

प्रस्तुत रॅपवर फक्त आणि फक्त मायबोली प्रशासनाचा, अज्ञातवासी या आय डी चा आणि किल्ली या धागामालकाचा अधिकार आहे.
कुठेही पुनमुद्रण, छायाचित्रण अथवा ध्वनीमुद्रण करताना या तिघांपैकी एकाची परवानगी आवश्यक राहील!
तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे!!!

दादासाहेब 70,जयडू7>>>> मेधावी, याचा अर्थ दासा वयाच्या 63 व्या वर्षी पुन्हा बाबा झाले.....
आणि सर्जाच काय? अचानक त्याला पा च्या बच्चन सारखा डीसीज़ झाल्यामुळे 50 शीचा माणूस 70 चा दिसू लागला की काय??

कितीही डोकं लढवा कशाचाच मेळ लागत नाहीये?

कास्टींग, वय, कपडेपट, मेकअप, दिग्दर्शन, संवाद आणि खूsssssप काही.... सगळच गंडलय

फेसबुकवर कुठेतरी ईशाताई एक्झरसाईझ करतानाचा फोटो बघितला. मख्ख चेहेरा आहे खरंतर, फोटो पण ठीकठाक पण खालच्या कमेंट्स म्हणजे किती गोड दिसतेयस, कम सून, मिसिंग यु अशा आहेत. मी सगळ्या नाही वाचल्या पण जाम हसू आले Lol

माझंही एक गंडलेले कॅलक्यलेशन...
वयाचे गणित मांडायचा मोह (मेळ बसणार नाही हे माहीत असून सुद्धा).....
जयडू मध्यवर्ती मानू,
कारण त्याने आणि सॉन्याने एकदा mfv ला सांगितले होते की राज नंदिनी 20 वर्षाची असताना दासांनी आसांशी लग्न केले...
यावरून जैदू आणि नंदू यांच्यात किमान 21 वर्षाचे अन्तर असणे आवश्यक आहे..
म्हणजे फ्लॅशबॅक मधला जैदू 7 वर्षाचा मानला तर नंदू 28 ची होईल (डोळे गरागरा फिरणारी बाहुली)...(आणि 28 हे लग्नाचे उलटून गेलेले वय असते का हे पण मला माहीत नाही).. असो, तर पुढे...
गपा वय = नंदू वय.. 28=28
...समजा त्यांचे प्रेम प्रकरण, पुढे लग्न आणि रानंचा मृत्यू यात किमान दोन वर्षे खर्ची गेली असे मानले तर राज नंदिनी 30 वर्षाची असताना वारली असे होईल....
पुढे दहा महिन्यानी ई बाळ जन्मले...
... आता ई बाळात आणि नंदू मध्ये 31 वर्षाचे अन्तर असले पाहिजे... तसेच गपा आणि बाळात देखील 31 वर्षाचेच अन्तर होईल..
आता बाळाचा जन्म 97 चा दाखवलाय... आणि कथानक सुद्धा 20 वर्षानी घडते असे दाखवले आहे तर..
बाळ 20 वर्षाचे आणि विकू सर 51 चे असलेच पाहिजेत...
आता मोजा पुढील वयं....
(1)ई आई (2) निमकर
(3)आसा (4) दासा (5)सर्जेराव (6)झेंडे (7) मायरा (8) परांजपे... इत्यादि इत्यादि....

डोकं गरगरायला लागलं आहे...... बेशुद्ध पडलेली बाहुली

पण सगळे असंच का धरून चालले आहेत की गपा रानं पेक्षा मोठा किंवा सेम वयाचाच असेल? फक्त तो तिचा नवरा म्हणून?
पण प्रेमात पडल्यावर लहान वयाच्या मुलाशी सुद्धा लग्न होतात की (आठवा एलिझाबेथ टेलर, मडोना, प्रियांका चोप्रा इ इ ) तसही वय विसरायला लावणारी प्रेमकहाणी आहे ती

डोकं गरगरायला लागलं आहे...... बेशुद्ध पडलेली बाहुली

नवीन Submitted by सुषमा ताई 11 on 4 May, 2019 - 11:56
>>>>
एवढं अवघड गणित तर UPSC च्या परीक्षेला येत नाही!
Rofl

हो.. गपा 20 आणि नंदू 30 असं असू शकेल. पण केड्या- the irritating ने याचा खुलासा करायला पाहिजे.

सुषमा ताई TPR ला विचारून बघा म्हणजे काय हो? कारण..TPR ची story तर fix असेल ना..>>>> सुचना रास्त आहे.. नक्की विचारून बघते.. कारण TPR ची अतर्क्य story हमखास fix असेल... Lol Lol :हाहा

UPSC चा पेपर >>> Rofl

धन्स फॉर बालुशाही. फारएण्ड तुम्हाला बालुशाही मिळाली का?

अज्ञातवासी Rofl

बाळाचा जन्म 97 चा दाखवलाय.. >>>>>>>>> ९७ चा कि ९८ चा?

आता मोजा पुढील वयं....
(1)ई आई (2) निमकर
(3)आसा (4) दासा (5)सर्जेराव (6)झेंडे (7) मायरा (8) परांजपे... इत्यादि इत्यादि.... >>>>>>>>> मायराच्या म्हणण्यानुसार ती १० वर्षापुर्वी सरन्जामे इण्डस्ट्रीध्ये जॉईन झाली होती. सो, मग ती तेव्हा २०-२१ ची आणि विस ३० ची असेल का? Uhoh ती लहानपणापासून विसच काम बघत आलीये म्हणे. लहानपणापासून म्हणजे कधीपासून?

खर तर गपा हा माझा शब्द नाहीये. ह्याच धाग्यावर किव्वा इण्डिया फोरमवर, नक्की कुठे ते आठवत नाही, पण कुठेतरी हा शब्द वाचला होता. त्यामुळे ह्या शब्दाचे श्रेय माझ्याकडे जात नाही. Happy

केड्या झीमराठीवर त्याच्या लहान मुलीबरोबर नाचतोय आणि खाली डोकं वर पाय वाचतोय. >>>>>>> इथे प्रेक्षकान्वर खाली डोकं वर पाय करण्याची वेळ आलीये.

आली का ती ब्याद परत???? >>>>>>>> नैतर काय! पुर्ण स्वप्न बघायच नि मग उठायच ना. आता उरलेल स्वप्न कधी बघणार? दुसर्या दिवशीच्या रात्री का? त्यापेक्षा एक करायच ना तिने, दिवसा डुलक्या मारायच्या. नाहीतरी तिला सवयच आहे कधीही डुलक्या घेण्याची.

राजनंदीनी साड्यांचे >>>>>>> दासाहेबान्नी काल घोषणा केली राजनंदीनी साडयान्चा ब्रॅण्ड काढण्याचा. गपा तिकडे काम करेल वाटत. ईशासारखे अकलेचे तारे तोडेल. मग नन्दू आणखीनच इम्प्रेस होईल ह्याच्यावर. मला एक कळत नाही, गपाकडे कुठलच क्वालिफिकेशन नसताना ह्याने इतकी वर्ष सरन्जामे इण्डस्ट्री साम्भाळलीच कशी?

आज बाळाने 20वर्षानंतर उघडलेल पुस्तक कोरकरीत होत.>>> अगदी अगदी नन्दूला गपाच्या नादात ते पुस्तक वाचायला फुरसत मिळाली नसावी, म्हणून तसच तिने ठेवून दिल असेल रॅपरमध्ये. 'तुला पाहते रे' पुस्तक बुकगन्गावर शोधाव लागेल आता. Proud

नन्दू गपाचा विचार करताना बॅकग्राउण्डला वाजलेल गाण छान होत. सेम गाण जेव्हा विस ईशाला चाळीत येऊन जाब विचारतो तेव्हा वाजल. ह्याचे लिरिक्स कुणी छापेल का धाग्यावर, प्लीज?

जरा लाल्याच्या वळणानी जातोय असं वाटतयं.. संवादफेक , ॲटिट्युड सगळच. थोडा लाल्या-इफेक्ट कमी करून गपा सजवला तर छान वाटेल >>>>>>> हम्म सुरुवातीला पुर्णपणे ग्रामीण भाषा आणि लग्नानन्तर सॉफिकेस्टेड झालेला, बदललेला गपा अस बघायला आवडल असत. मला कधीकधी त्याच्यात अक्षयकुमारच्या श्रीमन्त होण्यासाठी सतत प्लॅनिन्ग करण्यार्या पण आळशी असण्यार्या कॅरेक्टर्सची ( हेराफेरी, खिलाडीपट) झलक दिसते.

सुभा मन्दिराच्या खाम्बामागे उभा राहून नन्दूकडे पाहतो तेव्हा वाटल सुभा आपल्या मुलाकडे अभिमानाने, आनन्दाने पाहतोय आणि क्षणभर अ‍ॅक्टिन्ग करायला विसरलाय. Bw

विस मनापासून नन्दूची गोष्ट ऐकतो तेव्हाचे सुभाचे एक्सप्रेशन्स बेस्ट होते. हा खरच नन्दूच्या प्रेमात पडलाय का अस वाटत होत.

राजनंदीनी साड्यांचे >>>>>>> दासाहेबान्नी काल घोषणा केली राजनंदीनी साडयान्चा ब्रॅण्ड काढण्याचा. गपा तिकडे काम करेल वाटत. ईशासारखे अकलेचे तारे तोडेल. मग नन्दू आणखीनच इम्प्रेस होईल ह्याच्यावर. मला एक कळत नाही, गपाकडे कुठलच क्वालिफिकेशन नसताना ह्याने इतकी वर्ष सरन्जामे इण्डस्ट्री साम्भाळलीच कशी?>>>>>>> MBA आहे म्हणतो तो

निमकर रॅप!

निमकर तू काम कम कर,
मत विकू के नाक मे दम कर,
साडी नेसतो.... निमकर
घर विकतो....निमकर
बॅग विसरतो...निमकर
झेंडे कुणाला उचलतो...निमकर
निमकर... निमकर... निमकर...
(बॅकग्राउंड ला बाबू....बाबू....)

Happy अज्ञातवासी पण उतरले का मैदानात...? रॅप एकदम.... व्हरायटी भरपूर झाली काव्यांची

पण सगळे असंच का धरून चालले आहेत की गपा रानं पेक्षा मोठा किंवा सेम वयाचाच असेल? >>>>>
नाही हो मीरा.., तो लग्नाच्य वेळी MBA + FRCS + CS + MA संस्कृत + International Diploma in Marketing & HR + PG Diploma in Global warming करून उणे ५ वर्षे वयाचा असेल तरीही चालणारे. आटपा म्हणावं लौकर आणि जागा खाली करा पुढच्या सिरीयलसाठी.

आता काय दाखवतात ते बघा आणि मोकळे व्हा लोकहो. हत्ती गेला शेपूट राहिले.
मग केड्या सार्वजनिक कार्यक्रमात एकटे हातात सापडले की काढता येईल उट्टे.

नन्दू गपाचा विचार करताना बॅकग्राउण्डला वाजलेल गाण छान होत. सेम गाण जेव्हा विस ईशाला चाळीत येऊन जाब विचारतो तेव्हा वाजल. ह्याचे लिरिक्स कुणी छापेल का धाग्यावर, प्लीज? >>>>> !!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!!
सुलू आदर शतगुणित..... सगळी इंद्रिये एकवटून बघणार्‍या तुम्ही एकमेव. असं काही वाजतय आणि ते एकच आहे हे जाणवतं तुम्हाला???????????

काल सुभा खांबापाशी गोड हसला तो थेट बालगंधर्व वाटला.
पहिल्या भागातलं "तुला पाहते रे" पुस्तकाचं नाव ह्या जन्मात आपोआप "तुला हाणते रे" झालं तर मजा येईल बघायला.

आईसाहेबांचा मेकप चुकलाय. ती तरुण न दिसता नटवी दिसतेय. असो Happy

तरुण परांजपे पाहिले... जेमतेम 35 चे आहेत... गणित केल्यास आलेले उत्तर .. परांजपे चालू वर्तमान काळात 55 चे आहेत..

THE SGI फ्लॅशबॅक मधेही अनेक उद्योग असलेली कंपनी दाखवली आहे... मग गपाने अजून कोणते धंदे उघडलेत... पब्लिक इश्यू वगैरे होतेच ना त्यांचे कारण दासा म्हणालेले की आपल्या कंपनीने शेअर बाजारात उच्चांक गाठलाय (नक्की वर्ड्स नाही आठवत मला}...
मग हा गपा आल्यावर काय विकास करतो अजुनी हे पाहिले पाहिजे

नन्दू गपाचा विचार करताना बॅकग्राउण्डला वाजलेल गाण छान होत. सेम गाण जेव्हा विस ईशाला चाळीत येऊन जाब विचारतो तेव्हा वाजल. ह्याचे लिरिक्स कुणी छापेल का धाग्यावर, प्लीज? >>>>>>>

सूर आहेस की....
मौन आहेस तू.... का कळेना मला......
कोण आहेस तु ?
बोलक्या डोळ्यात दिसते.... ओठ मिटली शांतता... तुला पहाते रे.....

मागे एकदा हीच का ती राजनंदिनी याचा छडा लावण्यासाठी मोठा जयदू आणि आईसाहेब यांनी इशा ला ते "वाढदिवसाची भेट " म्हणून दिलेलं पुस्तक मागितलं होत .. आणि इशा ने ते लग्गेच आपल्या जादूगाराच्या कपाटातून(जिथे "छडीपासून साडीपर्यंत" सगळ्या गोष्टी असतात !!!) ते काढून खाली नेऊन दिलं होतं . पण परवा दाखवलेल्या फ्लॅशबॅक मधे खरी राजनंदिनी पुस्तक वाचून आईसाहेबांना ते पुस्तक परत देते आणि नीट सांभाळून ठेवायला सांगते तेव्हा आईसाहेब काहीतरी रेफरन्स देतात २ ऱ्या ड्रॉवर मधे कि कुठे ठेवते असा काहीतरी .. मग अनेक वर्षानंतर---
१) ते पुस्तक आपल्या जादूगाराच्या कपाटात कसं गेलं ? Uhoh
२) लास्ट वीक ते पुस्तक इशा ने पुन्हा आईसाहेबांना नेऊन दिलं मग तरी बेशुद्धीतून शुद्धीत आल्यावर पुन्हा पुस्तक परत जादूगाराच्या कपाटात कसं आलं ? Uhoh

कि मी काही मिसल आहे?
वरच्या एकेक कमेंट्स ह ह पु वा आहेत
अज्ञातवासी रॅप भारीच !!

अवांतर पण तरी #लॉजिकरानोमाळ शी निगडित . मागे एक जोक ऐकला होता.. हल्ली तुपारे पाहताना या जोक ची नेहेमी आठवण होते
बाई विद्यार्थ्यांना :रमेशकडे १० आंबे आहेत ,चिकूच्या झाडावर २० माकडे बसली आहेत ,रामू आज शाळेत आला नाही तर माझं वय काय ?
विद्यार्थी : वय ३४
बाई : बरोब्बर! आता कसं सोडवलंस सांग बघू !
विद्यार्थी : अहो कारण मी डब्यात पुरी भाजी आणली आहे ..

माननीय केड्या ला समर्पित !! काय एकेक चाल्लंय ते चाल्लंय

बरं , तो कर्जतचा बंगला तोच आहे की नविन बांधला ?
नविन बान्धला असेल तर ते लाडवाचे साचे नंदूने ठेवलेल्या ड्रॉवरमध्येच कसे सापडले ?

कि मी काही मिसल आहे? >>>>
बहोत सोचती है बच्ची.... जरा दिमाग को पीछे रक्ख और जो दिखता है श्रद्धा से देखती जा... उसी में तेरा कल्याण हय ..... केड्या के दरबार से कोई पागल हुए बिना वापस नहीं जाता..... तेरा भी दिन आयेगा. सब्र कर बच्ची सब्र.

@ स्वस्ति >>>>> गणपती आले नि नाचून गेले ऐकलय का शाहीर साबळेंचं?
तसं नंदिनी आली नि ठेवून गेली हो नंदिनी आली नि ठेवून गेली
जिला लाडू वळून न दुखणार्‍या बोटांची काळजी, इतकी जी प्रेमस्वरूप----
ती बंगला बदलल्यावर सामान लावायला नाही का येणार, भूत म्हणून यील भले....

माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे (चिंधड्या चिंधड्या)...

काहीतरी लॉजिकल, उत्सुकता वाढवणारं
पहायला मिळेल असं वाटलं होतं..

चाळिशीच्या माणसांना रंगरंगोटी करून विशी पंचविशीतील तरुण केलंय,
पण तेही धड जमले नाहिये...
फ्लॅशबॅक मध्ये मोठ्ठा खडीसाखरेचा खडा तोंडात ठेऊन घोळवत गोल गोल लाडे लाडे बोलणारी नायिका काहीच प्रभाव पाडू शकली नाहीये...
मेक अप तर फुल्ल गंडलाच आहे, पण गेला बाजार कपडे पट तरी बरा हवा होता...
काय ते बुजगावण्याला अडकवतात तसले डगले दिलेत हीर्विणीस..
त्यामुळे ती अधिकच प्रौढ दिसते...
सुभा चा भाव काही पचला नाही... जेवढे पैसे तेवढी एक्टिंग असा attitude वाटतोय मला..

परत परत---- ष्टोरी, कास्टिंग, एक्टिंग, इ. इ............ गंडले आहे हेच सांगायचा पण कंटाळा आला आहे...

पण माबोकरांशी गप्पा मारल्या आणि इथले प्रतिसाद वाचले की सगळे नैराश्य दूर पळून जाते....

सो मी येथे येणार, पिसं काढणार, काढलेली पिसं वाचणार मोजणार आणि आनंदी राहणार!!!

Pages