तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नक्की गजाच्या कोणत्या गुणावर भाळली राजनंदिनी ? आणि गजाने खोटी सही केली वगैरे ठीक आहे पण मेहतांच्या माणसाला कसं मॅनेज केलं ? आणि एकाच वेळी २ कंपन्यांसाठी सेवा पुरवली त्या जालिंदरने तर बिघडलं कुठे ? मशिनरी मेंटेनंस च काम आहे ना ते.

बहुतेक दादासाहेबांचा काटा लगेच काढणार गजा. इन्हेलर लपवून वगैरे.

नक्की गजाच्या कोणत्या गुणावर भाळली राजनंदिनी ? >>>> टाईमपास मधली प्राजु आठवली... पण ती 15-16 वर्षाची दाखवलीय आणि ही बया प्रौढ... प्राजुला कसं दगडू आवडला तसा नंदूला गजा असं खंग्री नाव आणि ते नाव धारण केलेला बेक्कार मनुष्य आवडला...
ती प्रत्यक्षात आहे 40-45 ची,
भूमिका करतीय 25-30 ची,
आणि विचार आहेत लहान मुलीचे...
कुठलीही चौकशी न करता त्या जाळ्याला सुभाच्या जाळ्यात अडकवून दिलं!!..यशस्वी बिझनेस वुमन म्हणे!!!!

नंदिनी एक successful business women आहे एवढी मोठी कंपनी चालवते आणि कुणावरपण लगेच विश्वास ठेवते आणि लग्नासारखा निर्णय असा घाईत घेते कसलीच चौकशी न करता!! हे काही पटत नाहीये बुवा Uhoh
मागे दाखवलं होत की इशा विसला बाहेर घेऊन जाते पाणीपुरी बाहेरच खाऊ घालते तेव्हा विसकडे बघून अस वाटत होतं की त्याने कधी गरिबी पाहलेलीच नाहीये पण तो तर लहानपणापासून गरीब होता.. त्याला तर माहिती हवं ना सगळं (कदाचित त्यावेळी केड्याला विस ला चांगलं दाखवायचं होत आणि गर्भश्रीमंत पण दाखवलं दुसरंच म्हणून सगळा घोळ झाला Proud

सुभा पाट्या टाकल्यासारख काम करत आहे आणि शिल्पा तर"आलिया भोगासी"म्हणीप्रमिणे किम करत आहे.
तरी बर त्या बाळाला दाखवत नाही आहेत.
आता शिरियलीला नारळ द्यायची वेळ आली आहे.

कालची अजून एक चूक
खूपच खडतर होता का बालपण "तुझं" ? अश्या टाईप चा काहीतरी संवाद अगोदर म्हणून झाला ..
त्यानंतर गपा च उत्तर ..
मग परत काहीतरी विचारताना शितू "तुमचा" असं म्हणल्यावर गपा म्हणतो तुमचा नाही "तुझा" म्हण .. तेव्हा मग लगेच अगदी लाजून बीजं दाखवायचा प्रयत्न झाला .. अगोदर झाला ना म्हणून ऑपॉप "तुझं " मग आता काय परत ? Angry Angry :चिडचिड: :चिडचिड:
अरे केड्या लॉजिक तर रानोमाळ आहेच तुझं .. निदान संवादांचा क्रम तरी नीट लिही
डायरेक्टर एडिटर काय करत असतात ?!

नंदिनी एक successful business women आहे एवढी मोठी कंपनी चालवते आणि कुणावरपण लगेच विश्वास ठेवते आणि लग्नासारखा निर्णय असा घाईत घेते कसलीच चौकशी न करता!! हे काही पटत नाहीये बुवा>> होना काहीही चाल्लंय

शितु लेगींग घालते 95 मधे>> आणि तेच ड्रेस घालतेय जे त्या रूम मध्ये घडी करून ठेवलेले दाखवलेत .. बाकी दुसरे काही नव्हते का ?
कालच किती बटबटीत वाटत होती शितु>> अगदीच .. काय ते केस आणि काय ते लाडे लाडे बोलणं ... Sad

आणि एकाच वेळी २ कंपन्यांसाठी सेवा पुरवली त्या जालिंदरने तर बिघडलं कुठे ? मशिनरी मेंटेनंस च काम आहे ना ते. >>>> त्यांच्य भाषेत टाय-अप / मर्जर आहे ते..... कसे काय कोण जाणे !! म्हणून एकाशीच एकनिष्ठ असणे जरूरी

नंदू ---> राजनंदिनी ---> शि तु ---> तुळस्कर बाईं ----> ?? ---> या वेगाने काय तुळस्कर आंटी करणार का त्यांना?

कर्तृत्व बघा हो बाईचं ..... दिसणं नका बघू ....... काय म्हणता?? दिसत नाही? शोधा म्हणजे सापडेल Happy

डगलं नको, लेगिंग्स नको, वधूवेष नको मग हवं तरी काय? ...... जिम वेअर चालेल का?

अशाने ई श्या परत येईल तेव्हा २ बीन बॅग्सपेक्षा, १ बीनबॅग + १ दगड कॉम्बो चालेल या मनःस्थितीत आलेले असणार लोक. विरोधाची धार बोथट करणे यालाच म्हणतात बहुतेक

Happy कूल अंजली लाल अंजली झाली बुवा .....

आणि एकाच वेळी २ कंपन्यांसाठी सेवा पुरवली त्या जालिंदरने तर बिघडलं कुठे ? मशिनरी मेंटेनंस च काम आहे ना ते. >>>> त्यांच्य भाषेत टाय-अप / मर्जर आहे ते.....>> हा तर अतिशय कहर आहे
कूल अंजली लाल अंजली झाली बुवा .....>> नाहीतर काय अगं Lol आपल्याला पण कळते ते या डायरेक्टर एडिटर लेखक याना कळात कसं नाही .. एखादी गोष्ट करू आपण दुर्लक्ष. अरे हे रोजच चुकाच दाखवतात ... बेसलेस गोष्ट आहे मुळात .. उगाच दळण दळतायत मोठे मोठे लोक घेऊन ..

शितु लेगींग घालते 95 मधे.>>>>> मेधवि....अगदी माझ्या मनातल.
शितू जरा जाड दिसतेय.... मला शितू आवडते पण फ्लॅशबॅक सुरु झाल्यापासून मजा येत नाही मालिका बघायला.

शितूला फार सैल कपडे दिले आहेत. त्यामुळे ती बेढब वाटतेय. कोण कोणाला कधी फसेल सांगता येत नाही. काही लोकं फार स्मार्ट दिसतात आणि मिठ्ठास बोलतात. काही दिवसांपूर्वी वाचली होती बातमी, मॅट्रिमोनी साईटवर एकजण वयाने मोठ्या,लग्न न झालेल्या उच्चपदस्थ मुलींना फसवायचा, फर्ड ईंग्रजी बोलायचा तो. असो. दासांनी तरी गपाचा नीट तपास करायला पाहिजे.

रच्याकने, कोणी खुलासा करेल का?...
सदर चालू असलेला फ्लॅशबॅक बाळाला पुनर्जन्मामुळे दिसतोय...
की
सुभा तिला सांगतोय...
की आणखी काही वेगळंच चालू आहे...
की केड्या त्यातही गोंधळलेला आहे..

सदर चालू असलेला फ्लॅशबॅक बाळाला पुनर्जन्मामुळे दिसतोय... >>>>>>> हो. सध्या पुस्तक वाचता वाचता झोपी गेल असेल बाळ

फ्लॅशबॅक फास्ट दाखवतायत. कुठेही रेन्गाळत नाही ते चान्गल आहे. नन्दूला इतक्या फास्ट प्रेमात पडताना दाखवलय! Uhoh

कोण कोणाला कधी फसेल सांगता येत नाही. काही लोकं फार स्मार्ट दिसतात आणि मिठ्ठास बोलतात. >>>>>>>>> +++++++++ १११११११११

गजाने MBA केलय? MBA मधला M तरी माहितीये का त्याला?

बुके देण्यासाठी, लहान मुलान्ना पार्टी देण्यासाठी त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून?

फ्रॉड( ?) पासून वाचवल एवढच कारण होत का आणखी काहीतरी' म्हणताना किलर भाव दिले सुभाने.

कालच्या पार्टीत माझ फेवरिट गाण वाजल , 'कुछ तेरे दिल ने कहा'

बहुतेक दादासाहेबांचा काटा लगेच काढणार गजा. इन्हेलर लपवून वगैरे. >>>>>>>>>> नाही ते लग्नानन्तर असेल बहुधा. आता तो दासाला पटवेल जस निमकरान्ना पटवल. विसने सान्गितलेल ' दासाहेबान्ना हार्ट अ‍ॅटेक आल्यानन्नर मी त्यान्ना स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो' हे खर असेल.

आईग्ग.. काय सही लिहिताहेत सगळे. Happy
प्रत्यक्ष सिरियलने नसेल इतकी इथे करमणूक आहे.
इथे मधे थोडी लिंक तुटली. गजाने काय स्टोरी सांगितली?

आज लग्नानंतर देवळात जे घडले ते बघून हिंदी सिनेमा आठवला. राकेश रोशन आणि जयाप्रदा यांनी काम केले होते. बहुतेक कामचोर वगैरे नाव असावे

Submitted by चंपा on 7 May, 2019 - 13:56 >>>>>
तुमची पहिली २ वाक्ये बरोबर आहेत पण शब्दांचा क्रम बदलावा लागेल.

बाकी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे पण असं मारला दगड उठले तरंग टाईप इन्स्टंट प्रेम कसे होईल? त्याला काही यशस्वी काही अयशस्वी प्रयत्न करावे लागतील.
तिला संशय येणे, सामाजिक - पत- फरक, या मुद्द्यांना काही विचार / वेळ तर द्यावा लागेल मग ते कमी महत्त्वाचे वाटू लागतील त्याच्या भावलेल्या गुणांसमोर...
किमान -- गुणी, आत्मविश्वासयुक्त MBA मुलाचे कँपस इंटरव्ह्यूत का सिलेक्शन झाले नाही इतका प्रश्न तरी पडावा. ती काय श्रीमंत बापाची अल्लड, लाडावलेली, बेजबाबदार लेक नाही दाखवलेली....

Submitted by प्राचीन on 7 May, 2019 - 20:41 >>>>
लग्न झाले पण? इतक्या इमर्जन्सीत लग्न करावे लागेल अशा घटनाही झाल्या का ?
आज कसे झाले पण.......?
पुनर्जन्मात सगळे जुळते -- मार्क, तन्मणी, पुस्तक, टाळ्या देणे, गोष्ट सांगणे --- तर एकीचे लग्न संक्रांतीला आणि दुसरीचे अक्षय तृतीयेला कसे होईल?

आज लग्नानंतर देवळात जे घडले ते बघून हिंदी सिनेमा आठवला>>> आं.. लग्न पण झालं का?

खूपच खडतर होता का बालपण "तुझं" ? अश्या टाईप चा काहीतरी संवाद अगोदर म्हणून झाला ..
त्यानंतर गपा च उत्तर ..
मग परत काहीतरी विचारताना शितू "तुमचा" असं म्हणल्यावर गपा म्हणतो तुमचा नाही "तुझा" म्हण >>>>> हो अगदी अगदी मी पण हे नोटीस केलं काही कंटीन्युटी च नाही संवादात.

शिल्पा चा अ‍ॅक्सेंट हॉरिबल आहे. ते ओठे मुडपून बोलायची सवय पण काहीतरीच.

एमबीए साठी पैसे कुठून आले गजाकडे? झेंडे का नाही नोकरी शोधत? काल अगदी बायकोसारखा वागत होता. एवढंच सामान राहिलंय वगैरे

आज सुबोध चक्क अभिनयात कमी पडला.
मुलाबरोबरच्या सीनमधे तो गजा न वाटता सुबोध वाटला. भले रोलमधे त्याला जयडुकडे प्रेमानंच बघायचं होतं, पण त्या प्रेमळ नजरेत अभिमान दिसण्याची काय गरज होती? पण मल्हारबरोबरचा सीन करताना तो अभिमान लपवता नाही आला त्याला आणि बापासमोर कलाकार मागे पडला. Happy

सुभाच ड्रेसिन्ग आणी हेअर्स खुपच गण्डलेत , ६०-६५ चे लोक घालतात तसे हाफ शर्ट आणी विचित्र फिटिन्गच्या पॅन्टस अस काहितरी दाखवलय, अगदी गरिब असला तरी कापड साध असेल फॅशन तर त्यातही लोक करतात्च..
शितुचे डिप कट असलेले ड्रेसेस ( पायघोळ) अगदिच विचित्र ! एखाद्या प्रोजेक्ट साठी स्वतःला मेन्टेन करण , थोडाफार रिसर्च करण इतक अवघड आहे का? पर डे असला तरी पडद्यावर तुम्हीच दिसणार ना? पडद्यामागच्या लोकानी माती खाल्लि तरी फरक तुम्हाला पडेलच की!

ती बेढब आहे म्हणून तिला सैल कपडे दिले आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला कारवी Wink तुुुुम्ही म्हणताय तशी नंदू बेजबाबदार नाही पण मग सुभाला मालिकेतून लवकर सुटका हवी असेल म्हणून मधल्या स्टेप गाळल्या असतील. असंही कथा फुलवण्यात वगैरे केड्याला काही रस नाही आणि लाॅजिकचा आणि त्याचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही Happy
काल अगदी बायकोसारखा वागत होता Proud

मालीका पटापट गुंडाळतायत्.>>> पूढच्या भागात दा.सा.ना पण गुंडाळलं वाटतं .
आ.सां च खरं नाव कोणाला कळलं का??? म्हणजे त्यांच नाव आईसाहेब दादासाहेब सरंजामे नाहीएयं हां Happy

पटापट गुंडाळतायत्>>>>दासा मरतंय बहुतेक येत्या आठवडय़ात!!!
नंदूचं ढिशकॅव पुढच्या आठवड्यात!!!

दचकून (आता कसंतरी वाटतंय, मोरावळा खाऊ की लवंग धरू अशा अविर्भावात ) बाळ उठेल

... मग गजाचा वाजणार बाजा...
.. बा केड्या, हात जोडून प्रार्थना रे... चांगलं पटेल असं काहीतरी लीहशील ना!!!

Pages