तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शितु शितु इतक्यांदा इकडे वाचून खूप कुतूहल वाटत होते मला, म्हणून आजचा एपी बघितला Angry

ईशा हिच्यापेक्षा बरीच बरी वाटली मला, अन तो रिक्षातला सुभा, तेव्हाही तो तिशीतलाच दिसतोय, अन राजनंदिनी, पस्तिशी किंवा चाळिशीची. अन तिला मरून 25 वर्षे झाली, मग सुभाचे आत्ताचे खरे वय काय????

तेव्हाच्या विक्या नंदूला 20 चे समजण्यात यावे अशी तळटीप टाकायला सांगावं का?

दादा अन् आईसा मधे पण वीसेक वर्षांचं अंतर वाटतंय.

या सिरियलच्या कास्टिंग डायरेक्टरला फटके मारायला पाहिजेत. 75% कॅरेकटर्ससाठी अयोग्य कलाकार निवडले आहेत. शिल्पा तुळसकर एके काळी सुंदर असेल, पण 25 किंवा अगदी 30 धरू वय, त्या वयासाठी ती बेढब आणि वयस्कर दिसते. हिरोईनची टिपिकल एन्ट्री म्हणजे सजनाधजना चालू असत, इअररिंग्ज घालताना हमखास दाखवतात आणि फायनल सजवलेलं सुंदर प्रोडक्ट प्रेक्षकांना दिसतं. इथे शिल्पा आवरताना मला तिची लूज स्किन आणि crow's feet डोळ्यांना खटकत होते

मिरा +१ !
शिल्पा छान वाटतेय पण अजिबात यन्ग २०-२२ ची वाटत नाहिये

इशा पडली तेंव्हा कुठलं तरी वरातीत वाजवतात तशी कर्कश ट्युन लावली होती..
मीरा >>सहमत. प्रोमोपासुन वाटतयं की शितु त्या रोल साठी योग्य नाही. तिचा चेहरा गोड आहे पण पोक्त दिसते ती

छ्याsss!!! डिसअपॉईंटेड...
काहीच प्रभाव नाही पडला शि तु चा... बाळा पेक्षा बरीच म्हणायचं... तिला "तरुण" नाही दाखवू शकले, शिरेल वाले!!!.. तिचे तोंडात खडीसाखर घोळवल्या प्रमाणे बोलणे लक्षात राहिले..
आसा - दासा जोडी पण नाही रुचली...
मोबाइल तर भारतात 95-96 पासून आलेत... 20 वर्षापूर्वी म्हणजे 99-20k पर्यंत मोबाइल बर्‍यापैकी उच्चभ्रू लोकांमध्ये सर्रास रूळले होते... मुंबई सारख्या शहरात तर नक्कीच होते...
.... नेमका कोणता काळ दाखवायचा आहे?...
... सगळे ब्रेकफास्टला गरम गरम उपमा खात होते.. आणि जैदूला "मैद्याचा" पांढरा शुभ्र पाव??.. नाही हजम झाले... वरती हिची पौष्टिक पदार्थ खावेत याबद्दलची मॉरल स्टोरी.. बिच्चारा जैदू...
आता मोठा झालाय तरीपण रोज पावच खावा लागतो!!!
...
गजू राजू पण केमिस्ट्री गंडलेली वाटली...
विल्या-गजा छान!! त्यांची कारस्थाने बघण्यात मजा येईल असे वाटते.. होप सोssss!!!

एक बाळबोध शंका— गजा आधीच रिक्शामध्ये बसून येतोय म्हणजे रिक्शाचा मीटर डाउन असतांना तो रिक्शावाला नंदूसाठी परत कसा थांबला? त्याने सरळ पुढे जायला हवं ना रिक्शा खाली नाही सांगून. का मी काही मिस केलं?

20 वर्षापूर्वी म्हणजे 99-20k पर्यंत मोबाइल बर्‍यापैकी उच्चभ्रू लोकांमध्ये सर्रास रूळले होते... मुंबई सारख्या शहरात तर नक्कीच होते...
.... नेमका कोणता काळ दाखवायचा आहे?...>>>
केड्याचं काळाचं गणित गंडलंच आहे.. तसं ते सगळ्याच सिनेमा-मालिकांचं गंडलेलं आहे सध्या.
20 वर्षांपूर्वी म्हणजे थेट 70s मध्ये जातात.

बरं राजनंदीनीच्या लग्नाला उशीरच झालाय असं आईसाब म्हणाल्या काल म्हणजे तो नक्कीच 25च्या पुढे असणार. विक्या तितकाच म्हणूया...एखादं वर्ष तरी संसाय झाला अहेल म्हणजे 27+20=47....विक्या आत्ता 40 चा असूच शकत नाही.....

इथे वय आणि वर्षे लवचिक आहेत.. जेंव्हा जे वय /वर्ष हवं तसं मानायचं आणि प्रत्येक पात्रासाठी वयाच्या लवचिकतेचा कोशंट वेगळा आहे. कशाचा कशाला ताळमेळ असायची गरजच नाही.
आपलं नशिब रानंला अजून शाळकरी मुलगी म्हणुन किंवा सौन्याला जुन्या सिनमध्ये दाखवलं नाहीये !
फक्त आसांचं २० वर्षात अजिबात एजिंग नाही. त्यांच्या साड्यांचा रंग बदलला आणि ॲक्सेसरिज बदलल्या. बाकी सगळ्या पात्रांचं त्यांच्या सध्याच्या कोशंट प्रमाणे कमी जास्त वय झालयं.. (इथे भिंतीवर डोकं आपटायचा स्माइली टाकायचा पण कसा टाकायचा ते शिकायचं आहे)

आसांचं फक्त २० वर्षात अजिबात एजिंग नाही. साड्यांचा रंग बदलला आणि ॲक्सेसरिज बदलल्या. बाकी सगळ्या पात्रांचं त्यांच्या सध्याच्या कोशंट प्रमाणे कमी जास्त वय झालयं>>> <अगदी अगदी

रच्याकने, तो यंग सर्जा नंदू पेक्षा लहान दाखवलाय...
आत्ताचा म्हातारा सर्जेराव किती वयाचा घेतलाय? ....
प्रेक्षकांचं डोकं फिरवून सोडायचा चंगच बांधलाय या लोकांनी
Angry

बरं राजनंदीनीच्या लग्नाला उशीरच झालाय असं आईसाब म्हणाल्या काल >>>>>>>> ह्याचा अर्थ नन्दूच्या वयाची तिशी चालू आहे अस वाटतय. मग विस त्यावेळी २० वर्षाचा होता का? Uhoh

रिक्षाच्या उजव्या बाजूला शाहरुख खानच्या कोयलाच पोस्टर होत, म्हणजे तो काळ ९७ चा असावा, नन्दू ९८ साली वारली.

रच्याकने, तो यंग सर्जा नंदू पेक्षा लहान दाखवलाय...
आत्ताचा म्हातारा सर्जेराव किती वयाचा घेतलाय? .. >>>>>>>> Lol

फोटोतला दादासाहेब खरा होता तर. दादासाहेबान्ना पम्प लागतो. विस त्यान्चा खून करताना त्यान्चा पम्प काढून तडफडत ठेवेल अस काहीतरी असेल.

तो गुरुजी एकीकडे म्हणतोय की नन्दूला हितशत्रुपासून धोका आहे, आणि दुसरीकडे लग्नाबद्दल विचारल्यास, तिला उत्तम जोडीदार मिळेल असही बोलतोय. नक्की हा काय प्रकार आहे? जोडीदार निवडताना काळजी घ्या अस का नाही बोलला ज्योतिषी? Uhoh

गजू राजू >>>>>>> Rofl

विल्या-गजा छान!! त्यांची कारस्थाने बघण्यात मजा येईल असे वाटते.. होप सोssss!!! >>>>>>>>>>> ++++++++११११११११११

गजाची एण्ट्री झोकात झाली. Wink Blush

जयदीप झालेला मुलगा सुभाचा धाकटा मुलगा आहे?

आज विल्या आणि जालिन्दरची एन्ट्री आहे.

ज्या कम्पनीच्या बॉसचे नाव जालिन्दर असेल, तिकडच्या एम्पलॉयीजचे काय हाल होत असतील. गजाने चान्गल त्याला मॅनेज केलय.

ती शिल्पा किती ते लाडं लाडं बोलते. ती प्रेग्नंटपणी गेली म्हणजे आपलं हे यडं तिचंच तर नसेल नं? >>>>> कस शक्य आहे ते? नन्दूच्या डेथनन्तर ही दहा दिवसान्नी जन्माला आली.

ह्याचा अर्थ नन्दूच्या वयाची तिशी चालू आहे अस वाटतय. मग विस त्यावेळी २० वर्षाचा होता का? Uhoh>>> <नाही सुलू, मलातरी ती ४० अन सुभा ३५ चा वाटला काल त्या रिक्षात

त्या बाळाला किती वेळ अस बेशुध्द ठेवणार आणि ती नंदूचा पुनर्जन्म इहे ना मग विल्यागजाचे संवाद कसे आठवतात.काहीही.
शितु फार म्हणजे फारच थोराड दिसत आहे.बघवत नाही .

तिची ती एका बाजूला झुपका असलेली हेअरस्टाईल पण बघवली नाही. बोलणंही फारच लाडीक. तो छोटा जयदीपचा सीन पुढे ढकलला.

Happy अरेरे शि तु आली, बागडली तरी लोकांच्या तक्रारी काय संपेनात.
तिला लग्नाचे वय उलटून गेलेली म्हणजे १८ वर्षे १ महिन्याची धरा. मग जुळतील सगळे हिशोब.

आणि खात्या पित्या घरच्या मुली असतात दुड्या अंगाच्या. काय ती नजर लावायची लोकाच्या पोरीला.
बोलतेय ना लाडे लाडे, हसतेय ना गोड गोड मग तुमचा नजरेचा स्कॅनर खाली का सरकतो.

तरूण सर्जेराव लंगडत नाहीयेत... म्हणजे एक ष्टुरी त्यांच्या पायाची पण दावणार का?

२० वर्षापूर्वी सिटी स्क्वेअरला जायची माणसं ? ती पण कर्जत मधली?

VB -- त्याचे एक शास्त्र आहे. दुकानात जायचे. आपल्या बजेटप्रमाणे ५०-१०० ग्रॅम बदाम घ्यायचे. आपल्या डोळ्याच्या मापाचे निवडून घ्यायचे मात्र. त्यांना बुबुळाशी जुळेल अशा जागी कर्कटकने भोके पाडायची. ते भोकयुक्त बदाम डोळ्यात ठेवून शिरेल पहायची. मग वय बरोबर दिसते. एकदम "मैं सोल्ला बरस की ( इति शि तु) ..... तो मैं सतरा बरस का ( इति सु भा)"
रात्री ते बदाम पाण्यात भिजवून सकाळी खायचे म्हणजे सिरीयल बघून शिणलेल्या मेंदूला पोषण मिळते. रात्रीसाठी नवीन बदाम भोक पाडून तयार ठेवायचे. मग ऑफीसला जायचे.
सुरूवातीला ५०-१०० ग्रॅमच आणा बदाम. पुढे तुमच्या बघायच्या सहनशक्तीप्रमाणे आणता येतील हवे झाल्यास.

Lol

एक वयाचं गणित अजून बाकी आहे. मायराचे बाबा ती लहान असताना विस सोबत काम करायचे तेव्हापासून तिचा तो आदर्श वगैरे असतो. तर तेव्हा विस नेमका किती वर्षांचा होता? आत्ता मायराचं वय काय?

काही प्रश्न प्रश्नच राहू देणे आपल्या हिताचे असते --- असे एकदा बि. टा. आदरणीय श्री विक्रमराव सरंजामेसाहेबजी आपल्या मुग्ध, भाबड्या, सोज्ज्वळ, नूतन-परिणीत धर्मपत्नी सौ ईशावहिनी विक्रांत सरंजामे-निमकर यांस म्हणाले होते ---- ते आपणां कोणासच स्मरू नये यापरती दुसरी खेदाची बाब नव्हे.
याउपर वयाचे हिशेब विचारण्याची गुस्ताखी केल्यास कठोर शासनास पात्र व्हाल याची नम्र आठवण करून देण्यात येत आहे..... हुकूमावरून... सरंजामे गढी, कर्जत, (सिटी स्क्वेअरपासून शेअर रिक्षा १५ रू)

Rofl

बरं, मग उत्तर देते Proud गजाच्या मागच्या भिंतीवर यारानाचं पोस्टर आहे. नवीन यारानाचं. म्हणजे १९९५ किंवा ९६ मधे घडते आहे स्टोरी सध्या Wink

शितुला कदाचित पहिल्या दोन.तीन भागात बाळासारखी अक्टिंग करियला सांंगितली असेल,मग बिचारीची फारच पंचिईत झाली असेल,तशात गोंधळ उडाला असेल आणि मग तिने लाड लाड बोलण्याच ठरवल असेल.
पण काहीही असो,बाळापासून काही काळ का होईना सुटका झाली.कारण आता पिस कमी काढता येतील.शितु आता कितीही लाडात बोलली तरी लवकरच ती भूमिकेत घुसणार हे नक्की

जयदीप झालेला मुलगा सुभाचा धाकटा मुलगा आहे? >>> हो

ती शिल्पा किती ते लाडं लाडं बोलते. ती प्रेग्नंटपणी गेली म्हणजे आपलं हे यडं तिचंच तर नसेल नं? >>>>> कस शक्य आहे ते? नन्दूच्या डेथनन्तर ही दहा दिवसान्नी जन्माला आली. >>>>>>> दहा महीन्यानी ना

काही प्रश्न प्रश्नच राहू देणे आपल्या हिताचे असते --- असे एकदा बि. टा. आदरणीय श्री विक्रमराव सरंजामेसाहेबजी आपल्या मुग्ध, भाबड्या, सोज्ज्वळ, नूतन-परिणीत धर्मपत्नी सौ ईशावहिनी विक्रांत सरंजामे-निमकर यांस म्हणाले होते -->>>>>>>>>>>>>> हो बरोबर.... सो उत्तर न शोधलेली बरी

ती शेअर रिक्षातून का जाते. गजा किती छपरी दिसतो. काय तो झगामगा गाॅगल आणि गळ्यात काय आहे ते ताईतसारखं. सर्जेरावचंं काय म्हणताय तुम्ही सगळे. जुन्या काळी कुठे आहे सर्जेराव. आसा छान दिसतात पूर्वी, त्या गुलाबाच्या फुलासारख्या गोड. गजा आणि विल्या मजा आणणार.

सर्जेरावचंं काय म्हणताय तुम्ही सगळे. जुन्या काळी कुठे आहे सर्जेराव>>>>> काल दादासाहेब ज्याला सर्जा म्हणत असतात तोच तो वाढत असतो जेवण

सर्जेरावचंं काय म्हणताय तुम्ही सगळे. जुन्या काळी कुठे आहे सर्जेराव. >> आहे की !
फ्लॅशबॅक मधे शितु आणी सुभा दोघही तरूण दिसत नाहीत , सुभाची अ‍ॅक्टिन्ग आवडली मला, लाडेलाडे अ‍ॅक्टिन्ग कोणीही केली की मला इरेटॅटिन्गच वाटते त्यामुळे शितूच गोडगोड बोलण नाहिच आवडल.

Pages