Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही तुम्॑च्या पोस्ट्स चा
तुम्ही तुम्॑च्या पोस्ट्स चा प्रताधिकार घ्या बरं.. लोकं ढापुन राहिले न.. एक कलेक्शन येउ देत चिरफाडीचं>>>>अगदी अगदी....अनुमोदन!!!
कळत नकळत मी पण वापरुन गेले ना ग बाई (कापूसकोंड्याची गोष्ट)...फक्त आपल्याच धाग्यावर वापरलंय बरं!!
सिरियसली विचार कराच..
आणि तुपारे कलेक्शन्स सेपरेट ठेवा..
माबोवरचं जुनं कोणी नाही
माबोवरचं जुनं कोणी नाही ढापणार सुलू. असं करू नये हे कधी ना कधी वाचनात येतच माबोवर.
नवीन कोणी अजाणतेपणे, नियम माहीत नसल्याने उत्साहाच्या भरात किंवा सभासदत्व नसल्याने लॉगइन न करता वाचणार्या परक्या कुणीतरी, कोणाला कळणारे म्हणून... चिकटवले असेल तिथे.
सुषमाताई आपल्या आपल्यात इतके चालते. प्रताधिकार वगैरे परक्यांसाठी आणि श्रेय न देता जाणीवपूर्वक फायदा घेणे या वृत्तींसाठी स्टॉप सिग्नल असतो.
किल्ली, कलेक्शन कसले कर्माचे !! रिकामपणाचे उद्योग.
नाव काय देणार ? मेकिंग ऑफ तुपारे सारखे डिसेक्टिंग ऑफ तुपारे की डी-फीदरिंग ऑफ तुपारे ?
पण ३ धाग्यावरील सगळ्यांचे मिळून होईल मस्त.
ते मांजर उष्म्याने आप्ल्या जिवाला वैतागलेय आणि ही मांजर-मैत्रीण स्वतःचे प्राणी-हाताळणे-स्किल दाखवायच्या प्रयत्नात. मांजराने पंजा मारायला हवा होता. अगदीच पावली कम आहे बया.
ही comment झी मराठीच्या
ही comment झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर तुला पाहते रे च्या प्रोमोखाली दिसतेय..
तुम्हीच आहात का त्या?
Submitted by कच्चा लिम्बू on 29 April, 2019 - 07:47>>> लिंक द्या बघू, आधी कुणी पोस्टले
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BwoVzwLFsos/?utm_source=ig_share_sheet&igshi...
ही घ्या लिंक.
लोकं कमेंट पण ढापतात, आता गं बया.
मला एक प्रश्न पडलाय वरची।लिंक
मला एक प्रश्न पडलाय वरची।लिंक बघून
कुणी कोणाची पोस्ट कॉपी केली????
इकडे ती
Submitted by कारवी on 26 April, 2019 - 23:44
म्हणजे 4 दिवस आदीची आहे
पण इन्स्टाग्रामवर ती 5 days अगो दिसतेय
आज विक्याने उघडलेली खोली ती
आज विक्याने उघडलेली खोली ती नेहमीची नव्हती,अस वाटल मला,.
ही मस्त सिच्युएशन झालीये.
मी फक्त प्रतिसादाला रिप्लाय देताना वाक्य कॉपी पेस्ट करते. बाकी रेडीमेड काही उचलत नाही.
कोणाचे इन्स्टाग्रामवर लॉगइन असेल तर प्लीज बघून सांगा जरा. काय तारीख वेळ आहे....
मला इन्स्टावरचा प्रतिसाद दोन
मला इन्स्टावरचा प्रतिसाद दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला दिसतोय.
कारवींचा 26 तारखेला म्हणजे चार दिवसांपूर्वीचा आहे.
अविकांना इन्स्टावर तो प्रतिसाद पाच दिवसांपूर्वीचा कसा काय दिसतोय??
निधी, तुम्ही जी आधी लिंक
निधी, तुम्ही जी आधी लिंक दिलीय -- Submitted by Nidhii on 29 April, 2019 - 22:13 --- मध्ये >>>>>
त्यात व्हिडीओच्या बाजूला खूप कमेंट्स आहेत आणि कमेट स्क्रोलिंग विंडोखाली सगळ्याला मिळून 5 days अगो दिसतेय. त्यावरून म्हणतायत अविका बहुतेक. मलाही तसेच दिसतेय.
त्या मुद्द्याच्या कमेंटची निश्चित वेळ तारीख वेगळी नाही दिसत.
कारवी, माझं इन्स्टावर अकाऊंट
कारवी, माझं इन्स्टावर अकाऊंट आहे. आणि मी वर स्पेसिफिक त्या कमेंटचा स्क्रिनशाॅट दिलाय. ती कमेंट दोन दिवसांपूर्वीची आहे.
इन्स्टावर अकाऊंट नसणाऱ्यांना तुम्ही म्हणता तसं सगळ्याला एकच तारीख दिसत असेल कदाचित.
हो, निधी, माझा अकऊंट नाहीये
हो, निधी, माझा अकऊंट नाहीये इन्स्टावर.
मी दुसर्याचे घेतले नाही हे मला नक्की माहितीये.
फार तर मी आणि इन्स्टावरची व्यक्ती यांनी एकाच वेळी लिहीले ही शक्यता होती.
दुर्मिळ पण संशयाचा फायादा देण्याजोगी म्हणू.
आता तर तुमच्या स्क्रिनशाॅटने स्पष्ट झाले चित्र, धन्यवाद.
आशा करूया अविकांनाही ----- मला एक प्रश्न पडलाय वरची।लिंक बघून --- कुणी कोणाची पोस्ट कॉपी केली???? --- या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल बहुधा.
कारवी, माझं इन्स्टावर अकाऊंट
कारवी, माझं इन्स्टावर अकाऊंट आहे. आणि मी वर स्पेसिफिक त्या कमेंटचा स्क्रिनशाॅट दिलाय. ती कमेंट दोन दिवसांपूर्वीची आहे.>>>
येस कारवी, माझंही इंस्टावर अकाउंट आहे. आणि तिथे ती पोस्ट 2d ago दिसतेय.
मी मायबोलीवर पोस्ट केलं तेव्हा ती comment इंस्टावर posted few hours ago दिसत होती.
अगदीच डिटेक्टिव्हगिरी करायची झाली तर...
'शितु' हा शॉर्टफॉर्म माबोवरच पाहिला आहे. इंस्टावर नाही.
मला वाटतं त्यावरुनही कोणी कोणाची पोस्ट कॉपी केली याचं उत्तर मिळू शकतं
माझ्या फोन मध्ये इमेज अपलोड
मलाही 3 d ago असे दिसतंय
इमेज अपलोड सुविधा माझ्या फोनला
सपोर्टेड नाहिये
कारवी, वेलकम.
कारवी, वेलकम.
माबोवरच्या बऱ्याच "धम्माल" कमेंट व्हाॅटसपवर वेगळ्याचं नावांनी फिरत असतात. आपल्याला माहित असतं त्या आपल्या मायबोलीवरच्याच आहेत पण आपण काही करु शकत नाही.
माबोवरच्या बऱ्याच "धम्माल"
माबोवरच्या बऱ्याच "धम्माल" कमेंट व्हाॅटसपवर वेगळ्याचं नावांनी फिरत असतात. >>>>
कमेंट कशाला अख्ख्या कथा-कविता फिरतात. किती धाग्यांवर माबोकर लिहीतात येऊन, नावाशिवाय कथा फिरतेय.
लोकांना लाईक्स, उंच अंगठे इतके आवडतात हल्ली आणि स्वतः काही श्रम न घेता आयते काही मिळाले तर बरेच.
तक्रार करणे, हरकत घेणे, त्या साईटच्या व्यवस्थापकांना कळवणे.... त्यांचीही IP Policy आणि Violation rules असतातच.... करता खूप येईल. किती लक्ष ठेवणार कोणी आणि किती पाठपुरावा करणार. म्हणून फावते अशांचे.
हे करू नये ही जाण प्रत्येकाल आतून हवी (Intellectual honesty) पण नसते बहुतांशी.
सुषमाताई, कच्चा लिंबू थँक्स तुमच्या सहकार्याबद्दल.
मला ज्याची खात्री होती पण इन्स्टा अकाऊंट नसल्याने पुरावा नव्हता, तो निधींनी दिला. सो, बात खतम.
खात्रीला विश्वास पुरतो, अविश्वासाला पुरावा देणे उत्तम.
चला आता राजनंदिनीच्या नावाने हाकारे - कुकारे घाला. शिकारीच्या वेळी करतात तसे.
येऊ दे एकदाची परातीतून बाहेर.
आली आली काल ती .
आली आली काल ती .
म्हणजे काल थोडीशी दिसली , आज रिक्शात बसून येईल .
विसं एक्दम पहुंचा हुआ खिलाडी निघाला . काय स्टोरी ऐकवली बाळाला.
आणि ते बेणं फसणार !
एक्दा धडधडीत विचारायाचं ना ....
सर , जर तुम्ही विक्रांंत सरंजामे नाही तर मग तुमचं खरं नाव काय?
बोला ना सर .. काय आहे तुमचं खर नाव??
ती बंद खोली किती गूढ वाटत होती.
ती खोली नेहमीची बंद खोली
ती खोली नेहमीची बंद खोली वाटली नाही.विक्याने शूज,घड्याळ,मोबाईल बाहेर ठेवला नाही, ठेवायला तसही काहीच नव्हत,चावीनेही दार उघडल नाही.बाळाला कळल कस नाही
सोनिया किंवा पुष्पाच पाहिजे होती,प्रश्न विचारून भंडावून सोडल असत,अग बाई,अग बाई करत विक्याला वेडा करून सोडेल.
ती खोली नेहमीची बंद खोली
ती खोली नेहमीची बंद खोली वाटली नाही >> हो नं
४-५ एपि पूर्वी आसा तो ह्याच खोलीत बसला असताना येतात आणि विस लाईट बंद करतो त्यांनी हाक मारल्यावर...
एवढ्या मोठ्या बंगल्यात ती
एवढ्या मोठ्या बंगल्यात ती खोली गेस्टरुमसारखी वाटत होती ती.अडगळीची खोलीपण मोठी असते त्या दाखवलेल्या खोलीपेक्षा..
नंदूकडे पण बाळासारखेच मोजकेच
नंदूकडे पण बाळासारखेच मोजकेच ड्रेसेस होते का?
एक तो राणी कलरचा लहरिया दिसला .
मुख्य म्हणजे खोलीत जायला
मुख्य म्हणजे खोलीत जायला जिना चढुन घराच्या डावीकडून येतात. आणि विक्या काल तिला उजवी कडून घेउन आला. स्टुपिड नटर्स
केवढं ते निरिक्षण!
केवढं ते निरिक्षण!
येथून पुढे रोज, ईशा ऐवजी राज
येथून पुढे रोज, ईशा ऐवजी राज नंदिनी दिसू लागली तर्र्र्र्... पिसं काढताना मजा येईल का?? ...केड्याचे रानोमाळ लॉजिक उरेल फक्त!!

... काल बाळाला प्रत्येक प्रसंग सांगताना सुभा काय साळसूदपणाचा आव आणून, डोळ्याच्या कोपऱ्यातून(उल्लू बनली का याचा अंदाज घेत) कसलं भारी लुक देत होता.. कम्माल हावभाव होते चेहर्यावर..
.. या उलट बाळ, "काय ती प्रेग्नंट होती.?" = "निम्म्या वयाच्या बायको बरोबर चालायला लाज वाट्टीय?" (तु पा रे सुरू व्हायच्या आधीचा प्रोमो.. बाळाचा डायलॉग)
दोन्ही वाक्य एकाच सुरात म्हटली आहेत !!
विसं एक्दम पहुंचा हुआ खिलाडी
विसं एक्दम पहुंचा हुआ खिलाडी निघाला . काय स्टोरी ऐकवली बाळाला.
आणि ते बेणं फसणार ! >>>>>>>> अगदी अगदी. फक्त नन्दूने विसला 'गूड न्यूज' कशी सान्गितली ते एवढ डिटेलमध्ये सान्गायची गरज नव्हती ह्याला. किती फिल्मी वाटत होत ते.
सर , जर तुम्ही विक्रांंत सरंजामे नाही तर मग तुमचं खरं नाव काय?
बोला ना सर .. काय आहे तुमचं खर नाव?? >>>>>>>>> तो गजा पाटील आहे हे तिला माहितीये. तिने विचारायला हव होत की, सर, तुम्ही स्वतःच्याच कम्पनीत फ्रॉड का केला? राजेश आणि त्याच्या फॅमिलीच काय झाल? बोला ना सर्र्र्र्
कोणाला दादासाहेबान्चा फोटो सर्जेरावासारखा दिसला नाही का? पण विस खोटा दादासाहेब का दाखवेल?
तो अस्थिकलश खोटा असेल का?
नन्दूचा फ्लॅशबॅक ईशाला बेशुद्द झाल्यावर दिसणार? का तो फ्लॅशबॅक फक्त प्रेक्षकान्साठी आहे?
ईशा चक्कर येऊन पडल्यावर विस तिकडेच मख्ख का उभा होता. नन्दूची खरी स्टोरी तिला कळू दे म्हणून?
बोला ना सर्र्र्र्
.. काल बाळाला प्रत्येक प्रसंग सांगताना सुभा काय साळसूदपणाचा आव आणून, डोळ्याच्या कोपऱ्यातून(उल्लू बनली का याचा अंदाज घेत) कसलं भारी लुक देत होता.. कम्माल हावभाव होते चेहर्यावर.. >>>>>>>> +++++++++१११११११११
निम्म्या वयाच्या बायको बरोबर चालायला लाज वाट्टीय? >>>>>>>>>> खर त्या प्रोमोत, ईशा विसला तु म्हणताना दाखवलीय, केडया विसरला वाटत.
सोनिया किंवा पुष्पाच पाहिजे होती,प्रश्न विचारून भंडावून सोडल असत,अग बाई,अग बाई करत विक्याला वेडा करून सोडेल. >>>>>>>>
खात्रीला विश्वास पुरतो, अविश्वासाला पुरावा देणे उत्तम. >>>>>>> कारवी, मस्त डायलॉग.
कोणाला दादासाहेबान्चा फोटो
कोणाला दादासाहेबान्चा फोटो सर्जेरावासारखा दिसला नाही का? >>> मला नंदूच्या आईचा फोटो शितुसारखाच दिसला. नक्की तिच होती .
काल बाळाला प्रत्येक प्रसंग
काल बाळाला प्रत्येक प्रसंग सांगताना सुभा काय साळसूदपणाचा आव आणून, डोळ्याच्या कोपऱ्यातून(उल्लू बनली का याचा अंदाज घेत) कसलं भारी लुक देत होता.. कम्माल हावभाव होते चेहर्यावर.. >>>>>>>> +++++++++२२२२२२२२२२२२२२२२२२२
सर , जर तुम्ही विक्रांंत सरंजामे नाही तर मग तुमचं खरं नाव काय? >>> हे का नाही वि चारल नुसत आपल काय सागतो एकत होती
ऑ...... ती आई दाखवली होती का....... पण ती तर शितु च होती..... तरी मी म्हट्ल ... हा फोटो ब घुन ई बाळाला चक्कर का नाही आली...
ती खोली म्हणजे प्रदर्शन
ती खोली म्हणजे प्रदर्शन मांडल्यासारखंच दिसत होतं.
. पण ती तर शितु च होती..... तरी मी म्हट्ल ... हा फोटो ब घुन ई बाळाला चक्कर का नाही आली...>>>>>>+११ म्हटलं हिला दिसलेला चेहेरा विसरली की काय? की चक्कर येण्याची अॅक्टींग करायला विसरली.
खोली बदलेलीच होती, कारण
खोली बदलेलीच होती, कारण आधीच्या गुढ खोलिच दार उलट्या बाजुन उघडत होत, खोलिच्या बाहेर घड्याळ, मोबाइल ठेवायला हॉलवे टेबल पण नाही दिसला.... बाळाला (आणखी)मुर्ख बन्वल न काय ,,वेगळिच खोलि दाखवली वाटत.
झेन्डे कशाला म्हणात होते मग खोलिच रहस्य कळल तर आपले सगळे सिक्रेट ओपन होतिल? बाळ मन्द सारख सगळ्या स्टोर्याच काय एकत ? एकही प्र्शन पडत नाही? ओह सॉरी सॉरी! लॉजिकल काही विचारल तर फाउल आहे इथे.
दादासाहेब म्हणजे कोणाला आणून
दादासाहेब म्हणजे कोणाला आणून बसवल आहे? छोटा जयदीप सुभाचा मुलगा मल्हार आहे.बाळ अस किती वेळ जमिनीवर पडून राहणार.
काल विक्या पुड्या सोडत
काल विक्या पुड्या सोडत असताना इशा त्याच्याकडे बेडकासारखी गुटुगुटु बघत होती. राजनंदीनी स्मारकातल्या आजूबाजुच्या वस्तूही तिच्यापेक्षा जास्त एक्सप्रेसीव्ह वाटल्या. ती फक्त ऐकते. पुढे मेंदूत प्रोसेसिंग होणं आणि मग हावभाव बदलणं वगैरे गोष्टी घडत नाहीत.
आजपासून इतिहासात डुबकी मारलिये...मजा येते आहे बघायला. इथल्या सर्व पळ काढलेल्या शिलेदारांनी परत काही दिवस हजेरी लावायला हरकत नाही. आता काही दिवस तरी इशामुक्त तुपारेचा लाभ मिळेल.
जयदू म्हणजे सुभाचा धाकटा मुलगा वाटतोय. बादवे, तो राजनंदिनीला "ताई" म्हणतोय. आता का राजनंदीनी सुरु केलं बरं ?
दादासाहेब, आईसाहेब छान आहेत. विक्या झेंडे पण मस्त.
Pages