तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ती जोगतीण बाई मधेच किती जोरात ओरडते उदे ग .. दचकायलाच होतं.

त्या जालिंदरचा काय काम धंदा.. बघावं तेव्हा गाडीला टेकून चहा पित असतो.

योग>>> आता जस्सा च्या तस्सा बदला घ्यायचा म्हणून ती बाळाच्या रूपात आली आहे.
आहे की नाही मस्त लॉजिक! >>>> अगदी बरोबर! फक्त मग व्याज म्हणुन मठ्ठपणा ॲड झालाय.

म्हणजे जेव्हा राजनंदिनी आणि विकु च लग्न झालं तेव्हा ती चाळीशी मधिल असावी. थोडक्यात ईबाळ व विस च्या अगदी ऊलट प्रकार तेव्हा घडला असावा. विकु तेव्हा विशीतला.>>>>मला पण तसच वाटतय ...
जिवलगाला कॉम्पटिशन म्हणून विस- मायराच एक्सट्रा मॅरिटल दाखवतायत की काय? Uhoh>>>> लोकांना आधीच वैताग आलाय.... अस दाखवल तर काय करतील माहीत नाही

आज विक्या इशाला विचार्नार आहे की तु जलिन्द्र ला का भेत्लिस म्हनून. आनि ति मख्ख उभ राहून अखखा एपिसोद उदव्नार.>>>>अगदी असंच झालं बरं....
आजपर्यंत एकदाही नायिकेच्या डोळ्यांचा क्लोज अप पाहिला नाहीये मी... तिला नेत्रपल्लवी करता
येतच नाही बहुतेक Proud Proud Proud

जालींद्राला उगं स्टाईलकरता थोड्या थोड्या वेळानं मिशीच्या जागी बोट लावायची लकब दिलीये. तो पण बोअर होतो ती सांभाळायला असं वाटलं.

मेधावि.. जालिंद्र आणि त्याची स्टाईल!! Lol
खरंच कोण ठरवत असेल अशा लकबी अँड ऑल?
तो जालिंदर एकदमच ऑर्डिनरी मॅन दिसतो...... मला तर वजन काट्यावर काम करणारा, गॅरेजचा मालक, पंक्चर दुरुस्त करणारा, धारवाला.......अशा टाईप्स वाटला काल....!!
विक्याने काय बिझिनेस केला म्हणे याच्या बरोबर जॉईंटली?

झेण्डेला आजारी असल्याच दाखवण्यापासून ते सासरी आईसाहेबान्ना भेटेपर्यन्त ईशाचा अभिनय सुधारल्यासारखा वाटला. पण विसबरोबरच्या सीनमध्ये पहिले पाढे पन्चावन्न.

विसचे इतके सारे पराक्रम ऐकूनही ( अजून आणखी बरेच पराक्रम ऐकायचे आहेत हिला) हि म्हणते, ' मला पुर्वीचे विक्रान्तसर हवेत'. Angry हिच अजूनही विसच्या फोटोशी बोलण चालूच. दुसरी एखादी असती तर तिने फोटो फेकला असता. तरी बर, फोटो उपडा ठेवला तिने नन्तर.

विसने जालिन्दरला भेटण्याविषयी विचारल्यानन्नतर ईशाच गुन्हा केल्यासारखी घाबरत होती त्याच्यासमोर. बावळटासारखी उभी होती. खर तर अश्या सिच्युएशनमध्ये माहेराहून आल्यावर ईशा बदलते, तिच स्ट्रॉन्ग मुलीमध्ये रुपान्तर होत अस दाखवायला हव होत. विसशी डोळे भिडवून बोलणे, त्याला प्रत्युत्तर देणे, टोमणे मारणे, त्याचा राग येणे असे चेन्जेस दाखवायला हवे होते. ' मी तुम्हाला काय शिक्षा देणार' हे सुद्दा तिने मेन्गळासारख विचारल. खर तर हा प्रश्न तिने उपहासाने विचारायला हवा होता. आईशाहेबान्शी बोलताना मात्र ती कॉन्फिडन्ट वाटत होती.
विस म्हणतो की, ' तुझ्या वडिलान्नी हेच शिकवल का, खोट बोलणे' एखादीने म्हटल असत, " माझ्या वडिलान्नी मला काय शिकवल ते तुम्ही सान्गायची गरज नाही. तुम्ही कुणालाही न सान्गता कुठेही जाता, कधीही घरी येता. मी तुम्हाला एकदाही विचारलय का सारख सारख कुठे जात असता, कुणाला भेटत असता, का भेटत असता. माझ्या बाबान्ना यात ओढायच काही काम नाही, सान्गून ठेवते."

बर इतका अपमान सहन करुनही हिच आपल भलतच सुरु आहे, ' जालिन्दर सरान्ना काही करणार नाही ना. ' अग, तुझा नवराच त्याला मारुन परत येईल.

पुढचा भाग पाहून पुढील शक्यता जाणवतात.

१. विस झेण्डेचा बळी देईल. जालिन्दरने विसवर हल्ला केल्यास, विस ईशाला ईमोशनली ट्रॅप करेल. जालिन्दरला झेण्डेच्या खुनाबद्दल अटक करेल.

२. जालिन्दर विस आणि झेण्डेला सामील असेल.

३. झेण्डेऐवजी मायराचा सुद्दा बळी जाऊ शकतो.

दुसर्या दिवशी मायरा विसला त्याचा कोट आणून देते. कोटाला चिखल लागला होता का, जेणेकरुन तो धुऊन सुकेपर्यन्त विसला मायराकडे रात्रभर थाम्बाव लागल? आणि मायराच्या घरुन लगेच ऑफिसमध्ये? आन्घोळ कधी आणि कुठे केली?

ईशासारख्या मुलीने आपला विश्वासघात केला ह्याचा विसला राग आला. केडयाने मायरा प्रकरण मध्येच आणल नसत, आणि विस ईशाच्या विश्वासघातामुळे जस्ट दुखावला जातो, पण त्याला राग येत नाही अस दाखवल असत तर ते पटल असत. After all, He deserves it. आपल्या जवळच्या माणसाने विश्वासघात केल्यावर काय अवस्था होते हे त्याला कळायला हव होत, अर्थात त्याच तिच्यावर खर प्रेम असत तरच.

म्हणजे जेव्हा राजनंदिनी आणि विकु च लग्न झालं तेव्हा ती चाळीशी मधिल असावी. थोडक्यात ईबाळ व विस च्या अगदी ऊलट प्रकार तेव्हा घडला असावा. विकु तेव्हा विशीतला. >>>>>>>>> योग हे मस्त आहे. Happy हे शक्य आहे.

बादवे काल ईशाने आईसाहेन्बाच्या खान्द्यावर हात ठेवताना विसची कॉपी केली. पण ती स्टाईल विसलाच शोभते. Happy

विक्याने काय बिझिनेस केला म्हणे याच्या बरोबर जॉईंटली? >>>>>>>> वडापावची गाडी टाकली असेल.

गजा सोडून स्केच वाल्या बाईच्या शोधात सोनेरी चपला घालून दुडूदुडू धावू लागलं बाळ.. >>>>>>> हे मी इमॅजिन केल. Proud

सॉलिड गेमाड आहे विक्या.. भारी अॅक्टिंग..
बरोब्बर हीर्वीणीचा फोकस हलवलान् की ओ... >>>>>>> त्यात विसची कसली कमाल? खरी कमाल तर जोगतीणबाईन्ची आहे.

केड्याला नेमकं दाखवायचं काय आहे हे बहुधा त्यालापन माहिती नाहीये कधी विसच ईशावर प्रेम आहे असं दाखवतात कधी मायरसोबत तर कधी म्हणतो दोघींसोबतपन नाही. नुसता गोंधळ. >>>>>>>>> +++++++१११११११११

सॉलिड गेमाड आहे विक्या.. भारी अॅक्टिंग..
बरोब्बर हीर्वीणीचा फोकस हलवलान् की ओ...
गजा सोडून स्केच वाल्या बाईच्या शोधात सोनेरी चपला घालून दुडूदुडू धावू लागलं बाळ..
... कालच्या एपिसोडात सर मायराच्या घरी मुक्कामी राहिले की काय?...
... रानोमाळ लॉजिक सोबत जिवलगाला टक्कर चालू केलीय वाटतंय..>> अगदी अगदी.. आणि बाळंतर विसरलंच की तिला विसने फसवलय आणि त्याचा शोध लावायचा सोडूनच दिल तिने.. आणि केड्याला नेमकं दाखवायचं काय आहे हे बहुधा त्यालापन माहिती नाहीये कधी विसच ईशावर प्रेम आहे असं दाखवतात कधी मायरसोबत तर कधी म्हणतो दोघींसोबतपन नाही. नुसता गोंधळ.

रानोमाळ लॉजिक: पुढे सुरू
१) मायरा ही इशा बेबी ची बहिण तसेच जालींदराची बायको असल्याने विक्यावर सूड घेण्यासाठी त्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत असावी. मंदा ही तिची खबरी आहे.
२) लंगडा नोकर जालींदराचा खबऱ्या आहे.
३) अजून खून होणार आहेत. सोन्या, मायरां, जयदीप आईसाहेब कोणाचाही नंबर लागू शकतो.
४) रानं मेलेली नसून जिवंत असावी आणि तीच विक्याचा सूड घेईल. त्या case मध्ये इशा बाळ मारले जाईल पण गायत्री दातार चे बाबा financer असल्याने तसे काही होणार नाही. उलट इशा बेबी अमिताभ स्टाईल मध्ये विक्या / गजा यांचा सूड घेईल. सहन करण्याची मानसिक तयारी ठेवा.

>>मायरा ही जालींदराची बायको असल्याने
ईतके वाईट दिवस अजून तरी झी मराठी ला आलेत असं वाटत नाही..! Proud

ई बाळा चा मख्ख चेहेरा आणि बालिश टोन अजूनही कायम आहे हे पाहून मला तर वाटतं एखाद दिवस सुभा चा भडका ऊडेल आणि त्याच्यात दामिनी मधला गोविंद सांचारेल: (सुभा विथ लाल डोळे, लाल नाक, फुगलेले गाल, खुनशी लूक!) Happy

https://www.youtube.com/watch?v=X67EI1e0H6Y

मिलॉर्ड... हीचा अभिनय सुधारावा म्हणून आम्ही किती वाट पाहिली.. पण मिळाला काय तर मख्ख चेहेरा!
एपिसोड वर एपिसोड.. एपिसोड वर एपिसोड... एपिसोड वर एपिसोड... एपिसोड वर एपिसोड मिळालेत मिलॉर्ड.. पण अभिनय नाही मिळाला मिलॉर्ड.. मिळाला तर फक्त मख्ख चेहेरा.. (मागे ते फेमस चाबूक मारल्याचा साऊंड इफेक्ट! सटॅक!)
दोन एपिसोड च्या मध्ये, सेट च्या बाहेर ही नुसती टींगल टवाळीचे धंदे करते... आणि ऊरतो फक्त मख्ख चेहेरा.. ( सटॅक!)
लोकं एपिसोड पाहण्यासाठी सगळी कामे आटोपून बसतात आणि घेऊन जातात फक्त मख्ख चेहेरा.. (सटॅक!)
मायराने,सोनियाने, रूपालीने, आणी न जाणे आणखी किती मुलींनी हा रोल मिळावा म्हणून ऑडीशनस दिले.. पण मिळाला फक्त मख्ख चेहेरा.. (सटॅक!)
आठवडे, महिने, वर्षभर ही मालिका बघता बघता अनेक प्रेक्षक आता स्वतःच बनलेत एक मख्ख चेहेरा.. आणि त्यांनाही मिळतो फक्त मख्ख चेहेराच.. (सटॅक!)
ही मालिकाच पुरत्या महाराष्ट्रातील गंडलेल्या प्रेक्षकांचे ऊदाहरण आहे.. आता त्यांची नजर फक्त तुमच्यावर खिळली आहे (मिलॉर्ड), की तुम्ही त्यांना काय देता? न्याय का मख्ख चेहेरा..जर तुम्ही त्यांना चांगला अभिनय करणारी नायिका देऊ शकत नसाल तर बंद करा ही मालिका.. हाकलून द्या दिग्दर्शकाला.. फाडून टाका, जाळून टाका पटकथेला... म्हणजे अभिनयाच्या अपेक्षेत पुन्हा प्रेक्षक बरबाद ना होवोत.. बरबाद ना होवोत...
(सन्नाटा..)

ईकडे सुबोध चा हा अवतार पाहून बाकीच्या पात्रांची भंबेरी ऊडते, ऊगाच मालिका बंद व्हायला नको.
झेंडे: अरे विक्रांत, तुला पर डे मिळाताहेत ना, मग जाऊ दे ना.. कशाला ऊगाच राडा करतोयस.
मायरा: सर, मी तुमचं डोकं चेपून देऊ का?
जेडी: माय फ्रेंड वहिनी, ईट्स हाय टाईम! मी पण अभिनय करू लागलो आहे..
सोनिया: नाहीतर काय..
ईबाबा: बाळ ईशा, एव्हाना तुला थोडा तरी अभिनय यायला हवा होता गं.
ईआई: बोलले निमकर!

(सीन समाप्त.)

योग! smiley36.gif

योग! Proud तुमचा सीन 1च नंबर.
बाळाच्या अभिनयात काहिही फरक पडणार नाही तिला सिरेलीत पाहण्याशिवाय उपाय नाही! Sad Uhoh

जालिंदरला अंधारात झेंडे दिसला नाही की
जालिंदर विशिष्ट रंगांधळा आहे की
झेंडे जालिंदरला बच्चा /लिंबू टिंबू वाटला की
काय की बाई, पण जालिंदरने त्याच्या समोरच विसला ठार मारण्याची घोषणा केली.
आणि
विस अतिवाईट आहे असं दाखवायला त्याला जालिंदरच्या पाठीवर गोळी मारायला लावली.
आणि जखमी झालेल्या जालिंदरने केड्या वर विश्वास नसल्याने असेल बहुतेक, पण आपल्या हाताला रक्त लागलेले पाहिले नि मगच परलोक प्रस्थान केले. आ... त्ता.

योग >>>>धम्माल भन्नाट लई भारी शीन लिवलाय... तु पारे वापरतील हं.. माबोकर लक्ष ठेवावे..
आणि जनरली न्यायाधीश झालेले कलाकार पण चेहर्‍यावर कोणतेही एक्स्प्रेशन्स दाखवत नाहीत..
कोण करू शकेल ही भूमिका
....

https://www.instagram.com/p/BwoVzwLFsos/?utm_source=ig_share_sheet&igshi...
प्रोमोवर प्रोमो येत आहेत पण नंदूचा अजूनही पत्ता नाही.>>.
हा प्रोमो पाहिला. तो देणं ठेवत नाही डायलॉग बाळाच्या आवाजात, तिच्या pauses सकट ऐकू आला.
बाळ 'कध्धीच कुण्णाच्ची देणी ठेवत नाही'.. नंदूताई पण कधीच कोणाची देणी ठेवायची नाही

विक्याने मारल जालिंदरला........अरे मग त्याला कशाला आणल होत सिरियलीत.एकतर बाळाला आधीच कळल होत की विक्या गजा पाटील आहे तरी त्याला भेटायला बोलावल,स्वत: सेफ राहिली,जालिंदर नाहक मेला.ह्याला लव्हिस्टोरी म्हणतात व्हय,माहित नव्हत
खरतर आता सिरियलीच खर नाव पाहिजे...
डोक बधिर करणारी विचित्र प्रकारची लव्ह स्टोरी.

जालिंदर नंदूचा मित्र किंवा आशिक दाखवतील पण गज्याने तिला प्रेमाच्या जाळयात ओढलं असं काहीतरी असेल केड्याच्या डोक्यात,अस मला वाटायला लागलय.

झालींदर आणि विसची भेट काहीतरीच होत ते. एकतर म्हणजे एकमेकांना मारायच होत तर अस ठिकाण नाही निवडत कुणी सुनसान जागा असते आणि इथेतर आजूबाजूला अपार्टमेंट्स होते परत मागे Quick Heal च होर्डिंग होत म्हणजेच लोकवस्ती होती.अस ठिकाण कुणी निवडत का. आणि झालींदरला माहिती होत ना की जीवाला धोका आहे त्याच्या तर त्याने काहीच तयारी केलेली नव्हती कमीतकमी कुणाला सोबततरी आणायचं होत ना. आणि त्याच्या बोलण्यावरूनतर तो खूपच confident वाटत होतं पण तो एवड्या सहजासहजी मेला हे काही पटल नाही बुवा Uhoh
आणि मुळात जालिंदरला मारलं हेच पटत नाहीये.

जालिंदर चा रोल संपवायचा होता म्हणून काहीच्या काही म्हणजे कहिहिहिही... तो असाच सेफ़ ठिकाणी निघुन गेला वगैरे दाखवता आलं असतं..पण मग बाळा वर आलेला संशयाचा फोकस divert करायच कोणता दूसरा मार्ग दिसला नसेल केड्या ला..

जळींदर प्रकार म्हणजे NEET च्या तयारीनिशी परिक्षेला जावं अन् बालवाडीचा पेपर यावा तसं होतं. विक्या किती खुनशी आहे ते दाखवायचा यत्न केलाय केडुकल्यानं Happy

योग Rofl Rofl Rofl

Pages