तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जळींदर प्रकार म्हणजे NEET च्या तयारीनिशी परिक्षेला जावं अन् बालवाडीचा पेपर यावा तसं होतं. विक्या किती खुनशी आहे ते दाखवायचा यत्न केलाय केडुकल्यानं >>>> Rofl
.... बिन्कामाचे फिल्मी वाढीव प्रसंग व्यक्तिरेखा घुसडण्यात केड्याचा हातखंडा आहे..
... त्याप्रमाणे तो हे प्रसंग विसरेलही आणि पुन्हा प्रेक्षक डोके फोडून घ्यायला लागतील..
Uhoh

नक्की जालिंदरचा रोल काय होता हेच कळलं नाही. आणि दुसर्या दिवशी ईबाळाला दाखवायला रक्त होतं की काय त्या रस्त्यावर, झेंडेने काय फक्त मृतदेहाची विल्हेवाट लावली की काय.

झालींदर आणि विसची भेट काहीतरीच होत ते. ..........अगदी अगदी.शुध्द अचरटपणा होता तो.एकतर जालिंदरला बाळाची ईतकी काळजी होती तर अगदी मागच्याच आठवड्यातल्या भागात तिला म्हणाला की आता आपण भेटायच नाही.
बर या मुर्ख मुलीने फोनवरून त्याला 5मि भेटा अस सांगितल,म्हणजे खरतर जालिंदर ला शितुबद्दल काही विचारायच आहे बाळाला हे ही त्याला माहित नसणार.
पतंग महोत्सवानंतर विक्याला केलेल्या फोनवरच्या संभाषणात म्हणाला की मी तुला रस्त्यावर आणीन.काल रुपालीला म्हणाला की बाहेर राहून मी विक्रांतच काहीच वाईट करू शकत नाही.
बर,नेमक विक्या बाळाला का फसवत आहे याचाही अंदाज याला नव्हता
मग हा तिथे मरायला आलाच का,उलट बाहेर राहून बाळाच्या मदतीने बरच काही करू शकला असता.
आणि काय ते विक्या आणि त्याची सो कॉल्ड लुटुपुटीची लढाई. रनिंग रेस होती ज्यामध्ये खेळाडू जालिंदर च होता.विक्या पळ ,म्हणाला ,पळाला.
गोळी लागल्यावर शरीरातून रक्तच बाहेर येणार,त्यात हात बघण्यासारख काय होत.
बाळाबद्दल न बोललेलच बर.रुपालीचा फोन आला नसता तर पचकली असती.काय तो चेहरा,बघवत नाही आता.
कालही वाटल,मालिकेची हिरवीण रुपाली हवी होती.
बातम्यांनुसार २४एप्रिलपासून शितु येणार होती,काल आलीच नाही.

कॉलींग फारेंड. त्यांचा फेवरेट जालिंदर मेला!
विशेष काहीही कार्य न करता....!!!!
बिचारा! केड्या च्या कंफ्युजन मधे त्याचा हकनाक बळी गेला.

केड्याला हातच्या का़कणाला आरसा दाखवायचा असेल...
विस घात करतो माहीत आहे तर पळायचं कशाला उगाच धाप लागली

योग ...... हसुन हसुन पुरेवाट झाली. Lol Lol :हाहा::D Lol :हाहा::D Lol :हाहा::D Lol :हाहा::D Lol :हाहा:....... सगळा सिन डोळ्यासमोर उभा राहीला... खरच ग्रेट.....

बिचारा! केड्या च्या कंफ्युजन मधे त्याचा हकनाक बळी गेला. >>>>>>>>>>>>>>>>>>> Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol

डोक बधिर करणारी विचित्र प्रकारची लव्ह स्टोरी. >>>>>>>>>>> खरच...... कोणाला सुचल हे नाव काय माहीत

केडयाने मायरा प्रकरण मध्येच आणल नसत, >>>>>>>>>>> उगाचच मध्ये घुसवल आहे तिला..... काय नक्की आपल काम आहे ह्यात हे तिला तरी कळल आहे का देव़ जाणे..... का तिची वेब सिरिज.. सपली.... तर उगाच ईथे आणल

योग .. सटॅक एक नंबर सीन Lol Lol
एवढं सहजासहजी फुकटात मेला जालिंदर !? मला नाही वाटत ते खरं असेल ... उगाच कल्पनेचे खेळ असतील कोणाच्यातरी .. असा कसा बाकी काही तयारी न करता आला ?! निदान एखाद्या पंटर ला तरी सोबत आणायचं ! Uhoh
पाठीवर एवढ्या जवळून गोळी झाडल्यावर ती छातीतून बाहेर नाही का येणार ?... आणि जालिंदर पण बावळट सरळ धावत सुटला... जरा वेडीवाकडी वळण घेत किंवा उड्या मारत तरी पळायचं .. एखादी गोळी चकवता आली असती !
आणि जालिंदर ने विस वर बंदूक रोखली तेव्हा त्याचा चाप (कि खटका!?) मागे ओढला होता एकदा .. नंतर झेंडे नि हिसकावली बंदूक अन विस कडे दिली तेव्हा विस ने परत एकदा खटका ओढला .. काय तरी दिग्दर्शन Uhoh एकदा शूट झालं कि परत बघत नाहीत कि काय हे लोक खरंच ?
जालिंदर आणि विसची भेट काहीतरीच होत ते. ..........अगदी अगदी.शुध्द अचरटपणा होता.. गोळी लागल्यावर शरीरातून रक्तच बाहेर येणार,त्यात हात बघण्यासारख काय होत >>नै त काय Angry
#रानोमाळलॉजिक

>>गोळी लागल्यावर शरीरातून रक्तच बाहेर येणार,त्यात हात बघण्यासारख काय होत >>नै त काय Angry
त्याला शेवटचं एक्दा बोट मिशीवर/नाकाखाली (कारण मिशी गायब्लीये) न्यायचं असेल.. ! Proud
लेखकूचं सामान्य ज्ञान पाहता, मला तर वाटलं होतं, जाळी ला 'पळ' म्हटल्यावर विक्रांत वर हवेत फायर करेल रनिंग च्या शर्यती सारखे आणि मगच जाळी स्प्रिंट करेल.... पण अपेक्षाभंग झाला. Proud
खरे तर बोरीवली पार्कात एक मस्त चेस सिक्वेंस टाकायची संधी होती.. म्हणजे पुढे तीन पोटोबा आणि मागे आपला (मख्ख) विठोबा. Happy पण गमावली..
रच्याकने: बाकी तो सीन पाहून तमाम प्रेक्षक धन्य झाले.. आणि हे सर्व बाहेर सुरू होतं हे तिथल्या बिल्डींग मधिल लोकांना माहितच नव्हते कारण ते तेव्हा तुपारे बघत होते.
यावर शाळेच्या मराठी पेपरमध्ये एक प्रश्ण विचारला गेला.
वरील दृष्याचा एका वाक्यात सारांश लिहा: ५ गुणः
ऊत्तरे:
१. क्रीयेटीव्हिटी ला अचाट आणि अतर्क्य च्या मर्यादा नसतात (५ गुण)
२. नि:शस्त्र माणसावर पाठीवर गोळी झाडणे हे भ्याडपणाचे ऊदाहरण आहे. (४ गुण)
३. बोरीवली पार्कात रात्री आठ नंतर जाणे हे धोकादायक आहे. (३ गुण)
४. बंदूक वापराच्या ज्ञानाबाबत सर्वसामान्यात ऊदासीनता आढळून येते. (२ गुण)
५. बंद दाराआड जगणार्‍या संस्कृतीमूळे असे गुन्हे घडतात (१ गुण)
६. झेंडे वॉज ओव्हर्ड्रेस्ड फॉर धिस अ‍ॅक्टीविटी (पालकांना घेऊन या!)

विकूविलु व्हॅम्पायर जोडगोळी असेल म्हणूनच जाळी न दरने मरतांना रक्ताने माखलेला हात पहिला असेल....
राजेश चा खून झाल्यावर नक्की त्यांनी चहाच प्यायला होता ना?
केड्या त्याचे लॉजिक रानोमाळच काय परग्रहावर सुद्धा घूमवुन आणेल

योग Lol

तुमचं लॉजिक लॉजिकल असल्याने फाऊल!!!!
इथे रानोमाळ लॉजीकच चालतं! >> Lol

दुसर्या दिवशी ईबाळाला दाखवायला रक्त होतं की काय त्या रस्त्यावर, झेंडेने काय फक्त मृतदेहाची विल्हेवाट लावली की काय. >> हो ना. काहीपण दाखवतात

आठवडे, महिने, वर्षभर ही मालिका बघता बघता अनेक प्रेक्षक आता स्वतःच बनलेत एक मख्ख चेहेरा.. आणि त्यांनाही मिळतो फक्त मख्ख चेहेराच.. (सटॅक!) >> Lol योग हसून हसून पुरेवाट झाली.

विकूविलु व्हॅम्पायर जोडगोळी असेल म्हणूनच जाळी न दरने मरतांना रक्ताने माखलेला हात पहिला असेल....
राजेश चा खून झाल्यावर नक्की त्यांनी चहाच प्यायला होता ना?
केड्या त्याचे लॉजिक रानोमाळच काय परग्रहावर सुद्धा घूमवुन आणेल. >> Lol हो काही सांगता येत नाही केड्याच

योग, सुषमाताई Lol

जालिंदर आणि विसची भेट काहीतरीच होत ते. ..........अगदी अगदी.शुध्द अचरटपणा होता.. गोळी लागल्यावर शरीरातून रक्तच बाहेर येणार,त्यात हात बघण्यासारख काय होत >>>>>>> अगदी अगदी

आणि जालिंदर पण बावळट सरळ धावत सुटला.. >>>>>>> नैतर काय. त्याच्याकडे छोटीशी बाटली होती ना कसलीतरी. विषाची बाटली असावी. ती दाखवून रुपालीला म्हणत होता, 'मला माझ्या जीवाची पर्वा नाही' मग पळण्याऐवजी त्याने तीच बाटली तोन्डाला लावली पाहिजे होती आणि तिथल्या तिथेच धारातीर्थी पडला पाहिजे होता. विस आणि झेण्डेची जाम टरकली असती. Proud

काल ईशा ' आता कुठला तरी चमत्कारच मला वाचवेल; अस म्हणत होती. तिच डोकही दुखत होत. सो, विस जेव्हा तिला नन्दूचा फोटो दाखवेल, तेव्हा ईशा चक्कर येऊन पडेल. डॉक्टर तिला झोपेच इन्जेक्शन देतील. स्वप्नात तिला फ्लॅशबॅक दिसेल. ( सात ते आठ तासाच्या झोपेमध्ये तीन तासाचा फ्लॅशबॅक ठीक आहे. Proud ) तसही विसने नन्दूची स्टोरी सान्गितली तरीही ईशाचा आणि प्रेक्षकान्चा त्याच्यावर विश्वास बसणार नाही.

उगाचच मध्ये घुसवल आहे तिला..... काय नक्की आपल काम आहे ह्यात हे तिला तरी कळल आहे का देव़ जाणे..... का तिची वेब सिरिज.. सपली.... तर उगाच ईथे आणल >>>>>>>> ++++++++११११११११

https://www.instagram.com/p/BwoVzwLFsos/?utm_source=ig_share_sheet&igshi... >>>>>>>> गजाने मस्त पटवल नन्दूला. प्रोमो भारी आहे. पण हे दाखवणार कधी, इथे अजून जालिन्दरपुराणच सुरु आहे. Sad बादवे ह्या दोघान्ची पहिली भेट सुद्दा रिक्षातच झाली!

पु. भा. बद्दल- नशीब ईशाचे डोळे उघडले तरी, आता तरी तो फोटो फेकून दे म्हणाव.

योग,सुषमाताई,सुलु......एकदम भारी
कारवी कुठे आहात
फारएण्ड,तुम्ही तर धुमकेतुच झाला आहात,
आताच तर केड्या,बाळ केवढीतरी पिस काढायला देणार आहेत
या लवकर.वाट बघत आहोत.

जालिंदर तर जिवंत आहे
अरे कोण कोणाबरोबर आहे तेच कळत नाही.
झेंडे जालिंदर की झेंडे विक्रांत की विक्रात जालिंदर की बाळ नंदिनी
केड्या ,ही लव्ह स्टोरी आहे रे,प्रियदर्शनचा भुलभुलैय्या नाही.

यक् ती इशा गावभर तेही भर उन्हात हिंडुन त्याच जरीच्या लाल ड्रेसमध्ये झोपली . बघुनच किळस येते. कोण आळशी काॅश्चुम डिझायनर पकडलाय.. पाट्या टाकायचं चांगलं काम करत आहे.

जालिंदरची विल्हेवाट लावली ना झेंडेनी? मग तो परत त्याच जागी कुठून उगव ला? किती भंकस दाखवणार अजून ते केड्याच ठरलं नसेल.
सहनशक्ती संपत आली

बातम्यांनुसार २४एप्रिलपासून शितु येणार होती,काल आलीच नाही. >>> नाही आली का, उगाच लोकांनी बघावं म्हणून पसरवतात की काय.

यक् ती इशा गावभर तेही भर उन्हात हिंडुन त्याच जरीच्या लाल ड्रेसमध्ये झोपली . बघुनच किळस येते. कोण आळशी काॅश्चुम डिझायनर पकडलाय>>>हो ना!!! आसा ही तसल्याच यक्क!! साडीची पिन पण न काढता झोपलेल्या मॅडम.. सरंजाम्यांकडे आख्ख्या खानदानात कोणालाच बाहेरून आल्यावर कपडे बदलणे, हात पाय धुणे, फ्रेश अप होणे, किमान रात्री दिवसभराचा घामट/यक् ड्रेस बदलणे अशा सवयी नाहियेत..
फक्त गजा पाटील आणि निमकर बाबा बाहेरून आल्यावर चेंज करतात.. अर्थात ते सरंजामे नाहियेत म्हणूनच असेल..
बाळाच्या ड्रेस मध्ये ए सी फिट केला असेल #फॅशन डिजास्टर#(शब्द कल्पना- - दक्षिणा) ने..

फक्त जयदीप हाच्च आयसायबाचा खर्रा मुलगा आहे हे आधीच कळलं होतं. कारण "फक्त" सोन्याशी त्या खर्या सासूसारख्या वागतात.

जालिंदर तर जिवंत आहे>>>
म्हणजे???.....
बाळ आणि रुपाली त्या जागेवर येऊन काय झाल असेल ,काही मिळत का हे शोधतात,खरतर त्यि काय शोधतात ते मलाही कळल नाही.विक्या जालिंदर ला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची थाप बाळाला मारतो.
पण विश्वास न ठेवता ते बाळ त्या ठिकाणी येत.मग विक्यालाही बाळाच्या वागण्याचा संशय आल्याने तो तिला फोन करून भेटायला बोलावतो.
इकडे बाळ बाळासारखच रुपालीकडे"मी नाही जाणार" अस भोकाड पसरत.
तेवढ्यात"तुला जावच लागेल"असा जालिंदर चा आवाज येतो
जालिंदर लिल शर्ट मध्ये,शरीरावर जखमा नाहीत,असा समोर उभा रहातो.
आता प्रीकँपमध्ये तो आपण विक्याला कस फशिवल हे सांगेल बहुतेक.
पण खरी गंमत म्हणजे बाळ "मी सरांचा खरा चेहरा जगासमोर आणीन अस म्हणत ते इतक पुचाट,आणि फालतू बोलते की ही हे सगळ कस काय करणार हेच कळत नाही
नंदू बाळाच्या रुपात पुन्हा जन्म घेतला याचा नक्की पश्चाताप करत असेल
बर...कालही नंदू आली नाही.

जाळी अंदर मेलेलाच नाहिये!!
पाठीत लाल पाण्याची बाटली लपवलेलीन् की काय मेल्याने?.. ती फुटली की नाही ते पाहिलं जाळ्याने हात वर करून..
आता राजेश आणि फॅमिली पण जिवंत दाखवा म्हणावं..
किती पुचाट फुस्का सस्पेंस निर्माण करतात..
रा नं ची ष्टोरी, गजा किती महान, सालस आहे हे विक्या यापुढे सांगणार आहे फ्लॅश बॅक मध्ये म्हणे
.. Uhoh

किती बाटल्या लपवल्या असतील जा ने, कारण विक्या नक्कि कशी गोळी झाडेल ते कसं कळणार आधीच ? जरी लाल रंगाची बाटली फुटली तरी जखम होणारचं ना !!

जाळी अंदर मेलेलाच नाहिये!!
पाठीत लाल पाण्याची बाटली लपवलेलीन् की काय मेल्याने?.. ती फुटली की नाही ते पाहिलं जाळ्याने हात वर करून..
>> Biggrin
जालिंदर आधी बाळाला म्हटला होता की यानंतर त्याला कॉल करायचा नाही कधीच आणि आता म्हणतोय की मी मेलो तरी चालेल पण इशा वाचली पाहिजे. आता काय इशा आणि जालिंदर ची लव्हस्टोरी दाखवण्याचा विचार आहे की काय केड्याचा Wink आपल्या सगळ्यांना वाटत आहे की विस आणि बाळाची लव्हस्टोरी आहे पण बाळ आणि जालिंदर ची लव्हस्टोरी आहे खरतर आणि वय विसरायला लावणार प्रेम झालींदरच वय जास्तच आहे Proud शेवटी केड्या आहे तो, काय दाखवेल याचा नेम नाही

विसचे सध्याचे उद्योग बघता मला सुभाची कीव करावीशी वाटते ..मनातल्या मनात तोही वैतागला असेल या मुर्खपणाला. पैसे मिळतात म्हणून कायकाय सहन करणार बापडा Sad

गूढ शुभांगी >>>> lol ट्विस्ट.. बाळ विक्याला सर्र्रर्र म्हणते,तर जळींदरला काय म्हणेल बरं?... जाळू सर्र्रर्र की आणखी काही सुचतंय कोणाला?

.....जालू विलू>>>मेधावी, हसून पुरेवाट झालीय..
जाळू वीलू वरून विडंबन काव्य करताय का कारवी..?

..... जरी लाल रंगाची बाटली फुटली तरी जखम होणारचं ना>>>>खरंय,होणारच जखम, पण इतका लॉजिकल विचार करून स्क्रीन प्ले लिहिणं अलौ नाहीये या शिरेलीत Lol Lol Lol

सरंजाम्यांकडे आख्ख्या खानदानात कोणालाच बाहेरून आल्यावर कपडे बदलणे, हात पाय धुणे, फ्रेश अप होणे, किमान रात्री दिवसभराचा घामट/यक् ड्रेस बदलणे अशा सवयी नाहियेत..>>> बाळ , निमकरांकडे असताना व्यवस्थित होती , बाहेरून आल्यावर हात-पाय धुवायची , कपडे बदलायची , झोपताना कॉटन नाईटी घालायची . ईथे येउन बिघडली .
गजा पाटील कसा मस्त शुभ्र लेंगा-सदरा घालतो.
काल किती वेळा भोकाड पसरलं बाळाने .
ती सिरियसली , लहान बाळं कशी रडू आल्यावर ओठ काढतात , तशी रडायला सुरुवात करते.

जालू विलू जाळी अंदर Lol

धन्स UP Happy

जालिन्दरने स्वतःचा पन्टर पाठवला असेल त्याच्या चेहर्याचा मास्क लावून . विसने त्यालाच मारल असेल.

जालू विलू एकत्र आलेत काय? >>>>>>> शक्य आहे , मेधावि. मला मायराचा सुद्दा यात हात वाटतोय.

रा नं ची ष्टोरी, गजा किती महान, सालस आहे हे विक्या यापुढे सांगणार आहे फ्लॅश बॅक मध्ये म्हणे >>>>>>>> ईशाने त्या स्टोरीवर विश्वास नाही ठेवला म्हणजे मिळवल. नाहीतर कथा पुन्हा गोल गोल फिरत राहील.

पण खरी गंमत म्हणजे बाळ "मी सरांचा खरा चेहरा जगासमोर आणीन अस म्हणत ते इतक पुचाट,आणि फालतू बोलते की >>>>>>>> आता हे कधी बोलली ती? Uhoh इथे तेजश्री प्रधान हवी होती, प्रेमातला राग, चीड, द्वेष वै वै सगळ परफेक्ट दाखवल असत तिने.

बादवे, आज सुभा फ्रेश दिसत होता. Happy

ती अंबाबाईवाली "बुवा आला" स्टाईलमधे सारखी देवीची भिती का दाखवते? जरा विकृत वाटते ती.

इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न असल्याचा अभिनय मळमळतंय पण उलटी होत नाही टाईप्सचा होता.

Pages