तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न असल्याचा अभिनय मळमळतंय पण उलटी होत नाही टाईप्सचा होता. >>>> हहपुवा.. अजून आजचा भाग सहन करायचा आहे. पण तेव्हा ही कमेंट नक्की आठवेल Happy

अगदी बरोबर kairee आजचा बाळाचा अभिनय बघून मेधाविंची कंमेंट आठवली.
आणि बाळाला पुस्तक सापडलं तर तिचा पुनजन्म चा अजून एक पुरावा हेतर काहीच्याकाहीच. आणि ते पुस्तक काय एवढे वर्ष तिथेच होत का आणि एवढे दिवस त्या कपाटात नव्हतं अचानक आलं कदाचित पुस्तकाला पाय फुटले असावेत Biggrin
ते कपाट म्हणजे साधं नसून इच्छा पूर्ण करणार कपाट आहे जेव्हा जे हवं असत तेव्हा ते मिळत Proud

काय टपाटप प्रतिसाद पडलेत !!
लोक थकले, लोक पकले, लोक भ्रमिष्ट जाहले, Happy
देवा त्यांना क्षमा कर, ते काय दाखवतायत ते त्यांनाही कळत नाहीये.....

योग, तुमचा दामिनी-गोविंद लाल डोळ्यांनी सुरूवात करून, शेवटाला ओरडून ओरडून डोळे पांढरे होऊन पडला तरीही अभिनय दारिद्र्यात का--डी--चा--ही फरक पडणार नाही. नका त्रास देऊ त्याच्या जिवाला Happy

इशाचा आजचा दुःखी + विचारमग्न असल्याचा अभिनय >>>>>
@ मेधावि, हे असे प्रतिसाद फोडणे बरे नव्हे हां. मी हेच कधीपासून लिहीन लिहीन म्हणत होते. पण म्हटले कोणालाच तसे दिसत नसेल तर माझी दिव्यदृष्टी व्हायची उगाच..... उलटी व्हायच्या आधी खारट, तुरट पाणी सुटते तोंडाला तसे दिसते ते अगदी. प्रसंग काही असो.

किंवा विचारमग्न दिसायच्या ऐवजी सर्वस्व लुटले गेले, काही काही उरले नाही आयुष्यात, असे दिसते मुखकमल.

बाकी एपिसोड बरेच झाले, पण एपिसोडांत काहीच नाही झाले ?! --- बरी खोड मोडली प्रेक्षकांची.
कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखी
शितु पाहिजे काय? इ श्या च ब घा
गजा पाटीलचा भूतकाळ बघाचा? इ श्या च ब घा
जालिंदरचा प्लॅन बघाचा? इ श्या च ब घा
झेंडेचा पलटवार बघाचा? इ श्या च ब घा
खास खोलीचा अंतर्भाग बघाचा? इ श्या च ब घा
विस मायरा लव्ह सीन बघाचा? इ श्या च ब घा (पण हे सगोत्र अफेअर होईल ना?)
ईशाचा अभिनय बघाचा? इ श्या च ब घा
संयम संपला बघाचा? इ श्या च ब घा
उत्साह मावळला बघाचा? इ श्या च ब घा

कारण रूपयाभोवती फिरते दुनिया.....

दातारबाबा उवाच :
या बाई या, सारेजण या
बघा बघा कशी माझी दिसते बया

डोळे मिटती, गाल फुगती
भाव हवे तसे कधीही न दिसती

ओठ मुरडी, चाले फेंगडी
कधी बघा कुठे बघा दिसते रडी

दिसे मेंगळी वागे वेंधळी
गालावरी तिच्या परि आहे हो खळी

मख्ख चेहरा स्वर बेसुरा
अभिनय चुकूनही करेना बरा

चप्पल सोनेरी, ड्रेसला जरी
तोच क्लच वापरते महिनाभरी

दिस उगवे दिस मावळे
तिच्या मध्ये फरक ना कधी आढळे

मुलगी होती बायको झाली
अकलेत काडीची ना भर पडली

नको ते करी नको ते बोली
जाणे कोण विस तिला कसा हो झेली

टाकाऊ जरी, विचका करी
स्वतःचेच आहे तिला कौतुक भारी

असू दे कशी, होवो नकोशी
तीच राहणारे आता तुमच्या राशी

या बाई या, सारेजण या
बयेसाठी सारे आता टाळ्या पिटू या.

कारवी>>>>कम्माल धमाल, अफलातून,...

...
हे कधी वाचलेच tpr ने तर केड्या, शर्वरी आणि बरेच जणं आपल्याला कामात सुधारणा करतील नक्कीच!!
पण बाळाचे काय वो??.....

... >>>या बाई या, सारेजण या
बयेसाठी सारे आता टाळ्या पिटू या>>
.. या ओळींनंतर मी खरोखरच टाळ्या वाजवल्या...
..... Rofl

कारवी......जबरदस्त.
नंदूचा अजून पता नाही,कशाला खोट खोट सांगितल?24पासून येणार म्हणून.
आता पुनर्जन्म तरी नक्की आहे का की ते ही खोटच.
जालिंदराला जिवंत दाखवला
नंदूला पण दाखवतील
मग बाळाच काय?
विक्या आणि नंदू दत्तक घेतील ,अस दाखवेल केड्या.
काल विक्याच्या एकंदरीत वागत्यावरून विक्रुत असावा गजा अस वाटत आहे.
आणि हे बाळ,आजकाल फार स्वत:शी बोलायला लागल.आहे,माझ्या भविष्याच काय, अस विचारत आहे,इथे वर्तमान खड्डयात चालला आहे हे कळतच नाही आहे.

बाळ,आजकाल फार स्वत:शी बोलायला लागल.आहे,माझ्या भविष्याच काय, अस विचारत आहे,इथे वर्तमान खड्डयात चालला आहे हे कळतच नाही आहे.>>>>हो ना!! काय ते पाठांतर केलेले स्वगत!! आवाजात ना चढ ना उतार एकसुरी नुसती बडबड, लांबून ऐकले तर कोणी पाठ्यपुस्तकातला रटाळ धडा वाचतंय असेच वाटते,.

आणि स्क्रीन पहावा तर आवाजाची खरखर आणि चेहर्‍यावर मळमळ...
काहीही करा पण इ शा च ब घा!!

कारवी Biggrin Biggrin Biggrin Biggrin
कसलं भारी लिहिता तुम्ही कारवी.
आपण सगळ्या मबोकरांनी तुपारेच एकही पीस शिल्लक ठेवलं नाही तरी मलिकेवाल्याना अक्कल आली नाही अजून. बाकी पोस्ट वाचायला मजा येत आहे.

कारवी फार भारी!
ती वाया गेलेली गोळी इशाच्या घशात घालायला हवी होती.>> एकदम सात्विक सन्ताप.

:)) धन्यवाद सार्‍यांना

नंदूचा अजून पता नाही,कशाला खोट खोट सांगितल?24पासून येणार म्हणून. >>> १ एप्रिलला सांगितले होते का ?
तिला रिक्षा मिळाली नसेल अजून, हल्ली रिक्षावाले नाही फार म्हणतात ट्रॅफिकमुळे किंवा रिटर्न भाडे शक्यता कमी असणार्‍या एरिआसाठी. थोडे थांबा अजून.

आणि हे बाळ,आजकाल फार स्वत:शी बोलायला लागल.आहे,माझ्या भविष्याच काय, अस विचारत आहे, >>>>. पपांचे पैसे एका सिरीयलीत संपले. ही संपल्यावर दुसर्‍यात कोणी घेणार नाही, मग माझे पुढे काय. असे असावे ते.

आवाजात ना चढ ना उतार एकसुरी नुसती बडबड >>>>> वाक्य कुठे तोडायचे तेही नाही जमत. पॉज कुठे हवा, जोर कुठे द्यायचा. कशाचा कशाला पत्ता नाही.
कालचंच --- म्हणजे तुम्ही सरांना-ठार.... मारून-टाकणार-होतात? काय हे? एक एपिसोडही पुढे ढकलून ढकलून बघवत नाही.

आपण सगळ्या मबोकरांनी तुपारेच एकही पीस शिल्लक ठेवलं नाही तरी मलिकेवाल्याना अक्कल आली नाही >>>> त्यालाही ३ धागे झाले म्हणजे प्रेक्षकांनी पसंतीची दाद दिली म्हणून छापतील बिनदिक्कतपणे. एकदा लाज सोडली की सोपे होते सगळे.

ती वाया गेलेली गोळी इशाच्या घशात घालायला हवी होती >>>> गोळीवर का राग मेधावि Happy

कारवी मस्तच Rofl

कैच्याकै सस्पेन्स होता जालिन्दरचा.

विसने मायराला पुन्हा डम्प केल. मायरा बरोबर बोलते, ह्याच्या मनात नक्की काय चाललेय तेच कळत नाही.

मायराला विसशी लग्न करायच नव्हत तरीही ती ईशाला एवढी पाण्यात का पाहते ते मात्र कळत नाही.

काय ते पाठांतर केलेले स्वगत!! >>>>>> नैतर काय. सरान्च खर रुप जगासमोर यायलाच पाहिजे हे बोलताना सुद्दा इतक मिळमिळीत बोलते ना. कुठेही तिच्या बोलण्यात राग, तिरस्कार, चीड, दवेष वै वै दिसत नाही.

इतक सगळ खर कळूनही हिला शेवटी विसचाच पुळका, ' म्हणजे तुम्ही सरान्ना ठार मारुन टाकणार होतात का' म्हणे.

" सरान्नी गजा पाटीलला मारल" अग बये, सर हेच गजा पाटील आहेत हे विसरली का?

काल विक्याच्या एकंदरीत वागत्यावरून विक्रुत असावा गजा अस वाटत आहे. >>>>>>> आ, एवढ काय विकृत वागला काल? मी काही मिसल का? Uhoh नुसत खुर्चीवर तर बसून होता. काल सुभा फक्त एका सीनपुरती दिसला. बाकी सगळा एपिसोड ईशा आणि मायराने खाल्ला.

जर केड्या नंदूला फ्लॅशबॅकमध्येच दाखवणार आहे तर मग कोणी यंग कलाकार घ्यायची की.. ओढूनताणून शितुला यंग दाखवायचा प्रयत्न कशाला करतोय?वय लपवणं काय सोपी गोष्ट नाही.. एकुणच नायिका कास्टींग करण्यात माती खाल्लीए.

कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखी
शितु पाहिजे काय? इ श्या च ब घा
गजा पाटीलचा भूतकाळ बघाचा? इ श्या च ब घा
जालिंदरचा प्लॅन बघाचा? इ श्या च ब घा
झेंडेचा पलटवार बघाचा? इ श्या च ब घा
खास खोलीचा अंतर्भाग बघाचा? इ श्या च ब घा
विस मायरा लव्ह सीन बघाचा? इ श्या च ब घा (पण हे सगोत्र अफेअर होईल ना?)
ईशाचा अभिनय बघाचा? इ श्या च ब घा
संयम संपला बघाचा? इ श्या च ब घा
उत्साह मावळला बघाचा? इ श्या च ब घा>>>>
कारवी.. ही comment झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर तुला पाहते रे च्या प्रोमोखाली दिसतेय..
तुम्हीच आहात का त्या?

Submitted by कच्चा लिम्बू on 29 April, 2019 - 07:47 >>>>>
?? !!
नाही मी कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर नाही / नसेन. कोणी समदु:खी असेल.

कारवी , हल्ली कुठेही ह्या सीरीयल चा विषय निघाला की तुमची आठव्ण येते.. धम्माल कमेन्ट्स असतात तुमच्या..
ह्या साठी तरी अशा भन्गार मालिका आल्या पाहिजेत Proud Lol

तुम्ही तुम्॑च्या पोस्ट्स चा प्रताधिकार घ्या बरं.. लोकं ढापुन राहिले न.. एक कलेक्शन येउ देत चिरफाडीचं

इशासारखंच वागतंय ते मांजर. कितीही नाचा त्याच्यासमोर. ढिम्म ते ढिम्मच. >>>>>>>>>>> Lol

नाही मी कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर नाही / नसेन. कोणी समदु:खी असेल. >>>>>>>> मग माबोवरच्याच कुणीतरी तुमची कमेण्ट ढापली असेल.

विसने नन्दूबद्दल सान्गितलेली स्टोरी चान्गली होती, ह्या स्टोरीवर सिरियल होऊ शकेल. मात्र ती सिरियल केडयाने लिहू नये म्हणजे झाल.

Pages