Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवराच.
आवराच.
:
हि सिरियल समोर सुरू असली तरी मला रजिस्टर होत नाही आईशप्पत>>>>दक्षिणा,तरीही तुमचा टायपो स्वच्छ आणि स्पष्ट बोलतोय
... मी तुमच्या तोतऱ्या टायपोची फॅन आहे...
शिरेल गंडलीय ते लगेच कळते...
होऊन जाऊदे बोबडा टायपो
धन्स सुषमाताई सोटीबद्दल
धन्स सुषमाताई सोटीबद्दल
पण ते ' राजनन्दिनीच्या गळयातला तन्मणी' हा काय प्रकार आहे?
मला पार्शियल मेमरी लॉस झालाय तुपारेबाबतीत. 
ईआईने बॉम्ब काय फोडला, धागा धावायला लागला.
ईशा कुठल्याही एन्गलने आजारी वाटत नाही. दुसर्या दिवशी चान्गली फ्रेश, केस मोकळे सोडलेली बसलेली दिसली.
आपल्या नवर्याने आपला कम्पलीटली विश्वासघात केलाय हे बाळ पुर्णपणे विसरल, आणि वेगळच शोधकार्य तिच्या डोक्याने घेतल, " स्वप्नात दिसलेला चेहरा नक्की कोणाचा होता? "
ईबाळ म्हणत की, " स्वप्नात तो चेहरा मला बघून हसत होता." ( शक्यता आहे )
तिकडे मायरा विसमागे ' अॅवार्ड फन्कशनला का आला नाहीत" ह्याची भुणभुण लावते, तिकडे ईशा तापाने फणफणत पडलेली असताना तिच्यामागे ईआईची ' ईशा काय झाल' ,' ईशा, ईशा, ईशा' ची भुणभुण.
ईआई किव्वा ईबाबा सरन्जामेकडे कामाला असतील. दादासाहेबान्च्या पहिल्या बायकोला मूल होत नसेल. सो, निमकरान्नी नन्दूला सरन्जाम्याकडे दत्तक दिली असेल..
नाहीतर अस झाल असेल, दादासाहेबान्ची पहिली बायको आणि ईआई ह्यान्ची डिलिव्हरी एकाच हॉस्पिटल मध्ये झाली असेल. मिसेस सरन्जामेच मूल दगावल असेल. तिचा जीव वाचाव म्हणून दादासाहेबान्नी निमकरान्कडे नन्दूला मागितली असेल. निमकरान्ना ते सरन्जामे आहेत ते माहित नसेल.
ईशाला निमकरान्नी दत्तक घेतल असणार. निमकर तिला एवढ जपतात आणि तिची अति़काळजी घेतात त्यावरुन ती दत्तकच असावी.
घर विकल्यानन्तर चाळ सोडून जाताना, ईआई जेव्हा 'ईशान्च्या कानातले आपल्याकडे आहेत, त्याच काय करायच' अस काहीतरी विचारते, तेव्हा ईबाबा तिला ' ते आपल्याजवळ राहू देत तिची आठवण म्हणून' म्हणतात. त्यानन्तर ते काहीतरी बोलतात तेव्हा त्यान्नी मुद्दामहून आवाज म्यूट केला होता. त्या सीनमध्येच काहीतरी सस्पेन्स आहे अस वाटत.
पण मला अजूनही वाटत आहे की विक्या माईंडगेम्स खेळत आहे ज्यात त्याला आता झेंडे पण नको आहे.प्रेम वगैरे आहे हे ही खोटच असाव
सोन्याच अंड देणारी कोंबडी अशी हा झेंडे मारायला निघाल्यावर विक्याने प्रेमाची गुगली टाकली
माझ्या आठवणीनुसार काही दिवसांपूर्वी झेंडे विक्याला म्हणाला होता की ती खोली बाळाने उघडली तर आपण संपलो,आता संपण्यासारख त्या खोलीमध्ये काहीच नाही.विक्याने खोली मँनेज केली आहे. >>>>>>>>> मला पण असच वाटत आहे. पण अॅवार्ड फन्कशनच्या फियास्कोनन्तर विस खरच दुखावलेला, डिस्टर्बड वाटला. विस जर माईन्ड गेम खेळत असेल तर मात्र सुभाच्या अभिनयाला सलाम
विस त्या खोलीत नन्दूच्या फोटोशी बोलतो हे न पटण्यासारखे आहे. कारण ईशाइतकच त्याचा नन्दूवर राग होता. तिचाही त्याने उपयोगच केला होता. सो, त्याच नन्दूवर प्रेम असण शक्यच नाही.
बादवे, त्या खोलीत घडयाळ, शर्ट अश्या वस्तू होत्या.
नन्दूचा फोटो एपिक आहे, 'हाय ईशा, ओळखलस का मला?' विचारणारा फोटो 
त्याचा कोणतरी जबरदस्त खबरी आहे जो झेंडेलाही माहित नाही ,त्याच्याकडून विक्याला कळल असाव की बाळाला सगळ माहित झाल आहे >>>>>>>> रुपाली किव्वा जोगतीणबाई असेल का?
अरे पण रानं जरी ईबाळाची सख्खि बहिण असेल तर तिचा नवरा माहीत हवा ना ईआई-बाबांना. >>>>>>>>> अगदी अगदी. ती नन्दू आहे हे सुद्दा माहित हव ना त्यान्ना. नाहीतर अस असेल, ईआई सान्गत असलेली सख्खी बहिण वेगळी असेल, नन्दू वेगळी असेल.
दोन्ही बाजून्नी लपवाछपवी चालू आहे. मुलाकडच्यान्नी विस ' जावई आहे' लपवल, तर मुलीकडच्यान्नी सख्खी बहीण लपवली.
विसला जेव्हा ' हा बॉम्ब' कळेल तेव्हा चक्कर येऊन पडण्याची पाळी त्याच्यावर येईल.
ईशाला ' तो चेहरा राजनन्दिनीचा तर नसेल ना' हा बेसिक प्रश्न पडायला हवा. डायरेक्ट ती मला कुणी सख्खी बहीण आहे का अस कस विचारु शकते?
काल कुणी नोटिस केल, एरवी मन्गळसूत्र न घालणार्या सॉन्याने काल छोटस मन्गळसूत्र घातल होत.
गजा मामा >>>>>>>> व्हिलनसाठी परफेक्ट नाव आहे.
बाबाबाबी >>>>>>>>
लोकहो, कळवावयास खेद (?) होत
लोकहो, कळवावयास खेद (?) होत आहे की आपल्या तर्काच्या पलीकडे ईबहिणीचं रहस्य (??) निघालं.
एक परात प्रसंग आणि तो आज पुन्हा इत्थंभूत तीन वेळा सांगून झाला. एक संजय दत्त आणि मातोंडकर यांचा कॉमेडी सीन आहे (मेरी माँ शेर के पीछे इ.) आठवला.
सुबोध कितीही वाईट दाखवला तरी
सुबोध कितीही वाईट दाखवला तरी आवडला...आज इशी त्याच्याशी वाईट वागली तरी त्याच्यासाठीच वाईट वाटलं आणि ती इशी एवढी शहाणी दाखवली तरी रागच आला तिचा.
इशी त्याच्याशी वाईट वागली तरी
इशी त्याच्याशी वाईट वागली तरी त्याच्यासाठीच वाईट वाटलं >>> म्हणजे ईशा आता हिंदी चित्रपटातल्या गरीब गाय हीरॉइन्स एकदम डॅशिंग बनून उत्तरार्धात येतात तशी झाली का? त्याकरतातरी बघायलाच हवा एपिसोड. उदाहरण द्यायचे तर जुन्या खुद्दार मधे विनोद मेहरा हा बिघडलेला तरूण दाखवला आहे. विनोद मेहरा बिघडून बिघडून किती बिघडणार या लॉजिक ने ईशा किती वाईट वागू शकते ते बघायला हवे. बटाट्याची चाळ मधे कोचरेकर मास्तरांकडे "ही शुद्ध लुटालूट आहे" पेक्षा कठोर शब्दच उपलब्ध नसतात तसे काहीतरी असावे
एक संजय दत्त आणि मातोंडकर
एक संजय दत्त आणि मातोंडकर यांचा कॉमेडी सीन आहे (मेरी मा शेर के पीछे इ.) आठवला.>>

आज इन्सटाग्रामवर सुभा ऑनलाईन
आज इन्सटाग्रामवर सुभा ऑनलाईन होति तेव्हा लोकांनी त्याला प्रश्न विचारले.त्यातला एक प्रश्न
सर,विक्रांत सरंजामे बदलणार का
सुभा...सूर्य कधीही पश्चिमेला उगवेल का
तेव्हा हे सुभाचे नाटक आहे.एकदम कडक.सुभा++++++1111111+++++++
आज त्या बाळाचा चेहरा बघवत नव्हता
आणि बाळाच्या बहिणीबद्दल........जरा थांबा लोकहो.तो केड्या आहे.मुळात बाळाच्या बहिणीचीच काही गरज नव्हती,तरी त्याने आणली ना,मग जरा थांबा,तो कधी त्या बहिणीचा उपयोग करून घेईल सांगता येत नाही.
आता सुभाचा खबरी
जोगतीण
सर्जेराव
मंदा
हिडन कँमेरा
विनोद मेहरा बिघडून बिघडून
विनोद मेहरा बिघडून बिघडून किती बिघडणार या लॉजिक ने ईशा किती वाईट वागू शकते ते बघायला हवे. >>
लोकहो, कळवावयास खेद (?) होत आहे की आपल्या तर्काच्या पलीकडे ईबहिणीचं रहस्य (??) निघालं.>> इस्कटून सांगा की जरा.
ईबाळाची मोठी बहीण तीन
ईबाळाची मोठी बहीण तीन महिन्यांची असताना गेली. ही दुःखद गोष्ट असल्याने ईआबांनी तिला आजवर सांगितले नव्हते. एवढेच रहस्य आहे सध्या तरी. निधी
ओह, ओके प्राचीन.
ओह, ओके प्राचीन.
मग आणलं तरी कशाला तिला??
उगाच माबोकरांच्या डोक्याला ताप केला मेल्याने.
निधी, तीन महिन्यांची असताना
निधी, तीन महिन्यांची असताना गेली, ही हींट केव्हाही मिळेल ना, खुशाल समजावं, ती परत येणारच!
कालातीत फॉर्म्युला आहे हा!
प्रीकँपमध्ये जे शितुच स्केच
प्रीकँपमध्ये जे शितुच स्केच काढल होत ते किती भयंकर काढल होत,मुळात ते नंदूच वाटतच नव्हत.
आच बाबाबाबी पूजा करणार होते त्याच काय झाल? केड्याला धागा वाचून कळल असाव आणि पूजा एडिट केली असावी.
तीन महिन्यांची असताना गेली,
तीन महिन्यांची असताना गेली, ही हींट केव्हाही मिळेल ना, खुशाल समजावं, ती परत येणारच>>>
हो मलाही तसंच वाटतंय. गेली म्हणजे वारली नसेल.. कोणीतरी पळवून नेली अशा टाइप असेल.. मग ती अत्यंत कनवाळू हृदयाच्या पण निपुत्रिक दादासाहेबांना सापडली असेल. and rest follows...
मी केड्याच्या दृष्टीकोनाने
मी केड्याच्या दृष्टीकोनाने विचार करून रानोमाळ लॉजिक लावत आहे-
रान ही इशाची बहिणीच असते पण ती कुंभ च्या मेळ्यात हरवते आणि दादासाहेबाना सापडते मग ते तिला दत्तक घेतात, पण विस तिला गायब करतो सगळ्यांना वाटत की ती कायमची गेली पण ती जिवंत असते.
मग विस ने इशासोबत लग्न केल्यावर रान च्या लक्षात येत की अरे ही तर आपली बहिणीच मग दोघी बहिणी मिळून विस चा बदला घेतात. आणि शेवटी एकमेकींकडे बघून हसतात आणि म्हणतात तुला पाहते रे
ईबाळाची बहिण तिच्यापेक्षा 3
ईबाळाची बहिण तिच्यापेक्षा 3 ते साडे3 वर्षानी मोठी आहे तर नंदू 20-21 वर्षानी मग ईबाळ-नंदू बहिणी असणं अशक्य.
3 महिन्यांच्या बाळाला(ईभेन)परत आणून काय होणारे,ती आली तरी हे प्रकरण पाहुन 9 2 11 होईल.
सुभाची कालच्या एपीतली acting एक नंबर होती,अस वाटलं कि तो खरंच ईशाच्या प्रेमात पडलाय.ईबाळात अडकत चाललोय हे ऐकून बिचारे झेंडे विसंवर रागावून फडफडत राहीले.
सुबोध कितीही वाईट दाखवला तरी
सुबोध कितीही वाईट दाखवला तरी आवडला...आज इशी त्याच्याशी वाईट वागली तरी त्याच्यासाठीच वाईट वाटलं आणि ती इशी एवढी शहाणी दाखवली तरी रागच आला तिचा. >>>>>>>>> खरच .... डोळ्या तुन पाणी वगरे काढ्ल.... ......सुभा...... एकदम बेस्ट..........................++++++++++++++++२२२२२२२२२२२२२२२२२१११११११
सुभाची कालच्या एपीतली acting एक नंबर होती,अस वाटलं कि तो खरंच ईशाच्या प्रेमात पडलाय.ईबाळात अडकत चाललोय हे ऐकून बिचारे झेंडे विसंवर रागावून फडफडत राहीले. Proud >>>>>>>> नाटक एकदम भारी.... मला वाटत.... त्याला समजलय..... सो आता ईमोशनली काय होतय का बघतोय
[4/20, 6:16 AM] ☺:
राजनन्दिनीच्या गळयातला तन्मणी' हा काय प्रकार आहे? >>>> जेव्हा बाळ सरंजामे कंपनी मधला फ्रॉड शोधून काढते तेव्हा आसा तिला राजनंदिनीचा तन्मणी बक्षीस देतात....मग विकू चिडतो (झगा ड्रेस लक्षात आला की सगळं आठवेल)...

आपल्या नवर्याने आपला कम्पलीटली विश्वासघात केलाय हे बाळ पुर्णपणे विसरल, आणि वेगळच शोधकार्य तिच्या डोक्याने घेतल, " स्वप्नात दिसलेला चेहरा नक्की कोणाचा होता? ">>>>हो ना, अचानकच हीर्वीणीचा फोकस भलतीकडे हलवतात!!!
....
ईबाळ म्हणत की, " स्वप्नात तो चेहरा मला बघून हसत होता." ( शक्यता आहे )>>>>lol
......... प्रीकँपमध्ये जे शितुच स्केच काढल होत ते किती भयंकर काढल होत,मुळात ते नंदूच वाटतच नव्हत.>>>>बाळाने काय सुंदर चेहऱ्याचे वर्णन केले असेल बघा... म्हणे लख्ख दिसला चेहरा तिला, आणि तन्मणी कस्काय करेक्ट काढला बरं¡¡¡
परवाच्या भागात बाळ म्हणाल की
परवाच्या भागात बाळ म्हणाल की तो चेहरा ओळखीचा नव्हता आणि काल रुपालीला सांगताना म्हणाली की मी कुठेतरी पाहिला आहे हा चेहरा
स्वत:किती खोट बोलते आणि विक्यावर आरोप करते
पण आजही वाटत की रुपालीच हिरवीन असायला हवी होती.
बाळाने बिप्याला नकार देऊन चूक केली,आता रडत बसली आहे.
तीन महिन्यांची असताना गेली,
तीन महिन्यांची असताना गेली, ही हींट केव्हाही मिळेल ना, खुशाल समजावं, ती परत येणारच!>> हो रे. केड्या तर काहीही करु शकतो.
कालची सुबोध भावेची अॅक्टींग
कालची सुबोध भावेची अॅक्टींग कमाल!
किती सुंदर आर्त डोळे, व्यग्र चेहेरा, बोलके भाव.........
तिला खांदे धरुन आपल्या कडे वळवतो तेव्हा मंद ईबाळाच्या जागी दुसरी कुणीही असती तरी अगदी विरघळून गेली असती!
विस चे नाटक फारच उच्च प्रकारचे चालू आहे......!!
फारएंड -- विनोद मेहरा बिघडून बिघडून किती बिघडणार - किती पटकन रेफरंसेस आठवतात तुम्हाला याच गोष्टीचं नवल वाटतं!
बटाट्याची चाळ मधे कोचरेकर
बटाट्याची चाळ मधे कोचरेकर मास्तरांकडे "ही शुद्ध लुटालूट आहे" >>
कोणत्याही घटनंच, प्रसंगाचं, उद्वेगाचं, रागलोभाचं कनेक्शन पुलंच्या साहीत्यात कुठं ना कुठंतरी सापडतं. ज्याला ते दिसतं तो फक्त त्याची हिंट देतो की लगेचच समोरचा पुलभक्त ते एका सेकंदात झेलतो. पुलंना आपणही आता यमीसारखं माप म्हणून वापरायला लागलोय
कालची सुबोध भावेची अॅक्टींग
कालची सुबोध भावेची अॅक्टींग कमाल!
किती सुंदर आर्त डोळे, व्यग्र चेहेरा, बोलके भाव.........
तिला खांदे धरुन आपल्या कडे वळवतो तेव्हा मंद ईबाळाच्या जागी दुसरी कुणीही असती तरी अगदी विरघळून गेली असती! >>>>>> +100000
मी केड्याच्या दृष्टीकोनाने
मी केड्याच्या दृष्टीकोनाने विचार करून रानोमाळ लॉजिक लावत आहे-
रान ही इशाची बहिणीच असते पण ती कुंभ च्या मेळ्यात हरवते आणि दादासाहेबाना सापडते मग ते तिला दत्तक घेतात, पण विस तिला गायब करतो सगळ्यांना वाटत की ती कायमची गेली पण ती जिवंत असते.
मग विस ने इशासोबत लग्न केल्यावर रान च्या लक्षात येत की अरे ही तर आपली बहिणीच मग दोघी बहिणी मिळून विस चा बदला घेतात. आणि शेवटी एकमेकींकडे बघून हसतात आणि म्हणतात तुला पाहते रे >>> 1111
आणि शेवटी एकमेकींकडे बघून हसतात आणि 'तुला पाहतेच रे' असा म्हणतात...
जेव्हा बाळ सरंजामे कंपनी मधला
जेव्हा बाळ सरंजामे कंपनी मधला फ्रॉड शोधून काढते तेव्हा आसा तिला राजनंदिनीचा तन्मणी बक्षीस देतात....मग विकू चिडतो (झगा ड्रेस लक्षात आला की सगळं आठवेल)... >>>>>>>> आत्ता आठवल. धन्स सुषमाताई
तुपारेमध्ये व्हिलनगिरीचा फोकस सिच्युएशननुसार बदलतो. आधी झेण्डे- मायरा, नन्तर जालिन्दर, नन्तर विस आणि आता पुन्हा झेण्डे- मायरा. आता हे बघायचय की विसकडे हा फोकस पुन्हा कसा येतो ते.
मायराच काय सतत चाललय, सर अवॉर्ड फन्कशनला गेले नाही, सर अवॉर्ड फन्कशनला गेले नाही. बडेबडे सीईओ, सेलिब्रिटी कधीकधी अवॉर्ड फन्कशनस अटेन्ड करत नाहीत, तर काय एवढ आभाळ कोसळत नाही. सरान्च्या पाठीमागे लागण बन्द केल तर कम्पनीचा तेवढाच फायदा होईल म्हणाव. विसच हे पहिलच अवॉर्ड नाहीये.
कालची सुबोध भावेची अॅक्टींग कमाल!
किती सुंदर आर्त डोळे, व्यग्र चेहेरा, बोलके भाव.........
तिला खांदे धरुन आपल्या कडे वळवतो तेव्हा मंद ईबाळाच्या जागी दुसरी कुणीही असती तरी अगदी विरघळून गेली असती! सुभाची कालच्या एपीतली acting एक नंबर होती,अस वाटलं कि तो खरंच ईशाच्या प्रेमात पडलाय.ईबाळात अडकत चाललोय हे ऐकून बिचारे झेंडे विसंवर रागावून फडफडत राहीले. >>>>>>>>> +++++++१११११११११११
विस चे नाटक फारच उच्च प्रकारचे चालू आहे......!! >>>>>>>>> अगदी अगदी
सुबोध कितीही वाईट दाखवला तरी आवडला...आज इशी त्याच्याशी वाईट वागली तरी त्याच्यासाठीच वाईट वाटलं >>>>>>>> हो ना. ही प्रॉपर्टी मिळवण्यामागे नक्कीच काहीतरी ईमोशनल कारण असाव. पण त्याने राजेशच्या मुलाचा खुन करायला नको होता. ती अक्कल नक्की झेण्डेची असणार.
तीन महिन्यांची असताना गेली, ही हींट केव्हाही मिळेल ना, खुशाल समजावं, ती परत येणारच>>>
हो मलाही तसंच वाटतंय. गेली म्हणजे वारली नसेल.. >>>>>>>> +++++++++२२२२२२२२२ ईआई बाबान्ना म्हणत होती की 'मला काही सुचत नव्हत. जे सुचल ते सान्गितल ईशाला' अस काहीतरी. म्हणजे ईआई ईशाशी खोट बोलली?
विनोद मेहरा बिघडून बिघडून किती बिघडणार >>>>>>>> फारएण्ड
'टक्कर' सिनेमात विनोद मेहरा खलनायक झाला होता.
आणि शेवटी एकमेकींकडे बघून हसतात आणि 'तुला पाहतेच रे' असा म्हणतात... >>>>>>>>
ईआई , aluminum च्या पातेल्यात
ईआई , aluminum च्या पातेल्यात ताक करत होती , कळकणार नाय????
लिमलेटच्या गोळ्या आणायला किती वेळ, पूर्ण sketch तयार झाले.
मायरा ने ज्या थाटात laptop बंद केला , मला वाटलं आता "रूप तेरा .....मस्ताना" चालू होत की काय !!
Sketch बघुन वाटलं कि कोण आहे
Sketch बघुन वाटलं कि कोण आहे हि हिडीस बाई?

नंदू किती सुंदर आहे त्या sketch पेक्षा!
नन्दूची एन्ट्री २४ तारखेला
नन्दूची एन्ट्री २४ तारखेला होणार आहे
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5600595265301001360&title...
शिल्पा तुळसकर ला मराठी
शिल्पा तुळसकर ला मराठी प्रेक्षकांची इतकी डिमांड आहे हे आजच कळले,
अगदी तिच्या करिअरच्या पीक वर ( बर्वे बरोबरची मेघ दाटले म्हणून सिरीयल होती)पण तिची कधी इतकी चर्चा झाल्याचे आठवत नाही.
लक्षवेधी अभिनय वगैरे साठी सुद्धा तिचे नाव आवर्जून घेतल्याचे आठवत नाही, की सुभा बरोबर जुगलबंदी पाहायला मिळेल, हां, टेलीसोप च्या वासरात ती नक्कीच उठून दिसत असेल.
ही प्रतीक्षा शितु ची आहे? तिच्या निमित्ताने कथेत येऊ घातलेल्या ट्विस्ट ची आहे? की प्लॅन ई बाळा चा कंटाळा आला, नवीन चेहरा हवा अशी उत्सुकता आहे?
विक्याने उघडलेल्या खोलीमध्ये
विक्याने उघडलेल्या खोलीमध्ये त्याच्याशिवाय कोणीच जाउ शकत नाही तरीही खोली स्वच्छ कशी,हा झाडत असेल अस वाटत नाही.व्हँक्युम क्लीनर खोलीत कुठे दिसला नाही,कुठे जळमट नाहीत,फोटोवरचा पडदा एकदम स्वच्छ.शितुचे ड्रेसेस कालपरवाच आणल्यासारखे ईस्त्री केलेले.
कस काय?
सिम्बा +१११११११ शिल्पा तुळसकर
सिम्बा +१११११११ शिल्पा तुळसकर कधीच मराठीत एवढी प्रसिद्ध नव्हती. तरूण असताना सुंदर दिसायची पण आता तेही नाही. कहर तर तिचा फोटो आहे, हात हलवून हाय-बाय म्हणणारा. विनोदी मालिका आहे ही
Pages