Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निधी.. अगं सगळ्या शक्यता
निधी..
अगं सगळ्या शक्यता आजमाऊन पहाव्यात नेहमी!
मी आसा लिहिलं होतं ते आईसाहेब
मी आसा लिहिलं होतं ते आईसाहेब होतं दादा साहेब नाही
आईसाहेब ह्या खरी आई असणार विसची आणि जयदीपची. आणि दादासाहेबांची दुसरी बायको. आणि हे लग्न फार लहानपणी झालं असणार - म्हणजे नंदू लहान असताना , विस मुळात पाटील आहे, त्याला सरंजामे नाव दिलं , जयदीप मूळ सरंजामे च असेल तो नंदू पेक्षा लहान आहे बघता.
द्या द्या अजुन आयडीया द्या.
द्या द्या अजुन आयडीया द्या.
नाहीतरी लेखकुचं डोकं भंजाळलंच आहे.
तुला पाहते रे चा अर्थ 'तुला
तुला पाहते रे चा अर्थ 'तुला बघूनच घेते" असा लागत आहे आता
दादा अन् आईसायबांचं पण कायतरी
दादा अन् आईसायबांचं पण कायतरी रहस्य असणार. परवा विक्यानं हिंट दिलीये आसाला.
त्या कालपरवा आलेल्या सोनियाला
त्या कालपरवा आलेल्या सोनियाला पण सगळ माहित आहे,खर तर प्रेक्षकांनीही अंदाज बांधलाच होता.मग आता शितु फक्त येऊन सांगणार की तिला कोणी मारल,पण ते तर जालिंदर पण सांगू शकेल त्यालाही हे माहित असेल.हे तर ती जोगवा बाई पण सांगू शकत होती मग गेले 6महिने प्रेक्षकांना का छळल?
केड्याने वेड्याचा बाजार मांडला आहे.
ए प्लीज मला वेड्याच्या
ए प्लीज मला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा कुणीतरी
एका चांगल्या मालिकेतली मजा
एका चांगल्या मालिकेतली मजा ईशाच्या अभिनयामुळे गेली. आनंद असो वा दुःख हिच्या चेहेऱ्यावरची माशी हालत नाही.
विक्रांत सरंजामे - अण्णा, कसा
विक्रांत सरंजामे - अण्णा, कसा वाटला माझा डाव? आहे का नाही दिमाग... अहो विक्रांत सरंजामे म्हणताहा माकां... सॉरी, आय मीन, विक्रांत सरंजामे म्हणतात मला..
अण्णा नाईक - कसलो डाव रे विक्र्या? कसलो डाव... आणि पयला खोटं बोलणां बंद कर हां तुका पयलंच सांगून ठेवतंय. तु गजा पाटील का कोण ता असंय...आमची ही सांगत व्हती. मतदान यादीतलो नावाचो घोळ ऐकून तुझ्या कपाळाक गेल्या आसत.
विक्रांत - ते सोडा हो अण्णा, आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे सिद्ध व्हायची वेळ आली आहे. एकदा का ते सिद्ध झाले की मग सरंजामे इंडस्ट्री हळूहळू माझ्या नावावर होणार... हाहाहा.... येत्या काही वर्षांत एकदा का तो जयदीप वेडा झाला की नंतर आईसाहेबांच्या मृत्यूनंतर मीच वारस उरेन.. हाहाहा..
अण्णा - गज्या, लेका तुझो मेंदू गुडघ्यात असा काय रे? हे सगळा होईस्तोवर तु पेन्शनीत निघालेलो असशील. तुझ्या जागी मी असतो तर ये एवढो लफडो केलंच नसता.
विक्रांत - मग? काय केलं असतं अण्णा...
अण्णा - मी एकेदिवशी तुझ्या त्या आईसायबाक आणि भावाक गोळ्यो घातलो असतलो. ती कोण तुझी वयनी काय तिचा नाव... हां सोन्या.. तिची सोय वरच्या खाजगी खोलीत केली असती. ती सोन्या कडक सामान असां.. काय? ईशाशी लग्नाचो काय संबंधच आलो नसतो. असली बुळचट बावळट बायको काय कामाची? ता पेक्षा त्या मायराक ठेवून घेतली असती. सोन्या नं मायरा दोगी... न तीन हजार करोडची इश्टेट. आणि पयलो त्या झेंडेला कामावरून काढून त्याऐवजी नेने वकील आणि रघूकाकांका ठेवलो असतो....
विक्रांत - अण्णा... तुम्ही धन्य आहात.
अण्णा - तां माका म्हाईत असां. त्यात नवो काय? तं मतितार्थ काय असां गज्या? ... की तुझ्यो तुपारेचो टीआरपी पार घसरलो असल्याने लोकांना वेठीस धरण्यापेक्षा उचल बंदूक नं घाल गोळ्यो...सगळ्यांका उडवून टाक. मेल्या, तू गेलोस की आमच्या #राखेचा ला तरी प्राईम टाईम मिळतलो...
व्हाट्सअप्प फॉरवर्ड
ए प्लीज मला वेड्याच्या
ए प्लीज मला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा कुणीतरी>> थांब, मी पण येते .
वरती इतक्या #केड्यासाठीअजूनएकआयडीया लिहिल्या आहेत कि मी मला काय वाटत होते तेच विसरले !
केड्या स्वतः नाही विसरला म्हणजे मिळवलं !
बरं मला सांगा , त्या निवडणूक अधिकारी कि कोण होता त्याने त्या सॉफ्टवेअर मध्ये काय शोधलं असेल ? इमेज search तर नाही करू शकत . विक्रांत सरंजामे search केल्यावर नो डेटा फाऊंड एरर यायला हवी ना ? तो सारखं म्हणत होता कि विक्रांत सरंजामें च्या फोटो समोर गजेंद्र पाटील नाव येतंय . विक्रांत सरंजामें search केल्यावर गजेंद्र पाटील चा search result नाही यायला पाहिजे ना ?
कि त्याने वॉर्ड आणि घराच्या पत्याप्रमाणे search केलं असेल ?मी तरी अशी समजूत करून घेतली
आणि असं दुसऱ्याचं निवडणूक ओळखपत्र आपण कागदपत्रं दिली कि बनवून मिळतं का ? प्रत्यक्ष त्या माणसाची सही नाही लागत ?
अंजली, मलाही प्रश्न पडला.
अंजली, मलाही प्रश्न पडला. इमेज स्कॅन करून त्याला पाठवायला सांगितली त्यानं. डाटाबेसमधे इमेज कशी सर्च करणार होता तो देवालाच ठाऊक.
अगदीच फसलेली सिरीयल झाली आहे.
अगदीच फसलेली सिरीयल झाली आहे. लवकरच गाशा गुंडाळेल तर बरं.
मला तर वाटतं शि तु येणारच नाही. आणि सु भा ला लाइफटाइम रीग्रेट राहिल.
आलीच नाही का शितु अजून,
आलीच नाही का शितु अजून,
ती आली की सांगा, मी झोपते तोपर्यन्त
किल्ले , झोपतेयस काय गं ताई !
किल्ले , झोपतेयस काय गं ताई ! उठ !! तुझा किती महत्त्वाचा रोल आहे सिरयलीत.
तिला खरच पटल आहे की विक्या
तिला खरच पटल आहे की विक्या हाच गजा आहे.नशीब खर काय ते विक्याकडे यावेळी तरी पचकली नाही. >>>>>>> अगदी अगदी.
म्हणजे इतक मोठ सत्य कळल्यावर निदान तिला गरगरल्यासारख होईल,तोल जाईल,हात कापतील,घशाला कोरड पडेल,कदाचित विक्याचा फोनही ऐकू येणार नाही,अशी रिअँशन असायला हवी होती.पण तस काही झालच नाही >>>>>>>> ईथे कोणी तरी म्हटल होत की गजा पाटीलच सत्य कळल्यावर ईशा रस्त्यावर चालत राहते. ते मात्र दाखवल. हिची कार कुठे गेली? सर्विसिन्गला दिली का?
मग कोणत्या सत्याबद्दल गजाने आईसाहेबांना आठवण करुन दिल्यावर त्या गप्प बसल्या ? >>>>>> ह्याचा अर्थ आईसाहेब सुद्दा त्याच्या पुनर्जन्म प्लॅनमध्ये सामिल असतील. अस जर असेल तर विस- झेण्डे- आईसाहेब तिघ मिळून प्लॅनवर चर्चा करतात अस दाखवायला हव होत. पण त्या आपल्याच मुलाला, जयदीपला वेड कशाला ठरवतील?
मला एक कळत नाहीये जयदीप आणि राजनंदिनी चं नेमकं नातं काये? आईसाहेबांचा मुलगा म्हटला तर रानं त्याची मोठी बहिण मग तो विसं ला दादा कसा म्हणतो? आणि विसं चा लहान भाऊ असेल तर रानं त्याची वहिनी >>>>>>>>> +++++ १११११११११ तो राजनंदिनीला ताई किव्वा वहिनी असही म्हणत नाही. सरळ तिचा एकेरी उल्लेख करतो.
कालच्या मतदार यादीत गजाच्या शेजारी " जयदीप दादासाहेब सरंजामे" असं नाव होतं. >>>>>>> मेधावि, काय भारी निरीक्षण! ईशाला सुद्दा कळल नाही.
आईसाहेब ह्या खरी आई असणार विसची आणि जयदीपची. आणि दादासाहेबांची दुसरी बायको. >>>>>>> पण मग विस आणि राजनंदिनी भाऊ बहीण झाले असते की.
पुढच्या भागात आईसाहेब देवीला ' ईशा हीच राजनन्दिनी आहे का?' हा कौलरुपी प्रश्न विचारतात, कौल त्यान्च्या बाजूने पडतो.
तो सुप्रसिद्द परातीचा एपिसोड कधी दाखवणार? नन्दूचा मुखडा अजून दाखवलाच नाही आणि नवनवीन प्रोमोजची भर घालतायत.
ईशाला अजून राजेश आणि त्याच्या फॅमिलीच्या खुनाबाबत कस नाही कळल? का ते ही परातीमार्फत कळेल?
नाही, मला वाटतं ती विचारते "ऑफिसमधल" आयुश्यातल नाही . >>>>>> नाही स्वस्ति, मायरा विसला काय स्थान आहे माझ तुमच्या ऑफिसात? तुमच्या आयुष्यात? प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात? बोलल्यानन्तर ती आपली विचारण्यात चुक झाली कळल्यासारखी थाम्बते.
जिवलगा लाम्बल त्याचा फायदा तुपारेने करुन घ्यायला हवा.
बादवे, आज पुण्यामध्ये राहुल गान्धीचा मेगा शो होता. सुभा आणि आरजे मलिष्का शोचे सूत्रसन्चालन करत होते. दोघे रागाला प्रश्न विचारत होते. एबीपी माझा वर लाईव दाखवला शो. कुणी बघितला का?
गरगरतंय आता मला ही सगळी नाती
गरगरतंय आता मला ही सगळी नाती वाचून!

फोटो स्कॅन करून त्यावरून माहिती शोधणार्याला सलाम.
ती त्या मतदार नाव नोंदणी ऑफिसमधे जाते तिथला सीन कहर होता. एकतर तो चम्या अधिकारी, ती मंद ईशा आणि त्यांचे ड्वायलॉग
ती म्हणते माझ्या मिस्टरांचे नाव च नाहीये मतदार यादीत. मग तो म्हणतो काय नाव त्यांचं? तिने नाव सांगितल्यावर म्हणतो वा वा एवढे मोठे बिजनेसमन आणि तुम्ही त्यांच्या कोण? आता माझ्या मिस्टरांचं नाव नाही म्हणतेय तर ती काय याची बहिण आहे का? काहीतरीच
ती म्हणते माझ्या मिस्टरांचे
ती म्हणते माझ्या मिस्टरांचे नाव च नाहीये मतदार यादीत. मग तो म्हणतो काय नाव त्यांचं? तिने नाव सांगितल्यावर म्हणतो वा वा एवढे मोठे बिजनेसमन आणि तुम्ही त्यांच्या कोण? आता माझ्या मिस्टरांचं नाव नाही म्हणतेय तर ती काय याची बहिण आहे का? काहीतरीच>>> बरं झालं तू लिहिलंस मला टायपायचा कंटाळा आलेला ! मी अगदी हेच म्हंटलं , अरे चम्या सांगतेय ना ती माझ्या मिस्टरांचं नाव नोंदवायला आलेय ..
(No subject)
आता माझ्या मिस्टरांचं नाव
आता माझ्या मिस्टरांचं नाव नाही म्हणतेय तर ती काय याची बहिण आहे का? >> इतके दिवस प्रत्येक एपिसोड आधीच्या एपिसोड्स मधले लॉजिक लक्षात न ठेवता लिहील्यासारखे वाटत. आता एकाच एपिसोड मधले संवाद तसे वाटत आहेत
निधी - हो बर्याच दिवसांत पाहिली नाही. ते दोन प्लाण्ट्स मर्ज करणार, विक्याच त्यांचा म्होरक्या निघणे वगैरे भाग झाल्यावर पुढचे २-३ भाग बोअर झाले. ते ईशाचे रिग्रेसिव्ह वागणे डोक्यात गेले. मधले काही एपिसोड्स असे वाटले की काहीच घडत नाही नुसते वेळकाढूपणा करत चालले होते एपिसोड्स. मग कंटाळा आला.
मात्र गेल्या काही एपिसोड्स मधे पुन्हा तुडुंब ड्रामा भरलेला दिसतोय.
आज पुण्यामध्ये राहुल गान्धीचा
आज पुण्यामध्ये राहुल गान्धीचा मेगा शो होता. सुभा आणि आरजे मलिष्का शोचे सूत्रसन्चालन करत होते. दोघे रागाला प्रश्न विचारत होते. एबीपी माझा वर लाईव दाखवला शो >>
राहुल ची भरपूर तारीफ करून त्याची पाठ वळल्यावर उपस्थित प्रेक्षकांकडे पाहून सुबोध तुपारे स्टाइल खुनशी हसला का?
घ्या ! उगाच तुमच्या जीवाला
घ्या ! उगाच तुमच्या जीवाला घोर नको.

बघून घ्या नीट
जयडू , bro in law पेक्षा
जयडू , bro in law पेक्षा 2वर्षे लहान आहे.
Photo available लिहिले आहे चक्क
आईसाहेबांचा सेल्फी आहे voter
आईसाहेबांचा सेल्फी आहे !!! आणि त्या गजापेक्षा 4 च वर्षांनी मोठ्या आहेत!!
स्वस्ति भारी काम केलंस !
स्वस्ति भारी काम केलंस ! उजव्या कोपऱ्यात आईसाहेब आहेत ना ? वय ४३??? आणि सुभा च ३९ आणि जयदीप च ३७? म्हणजे मग काहीच ताळमेळ लागत नाहीये
मग जयदीप काय म्हणतो कि मला राजनंदिनी आठवत नाही मी लहान होतो खूप .. आणि ती पण अगदी जैदू जैदू करून गोष्टी सांगत असते !! मग राजनंदिनी किती वयाची असेल
Photo available लिहिले आहे
Photo available लिहिले आहे चक्क>>
हो ना!!! कै च्या कै च
आणि त्याचे घर क्र वेगळे आहेत ...
एकंदरीत वय बघता सुभा किंवा जयदीप हि आईसाहेबांची मुलं कशी काय असू शकतात !?
दादासाहेब आणि आईसाहेब एकाच
दादासाहेब आणि आईसाहेब एकाच वयाचे आहेत...
दादासाहेब जाऊन पण 20 हून जास्त वर्षं झाली तरी त्यांचं नाव voter लिस्ट मध्ये!!
त्या लॉजिकने नंदूचं पण असायला पाहिजे.
आणि , windows photo viewer
आणि , windows photo viewer application आहे.
Pic voting असं काहीतरी नाव आहे file च
दादासाहेब आणि आईसाहेब एकाच
दादासाहेब आणि आईसाहेब एकाच वयाचे आहेत >>> no. Thats his first wife probably
आईसाहेबांचा सेल्फी आहे !!!>>
आईसाहेबांचा सेल्फी आहे !!!>> हो ना ! हे तर खतरनाक ए एकदम !!
निदान त्या चम्या माणसाने किंवा दिग्दर्शकाने एकच फोटो दाखवायला पाहिजे होता पूर्ण स्क्रीन वर ...
किंवा मग सुभा आईसाहेब हे एका टोळीतले लोक असावेत आणि आईसाहेबानी दादासाहेबांशी लग्न केलं . जयदीप ला मुलगा मानलं असेल असं गृहीत धरलं तरी दादासाहेब पण ४३ वर्षाचे मग जयदीप ३७ हे गणित बसत नाहीये ... काय चाल्लंय काय !!
no. Thats his first wife
no. Thats his first wife probably>> हमम मग दादासाहेब आणि आईसाहेब यांच्या वयात खूपच अंतर असायला हवं .. आणि जयदीप दादासाहेबांच्या पहिल्या बायकोचा मुलगा असायला हवा ... कठीण आहे
Pages