तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनुराज, मीरा.., सुषमा ताई, किल्ली --- मी रोज नाही बघत / लिहीत हो. कधी तरी बघून किंवा इथले प्रतिसाद वाचून काही वाटले तर लिहीते. बाकी कशाचा काही संबंध नाही नाही. रात गयी बात गयी.
एपिसोडभर ई श्या बघायलाही तशी जिगर लागते. मी काय सुभा नाही. पाहिले की लिहीन Happy

@ अमा, सुलू_८२ -- छाया कोण? दुसर्‍या मालिकेचा संदर्भ आहे का?

शो कॉज नोटीस का आली या लोकांना? स्वतःचे 'मेड इन कर्जत' निपटतानाच फे फे उडालीय बिचार्‍यांची; इंडियात काय बनवायला कुठे जाणारेत ते !! ...... त्यांना फक्त प्रेक्षकांना बनवता येतं.

की रा नं जिवंत आहे असा धक्का येणार आहे? >>>>>>
किती विश्वास आहे प्रेक्षकांचा -- हे लोक खरेच धक्का देणार यावर.......आपल्याला नीट धक्के देता येत नाहीत तर सरळ, सोपे का नाही दाखवत हे लोक?
बिलीयर्डस टेबल करून ठेवलेय मालिकेचे. दुर्दैवाने क्यू स्टीक केड्यांच्या हातात. त्यांनी ठोकले की पात्रांचे बॉल इतस्ततः पसरतात. योगायोग असेल तसे एकमेकांवर आपटतात. संपला एपिसोड.
बॉलनाही कळत नाही आपण कुठे, कसे, का गेलो आणि केड्यांना तर नाहीच नाही कळत की आपण क्यू स्टीक अशी का चालवली.

आज ईशाने पराकाष्ठा केली सुन्न झाल्याचा अभिनय करताना >>>>>
@ प्राचीन, यासाठीही पराकाष्ठा लागावी? तिचे डोळे, चेहर्‍याचे स्नायू, आवाज, हालचाली नेहमी सुन्नच तर असतात.

शितु ह्या सिरीयलमधे आता एवढ्या उशीराने तरी का यायला तयार झालीये? >>>>
@ सस्मित, शितुच्या नावाच्या शितांवरच तर पळून गेलेली प्रेक्षक मंडळी पुन्हा टीव्हीभोवती जमवतात ते लोक.

मी कायदे तज्ज्ञ नाही. पण वकीलांकडून ऐकलेल्या माहितीप्रमाणे --

राजनंदिनीने जर प्रॉपर्टी नाकारली असेल तर ती दादासाहेबांचे उरलेले वारस = जयदीप + आईसाहेब अशी विभागली जाणार. कायद्याच्या दॄष्टीने 'म्हणण्याला' अर्थ नसतो. तसे तिचे लेखी एनओसी / प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतरच वकील ते पुढचे दोन भाग करणार. एकदा असे एनओसी / प्रतिज्ञापत्र झाल्यावर राजनंदिनी किंवा तिच्या पुढच्या वारसांचा अधिकार संपला.

नवर्‍याची प्रॉपर्टी त्याच्या पश्चात बायका-मुलांत विभागली जाते तशी बायकोची वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिच्या पश्चात नवर्‍याकडे जाऊ शकत नाही. फक्त मुलांकडे जाते वारसा हक्काने.
तिची स्वकष्टार्जित काही मालमत्ता असेल तर त्यापैकी काही ती विल करून नवर्‍याला ठेवू शकते. सो विसच्या हाती दादासाहेबांच्या प्रॉपर्टीपैकी फक्त भोपळाच. ईशा असो वा रानं.

आईसाहेब आपला हिस्सा -- जो वडिलोपार्जित स्वरूपाचा आहे नवर्‍याकडून आल्यामुळे, तो असा कोणालाही देऊन नाही टाकू शकत. ना ईशाला ना विसला. तो कायद्याने त्यांचा अधिकार नाही. स्वतःच्या पश्चात तो जयदीपला देऊ शकतात तो कायदेशीर वारस असल्याने किंवा त्याच्या मुलांना किंवा वारस नालायक / मेडिकली इनकेपेबल असेल तर ट्रस्ट करून वगैरे.

त्यांची काही स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर ती त्या कोणालाही देऊ शकतील. विस, ईशा, कोणीही ऐरागैरा. पण दादासाहेबांची नाही -- हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवल्यासारखी.

हे प्रकार शक्यतो मृत्यूपश्चात जाहीर करतात वकील. जिवंतपणी जाहीर केल्यास वैमनस्यामुळे प्रॉपर्टी मिळालेल्या व्यक्तीला धोका उद्भवू शकतो / त्याची नियत बदलू शकते लौकर ताबा मिळण्यासाठी.

असे काही करायचेच झाले तर कागदपत्रांवर सही आईसाहेब व साक्षीदाराची लागेल. आणि असा वेगळा निर्णय घेताना आईसाहेब मेडिकली / सायकॉलॉजिकली फिट असल्याचे प्रमाणपत्र.
ईशाची म्हणजे लाभार्थीची सही नाही लागणार.

विसला काही हवेच असेल तर ४ पर्याय ---
१. रानंची मुले, ती सज्ञान होईपर्यंत हा सांभाळणार मजा करणार //

२. ईशाला धमकावून तिच्या नावावर झालेल्या मालमत्ता वापरणे पण त्याच्या नावावर नाही होणार //

३. ईशा ढगात, ईशाची मुले, ती सज्ञान होईपर्यंत हा सांभाळणार मजा करणार
ईशाच्याच नावावर विसच्या मार्गे होणार पण तो रस्ता बंद आहे. आईसाहेबांचा हिस्सा आहे असाच ईशाचा होऊ शकत नाही. ईशाला त्यांनी दत्तक घेतली तर //

४. कोर्टात रीतसर अपील करून दादासाहेबांच्या काळातील बिझनेस अवस्था व त्याने सांभाळायला सुरू केल्यानंतरची बिझनेस अवस्था यातील आर्थिक तफावत ही माझ्यामुळे आहे. त्यातील काही हिस्सा माझी स्वकष्टार्जित संपत्ती आहे, तो मला मिळावा असा क्लेम टाकणे.

ज्या गोष्टी आपल्याला झेपण्या पलीकडे आहेत त्यावर का कथा बेतलीय यांनी? पुन्हा अभ्यास करून समजून फॅक्टस वापरणे वगैरेची अ‍ॅलर्जी आहे या लोकांना.

छान अ‍ॅनालिसीस कारवी! मी ही तेच म्हणत होते..की लाभार्थीची कशाला आणि कशावर सही?
नवर्‍याची प्रॉपर्टी त्याच्या पश्चात बायका-मुलांत विभागली जाते तशी बायकोची वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिच्या पश्चात नवर्‍याकडे जाऊ शकत नाही. फक्त मुलांकडे जाते वारसा हक्काने. - हे तर मलाही माहिती नव्हतं! Happy

बायकोची वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिच्या पश्चात नवर्‍याकडे जाऊ शकत नाही. >>>
@ आंबट गोड
एका त्रयस्थ केस संबंधी प्रश्न विचारल्यावर ओळखीतल्या वकीलांनी सांगितले होते. जनरल बोलणे होते. कायद्यांची कलमे वगैरे घेऊन सखोल चर्चा नव्हती झाली. काही इफ-देन-एल्स असू शकतील. पण वकिलीत पेशातले लोक चुकीचे शब्द / माहिती वापरणे कटाक्षाने टाळतात.

केड्याचे कायदे,त्याविषयीचा अभ्यास हे सगळच अजब आहे.
शितुची एंन्ट्री 23एप्रिलला होत आहे,जिवलगा 22 ला चालू होत आहे.तोपर्यंत जर सिरियल बघायची ठरवल तर बाळाला झेलाव लागणार.शितु आणि सुभा म्हणतात की आता तुम्ही खुर्चीला खिळून रहा,IPL बघू नका,तुपारे बघा(अस सांगण्याची वेळ का यावी या दोन ज्येष्ठ कलाकारांवर) असो.
पण शितु, तू अस बोलत आहेस कारण तू बाळासोबत कदाचित अजूनपर्यंत काम केल नसशील मग तुला कळेल की प्रेक्षकांनी काय काय सहन केल आहे
शितु जशी आहे तशीच दाखवणार आहेत आणि सुभाला अश्रुंची साठी वजन कमी करायच आहे,त्यामुळे तो 25तला दाखवणार,मग ही जोडी पास्ट मध्येतरी कशी सूट होईल.बाळ विक्याची मुलगीच वाटत होत.पण शितुच काय? बर,भूतकाळात दाखवणार म्हणजे ही ढगात आहे,मग बाळाला हे विक्या सांगणार की शितुच भूत सॉरी आत्मा..?
काल बाळ एकदम रामायणात पोचल होत,सीता रामासोबत वनवासात गेली मग मी पण सर्रांसारखी प्रॉपर्टी घेणार नाही,अग, पण बावळट बाई,राम स्वत:सुदा गेला होता वनवासात,इथे हा गजा,नाही तुझे सर्र तुला आणि तुझ्यासोबत इतरांनाही वनवासात पाठवायला निघाला आहे.
बाकी,बाळाच्या आईच्या मेनूत चेंज झाला,काल चक्क खरवस
खरवस खातानाचा आणि त्यानंतरचा सुभाचा अभिनय लाजवाब,टाळ्या वाजवतानाही सुभा बेस्ट आणि बाळाला थोबाडीत ठेवून देण्याच्या वेळी त्याची तळमळ जाणवली.
किती सहन करणार सुभा?

बॉलनाही कळत नाही आपण कुठे, कसे, का गेलो आणि केड्यांना तर नाहीच नाही कळत की आपण क्यू स्टीक अशी का चालवली>>>>>>
अगदी बरोबर.... आता शि तु नावाचा चेंडू तु पारे वाले किती युगे लोटली नुसतेच दाखवत बसलेत... आणि काही वेळा किंबहुना बरेचदा बॉल आणि स्टिक या दोन्हीचा तडाखा प्रेक्षकांच्या माथी बसतो...
जे लोक या धाग्याला फॉलो करतात त्यांची मलमपट्टी शेअरिंग प्रकाराने आपसूक होते... आणि ज्यांना अशी पिसं काढायला नाही मिळत ते नक्की बधिर होत असावेत (स्टिक आणि बॉलचा तडाखा)..

थोबाडीत दिली????????>>>>अय्ययो, हे कधी घडले? >>>>> नाही हो कल्पना केली त्याने की द्यावी असं वाटतं होतं.

ईआई आणि ईबाबा बडजात्या सिनेमात अगदी फिट्ट बसतील, सारखं गोड गोड हसायचं, माना डोलवायच्या.

मला तो डबा उघडेपरेन्त वाटत होते की पोळीचा ल्लाडू करून आई गिरकी घेते कि काय. भीतीच वाटत होती.

कारवी छाया हे राखेचा २ मधील एक मस्त पात्र आहे.

मला तो डबा उघडेपरेन्त वाटत होते की पोळीचा ल्लाडू करून आई गिरकी घेते कि काय. भीतीच वाटत होती>>>>>> Rofl
अमा, मलाही असंच वाटलेलं, (नाहीतर शिळ्या पोळ्यांची खरवस नावाची डिश)

सुषमा ताई.... तो डबा उघडेपरेन्त वाटत होते की पोळीचा ल्लाडू करून आई गिरकी घेते कि काय. भीतीच वाटत होती>>>>>> Rofl
अमा, मलाही असंच वाटलेलं, (नाहीतर शिळ्या पोळ्यांची खरवस नावाची डिश) ++++++११११११११

मला तो डबा उघडेपरेन्त वाटत होते की पोळीचा ल्लाडू करून आई गिरकी घेते कि काय. भीतीच वाटत होती. >> अगदी अगदी मला पण सेम वाटलं, पण जर्रा नेम चुकला आणि पोळिच्या लाडवाचा खरवस झाला. Proud

मला एक कळत नाही, ही आईसाहेब बोम्बलून सांगतेय गेले कित्येक दिवस की प्रॉपर्टी इशाच्या नावावर करणार म्हणून. तेव्हाच ही इशा का बोलली नाही? की मला नको म्हणून? उगिच कागदपत्र करण्याचा खर्च, इशाई ला खरवस करायचा त्रास,, तो खराब न करता कर्जत पर्यंत वाहून आणायचा त्रास.

आणि गजेन्द्र पाटिल हे नाव दादासाहेबांनी जर विसं ला दिले तर ही गोष्ट आईसाहेबांना माहित असेल आधीपासूनच. मग इशाने फ्रॉड्लंट माणसाचे नाव गजा पाटिल सांगितलं तर त्यांना टोटल लागायला हवी होती ना? तरिही अजून का आईसाहेब विसं चे कौतुक करतायत? Uhoh

ईशाचा अभिनय सुधारला म्हणायचा. प्रॉपर्टी पेपरवर सही न केल्यानन्तर आत्मविश्वासाने वावरली. सही न करण्यामागच लॉजिक पटल. विसची शिकवणी त्याच्याच घशात घातली. पण ते राम सीता, अर्धान्गिनी वै वै कैच्याकै होत.

खरवस खातानाचा आणि त्यानंतरचा सुभाचा अभिनय लाजवाब,टाळ्या वाजवतानाही सुभा बेस्ट >>>>>> +++++१११११११११

नशीब ईआई आणि ईबाबाने मोडता नाही घातला ते.

कोर्टात रीतसर अपील करून दादासाहेबांच्या काळातील बिझनेस अवस्था व त्याने सांभाळायला सुरू केल्यानंतरची बिझनेस अवस्था यातील आर्थिक तफावत ही माझ्यामुळे आहे. त्यातील काही हिस्सा माझी स्वकष्टार्जित संपत्ती आहे, तो मला मिळावा असा क्लेम टाकणे. >>>>>>> सोप्पा उपाय आहे, विसने ह्यावर विचार करायला हवा होता.

ज्या गोष्टी आपल्याला झेपण्या पलीकडे आहेत त्यावर का कथा बेतलीय यांनी? पुन्हा अभ्यास करून समजून फॅक्टस वापरणे वगैरेची अ‍ॅलर्जी आहे या लोकांना. >>>>>>> +++++++++ २२२२२२२ काही नाही कारवी, शेवटी ते बाजीगरची कथा ढापतील. विसच्या वडिलान्ची प्रॉपर्टी दादासाहेबान्नी ढापली, विसला ती प्रॉपर्टी हवीय अस दाखवतील. विस म्हणाला होता ना एकदा, " जे माझ आहे ते मी मिळवीनच."

मला तो डबा उघडेपरेन्त वाटत होते की पोळीचा ल्लाडू करून आई गिरकी घेते कि काय. भीतीच वाटत होती >>>>> Rofl

मग बाळाला हे विक्या सांगणार की शितुच भूत सॉरी आत्मा..? >>>>>>> जोगतीण बाईच्या परातीत नन्दू दिसणार होती त्याच काय झाल? Uhoh
आणि हे मध्येच मान्त्रिकाच काय काढल? काहीही दाखवत सुटलेत. Sad

बाकी विसला गुलाबी शर्ट शोभत होता. >>>>>>>> अगदी अगदी

ती जाऊन एवढी वर्ष झाली तरी तिच्या साड्या बिड्या बऱ्या सांभाळून ठेवल्या आहेत यांनी>>>>>>>> नैतर काय. तिचा फोटो मात्र गायब केला हयान्नी.

झी ५ वरच्या इन्टव्ह्युमध्ये सुभाने काळे केस केलेले दिसले. विस आणि नन्दूचा फ्लॅशबॅक दाखवणार आहेत वाटत.

मान्त्रिक म्हणजे झेंडेंचा पीरबाबा आहे,दिसला एकदाचा...त्याला कौल लावलेला असतो ना झेंडेंनी,तो सांगतोय की विक्या के बुरे दिन है,एक लडकी बँड बजानेवाली है,मग विक्या म्हणतो 25 वर्षांची मेहनत वाया जाऊ देणार नाही.
प्रोमो पाहिल्यापासून या विचारानेच डोक्याचा पार भुगा झाला आहे की केड्या आता विक्याच्या डोस्क्यात प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कोणत्या नवीन पण बिनडोक आयडियाज घालणार आहे.
पण जयदीपने पण प्रॉपर्टी घ्यायला नकार दिला तर ती आसा कडेच राहणार,बाळ तर घेणार नाही.मग केड्या काय विचार करेल या विचाराने डोक बधिर झाल आहे.

साॉन्या खरंच सोन्यासारखी अभिनय करते एकदम प्रॅक्टिकल.. हल्ली ईशा पेक्षा तिच्याकडे लक्ष वेधले जाते.

तो पिरबाबा पण एनवेळी अस्टिन्टट पैकीच एकाला कपडे आणी स्किप्टचा कागद देवुन वेळ मारुन नेल्यासारखा वाटतोय...
कारवी पोस्ट मस्त! पण इतका अभ्यास आणी केड्या? मुळात प्रॉपर्टी देणारा सही करत नाहिये तर घेणार सही करतोय? अकलेची किती ती दिवाळखोरी??

धन्यवाद अमा, छायाला बघते जाऊन डीजेच्या धाग्यावर, त्यांनी मुखडे दिलेत ना सगळ्यांचे.

शितु आणि सुभा म्हणतात की आता तुम्ही खुर्चीला खिळून रहा,IPL बघू नका,तुपारे बघा (अस सांगण्याची वेळ का यावी या दोन ज्येष्ठ कलाकारांवर) >>>>
@ UP, ---- प्रेक्षक खुर्चीला खिळलेलेच आहेत म्हणावं... मालिकेच्या उत्सुकतेपोटी नव्हे तर इतके दिवस सलग, इतकी अकलेची दिवाळखोरी बघून मती गुंग झाल्याने. शितु-सुभाच्या लोकप्रियतेच्या गुडविलवर पोळी भाजून घेणे चालू आहे. आणि ते ते होऊ देतायत !! असो.

बाकी,बाळाच्या आईच्या मेनूत चेंज झाला,काल चक्क खरवस
खरवस खातानाचा आणि त्यानंतरचा सुभाचा अभिनय लाजवाब, >>>>>>
मेनूत बदल त्यातही माती खाणे परंपरा राखलीच आहे. सकाळी आमंत्रण येते, संध्याकाळी खरवस तयार.....
खरवस होईल भले तासाभरात. पण चीक सांगितला कधी मिळाला कधी...? मुंबईत इतक्या सहजी मिळतो चीक ? अर्धा लिटर पण नशीबाने मिळतो.
निमकरांनंतर आईसाहेबांनी म्हशीलाही फोन केला का? बाई गं रेडकू होऊ दे आता. जावईबापू खरवस खायचेत...
एप्रिलच्या उन्हाळ्यात खरवस? आंबा फिरनी तरी आणायची.

आणि ती खरवस डबे भरलेली पिशवी आईसाहेबांचा आमंत्रण फोन यायच्या आधीपासूनच निमकरांच्या मागे खुंटीवर लटकत होती. आमंत्रण आले की सुटायचे....

चमचा चाखल्यावर विसचा चेहरा आधी पंचगव्य चाखल्यासारखा दिसला. मग हसून छाने छाने... करतो काय ... आलिया सासूसी असावे सादर.

@ दक्षिणा -- लॉजिकल प्रश्न विचारण्यास मनाई आहे. गजा की विस हाच मुद्दा लावून धरलाय. आईसाहेबांना माहीत आहे तरी त्यांनीही फ्रॉड संदर्भात तुझे नाव कसे जोडले गेले विचारलेच नाही. खाजगीत सुद्धा.

काही नाही कारवी, शेवटी ते बाजीगरची कथा ढापतील.
जोगतीण बाईच्या परातीत नन्दू दिसणार होती त्याच काय झाल? >>>>
@ सुलू_८२ --- मग लोक अडीच तासांचा बाजीगर बघतील ना. ह्यांनी का कष्ट उपसले मालिका बनवायचे.
सेट लावताना सामानात परात सापडली की आठवेल.... अरेच्या हे राहिलच की
अष्टमी तरी आली का पुन्हा? मागची येऊन दीडेक महिना झाला ना.....नसेल आली तर हे पृथ्वीवरचे कर्जत नाही. त्यांची अष्टमी ३ महिन्यांनी एकदा येते.

तो पिरबाबा पण एनवेळी अस्टिन्टट पैकीच एकाला कपडे आणी स्किप्टचा कागद देवुन वेळ मारुन नेल्यासारखा वाटतोय... >>>>>>
@ प्राजक्ता, --- Happy एकदम !!
आणि पीरबाबा माणूस असतो? माणसाला कौल लावतात?
आपण देवाला कौल लावतो, पुजार्‍याला नाही. पुजारी समजून सांगतो.
तसा कौल समाधी / मजार वर लावतील ना? माणूस त्या पीरबाबाचा सेवक असेल जो अर्थ समजून सांगेल कौलाला मिळालेल्या उत्तराचे.

फारतर संचार झालेल्या व्यक्तीला प्रश्न विचारतात लोक. पण अशा लोकांच्या स्थानात, त्यांच्या बैठकीच्या वेळेला स्वतः जातात लोक.
ते लोक नॉर्मल अवस्थेत, ऑफीस मध्ये येऊन, क्लायंट सारखे खुर्चीत बसून कसे सल्ला देतील?
त्याला कौल नाही म्हणता येणार. अतींद्रिय ज्ञानाने दिलेली धोक्याची सूचना म्हणा फार तर.
काय बिनडोक कारभार आहे.

आणि ते प्रॉपर्टी कोणाच्या नावावर वगैरे इतर सदस्यांसमोर बोलणे !! कितीही विश्वासू + घरच्यासारखे असले तरी काही गोष्टी गोपनीयच ठेवतात.
ते लाजाहोम केल्यासारखे जोडीने सही करायला वाकणे !!
कोणीतरी दिग्दर्शकाचे नाव लिहा प्लीज. गुगलवर दर्शन घेईन म्हणते.

दिग्दर्शक-चंद्रकांत लता गायकवाड.काही काळ यांनी घाडगे अँड सून नामक एका टुकार मालिकेचे दिग्दर्शन केले होते(ही मालिका अजून चालू आहे का?)
सुरुवातीचे 100 भाग तुपारेचे गिरिश मोहितेंनी दिग्दर्शित केले होते.नंतर हे आले.

मग लोक अडीच तासांचा बाजीगर बघतील ना. ह्यांनी का कष्ट उपसले मालिका बनवायचे. >>>>>>>++++++१११११११

सेट लावताना सामानात परात सापडली की आठवेल.... अरेच्या हे राहिलच की >>>>>>> Rofl

साॉन्या खरंच सोन्यासारखी अभिनय करते एकदम प्रॅक्टिकल. >>>>>> अगदी अगदी. कालचा तिचा अभिनय छान होता. ती नेमबाजीची प्रॅक्टीस चालू असताना सॉन्या विसला ओरडत होती, अस वाटत होत की विस आता तिला गोळया घालतोय की काय. Lol

विक्या के बुरे दिन है,एक लडकी बँड बजानेवाली है >>>>>>>> झेण्डेच्या पीरबाबानेच गद्दारी केली त्याच्याशी. विस आता त्यालाही गोळी घालेल.

दिग्दर्शक-चंद्रकांत लता गायकवाड.काही काळ यांनी घाडगे अँड सून नामक एका टुकार मालिकेचे दिग्दर्शन केले होते(ही मालिका अजून चालू आहे का?) >>>>>>> हो. तिकडे दोन बायका फजिती ऐका चालू आहे सध्या.

आज झी २४ तासवर स्पॉटलाईट मध्ये ईशाचा मराठी- ईन्ग्रजी मिश्रीत इन्टरव्ह्यू होता. पाठीमागे मन्दिराचा सेट होता.

आजचा भाग म्हणजे सगळा सावळा गोंधळ होता.खोट्या गजा पाटीलचा अपघाती म्रुत्यु हे बाळाला अगदी लगेच लिंबू मिरच्या बांधलेल्या कागदावरच्या बातमीतून काय कळते
ईबाबांनी जालिंदर ची आठवण करून दिल्यावर बाळाच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर सापडतो.पण माझ्या माहितीप्रमाणे जालिंदर फोन झाल्यावर कार्ड बदलत असतो.मग तरीही बाळाला नंबर सापडला ,तिने फोन लावला,त्याने फोन उचलला.कैच्याकईच होत.

आजच्या एपी मध्ये कथा पुढे गेली, काहीतरी घडलं पण लॉजिक काहीच्याकाहीच होत. आधीच प्रश्नांची उत्तरं, लॉजिक शोधता शोधता डोकं बधिर झालं होतं आता आपल्या डोक्याचा पार भुगा करूनच सोडणार वाटत केड्या Sad
1) इशाला बरे सगळे पुरावे हातात मिळतात बरोबर तेच वर्तमानपत्र बर हातात आलं तिच्या
2)जेव्हा इआईने तिला कॉल केला तेव्हा ती आलू सोलत होती आणि इशा आल्यावर तिला आलूच सोलायला लावले.
3)बाळाने झालींदरचा मोबाईल नंबर जपून ठेवला, बर तिच्याकडे असेलही नंबर पण झालींदरणेपन तोच नंबर ठेवला म्हणजे तो तर नंबर्स बदलायचा ना तोच नंबर कसा काय ठेवेल तो तेपण एवढे दिवस Uhoh
4)बाळाला एवढे पुरावे मिळाले की विस गजा पाटील आहे परांजपेनिपण सांगितलं तरी हिचा विश्वास बसला नाही आणि जालिंदरवर लगेच विश्वास बसला
5)झालींदरपासून बाळाला धोका होता तरी एकटीच गेली भेटायला कुणाला सोबत नेउच शकत होती
6)बर जालिंदर आधीतर एका शब्दानेपण म्हटला नाही बाळाला की विसच खर नाव गपा आहे आताच बर सुचलं त्याला, काहीपण दाखवतात Proud
रच्याकने, इशा आज म्हटली की आमचा मैत्रिणींचा एक ग्रुप आहे त्यावर मत टाकतात सगळे मला तर हसायला आलं आपल्या माबो ग्रुप वरच टाकल्यासारखं वाटलं Biggrin

खरवस आला सिरीज मधे? खूप रॉयल झाली सिरीज! नाहीतर पुलंचे एक वाक्य वापरून पोळीचा लाडू ही या सिरीज मधली चैनीची परमावधी होती.

Lol फारेंड.

शिल्पा तुळसकर जाम गोड दिसतेय, तो interview बघितला. पण तिच्यासाठी सिरीयल बघायचं धाडस नाही ब्वा आपल्याकडे. सुभा फार खास नाही वाटत मात्र तिच्यापुढे, शिल्पा छा गयी. ती काय बोलली यापेक्षा तिझा प्रेझेन्स छान वाटला. पण एकंदरीत सिरीयल ईशाची आहे आणि ती strong होत जाणार असं सुभाच्या बोलण्यावरून समजले. त्यामुळे शिल्पा काही दिवसांसाठी असेल का. इशाताई कसा निभावणार इतक्या उंचीचा रोल. बघणाऱ्या प्रेक्षांकानी बघत रहा आणि इथे लिहित राहा, मी वाचायला येईन.

धन्यवाद UP, बघितले चं ल गायकवाड द ग्रेट.
खोट्या गजा पाटीलचा अपघाती म्रुत्यु >>>> त्या बॉबीलाही गायब केलाय का काही कळले म्हणून? काल दिसला नाही सही सोहळ्यात.

जेव्हा इआईने तिला कॉल केला तेव्हा ती आलू सोलत होती आणि इशा आल्यावर तिला आलूच सोलायला लावले. >>>> @ शुभांगी -- चाळीला जेवण असेल ईशाने प्रॉपर्टी नाकारली म्हणून. लागतील ना तेव्हढे बटाटे. फ्री पुन्हा. खरेदी नको करायला. प्रत्येकाच्या डोक्यातून १०-१० काढायचे.

खरवस आला सिरीज मधे? खूप रॉयल झाली सिरीज! >>>>> @ फारएण्ड
खरवस आला म्हणजे उल्लेख आला. लाँग शॉटमध्ये सासूबाईंनी भरवला १ चमचा. चमच्यातही दिसला नाही आणि डब्याचाही क्लोजप नाही. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचाही क्लोजप नाही. फक्त लीगल पेपर वापरला हिरवा.

शिरा पण आला. सगळ्या चाळकर्‍यांना दिला -- ईशाने प्रॉपर्टी नाकारली म्हणून. पण शिर्‍याच्या बशांचा क्लोजप नाही, कढईही झाकलेली. आपण शेरलॉकगिरी करतो म्हणून बहुतेक.

पहिल्या पाडव्याला काय खाऊन छाने छाने चेहरा केला विसने माहीत नाही.

खरवस आला म्हणजे उल्लेख आला. लाँग शॉटमध्ये सासूबाईंनी भरवला १ चमचा. चमच्यातही दिसला नाही आणि डब्याचाही क्लोजप नाही. >>> हे भारी आहे Lol

Pages