तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दादासाहेब आणि आईसाहेब एकाच वयाचे आहेत...>> नाही नाही. ते पहिलं नाव बहुतेक दादासाहेबांच्या पहिल्या बायकोचं आहे कारण तिथे पतीचं नाव दादासाहेब आहे आणि लिंग - स्त्री. Happy
दादासाहेबांच्या दोन्ही बायकांची वय सेम आहेत. Happy

ते ईशाचे रिग्रेसिव्ह वागणे डोक्यात गेले. >>
फारएण्ड, समजू शकते. मी एकही एपिसोड सहन करु शकत नाही.

राहुल ची भरपूर तारीफ करून त्याची पाठ वळल्यावर उपस्थित प्रेक्षकांकडे पाहून सुबोध तुपारे स्टाइल खुनशी हसला का? >> Lol

वाह, स्क्रीनशॉटच चक्क Happy

Photo available>>> मग कुठेय तो Lol
आसाहेबांची तीच माळ अजून आहे साडी पण बहुतेक ती ऑफ व्हाईट तीच वाटतेय.

वय, नातं स्गळ्याचा झोल आणि सगळे च सगळ्यांच्या लहानपणीपासून आहेत Proud

मतदार यादीत असले वयाचे खूप घोळ असतात असं सुचवून त्या केड्याची पळण्याची सोय करून ठेवते. >>> Happy

किंवा सिरीज मधे वेगवेगळ्या वेळी त्यांची जी वये दाखवली आहेत त्यावरून काढलेले सरासरी वय असावे ते.

* सरासरी म्हणजे विक्या आणि ईशा नव्हे Wink

आज कहर मँहणजे कहर झाला.जयदीप सोनियाला बाळ आणि नंदूचा काहीही संबंध नाही हे सिध्द कर अस सांगतो
अरे गाढवा,ती सोनिया मुळात पुनर्जन्म वगैरे काहीही नसत अस सांगत आहे मग जे तिच्या द्रुष्टीने अस्तित्वातच नाही ते तिने का प्रुवःह कराव.अंनिस कडे तक्रार करायला हवी की केड्या वाटेल ते सिध्द करायला लावतो.
आणि हे बाळ एक.जाम डोक्यात जाते.अग बाई,सरळ जा पोलिस स्टेशनात आणि भेट त्या गजाला किंवा जा त्या राजेशच्या घरी आजूबाजूला चौकशी कर ,नाहीतर दे ठोकून कम्लेंट.भटकत बसली आहे बावळट
पण त्या जोगवा बाईचा हात लागल्यावरच फूल खाली पडल हे सोनियाच एकदम करेक्ट
जरा आईसाहेबांंनी कौलच लावला होता तर विचारायच ना की ईलेक्शनमध्ये मोदी की गांधी.नसते फालतू प्रश्न विचारत होत्या.
मला वाटत की शितु जिवंत आहे.मला तिला खरतर जिवंतच बघायला आवडेल
मायबोलीकरांनो,तुम्हालाही आवडेल ना ,मग तिला जिवंत दाखवण्याच्या स्टोरी लिहा,केड्या वाचत असेल हा धागा.आयडियाज मिळतील.

आईसाहेब आणि विक्याचंं प्रकरण असेल, विक्याने नंदूला फसवून तिच्याशी लग्न केलं असेल, नंदूने आसा आणि विक्याला एकत्र बघितलं असेल आणि सरळ जाऊन गच्चीवरून ऊडी टाकली असेल. कौल किती वेळ दाखवत होते आणि शेवटी धक्का देऊनच फूल खाली पाडलं. मायराकडे ओळखपत्र असतात विक्याची सगळी, मग तिला माहिती असेल ना की तो गजा आहे की ती ओळखपत्र खोटी असतील.

दादासाहेब आणि आईसाहेब एकाच वयाचे आहेत...>> नाही नाही. ते पहिलं नाव बहुतेक दादासाहेबांच्या पहिल्या बायकोचं आहे कारण तिथे पतीचं नाव दादासाहेब आहे आणि लिंग - स्त्री >>हो पहिला रकाना तेच दर्शवतो.. पण एवढं लॉजिक हे लोक नाही लावत बसत..फक्त स्क्रीन वर नाव पूर्ण करण्यासाठी आजू बाजूला 2 4 नाव अन फोटो लावले.. पण zee वाल्याना काय माहीत लोक पिसं काढतील छोट्या गोष्टीची.. आणि हे वयाच गुणोत्तर तर अचाट आहे..काहिही म्हणजे काहिही.. आईसाहेब एकवेळ 43 पण जयदीप 37???!!..मग इतक्या वेळा मी लहान होतो लहान होतो हे कशाला दाखवल आम्हाला?!!

सगळेच सगळ्यांच्या लहानपणीपासून आहेत Rofl दादासाहेबांच्या दोन्ही बायकाही लहानपणापासून मैत्रिणी असतील.

एवढे सुंदर आणि side angle ने काढलेले फोटो मतदार यादीत?

आणि हो , फूल धक्का लागून पडल्यासारखंच दिसलं. त्यात माझ्या २.५ वर्षांच्या लेकीने १५-२० वेळा फूल कसं पडलं हा प्रश्न विचारुन हैराण केलं. आणि प्रत्येक वेळी with action धक्का लागून पडलं, हे सांगून कंटाळा आला. शेवटी सॉन्याने पण माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला...।।। Lol

यादी भय्न्कर आहे. मला घेरी येत्ये. झी मराथी इतक फाल्तू कस्काय असू शक्त? सग्ले सरन्जामे एकत्र, नचिन्दे एकत्र मग हा पातिल मध्येच कस्काय घुस्ला?

केड्या ला अजून एक आयडिया.....
रा नं हि दादासाहेबांची पहिली बायको. आईसाहेब आणि वि स नोकर मंडळी. जयदीप नक्की कोणाचा कोण किंवा फ्लेक्सिबल पात्र पण मोस्टली रा नं चा मुलगा. म्हणून त्याला वेड ठेवायचं.
रा नं ला मारून आसा नी दादासाहेबांशी लग्नं केलं आणि त्या आणि विकु घरात आले. रानं आणि विकु च्या वयात फार अंतर नसल्याने विकु पण रानं वर टप्पे टाकत होता पण हाती काही ना लागल्याने त्याने तिला मारून टाकले. आणि केड्याचा लॉजिक टोटल गंडलेल असल्याने, वय मात्र चुकलेली आहेत.
#रानोमाळलॉजिक

आज कहर मँहणजे कहर झाला.जयदीप सोनियाला बाळ आणि नंदूचा काहीही संबंध नाही हे सिध्द कर अस सांगतो
अरे गाढवा,ती सोनिया मुळात पुनर्जन्म वगैरे काहीही नसत अस सांगत आहे मग जे तिच्या द्रुष्टीने अस्तित्वातच नाही ते तिने का प्रुवःह कराव.अंनिस कडे तक्रार करायला हवी की केड्या वाटेल ते सिध्द करायला लावतो.
आणि हे बाळ एक.जाम डोक्यात जाते.अग बाई,सरळ जा पोलिस स्टेशनात आणि भेट त्या गजाला किंवा जा त्या राजेशच्या घरी आजूबाजूला चौकशी कर ,नाहीतर दे ठोकून कम्लेंट.भटकत बसली आहे बावळट
पण त्या जोगवा बाईचा हात लागल्यावरच फूल खाली पडल हे सोनियाच एकदम करेक्ट >>अगदी बरोबर UP.. सरळ सरळ अंधश्रद्धा. थोड्याफार गोष्टी जुळल्या तर लगेच पुनर्जन्म समजून बसले जेडी आणि आस..आणि इशाबद्दलतर बोलणंच नको. बाळाला एक माणूस सांगतो की एक पांढऱ्या रंगाची कार राजेशच्या घरी आली होती आणि बाळ लगेच सिरीयस होत पण पांढऱ्या रंगाच्या तर कितीतरी गाड्या आहेत मग फक्त रंगावरून कस ओळखणार की गाडी सुभाची आहे.. आणि नात्यांचा तर खूपच झोल करून ठेवलाय बाबा Uhoh

सॉन्या आणी जयदिपचे लग्न कसे ठरले हे दाखवले किंवा काही उल्लेख नाही. ती स्मार्ट आहे. हे एवढे नात्यांचे झोलझाल माहिती असतांना लग्न झाले की तिलाही अंधारात ठेवले देव जाणे

पण त्या जोगवा बाईचा हात लागल्यावरच फूल खाली पडल हे सोनियाच एकदम करेक्ट >>>++++++++++११११११११११

अरे गाढवा,ती सोनिया मुळात पुनर्जन्म वगैरे काहीही नसत अस सांगत आहे मग जे तिच्या द्रुष्टीने अस्तित्वातच नाही ते तिने का प्रुवःह कराव. >>>>>>> नैतर काय! जयदीपला म्हणाव, जेव्हा तुला फालतू बिझनेसच्या आयडीयाज देऊन लोक तुझा पैसा लुबाडत होते तेव्हा तू त्यान्ना का नाही विचारल की प्रुव्ह करुन दाखव की तुळशीन्च्या पानापासून पेट्रोल तयार होत वै वै.? ह्याने कुणाहीवर विश्वास ठेवला म्हणून विससारख्या परक्या माणसाच फावल.

जयदीपने ' मी जर चॅलेन्ज हरलो तर तुला जे हवय ते माझ्याकडून माग' म्ह्टल्यावर सॉनयाचे डोळे लकाकले. बहुधा ती त्याच्याकडून आईसाहेबान्ची प्रॉपर्टी मागेल जी ईशाच्या नावावर करणार होती. विसची मेहनत गेली वाया! Lol

मला वाटत की शितु जिवंत आहे.मला तिला खरतर जिवंतच बघायला आवडेल
मायबोलीकरांनो,तुम्हालाही आवडेल ना ,मग तिला जिवंत दाखवण्याच्या स्टोरी लिहा >>>>>> केडयासाठी आयडिया - विसने तिला त्या खोलीत डाम्बून ठेवल असेल.

* सरासरी म्हणजे विक्या आणि ईशा नव्हे Wink >>>>>>>>> Rofl

ते ईशाचे रिग्रेसिव्ह वागणे डोक्यात गेले. >> अगदी अगदी. त्याच्यावर कडी म्हणजे ईआई आणि ईबाबान्चे तिला रिग्रेसिव सल्ले देणे. Angry रुपालीच एकवेळ ठीक आहे, तिच मत तिच्या अनुभवान्वरुन तयार झालय. विस तर महारिग्रेसिव झालाय, पण त्यामागे त्याचा हेतू वेगळा आहे.

राहुल ची भरपूर तारीफ करून त्याची पाठ वळल्यावर उपस्थित प्रेक्षकांकडे पाहून सुबोध तुपारे स्टाइल खुनशी हसला का? >> नाही हो. Biggrin

स्वस्ति तुम्हाला _/\_

आईसाहेब आणि दादासाहेन्बाच्या पहिल्या बायकोच्या घराचा नम्बर: ७

गजा पाटील आणि जयदीपच्या घराचा नम्बर सुद्दा एकच : १८

दादासाहेबान्च्या पहिल्या बायकोचा फोटो 'अव्हेलेबल' दाखवतायत 'इन्विसिबल' असूनही.

स्वस्ति एवढी मेहनत केलीय तुम्ही आमच्यासाठी तर आता एक करा, हा स्क्रीनशॉट सुभा किव्वा केडयाच्या इन्स्टावर पाठवा, नाहीतर झीमच्या थोपु पानावर पाठवा.

बाकी मतदार यादीतला विसचा फोटोही खुनशी हास्य करताना दिसतो.

बादवे, कालच्या एपिसोडमधला सुभाचा सफेद शर्ट छान होता. छोटे छोटे प्रिन्टस होते त्याच्यावर. Happy

काय पाऊस पडलाय प्रतिसादांचा !! Happy
नका नातेसंबंध शोधू लोकहो.... ते कदाचित एकमेकांचे कोणीच नसतील, बिग बॉस सारखे थोडे एपिसोड एकत्र राहून मग आपापल्या घरी जाणार असतील.
४३ ची आई, ३७ चे गोष्टीवेल्हाळ बाळ आणि 'दादा' ३२ चा? श्रीमंताना ६ व्या वर्षी मुलं होतात?

मग तिला जिवंत दाखवण्याच्या स्टोरी लिहा >>>>>> केडयासाठी आयडिया >>>>>>
केड्यांना लिहीता येत नाही हे सिद्ध झालेय. वाचता तरी येते कशावरून? तेव्हा कशाला लिहायची मेहनत घ्यायची सुलू. या लोकांची धिंड काढायची म्हटली तर गाढवही पाठीवर बसवून घ्यायचे नाही स्वतःची तौहीन होईल म्हणून

कालच्या एपिसोडात इशाकडे पाहून खरंच वाईट वाटत होतं. एखाद्याची, कुणी स्वार्थासाठी एवढी मोठी फसवणूक केलेली पहाताना फार दुःख होतं.
(इशाचा अभिनय सुधारला असं म्हणावं का मी जास्त कनवाळू आहे ते ठरवता आलं नाही.)

नका नातेसंबंध शोधू लोकहो.... ते कदाचित एकमेकांचे कोणीच नसतील, बिग बॉस सारखे थोडे एपिसोड एकत्र राहून मग आपापल्या घरी जाणार असतील.
४३ ची आई, ३७ चे गोष्टीवेल्हाळ बाळ आणि 'दादा' ३२ चा? श्रीमंताना ६ व्या वर्षी मुलं होतात?>>>>>> कारवी, मस्तच!

(इशाचा अभिनय सुधारला असं म्हणावं का मी जास्त कनवाळू आहे ते ठरवता आलं नाही.)>>>>> Lol

वरचा प्रोमो: बाळाला डोकं आहे हे तरी कळालं. नशीब तिने नेहमीसारखा बावळटपणा केला नाही.. माझ्यातर डोळ्यात पाणीच आलं Wink

कालच्या एपिसोडात इशाकडे पाहून खरंच वाईट वाटत होतं. एखाद्याची, कुणी स्वार्थासाठी एवढी मोठी फसवणूक केलेली पहाताना फार दुःख होतं. >>>>>>>>> ++++++++++१११११११११११ कालच्या एपिसोडमधला ईशाचा अभिनय सरप्राईझिन्गली सुधारला, विसकडे एकटक बघत ' माझ्यासमोर उभा असलेला माणूस हा मी प्रेम केलेला विस आहे की आणखी कोणी?'' असा विचार करत होती ते योग्य वाटत होत.

नशीब, काल पुन्हा पचकली नाही विससमोर.

परान्जपेन्ना ऑन द फेस ईशाला सत्य सान्गता येत नव्हत तर एसएमएस करायचा ना तिला. कोणाला कळल असत?

परान्जपेशी बोलतानाच्या सीनवेळी ईशाचा मेकअप गन्डलेला वाटला. काजळाचे थर गालावर ओघळल्यामुळे चेहरा काळसर झाल्यासारखा वाटला.

परवाच्या एपिसोडमधला विसच्या शर्टाचा रन्ग सफेद होता ( छोटया प्रिण्टसवाला) , काल रन्ग बदललेला, हिरवा. विसच्या स्वभावासारखे त्याच्या कपडयाचे रन्ग सुद्दा बदलतात का सरडयासारखे एका दिवसात! Proud

परवाच्या एपिसोडमध्ये त्याला दाढी नव्हती. काल अचानक कुठून त्याला दाढी उगवली?

विसने काल दादासाहेन्बावर तो क्लॉज घातल्याचा आरोप केला. केडया विसरला की काय, तो क्लॉज विसनेच त्यान्ना घालायला लावला. Uhoh

जयदीप राजनन्दिनीचा भुतकाळ सान्गताना सॉनयाच एकच पालूपद चालू, " तुला हेही माहीत नाही" Lol

शाब्बास.ईशाबाळ.आगे बढो.तेवढ तुझ्या आईला दूर ठेव. >>>>>> अगदी अगदी. बाबान्ना आणि रुपालीला सुद्दा दूर ठेव.

वरचा प्रोमो: बाळाला डोकं आहे हे तरी कळालं. >>>>>>> ++++++++ फक्त एक प्रॉब्लेम झालाय. ' मी सही करणार नाही' हे सान्गताना ईबाळाचे एक्सप्रेशन्स ठाम असायला हवे होते, इथे ते रडके दिसतात.

केड्यांना लिहीता येत नाही हे सिद्ध झालेय. वाचता तरी येते कशावरून? तेव्हा कशाला लिहायची मेहनत घ्यायची >>>>>>>>>>> Lol

Pages