मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

हा बाफ तसा उगीच! परवा एकांशी बोलताना लक्षात आलं आपण माबोवरच्या काही पाकृ बरेचदा करतो. इतकच काय फक्त माबो रेसिप्या वापरून एखादा पार्टीचा मेन्यूही ठरवता येईल. आठवायला बसल्यावर बरेचदा केल्या जाणार्‍या / केल्या गेलेल्या खालच्या रेसिप्या आठवल्या. आठवल्या आहेतच म्हणून इथे लिहून ठेवतो आहे. कोणी पाहिल्या नसतील तर बघता येतील.

१. टोमाटियोची आमटी - अमेरिकन ग्रोसरीत गेलं की टोमाटीयो हमखास मिळतात आणि मग ही आमटी केली जाते.
२. क्रॅनबेरी सॉस (भारतीय स्वादाचा - मेथांब्यासारखा) - दरवर्षी न चुकता दोन, तीन वेळातरी हा केला जातोच. ह्या वर्षीचाही पहिला लॉट करून झाला. अनेक नॉन-माबोकरांना रेसिपी देऊन आणि त्यांनी ती करून झालेली आहे.
३. नारळीभात - अगदी हमखास यशस्वी होतो. त्यामुळे ह्याच पाकृने केला जातो.
४. मिक्स सॅलडचा झुणका - झुणका खूप आवडत नाही. पण ही पाकृ इंटरेस्टींग वाटली आणि करून बघितल्यावर आवडली पण. त्यामुळे बरेचदा केली जाते.
५. राईस क्रिस्पी चिवडा - झटपट आणि चविष्ट! ह्या दिवाळीतही दोन डब्ब्यांचा करून झाला.
६. व्हेज बिर्याणी (फोटोसहीत) - बिर्याणी वगैरेसारखे कॉम्प्लिकेटेड पदार्थ घरी करू असं कधी वाटलं नव्हतो पण फोटो पाहून वाट्याला गेलो आणि चांगली झाली. ह्या रेसिपीने बर्‍याचदा केली आणि दरवेळी चांगली झाली.
७. अंडंबिर्यानी - वरच्या पाकृची बहिण. ही पण बर्‍याचदा केली जाते.
८. पापलेटांची आमटी - परदेसायांची ही पाकृपण एकदम हिट. एव्हड्यात केली गेली नाही आणि आता सापडत नाहीये. Uhoh
९. द्राक्षबटाटा भाजी - दिशेनदांची पाकृने ही भाजी लय भारी होते. पाकृ माबोवर आता नाहीये. पण एका नॉन माबोकरांनी पिडीएफ सेव्ह करून ठेवली होती. ती बघून करतो. Happy
१०. सिंधी कढी - वर्षू नीलची ही रेस्पी पण भारी होती. ही पण आता सापडत नाहीये. Uhoh
११. भरलेली कोंबडी - नेहमी करतो असं म्हणता नाही येणार पण आत्तापर्यंत तीनदा केली. अजूनही बात कुछ जमी नही. कधीतरी जमेल म्हणून दर थॅंक्स गिव्हिंगला बिचारी कोंबडी जाते जिवानिशी.
१२. तिलापिया फ्राय - ही लिहीली आहे मीच. पण मूळ पाकृ शोनूची. मासे करायला सुरुवात करताना हमखास यशस्वी!
१३. आंब्याचा शिरा - - आम्ही आधी आंब्याचा शिरा करायचो पण ह्या रेसिपीने एकदम मस्त होतो.

माबोवरची सुप्रसिद्ध मब ह्या दिवळीत पहिल्यांदा जमली एकदाची. ती ह्या वरच्या लिस्टीत अ‍ॅड होईल का कळेलच आता.

तुमचीही अशी यादी असेल तर द्या. अजून काही सोप्या आणि हमखास यशस्वी रेस्प्या करून बघता येतील.

विषय: 
प्रकार: 

मी नेहमी करत असलेल्या माबो रेसिपीज : जशा च्या तशा फॉलो केल्या तर अगदी हमखास मस्त होतात.
मसालेभात (सायो)
वर्‍हाडी चिकन (टीना)
अमृतसरी छोले (अल्पना)

अमृतसरी छोले तर ऑटाफे आहेत पण काही नाकार्ड्यांना तेलाचा तवंग वर हवाच असतो; सो मी एकटा असेल तेव्हा घडतात ते. नाहीतर मग लपून केले तर...

मस्त धागा! नारळीभात काय बाईंच्या रेसिपीने करते. मस्त होतो!
सायोची पनीर माखनी फेवरिट आहे माझी. आणि दुसरी फेवरीट बनत चाललीय ती म्हणजे योकुची धनिया पुदिना आलू.. फारच यम्मी लागते!
अजुनही असतील. आत्ता ह्याच आठवल्या.

मी पूर्वी सप्रि(?) च्या रेसिपीने वरणातला पास्ता खूपदा करायचे. हल्ली झाला नाही विशेष.
माझ्याच रेसिपीने मब आणि बघारे बैंगन करते. मंजूडीच्या रेसिपीने तुरिया पात्रा वाटाणा, मृ च्या रेसिपीने शेवयांच्या इडल्या ह्या अत्ता पटकन आठवणार्‍या रेसिफा. आठवेल तसं अ‍ॅड करत जाईन.

आमच्याकडे काही रेसिपीज मायबोली न बघता करता येतात. काही रेसिपीज पहिल्यांदा केल्या तेंव्हा ' छाप के रखना' असं रेटिंग येतं. काही काही रेसिपीज ना ' मॉम राइट इट डाउन फॉर मी इन इंग्लिश' असं रेटिंग येतं.

वर्‍हाडी चिकन, अमृतसरी छोले, अंडा घोटाला वर्षू, कृष्ण्करी लालू, बेसन लाडू स्वाती, लग्नातली वांग्याची भाजी ( सीमा) , खानदेशी भरीत आणि मेथी डाळ मिनोती, सिंडीच्या रेसिपीने पेंसिल भाजी, मृची लाल भोपळा बाकर भाजी , ९ च्या रेसिपीने कुरकुरीत भेंडी या सर्व छापलेल्या आणि इंग्रजीत बारक्यासाठी लिहून ठेवलेल्या भाज्या आहेत. अजून आठवतील तशा लिहिन.
कन्फेशन मोड : मसाले भात २-३ वेळेस ट्राय केला पण मनासारखा जमला नाही. म ब ,गूळ पोळी करायची हिम्मत अजून होतच नाही Happy

मस्त धागा.
सशल यांच्या रेसिपीने रवा बेसन लाडू कित्येक वेळा केलेत. परफेक्ट होतात. स्वाती आंबोळे - नारळीभात. दिनेशदांची द्राक्ष बटाटा भाजी एकदाच केली पण मस्त जमली होती. त्यांचा शुद्ध देसी पिझ्झाही. बहुतेक प्रीति यांनी कॉर्न पनीर पराठे रेसिपी दिलेली एका गणेशोत्सवात. ते पराठे किंवा तेच सारण भरून सॅन्डविच तर असंख्य वेळा केले. मंजूडी यांचे मूग बटाटा पराठे हल्ली केले नाहीत, पण आधी खूपदा केले. सायोंची पनीर माखनी एकदम हिट रेसिपी!
अजूनही खूप असतील.

स्वाती आंबोळे - नारळीभात.त्यांचीच का लाजोचे बटर पनीर (नावात गडबड आहे.).मृण्मयीची भरली वांगी.भ.वांगी तर माझ्या बाईने दुसरीकडे करून त्यांच्याकडे कायम पार्टी डिश म्हणून प्रसिद्ध केली आहे.

शाली, अंडंबिर्यानीला ती भलतीच लिंक कशी काय आली काय माहित ? Happy

हो, अमृतसरी छोले आम्ही पण केले होते मागे २-३ वेळा. नंतर केले गेले नाहीत. आता आठवण निघाली आहे तर करू पुन्हा.

मिरची लव्हर्स करता स्वातीचं मिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून अफलातून टेस्टी प्रकार.
कुठल्याही मिरच्या चालतील तिखट/कमी तिखट (मी दोन्ही प्रकारांत केलं आहे) सगळा भाव चढलेली मोहोरी खाते. चांगला झणका असल्यानी खप जरा कमी असतो पण वर्थ इट. थालीपीठांबरोबर दह्यांत कालवून, काकडीच्या कोशिंबीरीत (मी मुळ्याच्या कोशिंबीरीतही वापरून पाह्यलंय) वगैरे सुपरडुपर हिट आयटम बनतात.

अरे हो, दिलेल्या प्रमाणांतच करायचं हे; बरोब्बर मसाला पुरतो. जास्तही होत नाही आणि कमीही नाही.

अल्पनाच्या पाकृने सखुबत्ता केला होता दोनदा.. घरी खूप आवडला होता.. दोनदाच केला होता पण ती हमखास यशस्वी पाकृ वाटते म्हणून लिहिली.

मी अमृतसरी छोले (अल्पना रेसिपी) करते बरेचदा, मस्त होतात आणि अगदी सोपे. बरोबर समोसे बाहेरचे, किंवा घरी केलेलं अगदी साधं बटाटा पॅटीस छान लागतं, वरुन शेव घालायची छोले पॅटीस करताना. मी नुसतं खाते पण पाव आवडत असतील बरोबर, तरी छान लागतात.

क्रॅनबेरी साॅस (स्वाती आंबोळे)
मलई बर्फी (सायो)
आंब्याचा शिरा (दीपांजली)
मायक्रोव्हेव सुरळीच्या वड्या (आर्च)
मसालेभात (सायो)
कंग पाव चिकन (वर्षूनील)
कोलंबीचं बरटं (म्रुण्मयी)

हा धागाआहार आणि पाकक्रुती विभागात का नाही?

स्वाती च्या रेसेपीने गेली 4-5 वर्ष नारळीभात केला जातोय.
सायोच्या रेसेपीने -मसालेभात, पनीर माखनी (लेकाची आवडती रेसेपी आहे. महिना-15 दिवसाला केली जाते). मब पण २-३ दा केली आहे . मेथी मलई मटर पण सीझनमध्ये ४-५ दा तरी होते. मित्रमंडळीमध्ये खूप पॉप्युलर डिश आहे ही.
स्वातीताई च्या रेसेपीने व्हेजिटेबल स्ट्राटा बऱ्याचदा करतो.
मंजुडी च्या रेसेपीने लसूणी पालक
बस्केची (?? तुझीच आहे ना बस्के) पनीर जालफ्रेजी
व्हेज बिर्याणी/ अंडा बिर्याणी आणि चिकन बिर्याणी- इथल्याच रेसेप्या वाचून करते.
लालूच्या धाग्यावरच्या पास्ता रेसेपी
अंजली - टॉम याम सूप (???)
टोमॅटोचे भरीत - इब्लिस
लाजोच्या रेसेपीने कपकेक
मेथी पुलाव
वांगी-सोलाण्याची भाजी
वरच्या रेसिपीसाठी माबोवर शक्यतो यावं लागत नाही इतक्या प्रमाणात केल्या जातात.

याशिवाय बऱ्याच चटण्या-कोशिंबीर, रायते, सलाड, सूप प्रकारासाठी माबो सर्च वापरला जातो. पूर्वी विपुमध्ये पण शोधायचे.