Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 08, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » बटाट्याच्या रेसिपीज » द्राक्ष बटाटा भाजी, स्वनिर्मित » Archive through March 08, 2006 « Previous Next »

Dineshvs
Monday, January 30, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी नाशिकला द्राक्ष आणि बटाट्याची भाजी करतात असे वाचले होते, त्याची क्रुति मला मिळाली नाही, पण ते डोक्यातुन जात नव्हते. म्हणुन आज एक प्रयोग करुन बघितला, आणि भाजीला छान चव आली, ती कृति अशी.

पाच सहा छोटे बटाटे धुवुन न सोलता त्याला भरल्या वांग्याप्रमाणे चिरा दिल्या. मग पाच सहा छोटे कांदे सोलुन त्यानाहि अश्याच चिरा दिल्या. एका जाड बुडाच्या भांड्यात हे रचले. वर दोन मध्यम रताळ्याच्या फ़ोडी टाकल्या. त्यातच एका वेलचीचे दाणे घातले.
मग एका ताटात दोन मध्यम टोमॅटो बारिक चिरुन घेतले, त्यात अर्धा कप बारिक चिरलेली कोथिंबीर घातली. त्यात हळद, हिंग दीड चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साखर घातली. त्यातच सगळ्या पदार्थाला लागेल एवढे मीठ घातले. ते सगळे नीट मिसळुन कांद्या बटाट्यावर पसरले. ताट धुवुन अर्धा कप पाणी त्यात घातले. त्यावर एक चमचा काळा मसाला पसरुन घातला व एक वाटी काळी बिन बियांची द्राक्षे पसरुन घातली. वरुन अर्धी वाटी कच्चे तेल ( मी मोहरी आणि शेंगदाणा मिसळुन वापरले, ) मग त्यावर घट्ट झाकण ठेवुन मंद आचेवर ठेवले.
लक्ष द्यायची गरज भासली नाही. थोड्या वेळाने खमंग वास सुटल्यावर नीट ढवळुन शिजवले.

भाजीला खुप छान स्वाद व चव आली. पार्टिसाठी आवर्जुन करावी अशी भाजी आहे हि.
मोहरीचे तेल नसेल तर थोडी मोहरीपुड घालावी. पण स्वादासाठी मला ते तेल आवश्यक वाटते.



Bee
Monday, January 30, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कृती छानच आहे. पण मुळ कृती कशी असेल? अशीच असेल का? की वेगळी असेल?

मोहरीचे तेल म्हणजे सरसोचे तेल ना.. खूपच उग्र वास येतो. मी अभय बंग ह्यांनी सांगितल्या प्रमाणे, एक चमचा सरसोचे तेल, एक चमचा सनफ़्लावर तेल आणि एक चमचा olive तेल असे मिश्रण करून भाज्या करतो. स्वाद माहिती पडत नाही फ़ारसा.

द्राक्षाचा विषय आहे म्हणून मला विचारावेसे वाटते, फ़क्त एकट्या नाशिकलाच आपल्याकडे द्राक्षासाठी सुपिक जमीन उपलबध झाली आहे का? वर्‍हाडात आमच्या घरी अकोल्याला संत्री अशी यायची मे महिन्यात की नागपूरची संत्री आणि घरची संत्री ह्यात काही फ़रक वाटायचा नाही.


Dineshvs
Monday, January 30, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बी, तेच तेल.
मुळ क्रुति मला नाही रे मिळाली.
आणि द्राक्षे अनेक ठिकाणी होतात, फ़लटण ला पण होतात, पुण्याच्या आसपास पण होतात. थंड कोरडी हवा लागते त्याला, पण मेहनत फ़ार असते, आणि नाशिकच्या शेतकर्‍याना बराच अनुभव आहे ना त्यातला.


Arch
Monday, January 30, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त recipe आहे. oven मध्ये करून बघायला हरकत नाही.

Karadkar
Tuesday, January 31, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तासगांवची द्राक्शे कशी विसरलात! पश्चिम महाराष्ट्रात तासगावमधुनच येतात. आणि दुबई, शरजह, सौदी अरेबिया याठिकाणी निर्यात पण होतात.

Dineshvs
Tuesday, January 31, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर, तासगाव, तासगाव चमन अशी एक जात पण आहे नाहि का द्राक्षांची.

Supermom
Wednesday, February 01, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश रेसिपी खूपच छान आहे. विशेषत द्राक्षांमुळे मुलेही आवडीने खातील. पण अर्धी वाटी तेल खूप नाही का होत?

Daizy
Wednesday, February 01, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रेसिपी,मी नाशिकला गेल्यावरच करेल. पण कच्चे तेल तेही १/२ वाटी जास्त नाही का?

Seema_
Monday, February 13, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मी ही method वापरुन भाजी केलेली. oranges संपत नव्हती म्हणुण द्राक्षाच्या ऐवजी ती वपरली.मस्तच झालेली भाजी. तुम्ही पण oranges वापरुन करुन बघा एकदा. recipe बद्दल धन्यवाद

Pendhya
Tuesday, February 14, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
सरसों, नाही, पण शेंगदाणा तेलामधे ही भाजी करुन बघीन.


Dineshvs
Tuesday, February 14, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेंढ्या भैयच्या अंगाला वास येतो तितके वाईट नाही लागत हे तेल आणि शिजवल्यावर वास जातो याचा.
डेझी एवढ्या तेलातच मजा आहे. हे तेल कच्चे घातलेले असल्याने घश्याशी येत नाही. छान रस्सा होतो.
आणि सीमा, संत्री आहेत घरात, आता करीनच.


Rachana_barve
Wednesday, February 22, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश सही झाली होती बरका भाजी. भरपूर compliments मिळाले मला :-O चॅलेंज घेतल होत जबरी भाजी तयार करून आणेन मी म्हणून

Dineshvs
Thursday, February 23, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याना आवडली ते छान झालं. अचानकच शोध लागला होता या भाजीचा. पण मला ती नाशिकची कृति अजुनहि मिळाली नाही.


Rachana_barve
Thursday, February 23, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असूदेत. ही भाजी पण मस्त होते. तुमच्या रेसीपीज मी ओगले आजींच्या रेसीपीजसारख्या डोळे मिटून वापरते :-) आजपर्यंत कधी बिघडले नाहीत पदार्थ
धन्यवाद...
अहो पण दिनेश तुम्ही कृती सांगताना किती माणसांकरता साधारण होईल हे पण सांगत जाना प्लीज. माझी भाजी सगळ्यांनी लोणच केल आहे का... म्हणून वापरली :-(.. ...



Chafa
Monday, February 27, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी भाजी सगळ्यांनी लोणच केल आहे का... म्हणून वापरली
>> यावर अजून केड्याची कॉमेंट नाही? :-O

दिनेश, छान झाली भाजी. मी केलेले बदल म्हणजे टोमॅटो कोथिंबीर दोन्ही घरात नसल्याने, त्याऐवजी, टोमॅटो बेजिल मॅरीनारा टाकला आणि थोडं दाण्याचं कूटही घातलं. आणि vegetable oil वापरलं. बाकी सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच.

तुमचं पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा या भाजीला ' अंगूरी आलू' असं काहीतरी नाव द्या. :-)


Dineshvs
Monday, February 27, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना लोणचं म्हणुन खाल्ली तर सहाजणांसाठी आणि भाजी म्हणुन खाल्ली तर दोन जणांसाठी. बाकि सुचना लक्षात ठेवीन,
चाफा, नाव छानच आहे.


Rachana_barve
Tuesday, February 28, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा नाहीये त्याच लक्ष तर तु कशाला वेधून घेतोस :-O
दिनेश, धन्यवाद


Prajaktad
Tuesday, March 07, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश!मी पण केलि होती हि भाज़ी अगदी झक्क झाली होती
माझे माहेर नाशिकचेच पण,मलाहि अशि काही भाजी करतात हे माहितिही नव्हते.
नाशिकच्या द्राक्शांना मात्र तोड नाही.
परवा , पॉट्लॉगला हेच करावे म्हणतेय त्यासाठी काही addition सुचवता का?


Dineshvs
Wednesday, March 08, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, सगळ्याना आवडलेली दिसतेय हि भाजी. प्राजक्ता पण मला वाटते हेच रसायन झक्क जमतेय. सध्या तरी काहि बदल सुचत नाही.
रताळ्याच्या जागी लाल भोपळ्याच्या फ़ोडी घालता येतील. अशी गोडसर भाजी घातल्याने ग्रेव्ही छान होते, शिवाय तेलाचा ठसका लागत नाही.
बटाट्या बरोबर शिंगाडे म्हणजे चेसनट्स घालता येतील.


Prajaktad
Wednesday, March 08, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर मला हेच विचारायचे होते कि भाजि जरा मसालेदार वाटतेय तर गोडसर चव कशि आणता येईल...
कारण , इथे us मधे करायचे म्हणजे पार्टिची भाजी जरा गोड्सरच हवि.


Sonchafa
Wednesday, March 08, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्राक्शातल्या बटाट्यांची कृती आणि सगळ्यांच्या comments वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटले.. पण इथे कोथिंबीरही मिळत नाही सहजी आणि मोहरीचे तेल मिळेल की नाही ह्याचीही शंकाच आहे.. रताळे मिळण्याची शक्यता अहे.. तशीच try करु का अजून चार महीने वाट बघू घरी जाईपर्यंत ह्याचा विचार करत्येय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators