बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुईला फार काही कोणी विचारत नाही, आ ची होणारी बायको आणि मेघा फार जुन्या मैत्रिणी आहेत >>>>>>> आ च्या होणार्या बायकोने जुईबरोबर काम केल होत 'पुढच पाऊल' मध्ये.

माहितेय ती मालिका अनेक वर्ष चाललेली पण बाहेर पडल्यावर जुई ला फार कोणी विचारत नाही, पार्टीत वगैरे दिसत नाही किंवा ती जात नसेल. एक स्मिताची पार्टी सोडली तर. channel कोणी विचारत नाही असं म्हणायचं नाहीये मला. हे bb वाले स्पर्धक आणि ती फारशी दिसत नाही एकत्र असं म्हणायचं आहे.

सर्व channelsची लाडकी आहे ती, काम मिळेल कारण तिने एक पाच वर्ष चालणारी मालिका केलीय, दुसरी सरस्वती केलीय. मला आवडत नसली तरी ती फेमस आहे पण जनसामान्यांना bb मध्ये आवडली नाही म्हणून तर तिचे एवढे fans असून बाहेर पडली.

आता बाहेर जुई सईची दोस्तीपण झाली असेल शत्रूचा शत्रू तो मित्र ह्या धर्तीवर Lol . आतमध्ये झिंज्या ओढायच्या एकमेकांच्या.

आस्ताद आणि सुशांतचं नाटक बघितलं. फार्सिकल नाटकं मला आवडत नाहीत त्यामुळे नाही आवडलं. प्रचंड गोंधळ, खूप पात्र, द्वयर्थी संवाद आणि सूचक हावभाव जे आजकाल सगळ्याच नाटकांमध्ये बहुतेक असतात (मी नुकतीच जी बघितली त्यात तरी असं होतं). पण खूप मोठ्याने हसणारे आणि नाटक मनापासून एंजाॅॅय करणारे होते त्यामुळे लोकांना हे आवडत असावं. आस्ताद बीबाॅमध्ये जसा धिप्पाड दिसायचा तसा अजिबात दिसत नाही, खूप बारीक आहे. कदाचित वजन कमी केले असेल. सुशांत गोरापान आहे आणि छान दिसतो. बीबाॅॅची लोकप्रियता कॅश करण्यासाठी ही नाटकं करण्याची टूम निघाली आहे असा अंदाज कारण रेशमही कधी नव्हे ते नाटक करत आहे.

जुईची नवीन मालिका येत आहे 'वर्तुळ' नावाची झी युवावर. जुई त्यात गृहिणी झालीये. मालिका हॉरर आहे अस प्रोमोवरुन वाटतय. >>> बघितला आत्ता प्रोमो, विकास पाटील हिरो आहे. विकासला कामे झटपट मिळतात मात्र. प्रवाह वरची त्याची हल्लीच संपली सिरीयल.

अन्जू कडे सिनेमा सिरीयलींचा डेटाबेस आणि इत्यंभूत माहिती असते. >>> Lol

गंमत म्हणजे त्यासाठी सिरियल्स बघायला लागतात असं काही नाही, न बघता सर्व समजतं. youtube, news channels, channels ची फेसबुक पेजेस हे जाऊन बघितलं की समजतं.

संपली का एकदाची लेक लाडकी. विकास पाटील छान दिसतो, छान काम करतो पण म्हणावं तसं एक्सपोजर नाही मिळालं अजून त्याला. झीच्या मालिकांमध्ये तर कधीच नसतो. कालच्या वास्तुरंगमध्येही जुईचे फोटो आहेत दिवाळीसाठी. यातही जुई टिपीकल सर्वगुणसंपन्न गृहिणी दिसत आहे.

कोण

यावेळीदेखिल मागच्यासारखं फॉलो करूयात.. >>> Lol

करूयात. पहिले आवडते नंतर नावडते होऊ शकतात. नावडते आवडते होऊ शकतात. आवडते कलाकार तिकडे जाऊन नावडते होऊ शकतात. फारसे न ओळखीचे आवडते होऊ शकतात, त्यांच्या वागण्याने. मोकळ्या मनाने बघूया परत.

एकच सिझन पाहिला मराठी आणि हिन्दीचा, पण पॅटर्न एकदमच समजलाय !
किती लोकं व्हिक्टिम कार्ड खेळणार, किती लोकांची जिवाभावाची मैत्री होऊन मग ती तुटून हाडाचे वैरी बनणार, किती लोक डिसलॉयल, पाठीत सुरा खुपसणे कॅटॅगरी, किती व्हिलन कॅटॅगरी, कोण क्राय बेबीज बनणार, कोण डंब , कोण गुडीगुडी इमेज जपणार, कोण फेक लव्हस्टोरी चालवणार, कोण ड्रामाक्वीन्/किंग बनणार, मांजरेकर कोणाला फेवर करणार, सोशल मिडीया कोणामुळे पेटणार आणि या सगळ्यातून कोण आवडणार/ कोण तरणार हे पहायचे !

हिंदी महाबोअर होतं मात्र त्यामुळे नाही बघितलं, दोन दोन मिनिटं youtubeवर बघितलं मध्ये मध्ये. मराठी पण बोअर होतंय म्हणता म्हणता बघितला पहिला सिझन. दुसरा पण बघायचा प्रयत्न करेन.

डीजे करेक्ट.

मोकळ्या मनाने बघूया परत. >>> +१११
एकच सिझन पाहिला मराठी आणि हिन्दीचा, पण पॅटर्न एकदमच समजलाय ! >>> +१११

तुम्हा सर्वांसारखीच मीही आतुरतेने वाट पाहतेय Happy

ह्यावेळी तरी प्रेक्षकांनी तेवढ्यापुरते वाद घालावेत. इथे नाही फार पण फेसबुक पेजवर काय भांडतात एकमेकांशी, काहीजण भाषेत पण खालच्या थराला जातात आणि ज्यांच्यासाठी भांडतात ते बाहेर येऊन एकमेकांच्या गळ्यात गळेही घालतात, शेवटी त्यांचं प्रोफेशन आहे हे.

मगाशीच पुष्कीच्या एका फिल्म प्रमोशनचा व्हिडीओ बघितला. सई, मेघा, पुष्कर, स्मिता एकत्र होते. सई आणि मेघा पुष्कीचे कौतुक करताना थकत नव्हत्या. स्मिताने मात्र मृणाल कुलकर्णीचं कौतुक जास्त केलं, तिने डायरेक्ट केलेला तो. पिक्चर फार काही चालला नाही बहुतेक. ती आणि ती नाव.

ज्यांच्यासाठी भांडतात ते बाहेर येऊन एकमेकांच्या गळ्यात गळेही घालतात, शेवटी त्यांचं प्रोफेशन आहे हे. >>>>>>> अगदी अगदी. म. टा. मध्ये शिल्पा नवलकरच्या घरी मेघा आस्ताद काळेच्या गफ्रेबरोबर बसलेला फोटो आलाय.

तुम्हा सर्वांसारखीच मीही आतुरतेने वाट पाहतेय >>>>>>>>> मी टू Happy

म. टा. मध्ये शिल्पा नवलकरच्या घरी मेघा आस्ताद काळेच्या गफ्रेबरोबर बसलेला फोटो आलाय. >>> त्या सगळ्या खूप जुन्या मैत्रीणी आहेत. मेघा म्हणून तर बिबि मधे म्हणायची ना की माझ्या मैत्रीणीचं, स्वप्नालीचं कसं होणार. नंतर आ का, हे सर्व आणि मेघाचा नवरा आदित्य ह्यांचाही व्हिडीओ बघितला एकत्र.

म. टा. मध्ये शिल्पा नवलकरच्या घरी मेघा आस्ताद काळेच्या गफ्रेबरोबर बसलेला फोटो आलाय. >>> त्या सगळ्या खूप जुन्या मैत्रीणी आहेत. मेघा म्हणून तर बिबि मधे म्हणायची ना की माझ्या मैत्रीणीचं, स्वप्नालीचं कसं होणार. नंतर आ का, हे सर्व आणि मेघाचा नवरा आदित्य ह्यांचाही व्हिडीओ बघितला एकत्र. >>>>>>>> ओहो, अस होत तर.

बिबि मधे म्हणायची ना की माझ्या मैत्रीणीचं, स्वप्नालीचं कसं होणार >>>>>> मी तर हे विसरुनच गेले होते.

Pages